बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरींचं म्हणणं आहे की पोलिसांनी एखाद्याचं एन्काऊंटर करण्याआधी त्याची जात विचारली पाहिजे😡
मुख्यमंत्रीसाहेब नेमक्या कोणत्या जातीच्या लोकांना गोळी घालायची ते पण सांगून टाका 😒
आज सकाळी सकाळी कोणतीही दयामाया न दाखवता पेट्रोल डिझेलच्या किंमतीत डायरेक्ट हो डायरेक्टच 2.61 आणि 2.71 रुपयांची वाढ केली
बाकी पेट्रोल डिझेल मिळत की नाही मिळतं याचं काही घेणें देणं नाही ते तुम्ही बघून घ्या...
आपसांत भिडा डोके फोडा नाहीतर गाणे गा....
महंगाई डायन खाए जातं है...
Dr मनमोहन सिंग यांच्यासारखी अर्थव्यवस्था कोणीच चालवू शकत नाही हे खऱ्या अर्थशास्त्री ने समजावून सांगितल्यावर अंजना ला त्रास झाला.
अंजना म्हणतीये, "5 किलो राशन देतोय ना"
यावर अर्थशास्त्री ने काय धुतलंय. जबरदस्त 🔥🔥
माकडाच्या हाती दिला कारभार...
अमेरिका - इराण युद्धाचे कारण सांगून नरेंद्र मोदींनी देशावर फार मोठे आर्थिक संकट लादले आहे. खरंतर आपल्या १२ वर्षांच्या अपयशी कारभाराचे खापर फोडण्यासाठी त्यांना अमेरिका - इराण युद्धाचे निमित्तच मिळाले आहे.
आखाती देशांमध्ये पहिल्यांदा युद्ध होतंय का ??
नाही.. हा भाग गेल्या दोन - तीन दशकांत अनेकदा युद्धाने होरपळला आहे. पण त्या युद्धाचे चटके भारतीय नागरिकांना फारसे जाणवले नाहीत, कारण काँग्रेसच्या नेतृत्वात भारतात एक सक्षम व देशाचे हित जोपासणारे सरकार होते. अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यानंतर अवघ्या काही महिन्यात अमेरिकेने इराकवर हल्ला चढवला, याच काळात अमेरिका - अफगाणिस्तान संघर्ष ही शिखरावर होता. आत्ताच्या अमेरिका - इराण संघर्षापेक्षाही त्यावेळी अमेरिका-इराक, अमेरिका-अफगाणिस्तान युद्धांचे स्वरूप अधिक व्यापक होते. तरीही भारतात इंधनाचा पुरेसा साठा होता, आजच्या प्रमाणे इंधनासाठी कोणाला चाकू भोसकल्याच्या, हाणामारी झाल्याचा घटना त्यावेळी घडल्या नाहीत. इंधनाचे दरही २२ रुपये प्रति लिटर ते ३३ रुपये प्रति लिटर यादरम्यान होते.
२०१० चे दशक "अरब स्प्रिंग"ने गाजले. केवळ इराण, इराक नव्हे, तर संपूर्ण अरब जगत त्यावेळी अस्थिर झाले होते. ट्युनिशिया, लिबिया, इजिप्त, येमेन, सीरिया, बहरीन, मोरोक्को, इराक, अल्जेरिया, लेबनॉन, जॉर्डन, कुवेत, ओमान, सुदान, जिबूती, मॉरिटानिया, पॅलेस्टाईन, सौदी अरेबिया, पश्चिम सहारा असा संपूर्ण मिडल ईस्ट त्यावेळी धुमसत होता. पण, त्याची फारशी झळ भारताच्या अर्थव्यवस्थेला, भारतातील नागरिकांना जाणवली नाही. या काळातही भारतात पेट्रोल व डिझेलचा भरपूर साठा होता, डिझेल ४० रुपये लिटर, पेट्रोल ५५ ते ६० रुपये लिटर मिळत होते. कारण, जागतिक संकटांपासून भारतीय अर्थव्यवस्थेचे, भारतीय नागरिकांचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात प्रामाणिक सरकार त्यावेळी अस्तित्वात होते.
