महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय श्री राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री अमित साहेब ठाकरे यांनी वसई - विरार महानगरपालिका क्षेत्रातील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर केल्या आहेत. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी संघटनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा !
#MNVSAdhikrut
पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना, विधानसभा अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेची चिरफाड केली आणि कागदावर लिहून दिलेलं मराठी पण त्यांना वाचता येत नाही हे पाहून संताप, उद्वेग दोन्ही दाटून आला. वाचण्या आधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का यांनी ?
नार्वेकरांनी हा प्रस्ताव स्वाहिली अथवा हिब्रू भाषेत मांडला असता तरी चाललं असता कारण त्यांचं मराठी पण कळलं नाही आणि स्वाहिली, हिब्रू तसं पण कोणालाच कळत नाही. बरं अजून एक शोकांतिका म्हणजे नार्वेकर, दीनानाथ मंगेशकरांचा उल्लेख दीनदयाल मंगेशकर करत होते आणि वाट्टेल तसं मराठी वाचून दाखवत होते त्यावेळेस सभागृहात उपस्थित एकाही आमदाराला आक्षेप नोंदवावासा वाटला नाही. नार्वेकरांना ना दीनानाथ मंगेशकर माहित आहेत ना दीनदयाळ उपाध्याय माहित आहेत.
भाजपने जी काही खोगीरभरती सुरु केली आहे त्यात त्यांची अवस्था तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आलं धुपाटणे अशी झाली आहे.
सभागृहात नक्की कोण उपस्थित होतं माहित नाही पण अनेक ज्येष्ठ आमदार इथे असणार हे नक्की त्यांच्यापैकी एकानेही विरोध दर्शवला नाही ? सभागृहात श्री. देवेंद्र फडणवीस उपस्थित होते का माहित नाही, पण असते तरी मला वाटत नाही त्यांना काही फरक पडला असेल. गुलाबी आंखे जो तेरी देखी सारखी अनेक गाणी ( स्वतः निर्माण केलेल्या बेसुरात) म्हणणाऱ्या फडणवीसांना आज आपल्या राज्यात विधानसभेत कोणत्या महान व्यक्तीला आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत आणि त्याचं गांभीर्य काय असतं हे समजायला हवं होतं ! पण त्यांच म्हणणं सोपं आहे, सांगितलेली फोडाफोडीची कामं होत आहेत ना बरोबर , अधिवेशनाचा उपचार पूर्ण होत आहे ना ? बस झालं. दीनदयाल मंगेशकर म्हणो की दीनानाथ चौहान म्हणो काय फरक पडतो. शोकप्रस्ताव पण एक उपचारच आहे जो पार पडला. महाराष्ट्रातील आधीच्या, आताच्या पिढ्या हे पाहात आहेत आणि हे रेकॉर्ड झालेले सभापतींचे भाषण पुढच्या पिढ्या पाहतील याचं भान आणि जाणीव दोन्हीही नाही ? माणूस शिक्षित असला पाहीजे पण त्यापेक्षा तो सुज्ञ असला पाहिजे याची जाणीव मुख्यमंत्री सभापतींना करून देणार आहेत का नाही ?
आणि श्री. एकनाथ शिंदेंना पण याच्याशी घेणंदेणं असण्याचं काहीच कारण नाही. मराठी भाषेबद्दलच्या अभ्यासाचं त्यांचं विमान पंन्नास हजार फुटावरून चाललंय म्हणून त्यांचा पण दूर दूर पर्यंत संबंध नाही ! ही अवस्था आहे आज आपल्या महाराष्ट्राची. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षाला समोरच्या कागदावर लिहिलेलं मराठी वाचता येत नाही, ते सभागृह मराठी भाषेविषयी काय आस्था बाळगणार किंवा मराठीची गळचेपी होत आहे म्हणून काय कारवाई करणार?
