M.L Dahanukar
life isn't perfect, but your personality can be.!
#कलेला_इज्जत_आहे
Let's create a Maharashtra that the world should envy.!
#ध्यास_नवनिर्माणचा
आज दिनांक ०४/०८/२०२६ रोजी प्रभाग क्र.६५" येथे प्रभागात ठीक ठिकाणी "मॅन हॉल" अजून ही नवीन बसवलेले नाहीं आहे के-पश्चिम विभागाला मी विनंती करतो की लवकरात लवकर ह्या वर लक्ष देऊन नवीन बसवून घ्यावे आणि दुर्घटना मुक्त प्रभाग करावी! @mybmc@mybmcInfra@mybmcwardKW@AmeetSatam@TawdeRitu
नमस्कार,
गेल्या ७ दिवसापासून धाकुशेठे पाडा, तृप्ती बिल्डिंग समोर गटार साफ केले गेले नाही आहे त्यात माती जाऊन पाऊसाचे पाणी मोकळे जाऊ नाहीं शकत, आपल्याला विनंती आहे की आपण साफ करून ह्या वर मार्ग काढावा !! @mybmc@mybmcwardKW
@mybmcwardKW@AmeetSatam डिसोझा हाऊस,सीझर रोड, आंबोली येथे गेल्या १० दिवसा पासून माती आणि कचरा पसरला आहे जर पाऊस चालू झाला तर सर्व माती गटार मधे जाणार म्हणून आपली "स्वच्छता अभियान" इकडे ही राबवण्यात यावी अशी विनंती !!! @mybmc
@mybmcwardKW@AmeetSatam डिसोझा हाऊस,सीझर रोड, आंबोली येथे गेल्या १० दिवसा पासून माती आणि कचरा पसरला आहे जर पाऊस चालू झाला तर सर्व माती गटार मधे जाणार म्हणून आपली "स्वच्छता अभियान" इकडे ही राबवण्यात यावी अशी विनंती !!! @mybmc
नमस्कार, जय महाराष्ट्र
गेल्या ५ दिवसापासून कचऱ्याचा साम्राज्य टेप विलेज दादा भाई रोड येथे परसले आहे @mybmcwardKW आपली स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी आणि परिसर स्वच्छ करावा अशी विनंती करतो !
8454091180 @mybmc
सस्नेह जय महाराष्ट्र,
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपूर्वी तमाम भारतीयांना काटकसर करण्याचं आवाहन केलं. सोनं खरेदी कमी करा किंवा जवळपास थांबवाच, परदेशात गरज नसेल तर जाऊ नका, पेट्रोल डिझेलच��� वापर कमी करा, विजेवर चालणाऱ्या गाड्या जास्त वापरा, वर्कफ्रॉम होमचा पर्याय स्वीकारा इत्यादी इत्यादी. हे सगळं का ? तर, सोनं, पेट्रोल डिझेल हे आयात करावं लागतं आणि त्यात विदेशी गंगाजळी मोठ्या प्रमाणवर खर्च होते. आणि सध्या इराण युद्धामुळे खनिज तेलाचे भाव प्रचंड वाढलेत.
बरं, मग स्वतः पंतप्रधान आणि त्यांचे सगळे सहकारी देशभर काही शे गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणुका काढत आहेत, स्वतःवर फुलं उधळून घेत आहेत त्याचं काय करणार आहात आपण ? आमच्याकडून चूक झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून, यापुढे माझ्यासकट कोणीही काही असं करणार नाही असं सांगणार आहात का ? चुका तुमच्या, आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?
सध्या खनिज तेलाचा आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव हा साधारणपणे ९० ते १०० डॉलर्स प्रति बॅरल असा आहे. हा भाव जगाने या आधी कधी पाहिला नाही असं नाही.
२००८ ला पुढे २०११-२०१२ मध्ये अरब स्प्रिंगच्या वेळेस, २०१३-२०१४ च्या काळात ( जेंव्हा भाजपवाले खनिज तेलाच्या किंमती आणि ��ेशाची इभ्रत यावर तावातावाने बोलत होते तो काळ ), पुढे अशीच परिस्थिती २०२२ आणि २०२३ च्या दरम्यान जेंव्हा ओपेकने खनिज तेलाचं उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला तेंव्हा देखील बॅरलचा भाव ९० ते १०० डॉलर्सच्या दरम्यान गेला होता. या घटनांपैकी ३ ते ४ वेळा मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि एकदा तर स्वतः मोदी पंतप्रधान होते. मनमोहन सिंगांनी असं आवाहन केलं नाही की तेंव्हा मोदींनी केलं नाही. मग आत्ताच ��ा ? काटकसर करा हे आवाहन करताना खरं कारण देशाच्या आणि राज्याराज्यांच्या अर्थव्यवस्थेचं जे काही कंबरडं मोडून ठेवलं आहे त्याबद्दल पंतप्रधान काहीच बोलत नाहीयेत. बरं जेंव्हा बॅरलचा भाव ६० ते ६५ डॉलर्सच्या आसपास होता तेंव्हा पण तुम्ही चढ्या भावाने आम्हाला पेट्रोल डिझेल विकत होतात त्यावेळेस जे पैसे लोकांकडून घेतले जे काही लाख कोटी रुपये असतील ते कुठे गेले ? त्याचं काय झालं ?
