पाण्या तुझा रंग कसा?
ज्याला जसा हवा तसा...
पाण्याच्या जपणुकीचा आणि जाणिवेचा रंग आपण समजून घेणं ही काळाची गरज निर्माण झाली आहे. पृथ्वीवरचे अमृत म्हणून आपली तृष्णा भागविणाऱ्या पाण्याकडे पाहिले पाहिजे. त्याच जाणिवेतून त्याचा विनियोग अत्यंत जबाबदारीने व्हायला हवा. पाण्याचा अपव्यय होणे हे निसर्गाचे दान कृतघ्नपणे नाकारण्यासारखे आहे, असे मला वाटते. जगात पिण्यायोग्य पाण्याचा साठा मर्यादित आहे. त्यामुळे प्रत्येक थेंब वाचवणे आवश्यक आहे. ग्लोबल वॉर्मिंगच्या खुणांमुळे निसर्ग लहरी आहे. त्यामुळे जीवदान देणारे पाणी आपण जबाबदारीने वापरण्याची शपथ घेऊया. पाण्याचे स्रोत वाढवून पावसाचा प्रत्येक थेंब साठवणेही भविष्याच्या दृष्टीने महत्वाचे असेल. आजच्या जल दिनानिमित्त आपण पाणीबचतीचा मंत्र जपूया. तहान ही मूक असते, त्यामुळे ती भागविणाऱ्या पाण्याचा आवाज आपण आहोत. हा आवाज बुलंद करू या.
जल हेच जीवन!
#WorldWaterDay #Maharashtra #JalSevaChallenge #Panchamahabhute
@panchamahabhute
डियर पुणेकर्स, "चुलीवरचं जेवण" म्हणून पाट्या लावणारे हॉटेल्स जर गॅस टंचाई असताना बंद झाली तर समजून जा ते गिऱ्हाईकांना येड्यात काढत होते. 😂
#Courtesy_WhatsApp