@ekikaranmarathi@CPMumbaiPolice@Dev_Fadnavis@mieknathshinde@NiteshNRane@TawdeRitu छट पूजा महाराष्ट्रात इतक्या ग्रँड स्केल वर करण्यामागे निव्वळ शक्तीप्रदर्शन आणि लांगुलचालन एवढंच उद्दिष्ट दिसत आहे!
ह्या लोकांनी भारंभार लोकसंख्या वाढवायची, पोटं भरायला लोंढ्याने इतर राज्यांमध्ये जायचे आणि अशाप्रकारे स्वतःची संस्कृती लादायचा प्रयत्न करायचे, हे खूप चीड आणणारे आहे!
महाराष्ट्राचे समुद्रकिनारे नव्हे तर सगळी तलावे , नद्या आज अशा घाण केल्या आहेत. मात्र काल आयोजक असणारे भाजपचे, शिंदेचे नेते किंवा कोणताही बिहारी ही घाण साफ करायला रस्त्यांवर उतरला नाही.
त्यांना इथली काहीही पडलेली नाही आहे , ते घाण करणार आणि जाणार. #ChhathPuja
#ExpressInvestigation | ADANI Green Energy Ltd, a renewable energy company owned by the Adani Group, has sought to sharply revise downwards the cost of its 1,500 megawatt hydropower project in Maharashtra’s Satara district to Rs 56.75 crore from Rs 5,675 crore, according to documents and records reviewed by The Indian Express.
Read more: https://t.co/hMVOehArLS
#ExpressInvestigation | Adani Green Energy revised the estimated cost of its 1,500 MW Tarali Pumped Storage Project in Maharashtra from Rs 5,675 crore to Rs 56.75 crore, sharply reducing the amount it was required to deposit towards wildlife conservation.
The revised estimate has now come under scrutiny, with the Centre directing a probe into the matter. Here’s what led to the investigation and the questions raised over the revision.
🔗 https://t.co/jdWwhwcJYV
Written by: Chandan Haygunde
Hello @rahulkanwal, Did you ask any questions to PM @narendramodi during #DiwaliMilan or were you busy with selfies too?
Any questions to PM Modi on SIR, Gyanesh Kumar, Pollution? Inflation? No? Ok.
भारतीय जनता पक्ष हा एक अजब पक्ष आहे. जो खालपासून वरपर्यंत सत्तेत आहे तरीही लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढत आहे. हे जगातील एकमेव उदाहरण असेल जिथे सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाच्या विरोधात मोर्चा काढतो. बरं लोकशाहीची बूज राखायची खरोखर इतकी इच्छा असेल तर गोकुळ प्रकरणात तुमच्या भाजप पॅनलचे १२ विरोधात सतेज पाटील पॅनलचे १३ जण निवडून आल्यावर लगेच तुम्ही सरकारचे ( म्हणजे तुमचेच) ५ संचालक का नेमले आणि त्यांना मतदानाचा अधिकार देऊन काय सिद्ध करताय तुम्ही ? बरं ते बॅलेट मतदान पद्धतीने आणि लोकशाही मार्गाने निवडणूक लढवून निवडून आले. तुम्हाला खरंच लोकशाहीची पर्वा किंवा काळजी वाटत असती तर हा असला प्रकार तुम्ही केला नसता. गोकुळवर तुम्हाला सत्ता मिळवता नाही आली म्हणून तुम्ही लगेच तुमची सगळी तत्त्व बाजूला ठेवणार आणि म्हणे लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढणार. सध्या महाराष्ट्रात पाण्याचा भीषण दुष्काळ आणि भारतीय जनता पक्षात समजूतदारपणाचा भीषण दुष्काळ एकाच वेळी कसा यावा, याचंच आश्चर्य वाटतं !
सत्तेत असताना ते लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढतील आणि स्वतःच लोकशाहीचा गळा आवळतील. यांच्या काळात अतिरेकी हल्ले झाले, कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणून दहशतवादापासून देश वाचवा यासाठी मोर्चे काढतील. देशाची अर्थव्यवस्था गाळात गेली आहे म्हणून आता अर्थव्यवस्था वाचवा साठी पण मोर्चे काढतील.
भारतीय जनता पक्षाने रडीचा डाव खेळणं बंद करावं. कुठल्या का मार्गाने तुम्ही जे बहुमत मिळवलं ते सर्व विरोधी पक्षांनी १२ वर्षे सहन केलं मग आता विरोधी पक्षांकडे या देशातील जनता झुकायला लागली आहे तर त्यापुढे भाजपाने पण सहन करायला शिकले पाहिजे !
