मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या काळाचौकी विभागात असंख्य दुर्मिळ मराठी पुस्तकं वाचकांची वाट पाहत धूळ खात पडून आहेत. सध्या त्या ग्रंथालयाचे सभासद फारच कमी आहेत. भविष्यात हे एवढं निम्मित करून कदाचित ते बंदही पाडलं जाईल. मग नंतर एकेदिवशी ते बंद पडल्यावर व्हॉट्सअँपवर हळहळ आणि दुःख व्यक्त करण्यात काहीही अर्थ नाही.
त्यामुळे हीच ती वेळ. ग्रंथालयाला भेट द्या. तिथली पुस्तकं चाळा, निवडा, वाचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ताबडतोब त्याचे सभासद व्हा. फक्त ७० रुपये महिना एवढीच नाममात्र फी आहे.
ही जाहिरात नाही. ही कळकळीची विनंती आहे.
या मराठी ग्रंथालयाचं अस्तित्व हेच त्या परिसरातील मराठी समाजाचं अस्तित्व आहे आणि हे मराठी ग्रंथालय बंद पडणं म्हणजे महाराष्ट्रधर्म कमकुवत होणं आहे.
त्यामुळे आपल्या मराठीसाठी, महाराष्ट्रधर्मासाठी आणि मराठी समाजाची एकूणच विचार करण्याची क्षमता वाढावी यासाठी एवढं तरी आपण नक्कीच करू शकतो. (केलंच पाहिजे!)
ग्रंथालय मंगळवार ते शनिवार सकाळी ८ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत आणि रविवारी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू असतं.
सोमवारी साप्ताहिक संपूर्ण दिवस बंद.
वाचा, विचार करा, सभासद व्हा आणि इतरांनाही सांगा.
जय मराठी, जय महाराष्ट्र
#महाराष्ट्रधर्म #मराठीकारण
बनिया मुक्त महाराष्ट्रात मराठी माणूस काय करून दाखवू शकतो बघा.
शेतकऱ्यांच्या 7 कुटुंब मिळून तयार केले असे Singaporean efficiency वाले ठिकाण मुंबईतही नसावे.
"मराठी निष्कामी असतो"अशी अफवा इतकी पसरवल्या गेली की आता मराठी स्वतःहून ते खरं समजतात.
नमस्कार,
आपण केलेल्या आर्थिक सहकार्यामुळे आम्ही तिसऱ्या भाषेच्या सक्तीला विरोध करण्यासाठी उभारलेला हा लढा मराठीकारण व महाराष्ट्रधर्मापर्यंत आणू शकलो. आपल्या या पाठबळासाठी मनःपूर्वक आभार!
चळवळीच्या या टप्प्यावर आम्हाला तुमच्याकडून आणखी मदतीची अपेक्षा आहे. मराठी अभ्यास केंद्राचे सगळे कार्यकर्ते आपापला नोकरीधंदा सांभाळून चळवळीचं काम करतात. आता कामाचा व्याप वाढल्यामुळे आम्ही एका कार्यालयीन साहाय्यकाची नेमणूक केली आहे. तसंच दादर, मुंबई इथं एक कार्यालयही पाहत आहोत. ते लवकरच मिळेल. कार्यालयीन साहाय्यकाचा पगार आणि जागेचं भाडं यासाठी आम्हाला महिन्याला ४० ते ५० हजारांची आवश्यकता आहे.
काही जणांनी या आधीच आम्हाला मोठ्या रकमेच्या देणग्या दिलेल्या आहेत. मात्र मासिक देणगी म्हणून आपण १०० रुपयांपासून कितीही देणगी देऊ शकता. आपण प्रत्येक महिन्याला एक विशिष्ट रक्कम देणगीदाखल दिल्यास आम्हाला मासिक खर्च भागवण्याची काळजी न करता रचनात्मक कामात अधिक लक्ष देता येईल.
हा संदेश आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना पाठवून मासिक देणगीदार होण्याचं आवाहन करावं ही विनंती!
मासिक देणगी पाठवल्यावर 7208186353 या मोबाइल क्रमांकाच्या व्हॉट्सअपवर पैसे पाठवल्याचा स्क्रीन शॉट पाठवावा आणि ‘मी मासिक देणगीदार’ लिहून आपलं नाव आणि रक्कम कळवावी, जेणेकरून आम्हाला मासिक देणगीदारांची यादी करणं सोयीचं होईल. सोबत मराठी अभ्यास केंद्राचा क्यूआर कोड पाठवत आहे. (UPI : marathiabhyaskendra@idbi )
आपला,
डॉ. दीपक पवार
अध्यक्ष, मराठी अभ्यास केंद्र
#मराठीकारण #महाराष्ट्रधर्म
जे गेली १५/२० वर्ष भोगतोय ते या साहेबांना काल कळलंय. यांची मजल गडकरींच्या पीए ला फोन लावण्यापुरतीच😁 या साहेबांचे नात पणतु जन्माला येऊन मंत्री संत्री होतील पण #मुंबईगोवाहायवे पूर्ण होणार नाही. हे खरंय कारण आताच पनवेल सुटलं की लांबच्या लांब ट्रक कंटेनरच्या ट्राफीक रांगा सुरू होतात
Scammers धोखे से आपको *21*, *61*, *67* से शुरू होने वाले numbers dial करवाते हैं, जिससे आपका call forwarding activate हो जाता है और आपके OTPs, bank verification codes सीधे fraudsters तक पहुँच जाते हैं
इस संबंध में I4C, MHA ने आधिकारिक advisory जारी की है:
https://t.co/U8EquObbIV
A free MIT course breaking down mathematics for computer science & engineering: https://t.co/lrmKyeLsys (v/@MITOCW)
Here, MIT prof. Tom Leighton, who is also the CEO & co-founder of Akamai, discusses what a proof is (Lesson 1).