वेळच सांगते माणसाची किंमत..!
एखाद्या व्यक्तीचं महत्त्व ती आपल्या आसपास असताना फारसं जाणवत नाही. कारण तिचं अस्तित्व आपल्याला सवयीचं झालेलं असतं. पण जेव्हा ती व्यक्ती बाजूला होते, तेव्हा तिच्यामुळे उभं राहिलेलं संपूर्ण जग हलायला लागतं. त्यानंतरच लक्षात येतं की आधार कोणाचा होता आणि सावली कोणाची होती.
राजकारणातही हेच घडतं..काही नेते निवडणुका जिंकतात, काही सरकारं चालवतात; पण काही मोजकीच माणसं अशी असतात जी समाजातील विविध घटकांना सत्तेशी जोडून ठेवतात. त्यांची ताकद भाषणात नसते, तर नात्यांत असते. त्यांच्याकडे पदापेक्षा विश्वास मोठा असतो. अजित पवार यांच्याबद्दल बोलायचं झालं, तर त्यांचं राजकारण केवळ मंत्रालयापुरतं मर्यादित नव्हतं. त्यांची खरी ताकद गावागावातील संस्थांमध्ये, सहकाराच्या रचनेत, स्थानिक नेतृत्वात आणि कार्यकर्त्यांच्या विश्वासात होती. त्यामुळे त्यांच्या निर्णयाचा परिणाम एका पक्षापुरता मर्यादित राहणार नाही; त्याचे पडसाद अनेक स्तरांवर उमटतील.
आज अनेकांना वाटेल की राजकारणात कोणीही अपरिहार्य नसतं. ते खरंही आहे. पण प्रत्येकाची जागा सारखी नसते. काही जण जागा भरतात, तर काही जण संपूर्ण व्यवस्था सांभाळतात. अशी माणसं गेली की रिकामी खुर्ची दिसत नाही; रिकामं झालेलं जाळं दिसायला वेळ लागतो. ग्रामीण महाराष्ट्राचं राजकारण समजणारी नेतृत्वं दिवसेंदिवस कमी होत आहेत. निर्णय घेणारी केंद्रं शहरांकडे सरकत आहेत. अशा काळात गाव, शेतकरी, सहकार आणि स्थानिक समाजरचना यांची भाषा सत्तेपर्यंत पोहोचवणारे चेहरे कमी झाले, तर त्याची जाणीव आज नाही, पण उद्या नक्की होईल.
इतिहास सांगतो की मोठ्या नेत्यांची उणीव त्यांच्या जाण्याच्या दिवशी जाणवत नाही; ती पुढची पिढी अनुभवते. कारण त्या व्यक्तीबरोबर अनेक कार्यकर्त्यांचे मार्ग, अनेक संस्थांची ताकद आणि अनेक समाजघटकांचा आत्मविश्वासही कमी झालेला असतो.
कदाचित काही वर्षांनी महाराष्ट्र मागे वळून पाहील आणि विचारेल आपण फक्त एक नेता गमावला होता की एक संपूर्ण राजकीय आधारव्यवस्था..?
स्व.दादांना विनम्र अभिवादन..💐
#AjitPawar #Maharashtra
अवघ्या महाराष्ट्राच्या भक्ती, समता आणि मानवतेच्या परंपरेचा अखंड वारसा घेऊन जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरीच्या दिशेने आज प्रस्थान करत आहे.
लाखो वारकऱ्यांच्या मुखी हरिनाम, टाळ-मृदंगाचा निनाद आणि विठ्ठलभक्तीचा अखंड उत्सव म्हणजेच वारी. ही केवळ यात्रा नसून, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, संत परंपरेचा आणि सामाजिक ऐक्याचा जिवंत सोहळा आहे.
या पवित्र पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त सर्व वारकरी बांधवांना आणि विठ्ठलभक्तांना हार्दिक मंगलमय शुभेच्छा.!
ज्ञानोबा-तुकाराम.. 🙏🚩
#तुकाराम_महाराज #पालखी_सोहळा #ज्ञानोबा_तुकाराम #वारकरी #महाराष्ट्र
रयत कल्याणासाठी उभारलेले स्वराज्य लोकाभिमुख राज्यव्यवस्था, कर्तृत्वाचा अढळ विश्वास यांचे स्मरण करून देणारा गौरवशाली शिवराज्याभिषेक सोहळा प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील.
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यास अभिवादन.
#shivajimaharaj#shivrajyabhishek
कला ,क्रीडा, शिक्षण,आरक्षण,सामाजिक समतेचा आधारस्तंभ जातीभेद गाडण्यासाठी आपल्या स्वतःच्या मुलीचे लग्न धनगर समाजातील मुलाशी लाऊन देऊन क्रांतिकारी निर्णय घेणारे भारतीय आरक्षणाचे जनक लोकराजा छत्रपती शाहु महाराज यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन
🙏🙏
सिंधुसुधाकरासारखे प्रचंड बलशाली, कीर्तिवान, उदार, पराक्रमी व अर्थकलांमध्ये विशारद असे राजे शहाजी होऊन गेले..
