१५ तारखेला आमची आई आम्हाला सोडून गेली...
वनिता सर्जेराव यादव..माझी आई..गेल्या दहा वर्षांपासून तिची तिच्या आजारांसोबत चाललेली झुंज संपली..अर्ध आयुष्य म्हणजे वय वर्ष ५०...ते सुद्धा ती पाहू शकली नाही..याचं खूप वाईट मला वाटलं..कारण तिच्या अतिशय लहान वयापासूनच ती प्रचंड खडतर आयुष्य जगली..तीचे वडील दुसऱ्यांकडे चाकरी करायचे..आई आणि तीची दोन लहान भावंड यांना टाकून त्यांची आई कुठेतरी निघून गेली..स्वतःचं घर नसल्याने..दुसऱ्यांच्या आधारावर जगत तिने जबाबदारी घेऊन दोन्ही भावंडांना मोठं केलं..त्यांची लग्न लावून दिली..आईचं लग्न ही त्यांच्या अगोदर फार लहान वयातचं झालं.. इकडे सासरीसुद्धा घरची परिस्थिती फार काही चांगली नव्हती..आमच्या घाटावरच्या बऱ्याच स्त्रिया मुंबईत घर चालवण्यासाठी घरात खानावळ ठेवतात..
आमच्या आजीने असंच ३०-४० लोकांचं जेवण बनवत तिच्या मुलांना वाढवलं होतं..वडिलांप्रमाणे आमच्या घरची सगळी पुरुष मंडळी रंग कामगार आहेत,त्यांच्या पैशात घर चालत नाही म्हणून..आईने देखील तेच करायचं ठरवलं आणि..जवळपास २० वर्ष प्रचंड कष्ट घेऊन माझ्या आणि अजिंक्यच्या शिक्षणासाठी आणि आम्हाला मोठं करण्यासाठी खानावळ चालवली..त्याचसोबत ती काही काळ आमच्या विभागातल्या इंडस्ट्रीच्या समोर लंच टाईमच्या वेळी जेवण विकण्यासाठी बसायची..वडिलांसोबत संसाराचा गाडा ओढत तिने आमची शिक्षणं पूर्ण केली..
मी कॉलेजचं शिक्षण न घेता ॲनिमेशन क्षेत्रात लवकरात लवकर कामाला लागलो..त्या पुढच्या काही वर्षात सगळं कर्ज फेडलं..घरात थोडी सुबत्ता आली..खानावळ बंद केली.. कष्ट कमी झाले..आईच्या चेहऱ्यावर त्या काळात खूप आनंद होता..पण आजीच्या आजारपणामुळे तिच्या सेवेत तिला त्रास सहन करावा लागला..मध्येच मनाला चटका लावणारी घटना घडली आणि आमचा मामा वारला..त्यात तिच्या म्हाताऱ्या वडिलांना गावी सांभाळणारं कोणी नाही..त्यामुळे त्यांनाही मुंबईत आणून त्यांची आजारपणात ते जाईपर्यंत सेवा केली..अपार कष्ट,मेहनत आणि त्रास.. मनमिळावू आणि देवभोळा स्वभाव.. जवळचीच नाही तर लांबची नाती देखील तिने शेवटपर्यंत टिकवून ठेवली.. सतत तिचे कॉल आणि व्हिडिओ कॉल वेगवेगळ्या नातेवाईकांसोबत चालू असायचे.. तास तासभर ती त्यांच्याशी बोलत असायची..त्यांच्या सुखदुःखात त्या ठिकाणी हजर असायची..आजारपणामुळे दहा वर्षात कधी तिची स्थिती खूप ढासाळायची कधी खूप छान असायची..मानसिकरित्या तिला सकारात्मक ठेवण्याचे आम्ही खूप प्रयत्न केले..
दोन दिवसांपूर्वी आमच्याशी छान बोलणारी आई.. घराचं स्वप्न कसं पूर्ण करता येईल..यासाठी चर्चा करणारी आई..असं अचानक आम्हाला पोरकं करून कशी गेली?..हे वय होतं का जाण्याचं? कसले हे आजार..जे इतक्या जवळच्या व्यक्तीला असं घेऊन जातात..थोडं थांबली असतीस आई..तर आपलं घर घेतलं असतं ना गं..आता काय फायदा त्या घराचा.. जिथे तू नाहीस..तुझे गौर्या आणि आजू तुझी सगळी स्वप्नं पूर्ण करणार होते..थोडं थांबायला हवं होतं..😣❤️



Discover the multitude of worlds in #Karnataka, a state that promises a rollercoaster of experiences! Beautifully captured by subodhshettyy (Instagram)
Experience the vibrant hues, exhilarating adventures, and mesmerizing performances at Rann of Kutch Utsav! Join us from November 23 to February 2024 for an unforgettable journey through the world's largest salt desert festival.
#RannOfKutchUtsav#ColorfulCulture #AdventureAwaits #coloursofindia #VisitIndiaYear2023
#Sunrise at Jal Mahal – a gentle reminder that some moments are too beautiful not to share. Big thanks to khatarnakjanab (Instagram) for capturing this magic.
📍 #Jaipur, #Rajasthan
Early morning visuals from Shri Kedarnath dham
From today , Baba will be in Samadhi in silence & stillness of Winter in absence of Humans
जय श्री केदार
Today is the 100th birth anniversary of Maharashtra's beloved humorist, Pu La Deshpande! Here's a small tribute to the legend... A series of 18 cartoons based on his popular literature. The words are all his, I've merely attempted to visualize :)
Situated near Malvan of Maharashtra, this is a route to the enchanting escape into the mesmerising beauty of Kokan. Leading up to the Kunkeshwar Mandir, It is full of magnificent sights that will just force you to live in the moment and appreciate the grandeur of nature.