हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टीला तिसऱ्यांदा घवघवीत यश मिळाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
#BJPHaryana
मराठी भाषा ही भारताचा अभिमान आहे. या अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन. हा सन्मान म्हणजे मराठी भाषेने आपल्या देशाच्या इतिहासात दिलेल्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाचा गौरवच आहे. मराठी भाषा ही कायमच भारतीय वारशाचा आधारस्तंभ राहिली आहे. मला खात्री आहे की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने ही भाषा शिकण्यासाठी असंख्य लोकांना प्रेरणा मिळेल.
घटस्थापनेच्या पवित्र आणि पावन दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला!
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
जय महाराष्ट्र! 🚩
#मराठी
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके।
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते।।
आजपासून सुरू होत असलेल्या शारदीय नवरात्रोत्सव आणि घटस्थापनेच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
#घटस्थापना#नवरात्री
सतत येणा-या निवडणुका म्हणजे सततची आचारसंहिता. सततची आचारसंहिता म्हणजे सरकार आणि प्रशासनाच्या कामकाजातील सततचे अडथळे. सारख्या सारख्या निवडणुकांमुळे खरी अडचण होते, ती सामान्य नागरिकाचीच. "एक देश एक निवडणूक" प्रस्तावाला मान्यता देऊन पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने एका नव्या युगाच्या दिशेने आणि आणखी एका आश्वासनपूर्तीच्या दिशेने टाकलेले आश्वासक पाऊल आहे. आपल्या राक्षसी महत्वाकांक्षासाठी कॉंग्रेसने अनेक लोकनियुक्त राज्य सरकारांचा गळा घोटला. त्यामुळेच सततच्या निवडणुकांचे सत्र देशात सुरु झाले. ते लवकर संपणेच देशाच्या हिताचे आहे. मा. मोदीजींच्या कार्यकाळातच "एक देश, एक निवडणूक" प्रत्यक्षात येईल, हा विश्वास आहे. निवडणूक सुधारणांची सुरुवात केल्याबद्दल मा. नरेंद्र मोदीजी यांना मनःपूर्वक धन्यवाद.
#OneNationOneElection
#CabinetDecision
#ModiGovernment
@BJP4India@narendramodi@JPNadda@AmitShah@blsanthosh
डॉ. जयश्री फडणवीस लिखित मानससूत्र पुस्तकाचे प्रकाशन पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर सर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची संधी लाभली. डॉ. जयश्री फडणवीस लिखित मानससूत्र पुस्तक हे वाचकांना अतिशय उपयुक्त ठरेल असा ठाम विश्वास वाटतो. पुस्तक प्रकाशन सोहळ्यास महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रविंद्र साठे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन विभागाचे माजी विभागप्रमुख कॅप्टन डॉ. सी. एम. चितळे, पुण्यभूषण फाऊंडेशनचे डॉ. सतीश देसाई, माध्यमतज्ज्ञ डॉ. केशव साठे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.
आज बाप्पाच्या विसर्जनाला जाणाऱ्या मानाच्या गणपतींचे दर्शन घेतल्यानंतर विसर्जन मिरणुकीत सहभागी होताना कधी ढोल पथकांच्या ठेक्यावर ताल धरत, तर कधी ध्वज पथकात सहभागी होऊन सलाम देत मिरवणुकीचा मनमुराद आनंद लुटला. अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीत अनेक लहान मुले महापुरुषांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत फोटो काढण्यात मिळालेला आनंदही काही औरच होता!
#गणपती_विसर्जन #अनंतचतुर्दशी #पुणे
Keep shining and rising, champions! Congratulations to the Indian Men's Hockey Team for their record-breaking 5th Asian Men's Hockey Champions Trophy title, defeating China 1-0. This incredible success fills our hearts with pride.
My best wishes to the entire team!
@TheHockeyIndia
#ChakdeIndia #IndiaKaGame #Cheer4Bharat
ॐ नमः शिवाय!
आज श्रावण सोमवार निमित्त माझ्या कोथरुड मतदारसंघातील वनाझ परिवार शिव मंदिरात भगवान शंकराचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली. महादेवांच्या चरणी नतमस्तक होऊन आत्मिक आनंद आणि अध्यात्मिक सुखाची अनुभूती लाभली.
#omnamahshivay#kothrud
कोल्हापुरातील 'जाधव ज्वेलर्स'चा नूतनीकरण समारंभ पार पडला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून शॉपचा शुभारंभ केला आणि जाधव परिवाराचे अभिनंदन केले. पुढील सराफ व्यवसायामध्ये त्यांची यशस्वी वाटचाल अशीच सुरू राहो, यासाठी शुभेच्छा दिल्या. #jwellery#kolhapur
चिखलदरा तालुक्यातील हतरु व चुरणी या गावात साथरोगामुळे अचानक 24 जणांना स्थानिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. रुग्णांवर तातडीने औषधोपचार करण्यासाठी जिल्हास्तरावरील वैद्यकीय पथकही त्याठिकाणी पाठविण्यात आले होते. पथक व स्थानिक रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने संबंधित रुग्णांवर उपचार केले. चिखलदरा दौऱ्यादरम्यान या घटनेची दखल घेऊन चिखलदरा ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. याप्रसंगी वैद्यकीय सोयी-सुविधांचा व रुग्णांच्या प्रकृतीच्या सद्यस्थितीबाबतचा आढावा घेऊन साथरोग नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले.
यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, तहसीलदार प्रदीप शेवाळे, नायब तहसिलदार सुधीर धावडे तसेच वन विभागाचे अधिकारी व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्राला आधुनिक पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी आमचा सतत प्रयत्न असतो. आज केंद्रीय मंत्रिमंडळाने ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. ठाणे आणि आसपासच्या प्रमुख भागांना जोडणारा, तसेच आरामदायक आणि सुविधेत भर घालणारा असा हा एक महत्त्वाचा पायाभूत सुविधा प्रकल्प आहे.
https://t.co/EymK7MZnDT
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठासमोरील नवनिर्मित जिल्हा क्रीडा संकुलाचे लोकार्पण व विविध क्रीडा सुविधांचे आज भूमिपूजन केले. अमरावती जिल्ह्याला क्रीडा संस्कृतीचा उज्ज्वल वारसा लाभला आहे. येथील जगप्रसिध्द हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ मागील शंभर वर्षापासून क्रीडा क्षेत्रात कार्यरत आहे. हजारो क्रीडा शिक्षक व आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडू या भूमीत निर्माण झाले. प्रतिभावान क्रीडापटू घडविण्यासाठी क्रीडा संकुलात आवश्यक सर्व क्रीडा सुविधा पुरविणार, असे यावेळी आश्वस्त केले.
यावेळी आमदार सुलभाताई खोडके, आमदार रवि राणा, जिल्हाधिकारी तथा उपाध्यक्ष जिल्हा क्रीडा संकुल समिती सौरभ कटियार, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा अमरावती विभागाचे विजय संतान, राज्य धर्नुविद्या संघटनेचे अध्यक्ष ॲङ प्रशांत देशपांडे, सचिव अमर राऊत, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत मस्के आदी मान्यवर उपस्थित होते.