या सभागृहाला अध्यक्ष म्हणून गणेश वासुदेव माळवणकर लाभले जे पुढे लोकसभेचे पहिले अध्यक्ष झाले. नार्वेकर ज्या अलिबागमधून येतात त्या अलिबागचे दत्तात्रय काशिनाथ कुंटे विधानसभेचे अध्यक्ष होते, अरुणभाई गुजराथी होते, बाळासाहेब भारदे होते, अगदी आत्ता आता अध्यक्ष असलेले दिलीप वळसे पाटील होते. अशी अध्यक्षांची परंपरा कुठे आणि सध्याची काय ही अवस्था ? कधीकधी विधिमंडळाच्या कामकाजाचं चित्रण समोर येतं ते ऐकावंसं आणि बघावसं पण वाटत नाही इतकं सुमार पद्धतीने सुरु आहे.
आपल्या भाषेची गळचेपी ही हिंदी लादून केंद्राकडून सुरु आहे, ती राज्यात येणाऱ्या परप्रांतीयांकडून सुरु आहे आणि राज्याच्या विधिमंडळाकडून पण सुरु आहे याचं सगळ्यात जास्त वाईट वाटतं, चीड येते.
काल नार्वेकरांनी आशाताईंच्या निधनाचा नाही तर मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला आणि त्यावर एकाही सदस्याने ब्र देखील न काढून या शोकप्रस्तावाला जणू संमतीच दिली. मराठी माणसाने विचार करावा की काय पद्धतीची माणसं आणि सरकार आपण निवडून देत आहोत.
महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठी भाषेला रस्त्यावर सांडून नार्वेकरांनी त्यावर आपला बेजबाबदार बुलडोझर फिरवल्याबद्दल आणि शब्दशः धिंडवडे काढणाऱ्या या वृत्तीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेध !
राज ठाकरे ।
गिरगाव चौपाटीवरील कोळी बांधवांच्या बोटीवर काही दिवसांपूर्वी शासनाने कारवाई केली. हा निर्णय म्हणजे कोळी समाजाला त्यांच्या पारंपरिक उपजीविकेपासून आणि गिरगाव चौपाटीवरून हद्दपार करण्याचा प्रयत्न असल्याची भावना स्थानिकांमध्ये आहे.
दुसरीकडे, भाजप सरकार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या भूमिकेमुळे या परिसरात मांसाहार बंद करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. परिणामी, गिरगाव चौपाटीवरील कोळी बांधवांचा पारंपरिक व्यवसाय आणि रोजगार गंभीर संकटात सापडला आहे. मासेमारी आधीच कमी होत असताना त्यांच्या उपजीविकेचे साधनही धोक्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर कोळी बांधवांना पर्यायी रोजगार उपलब्ध व्हावा, त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरू राहावा आणि स्थानिकांना न्याय मिळावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मलबार हिल विभागाचे अध्यक्ष श्री. दिनेश पुंडे यांनी डी वॉर्डच्या सहाय्यक आयुक्तांकडे गिरगाव चौपाटीवर कोळी बांधवांसाठी अधिकृत फूड स्टॉल उभारण्याची मागणी केली आहे.
#MNSAdhikrut
पहिल्याच पावसात मुंबई कशी तुंबत आहे, रस्त्यांवर खड्डे कसे पडले आहेत याची पाहणी करायला गेलेल्या महापौर महोदयांच्या समोरच, मुंबई महापालिकेचा एक अधिकारी मॅनहोलमध्ये पडला. ही अवस्था या महानगराची..!
#MNSAdhikrut
सुक्ष्म जिवांची एवढी काळजी करणारे ॲंटीबायोटीक/ ॲंटीव्हायरल गोळ्या घेत असतील का?
घरात मच्छर झाले तर गुडनाईट वापरतात का?
ढेकणं झाली तर पेस्ट कंट्रोल करतात का?
सहजच मनात शंका आली.!
माझे काका, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे ह्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, ह्या सदिच्छा!