राज ठाकरे ।
चलिए, अडानी जी के NDTV पर ही बहस कर लेते हैं, मोदी जी।
मंच आपका, जज भी आपका - अडानी जी हों या मोहन भागवत जी।
मैं गारंटी देता हूँ - सिर्फ़ 5 मिनट में साबित कर दूँगा कि नरेंद्र मोदी देशद्रोही हैं।
अमिताभ बच्चन यांचा फॅन्सना भेटतानाचा त्यांच्या घराबाहेरील व्हिडिओ व्हायरल होतोय, ते नेहमीच चाहत्यांना भेटत असतात पण या व्हिडीओत ते बुलेट प्रुफ काचांमध्ये आहात, आणि सोबत मुलगा अभिषेक बच्चनही त्यांच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेताना दिसतोय. ही केवळ एका अभिनेत्याची परिस्थिती नाही, तर मुंबईतील अनेक सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न बनला आहे. खंडणीच्या मागण्या, धमक्यांचे फोन आणि जीवाला धोका, हे मुंबईचे नवे वास्तव बनत चालले आहे.
मुंबई-महाराष्ट्रातील नेते आणि अभिनेत्यांना बिश्नोई गँगकडून मिळणाऱ्या धमक्या असोत, टायगर श्रॉफच्या घराजवळ झालेला गोळीबार असो, काल महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये झालेली लुटमार, ठाण्यातील पूर्णेकरांची हत्या, महिलांवरील रोजचे अत्याचार, पुण्यातील कोयता गँगची दहशत किंवा आज पुणे, ठाणे, सोलापूर, सातारा, बीड आणि हिंगोली येथील जिल्हा न्यायालयांना आलेले धमकीचे ई-मेल असोत…प्रत्येक घटनेतून राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत. महाराष्ट्राचा गृह विभाग नेमका करतोय काय? महाराष्ट्राची कायदा व सुव्यवस्था ‘पांडू हवालदार’ देवेंद्र फडणवीसांच्या हाती कशी गंडलेली आहे आणि राज्याच्या गृहखात्यावर त्यांचे नियंत्रण नाही, हेच या वरील घटनांवरून सिद्ध होते. महाराष्ट्राला कणखर गृहमंत्री हवा आहे; ‘पांडू हवालदार’ गृहमंत्री नको!
#Maharashtra #LawAndOrder #DevendraFadnavis #MaharashtraUnsafe #कायदा_सुव्यवस्था #गृहमंत्री_अपयशी #महाराष्ट्र_असुरक्षित #जनतेला_सुरक्षा_हवी
So BJP Leader @AmeetSatam attacks @mybmc for sharing promotional video by Dia Mirza because of her 'Muslim sounding' name but avoids targetting other celebrities. @mybmc was forced to delete video Dis Mirza but hasn't deleted other videos on Diwali Firecrackers restriction.
Dear Mrs. Sitarama,
1.Which "legal and commercial matter" required Tata Trusts and Tata Sons to be hosted at Amit Shah's residence?
2.When is crony number 1 going to appear in the game and which pieces of Tata is he going to get?
Finally, all India's businesses except 3-4 of your cronies, already hate all of you and don't need any incitement.
गौतम अदानी आणि नरेंद्र मोदी यांचा दोस्ताना कसा जुना आहे, आणि यातून अदानींच्या घशात भारतीय उद्योग विश्व कसं घातलं जात आहे याची पूर्ण माहिती देणारी सबीर भाटिया यांची डॉक्युमेंट्री मी माझ्या सोशल मीडियावर शेअर केली. त्याला ४८ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज फक्त ट्विटरवर मिळाले, फेसबुकवर देखील प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. हे झाले माझ्या सोशल मीडियावरचे व्ह्यूज, बाकी लोकांनी शेअर केलं ते वेगळं आणि त्यातून मिळालेले व्ह्यूज याची मोजदादच नाही.
थोडक्यात हा गंभीर विषय लोकांपर्यंत पोहचला पाहिजे ही माझी इच्छा होती, तो हेतू साध्य झाला. अर्थात सबीर भाटियांनी ही डॉक्युमेंट्री आत्ता बनवली. पण त्याच्या आधीच जानेवारी २०२६ ला मुंबईतील शिवतिर्थ येथून मी एक मोठं प्रेझेंटेशन केलं होतं, ज्यात अदानीं समूह शब्दशः हा देश कसा गिळंकृत करायला निघाला आहे हे दाखवलं होतं.
त्याला अद्वितीय असा प्रतिसाद मिळाला. ते व्हिडीओज आजही माझ्या सोशल मीडियावर आहेत. आम्ही जे सादरीकरण केलं त्यातल्याच काही क्लिप्स या डॉक्युमेंट्रीत पण वापरल्या गेल्या. असो.