प्रत्येक जागतिक संकटाचा भारताने यशस्वी सामना केला. मात्र, त्यानंतर खोटे स्वप्न, माध्यमांना ताब्यात घेऊन केलेला खोटा प्रचार या बळावर नरेंद्र मोदींनी भारतीय नागरिकांची फसवणूक केली, भारतातील सत्ता हस्तगत केली आणि देशावर "नरेंद्र मोदी" नावाचं संकट आलं. देशाचे हित जोपासणे, देशातील नागरिकांची प्रगती साधणे हे मोदी सरकारचे ध्येय कधीच नव्हते. जात - धर्म - पंथ यांच्यात द्वेषाच्या भिंती उभ्या करणे हे एकमेव ध्येय घेऊन मोदी सरकार सत्तेत आले. २००८ साली कच्च्या तेलाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात १४७ डॉलर प्रति बॅरल झाली, २०१३-१४ सालीही कच्चे तेल १२० डॉलर प्रति बॅरल झाले होते, तरीही भारतात पेट्रोल डिझेलचे दर ५०-६५ रुपये प्रति लिटर यादरम्यान होते. नरेंद्र मोदींची सत्ता आल्यानंतर त्यांच्या नशिबाने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर ७० डॉलर ते ४५ डॉलर प्रति बॅरल इतके कोसळले. या काळात देशांतर्गत पेट्रोल/डिझेलचे दर कमी करून जनतेला दिलासा देणे शक्य होते. मात्र, असे न करता नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या उद्योगपती मित्रांची तिजोरी भरण्याला प्राधान्य दिले. संपूर्ण जगात इंधन स्वस्त असताना भारतात मात्र इंधनाचे दर गगनाला भिडले. याचाच परिणाम म्हणून देशातील प्रत्येक वस्तूचे दर वाढले. आपल्या काही उद्योगपती मित्रांची चंगळ करण्यासाठी नरेंद्र मोदींनी देशातील प्रत्येक नागरिकाला लुबाडले.
आता अमेरिका - इराण युद्धाचे कारण पुढे करून नरेंद्र मोदींनी देशाला बचत करण्याचे आवाहन केले. अमेरिका - इराण युद्ध २८ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झाले. लोकसभेचे विरोधी पक्ष नेते तथा काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय श्री. राहुलजी गांधी यांनी तेव्हाच देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत, इंधनाच्या उपलब्धतेबाबत सरकारला सावध केले होते. मात्र, अहंकारात नखशिखांत बुडालेल्या नरेंद्र मोदी व त्यांच्या मंत्र्यांनी राहुलजी गांधी यांच्या इशाऱ्याची खिल्ली उडवली. भारताची अर्थव्यवस्था भक्कम आहे, भारतात इंधनाचा पुरेसा साठा आहे असं मोदींच्या मंत्र्यांनी जाहीरपणे सांगितलं. अर्थात त्यांचा हा खोटारडेपणा फक्त आणि फक्त पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी येथील विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी होता हे पुढे सिद्ध झालेच. निवडणुका संपताच नरेंद्र मोदींना अचानक अमेरिका - इराण युद्ध सुरू असल्याची उपरती झाली. "अच्छे दिन आने वाले है" म्हणत सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदींनी "बुरे दिन आने वाले है" अशी जाहीर कबुली दिली. हे "बुरे दिन" म्हणजे अमेरिका - इराण युद्धाचा परिणाम नाही, १२ वर्षांपासून नरेंद्र मोदींनी आपल्या अनागोंदी कारभारातून जो अव्यवस्थेचा मनोरा उभा केला, तो मनोरा आता कोसळतोय. आज देशात इंधनासाठी लोक एकमेकांचा जीव घेण्यास तयार आहेत, जनतेच्या मनात प्रचंड असंतोष आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे , उद्धवसाहेब ठाकरे हे जागा वाटप चर्चेसाठी आजपर्यंत कधीच दिल्लीला गेले नाहीत. पण मला जागा द्या ना बोलत आजपर्यंत कधीच कोणते स्वाभिमानी ठाकरे दिल्लीला गेले नाही. स्वाभिमानी ठाकरेंसोबत जागा वाटप मुंबईतच होते..!!
@AUThackeray