मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या काळाचौकी विभागात असंख्य दुर्मिळ मराठी पुस्तकं वाचकांची वाट पाहत धूळ खात पडून आहेत. सध्या त्या ग्रंथालयाचे सभासद फारच कमी आहेत. भविष्यात हे एवढं निम्मित करून कदाचित ते बंदही पाडलं जाईल. मग नंतर एकेदिवशी ते बंद पडल्यावर व्हॉट्सअँपवर हळहळ आणि दुःख व्यक्त करण्यात काहीही अर्थ नाही.
त्यामुळे हीच ती वेळ. ग्रंथालयाला भेट द्या. तिथली पुस्तकं चाळा, निवडा, वाचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ताबडतोब त्याचे सभासद व्हा. फक्त ७० रुपये महिना एवढीच नाममात्र फी आहे.
ही जाहिरात नाही. ही कळकळीची विनंती आहे.
या मराठी ग्रंथालयाचं अस्तित्व हेच त्या परिसरातील मराठी समाजाचं अस्तित्व आहे आणि हे मराठी ग्रंथालय बंद पडणं म्हणजे महाराष्ट्रधर्म कमकुवत होणं आहे.
त्यामुळे आपल्या म��ाठीसाठी, महाराष्ट्रधर्मासाठी आणि मराठी समाजाची एकूणच विचार करण्याची क्षमता वाढावी यासाठी एवढं तरी आपण नक्कीच करू शकतो. (केलंच पाहिजे!)
ग्रंथालय मंगळवार ते शनिवार सकाळी ८ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत आणि रविवारी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू असतं.
सोमवारी साप्ताहिक संपूर्ण दिवस बंद.
वाचा, विचार करा, सभासद व्हा आणि इतरांनाही सांगा.
जय मराठी, जय महाराष्ट्र
#महाराष्ट्रधर्म #मराठीकारण
आर्टिफिशियल इंटेलिजन्स ❤️
आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा तांत्रिक विषय आहे,परंतु अच्युत गोडबोले सरांची ओळखच अशी आहे की ते तांत्रिक विषय अगदी विद्यार्थी पासुन ते वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना ते समजेल या भाषेत मराठीत विपुल लेखन करणारे लेखक अशी त्यांची ओळख आहे.
n/1
घुमक्कडी
लेखिका - कविता महाजन
हे एक अपारंपारिक प्रवास वर्णन आहे, ज्यात प्रवासातल्या विविध ठिकाणच्या निसर्ग किंवा व्यक्���ी ऐवजी परिसरातील कथा, दंतकथा, लोककथा, अख्यायिका, मिथकं या सगळ्यांचे आगळेवेगळे संकलन आहे. सृष्टी, निसर्ग आणि सामाजिक मूल्यांवर 👇
@LetsReadIndia @PABKTweets
नटरंग
लेखक - आनंद यादव
लोककला आणि कलावंतांच्या उपेक्षित आयुष्याशी प्रामाणिक राहून, भ���वनांच्या तीव्रतेने मनाला हादरवणारी ही कादंबरी वाचकाला अत्यंत अस्वस्थ आणि अंतर्मुख करते. कलावंतांचे दारिद्र्य आणि त्यांच्यातील कलात्मक ऊर्जा याचसोबत ग��रामीण 👇
@LetsReadIndia @PABKTweets
मंद्र
लेखक - एस एल भैरप्पा
अनुवाद - उमा कुलकर्णी
या कादंबरीसाठी एस एल भैरप्पा यांना मानाचा 'सरस्वती सन्मान' मिळाला आहे. शास्त्रीय संगीत, कलाकाराचे समर्पण आणि नैतिक मूल्ये यांच्या संघर्षावर आधारित कथानक असुन ही कादंबरी कन्नड साहित्���ातील 👇
@LetsReadIndia @PABKTweets
विठोबा मिसिंग इन पंढरपूर
लेखक - विनायक होगाडे
वैचारिक आणि उपरोधिक सामाजिक भाष्य करणारी ही वेगळ्या धाटणीची कादंबरी असून श्रद्धेचा बाजारूपणा आणि पोकळ कर्मकांड यांच्यावर टीका करीत अतिशय मार्मिक आणि खुसखुशीत भाषेत समाजातील दांभिकतेवर 👇
@LetsReadIndia@PABKTweets@HogadeVinayak
आज बाल दिवस आणि ह्या अनुषंगाने बाल्यावस्थेतील मुलांच्या अपेक��षा विरोधाभास स्वरूपात कर्तव्य कठोर व्यवहारात व्यस्त असलेले पालक ?