या विषयाच्या बाबत मी माझी भूमिका या आधी अनेकदा स्पष्ट केली आहे. माझा व्यक्तीला विरोध नाही तर एकाधिकारशाहीला विरोध आहे. मी माझ्या भाषणातून अनेकवेळा सांगितलं की पंतप्रधानांनी देशातील अनेक उद्योगपती मोठे करावेत आणि ज्यातून प्रचंड रोजगार या देशात निर्माण करावा आणि प्रचंड पैसा या देशात निर्माण व्हावा! तसेच या देशातील अनेक उद्योगपतींना जग पादाक्रांत करण्याची शक्ती द्यावी.
पण ते सोडून जर एकाचेच लाड करणार असाल आणि त्याने देशाला धोका निर्माण होणार असेल तर आमचा त्याला विरोध आहे आणि यापुढेही राहील. त्यामुळे अदानीच काय कोणाच्याही एकाधिकारशाहीला विरोध असणारच आहे.
आत्ता देखील आपल्या भीमाशंकर येथील काहीशे हेक्टर वनजमीन गुजरात मधल्या टोरेंट कंपनीच्या घशात घालायला राज्य सरकारला केंद्र सरकारने सांगितलं आहे. महाराष्ट्रातल्या अनेक वनजमिनी या सरकारने ठरावीक मित्र मंडळी उद्योगपतींच्या घशात घातल्या आहेत आणि अजुन घालायच्या ठरवल्या आहेत ! आज कोण कुठच्या पक्षात आहे याच्याशी मला काही देणे घेणं नाही, परंतु आपण या महाराष्ट्राचे नागरिक आहोत आणि आपल्या डोळ्यांदेखत महाराष्ट्र विकला जातोय हे बघताना तुमची तळपायाची आग मस्तकात कशी जात नाही याचंच मला आश्चर्य वाटतं ! महाराष्ट्रातल्या आपल्या मराठी खासदारांना , आमदारांना, मंत्र्यांना हे आपल्या डोळ्यांसमोर घडतंय याचा राग सुद्धा येत नाही ? सत्तेसमोर इतकं शरण जाणं हे महाराष्ट्राच्या इतिहासाला, परंपरेला आणि संस्कृतीला शोभणारे नाही. कशाला मग आपल्या शिवछत्रपतींच्या घोषणा देता आणि महाराष्ट्र गीत गाण्याचा फार्स करता ? असो..
पण सबीर भाटिया यांची डॉक्युमेंट्री शेअर केल्यावर तिला इतका प्रचंड प्रतिसाद आला की, वरच्यांच्या पोटात गोळा उत्पन्न होणे आणि आपलं गुपित फुटलं याची भीती निर्माण होणं हे स्वाभाविक होतं. पण ती इतकी तीव्र असावी की मला मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या मार्फत ही डॉक्युमेंट्री काढावी अशी विनंती केली गेली असावी.
मुळात मला जे म्हणायचं होतं ते जानेवारी २०२६ च्या सभेत आणि पुन्हा या डॉक्युमेंट्रीला पोस्ट करण्याच्या निमित्ताने केलं गेलं; यातून देशाचं प्रबोधन होणं हाच उद्देश होता आणि आहे ! पण मला आलेली विनंती ही मुंबई पोलीस आयुक्तांची आहे. मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वात कार्यक्षम पोलीस दल आहे आणि माझ्या मनात नेहमीच त्यांच्याबद्दल आदर राहिला आहे. अशा मुंबई पोलिसांच्या प्रमुखाने केलेल्या विनंतीचा मान राखतोय इतकंच.
म्हणून ही डॉक्युमेंट्रीची पोस्ट मी डिलीट करतोय. बाकी जी आग लागायची ती लागली आहे. जानेवारी २०२६ ला शिवतीर्थावरून मी या देशातील एकाधिकारशाहीच्या विरोधात ठिणगी टाकली तिचा वणवा पेटला आहे. आमचा लढा सुरु आहे. जानेवारी २०२६ ची आमची पोस्ट अजून तिथेच आहे आणि तिथेच राहील.आम्ही शेअर केलेली डॉक्युमेंट्री दुसऱ्यांनी बनवली होती ती पण लोकांपर्यंत पोहचावी हा उद्देश होता जो साध्य झाला. या विषयावर आम्ही केलेली अभ्यासपूर्ण मांडणी ही या निमित्ताने पुन्हा समोर आणतोय. आमच्या जानेवारी २०२६ च्या प्रेझेंटेशनचा भाग परत इथे देतोय. परत एकदा नक्की बघा..