-:श्री बुधभूषणम्
स्वराज्यसंकल्पक , महापराक्रमी , शहाजीराजे भोसले यांना जयंतीनिमित्त त्रिवार वंदन ! 🙏
#महाराजसाहेब 👑🚩
महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री व शिल्पकार स्व.यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती.
त्यांनी राज्याच्या शेती, सहकार, उद्योग, शिक्षणासह सर्व क्षेत्राला बळ देत राज्याच्या विकासाला दिशा दिली.
राजकीय संयम, विकासाचा दृष्टिकोन व सर्वसमावेशक विचारांसाठी ते आदर्शवत आहेत.
#यशवंतराव_चव्हाण
हा कालच्या दिवसातला सर्वात भावनिक क्षण होता
साहेबांच्या डोळ्यादेखत नवा अध्यक्ष झाला तर तुम्हाला का नको आहे.. हे वाक्य बॅकग्राऊंडला आठवत राहिलं आणि काळीज चिरल्यासारखं झालं.
नियतीचा फेरा काय असतो हे दाखवणारा क्षण.
माझे मित्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला.
अजित पवार यांचा आणि माझा राजकारणातला प्रवेश हा काहीसा एकाच काळातील, अर्थात आमचा परिचय हा बराच नंतरचा. पण राजकारणावर कमालीचं प्रेम या एका गुणावर अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी झेप घेतली. अजित पवार हे पवार साहेबांच्या मुशीत जरी तयार झालेले नेते असले, तरी त्यांनी नंतर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. आणि ही ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ठसवली.
१९९० च्या दशकांत महाराष्ट्रात शहरीकरणाने वेग पकडला. ग्रामीण भाग अर्धशहरीपणाकडे झुकू लागला, तरी तिथल्या राजकारणाचा बाज हा ग्रामीणच होता, जरी तिथल्या प्रश्नांचं स्वरूप हे काहीसं शहरी होत चाललं असलं तरी. या पद्धतीच्या राजकारणाचा पूर्ण अंदाज आणि ते उत्तम पद्धतीने कसं हाताळायचं याचं कसब अजित पवारांकडे होतं. पिंपरी चिंचवड आणि बारामती ही त्याची दोन उत्तम उदाहरणं. पिंपरी चिंचवड असेल की बारामती असेल अजित दादांनी या भागांचा कायापालट केला हे त्यांचे राजकीय विरोधक पण मान्य करतील.
प्रशासनावर अचूक पकड आणि एखाद्या फाईलीचा गुंता सोडवताना त्याची गाठ नक्की कुठून सोडवायची याचं अचूक ज्ञान असलेला हा नेता होता. प्रशासन हे सत्ताधाऱ्यांच्या पेक्षा वरचढ होण्याच्या काळात असा नेता महाराष्ट्राने गमावणं हे अतिशय दुर्दैवी आहे.
अजित पवार हे कमालीचे स्पष्टवक्ते होते. काम होणार नसेल तर ते तोंडावर सांगायचं आणि होणार असेल तर त्यासाठी ते सगळी शक्ती लावायचे. आश्वासनं देऊन स्वतः भोवती माणसांचा पिंगा घालायचा हा त्यांचा स्वभाव नव्हता. राजकारणात सडेतोडपणाची आणि स्पष्टवक्तेपणाची किंमत मोजावी लागते, त्याचा अनुभव मला पण आहे आणि त्यामुळे ती अजित पवारांना पण किती मोजायला लागली असेल याचा अंदाज करता येतो.
अजित पवारांच मला आवडणारं अजून एक वैशिट्य म्हणजे ते अजिबात जातीय नव्हते आणि त्यांच्या राजकरणात जातीपातीला अजिबात स्थान नव्हतं. सध्याच्या राजकारणात जातपात न मानता राजकारण करण्याचं धारिष्ट्य दाखवणारेच नेते कमी उरलेत, त्यात अजित पवार हे अग्रणी होते हे नक्की.
राजकारणातला विरोध हा राजकीय असतो, तो व्यक्तिगत नसतो. त्यामुळे एकमेकांवरची जहरी टीका ही व्यक्तिगत घ्यायची नसते, हे भान असलेले नेते महाराष्ट्रात कमी होत चालले आहेत. राजकारणातले दिलदार विरोधक एका मागे एक जाणे हे महाराष्ट्राच्या उमद्या राजकारणाचं मोठं नुकसान आहे.
मी आणि माझं कुटुंबीय पवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अजित पवारांना भावपुर्ण श्रद्धांजली.
राज ठाकरे ।
धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथून मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणासाठी जाणारे धनगर आरक्षण आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांना पोलिसांनी नजर कैदेत ठेवले आहे.