माझी सर्व महाराष्ट्र सैनिकांना आणि माझ्या हितचिंतकांना विनंती आहे की माझ्या वाढदिवसानिमित्त शहरंच्या शहरं रंगवणारे कोणतेही होर्डिंग्ज लावू नयेत त्याऐवजी फळांची आणि फुलांची झाडे लावा, प्राण्यांसाठी पाणवठे तयार करा - राजसाहेब ठाकरे.
#RajThackeray
ठाण्यातील वर्तकनगर परिसरात स्वच्छता राखण्याच्या कारणावरून एका परप्रांतीय टॅक्सीचालकाने ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली.
मा. श्री राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार #मनसे नेते अविनाश जाधव यांनी घटनास्थळी जाऊन परिसरातील सर्व रिक्षा टॅक्सी चालकांना समज दिली!
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बडनेरा कारखान्यातील पात्र ट्रॅकमन कामगारांना न्याय मिळावा, या प्रमुख मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष श्री. जितेंद्र पाटील यांनी रेल्वे प्रशासनाला स्पष्ट इशारा देत सांगितले की, पात्र ट्रॅकमन कामगारांच्या न्याय्य मागण्यांबाबत आजच्या चर्चेतून ठोस आणि सकारात्मक निर्णय झाला नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना भविष्यात हे आंदोलन अधिक तीव्र आणि आक्रमक स्वरूपात उभे करेल.
#MNSAdhikrut
पुणे येथील कोंढवा बुद्रुक परिसरातील प्रभांगण या गृहनिर्माण प्रकल्पामध्ये मराठी भाषिक नागरिकांना सदनिका विक्री करताना भेदभाव होत असल्याच्या तक्रारींची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गंभीर दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर आज मनसेच्या वतीने संबंधित विकसकाची भेट घेऊन त्यांना जाब विचारण्यात आला तसेच यासंदर्भात निवेदनही देण्यात आले.
महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी माणसाला त्याच्या स्वतःच्या राज्यात दुय्यम वागणूक देण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला. मराठी भाषिक नागरिकांवर अन्याय करणाऱ्यांविरोधात मनसे ठामपणे उभी राहील आणि आवश्यक ते सर्व आंदोलनात्मक मार्ग अवलंबेल, अशी भूमिका देखील यावेळी मांडण्यात आली.
#MNSAdhikrut
माझ्या महाराष्ट्र सैनिकांना, हितचिंतकांना,
सस्नेह जय महाराष्ट्र,
१४ जून या माझ्या वाढदिवसाच्या दिवशी गेली अनेक वर्ष तुम्ही सगळे जणं मला उत्साहाने भेटायला येता, शुभेच्छा द्यायला येता, येताना पुष्पगुच्छ, मिठाई, केक घेऊन येता, राज्यभर होर्डिंग्स लावता . वाढदिवसाच्या दिवशी माझ्या जवळच्या लोकांना भेटणं हे खरंच आनंददायी असतं. पण यावर्षी मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मुंबईत नसल्यामुळे तुमची भेट होऊ शकणार नाही.
पण माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की माझा वाढदिवस लोकोपयोगी उपक्रमातून साजरा करा. शुभेच्छांची होर्डिंग्स लावून, शहरंच्या शहरं रंगवण्याच्या ऐवजी हा वाढदिवस जरा वेगळ्या पद्धतीने तुम्ही साजरा करावा, असं माझं तुम्हाला आवाहन आहे.
यावर्षी १४ जूनला राज्यभर फुलांची, फळांची किंवा टिकतील अशी झाडं तुमच्या परिसरात लावा. फळांची आणि फुलांच्या झाडांना उन लागत त्यामुळे त्यांना उन आणि पाणी मिळेल अशाच ठिकाणी लावा ! फळांची आणि फुलांची झाडं याकरता जेणेकरून ती दिसतातही छान आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यामुळे विविध प्रकारचे पक्षी आकर्षित होतात ! बरं पुन्हा ती रस्ते रुंदीकरणात तुटली जाणार नाहीत याचीही काळजी घ्या ! झाडं लावताना ती मोठी झाडं लावा जेणेकरून ती टिकतील , बऱ्याचदा छोटी रोपं लक्ष नाही दिलं तर टिकत नाहीत! अशी झाडं नर्सरीत मिळतात, ती योग्य जागा बघून तुमच्या भागातील स्थानिकांच्या हस्ते त्यांचं रोपण करा. आणि तिथल्या स्थानिकांना विश्वासात घेऊन त्यांना देखील या नव्याने लावलेल्या रोपांची, झाडांची काळजी घेणं, त्याला पाणी घालणं या उपक्रमात सामील करून घ्या, जेणेकरून ती झाडं दीर्घकाळ टिकतील.