ह्या संदर्भातील यथार्थ दर्शन-
(एक शतकांपूर्वी प्रकाशित कथा 'अंगणातला पोपट' वाचन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.)
https://t.co/BzQ4zV4C64
डाॅन संथ वाहतच आहे
लेखक - मिखाईल शोलोखोव्ह
अनुवाद - नरेंद्र सिनकर
अँड क्वायट फ्लोज द डाॅन या मुळ रशियन कादंबरीचा अनुवाद. ही कादंबरी विसाव्या शतकातील रशियन साहित्यात युद्ध आणि शांती प्रमाणेच अत्यंत महत्त्वाची मानली जाते, 👇
@LetsReadIndia. @PABKTweets
गावाकडे पाहिलं की पहिल्यांदा दिसतांत ती शेतं. त्या शेतांबर घाम गाळणारा शेतकरी, कधी उन्हात तळपत उभा राहणारा, तर कधी पावसात चिंब भिजूनही आपल्या पिकाच्या मागे धावणारा. या जमिनीशी, मातीशी, बैलजोडीशी, कुस्तीच्या फडाशी आणि आपल्या भावकीशी गुंफलेलं आयुष्य म्हणजेच गावाचं खरं रूप.
पुस्तकाचे नाव - दु:खाचे श्वापद
लेखक - रंगनाथ पठारे
ही कादंबरी फक्त वाचली जात नाही, वास्तवतेच्या भावनिक कल्लोळात वाचकाला बोचकारत राहते. हृदयात एक वादळ घोंघावत राहतं जे शेवटपर्यंत पाठ सोडत नाही, श्वापदाच्या रुपातले भयावह वर्तमान किती दाहक आहे हे 👇
@LetsReadIndia. @PABKTweets
देवी रक्षति रक्षित:
लेखिका - सारिका कंदलग��वकर
पौराणिक कथा, आख्यायिका, दंतकथा, अध्यात्म, या सगळ्याचा संदर्भ वर्तमानाशी जोडून एक थरारक, गुढरम्य, वेगवान कथानक वाचकांचा ताबा घेते. हे कथानक आध्यात्मिक, पौराणिक, पार्श्वभूमीवर असले तरीही यातील सगळी 👇
@LetsReadIndia. @PABKTweets
आजीबाईची शाळा ❤️❤️
"गावातील एका उत्सवात धर्मग्रंथांचे वाचन झाले तेव्हा अनेक आजींनी शाळेत न जाऊ शकल्याची खंत व्यक्त केली. म्हणूनच आमच्या गावातील प्रत्येक आजीचे शाळेत जाण्याचे स्वप्न पूर्ण करून गावात १०० टक्के साक्षरता घडवण्याचा आमचा संकल्प अधिक दृढ झाला."
- योगेंद्र बांगर, शिक���षक ( जिल्हा परिषद शाळा )
#शाळा #ज्येष्ठ_नागरिक #मुरबाड #महाराष्ट्र
फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे एक व्यासंगी अभ्यासक
प्रा. हरी नरके यांची सर्व पुस्तके सवलतीच्या अगदी सवलतीच्या दारात पुस्तके उपलब्ध सोबत कॅश ऑन डिलिव्हरी फ्री....
अधिक सविस्तर माहितीसाठी संपर्क करा
माय मुक्ता पब्लिकेशन : - ९५०३६५२५९६
#phule#mahatma#mahatmajyotibaphule
महाराष्ट्राला “देश” संबोधल्यावर, काहींच्या गांडीचा पॉपकॉर्न का होत असेल?
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा
- गोविंदाग्रज
“वारे वळतात मोर होऊन, म���घ चळतात अमृत पिऊन.!!” ✨✨
बोरकरांच्या कविता म्हणजे अंगावरून जाणारी एक आल्हाददायी झुळूक.. वाचकाच्या बोटाला धरून स्वप्नवत गावी घेऊन जाणारी. एक लेखिकेने त्यांच्या कवितेला उलगडून सांगणं त्या कवितेचा आनंद द्विगुणित करून जाते.
#पुस्तकायन #मराठी
#मनातलंअवकाश