अभ्यासू व्यक्तीमत्व विधान परिषद मा.आमदार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सचिव, हरियाणा प्रदेश प्रभारी श्री. संजय जी दत्त साहेब @SanjaySDutt आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
#Happy_Birthday_Bhaiya
मनमिळावू व्यक्तिमत्त्व, सक्षम नेतृत्व, तडफदार कार्यशैली आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणाऱ्या कल्याण-डोंबिवली जिल्हा महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा तथा नगरसेविका सौ. कांचन (ताई) कुलकर्णी @kanchan6262 यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...
"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच..!"
स्वातंत्र्य, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक एकात्मतेची प्रेरणा देणारे राष्ट्रपुरुष लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन...!
#लोकमान्य_टिळक#LokmanyaTilak#BalGangadharTilak
"विटेवरी उभा राहोनी, भक्तांच्या हाकेला धावतो;
असा माझा विठुराया, प्रत्येकाच्या जीवनात आनंद भरतो."
श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो.
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा..!
दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थी व युवकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आज कल्याण पूर्व येथील कमलादेवी महाविद्यालयाबाहेर विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेत निषेध आंदोलन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी लोकशाही, शिक्षण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संरक्षणाची मागणी केली.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थी व युवकांवर झालेला लाठीचार्ज हा लोकशाहीवरील आघात आहे.
या घटनेच्या निषेधार्थ खडेगोळवली, कल्याण पूर्वमध्ये विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांनी एकत्र येत निषेध आंदोलन केले.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांवर लाठी नव्हे, तर संवादाने उत्तर द्यावे.
विद्यार्थ्यांच्या भविष्यावर घाला घालणाऱ्यांना प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.
आज सोनम वांगचूक आंदोलन करत आहेत, पण हा लढा प्रत्येक विद्यार्थ्याचा आहे.
देशभरातील विद्यार्थी, पालक आणि जागरूक नागरिकांनी शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी एकत्र यावे.
आज जर आपण शांत राहिलो, तर उद्या आपल्या मुलांच्या भविष्यावरही अन्याय झाला तरी बोलण्याचा नैतिक अधिकार आपल्याकडे उरणार नाही.
ही वेळ मौन बाळगण्याची नाही.
ही वेळ अन्यायाविरोधात एकजूट दाखवण्याची आहे.
विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवा.. लोकशाही वाचवा.
#SonamWangchuk#Students#SaveEducation
आज जर सोनम वांगचूक यांचा आवाज दाबला जात असेल, तर उद्या प्रत्येक विद्यार्थ्याचा आवाज दाबला जाईल..!
देशाच्या शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेण्याची वेळ येते, ही लोकशाहीसाठी अत्यंत गंभीर बाब आहे.
हे सरकार प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही, म्हणूनच प्रश्न विचारणाऱ्यांनाच गप्प करण्याचा प्रयत्न करते. पण लक्षात ठेवा...
आवाज दाबता येतो, विचार नाही..!
माणसाला ताब्यात घेता येते, सत्याला नाही..!
पावसाळा उशिरा सुरू झाला, तरीही नालेसफाई अपूर्ण..!
कर वेळेवर भरायचा, पण मूलभूत सुविधा मात्र वेळेवर मिळत नाहीत.
पूर आल्यावर पाहणी दौरे करण्यापेक्षा, पावसापूर्वी नालेसफाई पूर्ण करणे ही लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची जबाबदारी नाही का ?
लोकप्रतिनिधी नेमके करत काय आहेत ?
#KDMC
जनहिताच्या प्रश्नाला आवाज मिळाला...!
कल्याण-डोंबिवलीतील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नवीन बांधकामांना स्थगिती देण्याबाबत मी केलेल्या तक्रारीची पत्रकार बांधवांनी दखल घेतली.
सर्व पत्रकार बांधवांचे मनःपूर्वक आभार.
जनहितासाठीचा लढा कायम सुरू राहील.
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचा हा ऐतिहासिक दिवस प्रत्येक मराठी मनाला प्रेरणा देणारा आहे.
"सजलं सोनरी सिंहासन, लाभलं छत्र माय मातीला,
छत्रपती जाहला राजा, अभिमान गर्व मराठ्या छातीला"
कुशाग्र बुद्धिमत्ता, धर्मनिष्ठा आणि प्रजाहितदक्ष कारभारामुळे इतिहासातील आदर्श राज्यकर्ती म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!
#अहिल्यादेवीहोळकर#पुण्यतिथी