तसंच उन्हाळ्यातच नाही तर हल्ली अगदी जानेवारी फेब्रुवारीपासूनच प्राणी, पक्षी पाण्यासाठी वणवण फिरताना आढळतात. यावर्षी जर पाऊस कमी झाला तर पुढच्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच प्राणी पाण्यासाठी वणवण फिरणार आहेत. त्यामुळे प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी जंगलांच्या तोंडाशी, अगदी शहरांमध्ये सुद्धा भटक्या प्राण्यांसाठी पाणवठे उभारा आणि फक्त पाणवठे उभारून थांबू नका तर त्यात कायम पाणी असेल असं पहा. साधारणपणे १ ते १.५ महिन्यांपूर्वी चंद्र्पुरमध्ये प्राणी जंगलातून बाहेर येऊन शहरांत पाण्यासाठी वणवण भटकत आहेत अशी दृश्य मी पाहिली, आणि मी तात्काळ माझा चंद्रपूरमधला सहकारी मनदिप रोडेला फोन करून प्राण्यांसाठी पाणवठे करायला सांगितलं. आणि त्याने तात्काळ ते पाणवठे तयार केले. त्यामुळे असेच पाणवठे तयार करा. आणि पाणवठे असोत की वृक्षारोपण असेल, दोन्ही करताना शासकीय यंत्रणेला पण बरोबर घ्या.
यावर्षीचा उन्हाळा हा भीषण होता, आणि हवामान तज्ज्ञांचा अंदाज असा आहे की यावर्षीचा पावसाळा हा सरासरीत कमी असणार आहे. यावर्षी जर पाऊस कमी पडला तर त्याचा थेट परिणाम पुढच्या वर्षीच्या उन्हाळयात जाणवणार आहे. बरं हे एक वर्ष घडलं आणि पुढे सगळं आलबेल असेल असं नाही. सध्या राज्यात आणि देशांत वृक्षतोड्यांचं राज्य चालू आहे. त्यामुळे बेसुमार वृक्षतोड सुरु आहे. त्यामुळे कदाचित जसं प्राणिसंग्रहालयात जाऊन लहान मुलांना प्राणी दाखवायला लागतात तशी भविष्यात मुलांना झाडं दाखवायला कुठेतरी न्यावं लागेल. त्यामुळे आत्ताच्या आणि आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी झाडं लावली पाहिजेत, ती जगवली पाहिजेत, कारण सध्या झाडांची जंगलं उध्वस्त करून इमारतींची जंगलं उभी करण्यातच सरकार व्यस्त आहे ! म्हणूनच हा उपक्रम आपण हाती घेत आहोत.
फक्त झाडं लावताना जसं स्थानिकांना विश्वासात घेऊन हा उपक्रम राबवा तसा तो एक दिवसाचा सोहळा होणार नाही किंवा फोटो काढून सोशल मीडियावर टाकून फक्त लाईक्स कमवले असं करू नका. आपल्याला लाईक्स आणि व्ह्यूज नाहीत तर झाडं लावून लोकांचे आणि निसर्गाचे आशीर्वाद कमवायचे आहेत.
बाकी जरी १४ जूनला भेट होऊ शकत नसली तरी लवकरच आपली भेट होईल तेंव्हा सविस्तर बोलूच.
