शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील आडोशी–अंजनावळे आणि भोरांडे परिसरात प्रस्तावित असलेल्या अदानी समूहाच्या १,५०० मेगावॅट क्षमतेच्या माळशेज घाट–भोरांडे पंप स्टोरेज प्रकल्पाबाबत आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली.
हा प्रकल्प आदिवासीबहुल क्षेत्रात उभा राहत आहे. बाधित होणाऱ्या कुटुंबांपैकी ९३ टक्के लोक अनुसूचित जमातीचे आहेत. पेसा कायद्यानुसार अशा क्षेत्रात ग्रामसभेची पूर्वसंमती बंधनकारक असते. मात्र आजपर्यंत एकाही ग्रामसभेची संमती घेण्यात आलेली नाही. अंजनावळे ग्रामपंचायतीने २०२३ मध्येच प्रकल्पाविरोधात ठराव करून प्रशासनास दिला होता, त्याकडेही दुर्लक्ष झाले.
प्रकल्पाच्या पर्यावरणीय परिणाम अहवालातही अनेक गंभीर त्रुटी आहेत. जनसुनावणी २१ ऑगस्टला होणार असताना, मे महिन्यातच तयार झालेल्या अहवालात मात्र जनसुनावणीनंतर सुधारणा केल्याचा उल्लेख आहे. तीन ऋतूंच्या सर्वेक्षणात एकही सस्तन प्राणी आढळला नाही असे हा अहवाल सांगतो. नाणेघाटच्या संवर्धन राखीव क्षेत्राचा आणि वन्यजीव कॉरिडॉरचा उल्लेखच त्यात नाही. भूस्खलनाचा स्वतंत्र अभ्यास झालेला नाही.
हे सर्व मुद्दे मांडल्यानंतर पत्रकार परिषदेतूनच पुणे जिल्हाधिकारी मा. जितेंद्र डूडी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून २१ तारखेची जनसुनावणी रद्द करण्याची मागणी केली. या मागणीला प्रतिसाद देत जनसुनावणी रद्द करण्याबाबतचा आदेश काढण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच १९ तारखेला सर्व लोकप्रतिनिधी आणि बाधित गावांतील सरपंच यांची एकत्रित बैठक घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले. जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचला, ही समाधानाची बाब आहे.
ऊर्जा साठवणुकीची देशाला गरज आहे, याबद्दल दुमत नाही. विकासाला आमचा विरोध नाही. मात्र नियम वाकवून, ग्रामसभेला डावलून आणि सह्याद्रीचा ऱ्हास करून लादला जाणारा प्रकल्प मान्य नाही. सर्व अभ्यास पूर्ण होईपर्यंत मंजुरी प्रक्रिया स्थगित करावी, ही आमची मागणी कायम आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक शेतकऱ्याच्या आणि भूमिपुत्राच्या हक्कासाठी शेवटपर्यंत लढत राहू. हा विषय संसदेत मांडूच आणि वेळ पडल्यास रस्त्यावरही उतरू.
या पत्रकार परिषदेत सादर केलेले संपूर्ण सादरीकरण पत्रकार बांधवांसाठी आणि हा विषय समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी उपलब्ध करून देत आहे. लिंक खाली दिली आहे.
https://t.co/idW06fCMVr
#shirur #pune #malshejbhondarehydroelectricproject #junnar #shivjanmabhumi #ambegaon #khed #amolkolhe
लोकशाहीचा उत्सव म्हणजे मतदान!
आज रोहिणी ताई चिमटे यांच्यासोबत पुणे महापालिकेसाठी मतदान केले. 🗳️
आपणही मतदान करून आपल्या प्रभागाच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान द्या.
Happy Independence Day
We are a passionate team of photographers and cinematographers, capturing weddings and events with a natural, joyful and creative touch.
