मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार चाकण व लगतच्या औद्योगिक परिसरातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन रस्ते व वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. वाहतूक कोंडी व रस्त्यांशी संबंधित समस्या प्रभावीपणे सोडविण्यावर समितीच्या माध्यमातून भर देण्यात येणार आहे.
तसेच, चाकणसह पुणे जिल्ह्यातील वाढत्या उद्योग व ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स (GCCs)च्या पार्श्वभूमीवर उद्योगांच्या प्रलंबित मंजुरी व परवानग्यांचे जलद निराकरण करण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात ‘उद्योग तक्रार निवारण कक्ष’ स्थापन करण्यात येत आहे.
@Dev_Fadnavis
#Maharashtra #Chakan #ChakanIndustrialArea #Pune #DevendraFadnavis