आपला नम्र
राज ठाकरे ।
आज जागतिक पर्यावरण दिन. मागच्या वर्षी झालेली अतिवृष्टी आणि आजपर्यंतचा उच्चांकी उन्हाळा जो सगळ्यांनी सहन केला या पार्श्वभूमीवर आजच्या जागतिक पर्यावरण दिवसाकडे आपण नेहमीच्या उपचारांच्या पलीकडे जाऊन बघायला हवं. आपल्याकडे सगळ्याच बाबतीत उत्सवी उत्साह असतो. त्यामुळे पर्यावरण दिन आला की झाडं लावून त्याचे फोटोज काढून ते सोशल मीडियावर टाकणे याचा अतिउत्साह असतो. आणि त्यातली ९०% झाडं पर्यावरण दिनाच्या संध्याकाळपर्यंत पण टिकत नाहीत. त्यात काही वर्षांपूर्वी राज्य सरकारने काही कोटी झाडं लावण्याची आणि पुढे ती लावून झाली अशी घोषणा केली. ती झाडं कुठे आहेत हे सरकारलाच माहित. असो. पण आजच्या दिवशी तरी सरकारने आणि महाराष्ट्रातील लोकांनी आपण या पर्यावरण बदलाने काय गमावलं आहे आणि काय गमावणार आहोत याचा विचार करायला हवा.
२०१४ साली मी जेंव्हा महाराष्ट्राचा विकास आराखडा सादर केला होता तेंव्हा मी फिल्म सादर केली होती. विकासाला सौंदर्याची आणि पर्यावरणाच्या विचाराची जोड नाही दिली तर तो विकास किती वरवरचा आणि पोकळ असतो हे मी त्यात सांगितलं होतं. त्याची साक्ष गेल्या काही वर्षांत तुम्हाला जाणवत असेल. अमुक रस्ता बांधला, तमुक ब्रिज बांधला म्हणून श्रेय घेण्याची आणि ते पाहून खुश होण्याची स्पर्धा सुरु आहे. पण एका पावसाने, तो सुद्धा मान्सूनचा पाऊस नाही, शहराची दाणादाण उडत आहे. आत्ता परवा एका ठिकाणी बातमी वाचली की या उन्हाळ्यात शेतात सकाळी १० नंतर काम करायला जायला महिला पुरुष धजावत नव्हते. याचा अर्थ आपण लावणार आहोत का?
हल्ली सगळ्यांना जरा मोठ्या आकड्यांचं आकर्षण निर्माण झालं आहे. त्यामुळे म्हणलं जरा काही गंभीर आकडे मी पण तुमच्यासमोर ठेवतो.
यावर्षीच्या अति उन्हामुळे देशाच्या प्रॉडक्टिव्हिटीचं झालेलं नुकसान हे जवळपास १५९ बिलियन डॉलर्सचं आहे. अतिप्रचंड उन्हामुळे काम न करू शकल्यामुळे गेल्या काही वर्षात साधारणपणे वर्षाला १६० बिलियन कामाच्या तासांचं नुकसान झालं आहे. पर्यावरणात होणाऱ्या बदलांमुळे देशाच्या जीडीपीत २.५ ते ४.५ टक्क्यांची घट येऊ शकते असा अंदाज वल्ड बँकेचा आहे. एका जागतिक अभ्यासाप्रमाणे देशातील ५७% जिल्हे ज्यात देशाची ७६% लोकसंख्या राहते, हे जिल्हे पर्यावरण बदलामुळे होणाऱ्या जबर हानीच्या काठावर आहेत.
जेंव्हा आपली अर्थव्यवस्था अमुक तमुक क्रमांकाची अशी आकडेवारी टाकतो तेंव्हा या आकडेवारीचा विचार पण करणार आहोत का ?