Let us capture your special moments beautifully — get in touch today!
https://t.co/1k6bYUd6bu
समाजाच्या प्रत्येक चळवळीत, आंदोलनात, साहित्यिक क्षेत्रात अजून इतर सर्व क्षेत्रात खूप मोलाचे योगदान देणारे परंतु प्रसिद्धी पासून दूर राहणारे अश्या दिग्गज मित्रांसोबत...
खूप वेदना झाल्या. मला कळायला लागल्यापासून तरी मी ही पहिली घटना पाहिली की छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला आहे. तो ही थेट पंतप्रधानाच्या हस्ते अनावरण झालेला पुतळा ! पुतळा एवढा जुना ही नाही की नेहरुंच्या किंवा इंदिराजींच्या काळातला होता... मोदीजीच्या हस्ते उद्घाटन झालेला पुतळा होता हा. दहा वर्षांपुर्वीचा नाही, अगदी परवा-परवा. इलेक्शनच्या चारपाच महिने आधी. राममंदिराच्या दिड महिना आधी. त्यानंतर फक्त २६६ दिवसांत ही नामुष्की आणणारी दुर्घटना घडते !
यांच्या हस्ते उद्घाटनं झालेल्या विमानतळांची छतं कोसळताना आपण पाहिली... पुल कोसळताना पाहिले... पुलांना भेगा पडलेल्या पाहिल्या... बोगदे पाण्यानं तुंबलेले पाहिले...रस्ते खचलेले पाहिले... राममंदिराचा गाभारा गळताना पाहिला... नविन संसदेचा मार्ग पाण्याखाली गेलेला पाहिला... जगापुढे लाजेने मान खाली जावी अशा या घटना. पण त्या सगळ्यावर या घटनेनं मात केली.
त्यांना टीकाकार 'पनौती' वगैरे म्हणतात ते मला अजिबात आवडत नाही. एक तर असं कुणाला म्हणणं चुकीचं आहे. पनौती ही अंधश्रद्धा आहे. एकदा दुर्दैवावर गोष्ट ढकलून दिली की आपण यामागचा कारणकार्यसंबंध शोधणं सोडून देतो. नेहरूंच्या काळापासून बांधलेले पुल, रस्ते, इमारती आणि पुतळे सत्तर-पंचाहत्तर वर्षे भक्कम उभे असतात... आणि आजकाल गाजावाजा करत, प्रचार करत हजारो करोड खर्चून, स्पेस टेक्नाॅलाॅजी वापरून बांधलेलं सगळं एका वर्षाच्या आत पत्त्याच्या बंगल्यागत कोसळतं, याचं कारण पनौती नसतं. मग काय?
'भ्रष्टाचार, घोटाळे आणि निकृष्ट बांधकाम.' बस्स.
दुसरं काहीही नाही. पनौती म्हणून हसण्यावारी नेण्यापेक्षा आपण तर्कशुद्ध विचार करूया. हा भ्रष्टाचार आता थेट छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या बाबतीतही होऊ लागला, हे भयानक आहे ! स्वातंत्र्यानंतरच्या पाऊणशे वर्षांतल्या भ्रष्टाचाराच्या होत्या-नव्हत्या त्या सगळ्या मर्यादा आज ओलांडल्या गेल्या आहेत. कहर झाला आहे. धोक्याची घंटा आहे ही. भ्रष्टाचार्यांच्या विळख्यात संपूर्ण देश जखडला गेल्याचा हा सिग्नल आहे.
अजून तरी होय जागा... तुका म्हणे पुढे दगा !
- किरण माने.
पूर्वी मतदानाच्या आदल्या रात्री झोपडपट्टीतील पुरुष मतदारांना दारू पुरवली जायची. रबराच्या फुग्यातून यायची आणि रसदान केलं जायचं. मग गावठीची चपटी दिली जाऊ लागली. मग थोडीबहुत रोख रक्कम. पण हे सगळं व्हायचं रात्रीच्या अंधारात. चोरुन. मध्यमवर्ग नाक मुरडायचा. झोपडीवाले मत विकतात म्हणून