बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर आणि लोणार तालुक्यातील शिंदेगट, कॉंग्रेस, भाजप आणि सामाजिक कार्यकर्ते ह्यांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. ह्यावेळी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते सचिव खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, आमदार सिध्दार्थ खरात, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या संकल्पनेतून आणि पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या पुढाकाराने संयुक्त महाराष्ट्राच्या ऐतिहासिक लढ्याचा इतिहास सांगणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील ‘संयुक्त महाराष्ट्र दालना’च्या झालेली दुरावस्था आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनीधींसमोर मांडून ठिय्या आंदोलन करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त अजितकुमार आंबी ह्यांनी पुढील दोन दिवसात दालनाच्या दुरुस्तीचं काम सुरु करण्याचं आश्वासन दिलं. ह्यावेळी शिवसेना उपनेत्या महानगरपालिका विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणकर, उपनेत्या नगरसेविका विशाखा राऊत, शिवसेना सचिव नगरसेवक साईनाथ दुर्गे, विभागप्रमुख आमदार महेश सावंत, नगरसेविका हर्षला मोरे, नगरसेवक निशिकांत शिंदे आणि इतर पदाधिकारी-शिवसैनिक उपस्थित होते.
लैंगिक शोषण विरोधी कायदा किंवा कारवाई आहे ती निरपेक्ष असली पाहिजे. आणि जसा हा कायदा राज्यासाठी पारित केलेला आहे तसाच हा कायदा देशभरात लागू होणं गरजेचं आहे.
- आदित्य ठाकरे, आमदार
महाराष्ट्र विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ मध्ये दिनांक २४ मार्च २०२६ रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून मांडण्यात आलेले महत्वाचे मुद्दे!
आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या चैत्र नवरात्रौत्सवानिमित्त सौ. रश्मीवहिनी ठाकरे ह्यांच्या हस्ते अंबे मातेची पूजा आणि महाआरती!
जैवविविधतेने समृद्ध असलेल्या भीमाशंकर अभयारण्याला राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित. करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे, हे खरे आहे का? ह्या अभयारण्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा शासन देणार का?
- अजय चौधरी, आमदार
@AjayChoudhariSS
पोलीस पत्नींची मागणी आहे की त्यांना मुंबईतच हक्काची घरे हवी आहेत. ह्यासंदर्भातचा अहवाल २ महिन्यांच्या विहित मुदतीत येईल. त्यांना मालकी हक्काची मुंबईतच घरे देणार का?
- बाळा नर, आमदार
@Anantbnaroffice
कोकणातील दुर्मिळ मंदिरांना तीर्थक्षेत्र, धार्मिक क्षेत्राचा वारसा निर्माण करू शकतो. ह्यक्रिट्स एक वेगळी यंत्रणा शासनाने निर्माण केली पाहिजे. कोकणच वैभव जागतिक नकाशावर कसे येईल, हे शासनाने पाहायला हवे. वरळीच्या एनएससीआय इमारतीत ७०-६० वर्षांपासून राहणाऱ्या कुटुंबाना घरे खाली करण्यास दबाव टाकला जात आहे. त्यांना सुरक्षा देणे गरजेचे आहे. ह्यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत त्यांची घरे वाचवण्यासाठी बैठक आयोजित करण्याची विनंती आहे.
- सुनील शिंदे, आमदार
@misunilshinde
तृतीयपंथी व्यक्तींनाही समानता, स्वातंत्र्य आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. मात्र, तृतीयपंथी व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) सुधारणा विधेयकातील नव्या दुरुस्तीमुळे राज्यघटनेने स्वतःची ओळख स्वतः ठरवण्याचा दिलेल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत आहे. दुरुस्ती विधेयकाचा मसुदा तयार करताना तृतीयपंथी समाजातील संस्थांशी सरकारने कोणतीही चर्चा केलेली नाही. सरकारने हे विधेयक मागे घेऊन स्थायी समितीकडे पाठवावे.
- अरविंद सावंत, खासदार
@AGSawant
भारतीय न्याय संहितेच्या कलम ७५ नुसार विनयभंगाच्या गुन्ह्यात 'शरीरास स्पर्श करणे' हा मुद्दा अत्यंत कळीचा आहे. केवळ स्पर्श झाला म्हणून तो विनयभंग ठरू नये, तर त्यामागील 'इंटेन्शन' (हेतू) काय होता, हे तपासणे आवश्यक आहे. दोषी ठरवताना 'शरीरास स्पर्श करण्याची' जी व्याख्या आहे, त्यामध्ये स्पष्टता हवी. केवळ तांत्रिक स्पर्श आणि गुन्हेगारी स्वरूपाचा स्पर्श यात फरक करणारी दुरुस्ती (Amendment) सरकारने स्वीकारायला हवी.
- अनिल परब, आमदार
@advanilparab
बांबू ह्या क्षेत्रात पाशा पटेल ह्यांनी केलेलं काम कौतुकास्पद आहे. कोकणात टिशू कल्चर चालत नाही. वाहतुकीचे काय? कोकणातल्या माणसाला ट्रान्स्पोर्टेशनचा खर्च कसा परवडेल? म्हणून एखादी युनिव्हर्सिटी वा नर्सरी आपण कोकण उभी करणार का?
- भास्कर जाधव, आमदार
@_BhaskarJadhav
पुरुषाला सुद्धा न्याय मागण्याची व्यवस्था हवी. कुठलाही कायदा जेव्हा एकांगी होतो तेव्हा त्याचा अपेक्षित रिझल्ट मिळत नाही. ह्या संदर्भात समिती नेऊन महिलांच्या हक्कांना आणि कायद्याला धक्का न लागता पुरुषांना देखील न्याय मिळण्यासाठी प्रयत्न व्हायला हवा.
- भास्कर जाधव, आमदार
@_BhaskarJadhav
देशातील एलपीजी (LPG) गॅसच्या वाढत्या तुटवड्याकडे, सामान्य जनतेला भेडसावणार्या समस्यांकडे सत्ताधार्यांचे लक्ष वेधण्यासाठी आणि सरकारच्या धोरणांचा, खोट्या आश्वासनांचा निषेध करण्यासाठी 'इंडिया' (INDIA) आघाडीच्या खासदारांसह आज 'रिकामे सिलिंडर, अर्थहीन आश्वासने' (Empty Cylinders, Empty Promises) अशा आशयाचे फलक आणि सोबत रिकामे गॅस सिलेंडर घेऊन संसद भवन परिसरात निदर्शने केली.
- खासदार अरविंद सावंत
नेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
#ArvindSawant #ShivsenaUBT #INDIA #Parliament #LPGShortage
ऍट्रॉसिटी ऍक्टमध्ये स्पेशल अमेंडमेंट करून एसपी लेव्हल, डीवायएसपी लेव्हलवर काही तरतुदी करणार आहे का? सरसकट आरोप केले जातात. त्यात काही तरतुदी आपण करणार का?
- सचिन अहिर, आमदार
@AhirsachinAhir
१५५ चा गैर उपयोग करणारी पुण्यामध्ये ३२ हजार प्रकरण निघाली. त्यावर केलेली कारवाई, ऍक्शन टेकन रिपोर्ट आज संध्याकाळपर्यत समजेलच. पण डिसेंट्रलाइज पॉवरचा गैरउपयोग होणार नाही, ह्याबद्दल मंत्र महोदयांनी आम्हाला आश्वस्त करावं.
- अनिल परब, आमदार
@advanilparab