आज पावसाळ्याचे चार महिने शहरांमध्ये जगणं कठीण होत चाललं आहे, ग्रामीण भागात अतिवृष्टीने हाहाकार उडतो आणि उन्हाळ्याचे चार महिने ग्रामीण आणि शहरी भागांत जगणं असह्य होत चाललं आहे. थोडक्यात आपण जिथे जगतोय तिकडे ८ महिने आपल्याला धड जगता येत नाहीये, याची खंत आपल्याला का वाटत नाहीये? माझा विकासाला विरोध नाही, रस्ते, पूल हे करा ते आवश्यक आहेतच, पण ते करताना आपण आपली शहरं धड जगायला लायकीची करत आहोत का याचा विचार का होत नाही? पावसांत ग्रामीण भागात पिकं वाहून जातात आणि शहरी भागांत गाड्या पाण्यावर तंरगतात आणि तरीही आपण जे सुरु आहे त्याला विकास म्हणून खुश होणार आहोत का?
बरं सध्याच्या केंद्र सरकारच्या काळात गेल्या ११ वर्षांत जवळपास १,७३,९८४ हेक्टर इतकी जंगल जमीन ही खाणी, रस्ते इत्यादींसाठी देऊन टाकली. आणि हे सगळं यांच्या लाडक्या एकुलत्या एक अदानी उद्योगसमूहासाठीच केलं. जेंव्हा देशाचे पंतप्रधान हे पर्यावरण बदलावर मन की बात मध्ये बोलतात तेंव्हा त्यांच्या मनातील खरी गोष्ट ही जंगलांचं, झाडांचं काही का होईना आम्हाला दोन तीन उद्योगपतींनाच मोठं करायचं आहे हीच असते.
१७३९८४ हेक्टर म्हणजे किती याचा अंदाज यावा म्हणून तुम्हाला एक उदाहरण देतो. १.७३ लाख हेक्टर म्हणजे १७३० स्क्वेअर किलोमीटर. आपल्या मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे १०४ स्क्वेअर किलोमीटरचं. ज्याच्यावर आख्ख्या मुंबई आणि परिसराचं भवितव्य अवलंबून आहे. १७३० स्क्वेअर किलोमीटर जंगलाची जमीन गेली म्हणजे साधारणपणे १६ संजय गांधी राष्ट्रीय उद्यानं नष्ट झाली.
आज तरुण मुलं-मुली दिवसभर कुठल्यातरी सोशल मीडियावर काहीतरी बघत आहेत, पण त्यांचं काय चुकतंय ? मान वर करून काही बघावं असं धड काहीच नाही आपल्याकडे. आपल्याकडे बागा नाहीत, शहरातील झाडं प्रचंड प्रमाणवर तोडलेली, डोंगर पोखरलेले, नद्या आपणच घाण करून टाकलेल्या, मग जो एकाकीपणा, नैराश्य असतं ते रिल्स बघून घालवतात. माझी या तरुण मुलामुलींना विनंती आहे की जे तुम्ही सोशल मीडियावर बघताय जी जगातील शहरं, तिथला जपलेला निसर्ग हे इथे हवं यासाठी आग्रही रहा. त्यावर व्यवस्थेला जबाबदार धरा, खोटे आकडे, फसवी चित्रं याला भुरळून जाऊ नका. हे जर नाही केलंत तर तुमचं आयुष्य किड्या-मुंग्यांसारखं होईल हे नक्की.
आपण निसर्गपूजक समाज होतो. तो निसर्गपूजक समाज निसर्गविनाशक कधी झाला हेच कळत नाही. आज कोकणात देवराया टिकल्यात कारण त्या तिथल्या निसर्गपूजक परंपरेने टिकवल्यात म्हणून. जोपर्यंत आपण आपल्या मूळच्या धारणेकडे जाणार नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. पर्यावरण इत्यादीवर बोलणं, भांडणं हे मूठभर निसर्गप्रेमींचं काम होतं असं आपण मानायचो. पण तो आता तो अर्थव्यवस्थेचा, आरोग्याचा, शेतीचा आणि शहरांच्या भवितव्याचा विषय बनला आहे.
निसर्गातील बदल हे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला असे काही विळखा घालून बसलेत की जर आजच काही केलं नाही तर यातून तुम्ही तर सोडाच, पुढच्या पिढ्या पण निसटू शकणार नाहीत. आपल्या पुढच्या पिढीला आपण कसला महाराष्ट्र देणार आहोत? झाडांशिवाय शहरांचा? नदीऐवजी गटारं झालेल्या नद्यांचा ? उन्हाळ्यात घराबाहेर न पडता येणाऱ्या गावांचा? की जगातील सर्वोत्तम शहरांशी स्पर्धा करणारी, हिरव्यागार, सुंदर आणि जगण्यालायक शहरं आणि गावांचा ? याचा विचार आजतरी करायला सुरुवात करायला हवी. आणि हे केलं तरच हा जागतिक पर्यावरण दिवस साजरा झाला म्हणता येईल.
राज ठाकरे ।
आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी ही धोक्याची सुचना आधी अनेकदा दिली होती. महिलांना निवडणुकीपूरते फुकट पैसे वाटून राज्याच्या तिजोरीत खडखडाट होतोय हे दिसत असताना महिलांना केवायसी आणि इतर कारणं पुढे करत लाडकी बहीण योजनेतून बाद करण्याची नामुष्की सरकारवर ओढवली आहे. जर ह्या ८१ लाख महिला अपात्र होत्या, तर त्यांना सरकारने आजवर मोफत दिलेले पैसे सरकार कसे परत मिळवणार आहे. आज जागतिक सामाजिक आणि आर्थिक अस्थैर्य असताना, सरकारने निवडणुकीत फुकट पैसे वाटून केलेल्या ह्या चुका...राज्याला डबघाईला नेण्यास कारणीभूत ठरणार आहेत...
#लाडकीबहीण #FailedPoliciesOfMahaGov #EconomicCrises
बृहन्मुंबई महानगरपालिका, मुलुंड ‘प’ प्रभागातील प्रभाग क्रमांक १०८ मधील डोंगराळ भागातील नागरिकांना गेल्या तीन महिन्यांपासून पाणीटंचाईच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत होते. या प्रश्नाच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ‘टी’ विभाग कार्यालयावर मडकं मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
या मडकं मोर्चाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त व भरघोस प्रतिसाद लाभला. परिसरातील मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून पाणीप्रश्नाबाबतचा आपला रोष व्यक्त केला व आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
#MNSAdhikrut
मनसे ने पुन्हा गुंडगिरी केली.
कोकणातील पोलादपूर येथे एका हॉटेलच्या बाहेर अनधिकृत पणे थेट रस्त्यांवर केलेल्या पार्किंग मुळे पाठून येणाऱ्या गाड्या आदळून अपघात होतात.
शनिवारी अशाच एका अपघातात कार चा अपघात होत २ महिलांचा मृत्यू झाला. मनसे ने त्या हॉटेल ची तोडफोड करत इशारा दिलाय.
एकनाथ शिंदे हे फार काम करतात हे दाखविण्यासाठी त्यांची PR टीम प्रचंड धडपड करत असते. रात्री अपरात्री भेटी गाठी मग फोन रेकॉर्डिंग वगैरे वगैरे !
पण वास्तव वेगळेच असते. दादर भागातील सिद्धिविनायक मंदिराशेजारी पुरुषोत्तम वाडी रहिवासी संघाच्या काही इमारती २०२२ मध्ये धोकादायक आहेत असे सांगून पाडल्या गेल्या. त्याने १४० मराठी कुटुंबे बेघर झाली , त्यानंतर पुनर्वसन करू असे सरकारने आश्वासन दिले. शिंदेचे आमदार सरवणकर आणि स्वतःहा शिंदे सगळ्या निवडणूक पूर्वी इथे रात्री फेरी मारत तुम्हाला हे देऊ ते देऊ सांगत होते प्रत्यक्षात हाती भोपळा दिला.
अनाथांचा नाथ इथल्या मराठी माणसाच्या मदतीला धावून यायला तयार नाही. सत्तेत ते आहेत त्यामुळे सर्वाधिक जबाबदारी त्यांची आहे हे विसरता कामा नये. #eknathshinde