ज्या रेवडी संस्कृतीची पंतप्रधानांनी खिल्ली उडवली त्याच रेवड्या मग २०२�� ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक असो की त्यानंतरच्या बिहार, पश्चिम बंगाल निवडणूका असोत की इतर कुठल्याही निवडणुका 'रेवड्या' वाटूनच निवडणुका जिंकल्यात. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेने राज्याची अर्थव्यवस्था मोडकळीला आणली. महिलांना सक्षम करायचं सोडून त्यांना तुटपुंजे पैसे द्यायचे आणि ते पैसे महागाईच्या रूपाने पुन्हा काढून घ्यायचे. देशाची आणि राज्याची अर्थव्यवस्था जर नाजूक झाली आह�� तर या रेवड्या वाटू नका असं पंतप्रधान ठामपणे सांगणार आहेत का ?
पेट्रोल, डिझेलच्या वापरात काटकसर करा असं पंतप्रधान सांगतात. ठीक आहे. मग हे आत्ताच का सुचलं ? पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि इतर राज्यांच्या निवडणुकीत प्रचार, रोड शो करताना आणि देशभरातून लाखो माणसं त्या त्या राज्यात नेताना जे कोट्यवधी लिटर्स पेट्रोल, डिझेल वाया गेलं तेंव्हा का नाही सुचलं ? या राज्यांमध्ये जो अफाट पैशाच��� खेळ करून मतदान मिळवलं तेंव्हा का नाही सुचलं ? लोकांनी परदेशात जाणं टाळावं असं पंतप्रधान म्हणतात. पण किती टक्के लोकांना परदेशात जाणं आत्ता परवडत आहे ? ज्या वर्गाला परवडू शकतो त्यांना पुढच्या महिन्यात आपली कंपनी आपल्याला कामावर ठेवेल का याची खात्री नाही. विद्यार्थ्यांना परदेशात शिकायला जावंस वाटतं कारण गेल्या १० ते ११ वर्षांत आपण शिक्षणात फार मूलभूत गुंतवणूक पण केली नाही भारतात रहावं असं वाटावं असं वातावरण पण निर्माण केलं नाही. शिक्षणात फक्त हिंदी कशी लादता येईल याकडे सगळं लक्ष लागलेलं.
गेले काही महिने विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून अंग काढून घेत आहेत. एक अंदाज असा आहे जवळपास दीड लाख करोड रुपये गेल्या तीन महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी काढून घेतलेत. भारतात विदेशी गुंतवणूक होत नाहीये. पंतप्रधान आणि त्यांचे मुख्यमंत्री फक्त गुंतवणुकीचे करार करतात, त्यासाठी थंड हवेच्या देशांत जातात. बरं तिथे जाऊन भारतीय कंपन्यांसोबत करार कर��यचे मग त्यासाठी स्वित्झर्लंडला काय जायचं? स्वतः पंतप्रधान आता १५ मे पासून ५ देशांच्या परदेश दौऱ्यावर न��घालेत, हे दौरे तुम्ही थांबवा. आणि मग लोकांना आवाहन करा.
नमस्कार, गेल्या १५ दिवसापासून आंबोली सीझर रोड येथे रोड che काम चालू होते तेव्हा कॉन्ट्रॅक्टर यांनी कचऱ्याचा "ढबा" फूटपाथ वर ठेवला गेला आहे जेणेकरून कचऱ्याचे साम्राज्य परसले आहे नागरिकांना जाता येत नाही आपल्याला विनंती आहे की आपण ह्या वर कारवाई करावी!
@mybmcwardKW@mybmc
आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांचं या देशासाठी दिलेलं योगदान अतुलनीयच आहे आणि या देशाच्या येणाऱ्या पिढ्या त्याबद्दल त्यांच्या ऋणात राहतील.
पण आज जागतिक आणि देशांतर्गत घटनांमुळे रुपया जेंव्हा कमकुवत होत आहे त्यावेळेस, 'प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरीजीन अँड इट्स सोल्युशन्स' सारखा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहणारे, फक्त सामाजिक नाही तर अतिउत्तम आर्थिक समज असणारे बाबासाहेब आठवतात. ब्रिट��शांच्या धोरणांमुळे भारतीय रुपयाचं अवमूल्यन कसं झालं आणि त्याचा सामान्य भारतीयांच्या आयुष्यावर कसा खोल परिणाम झाला हे त्यांनी या ग्रंथात विशद केलं. यात त्यांनी मांडलेल्या सूचना या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेचा पाया आहेत.
स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांना फक्त देशाला स्वातंत्र्य मिळायला हवं इतकीच आस नव्हती तर हे स्वातंत्र्य समाजाच्या तळापर्यंतच्या माणसाला लाभदायक झालं पाहि���े आणि त्याचा आर्थिक विकास देखील झाला पाहिजे. थोडक्यात सामाजिक दृष्टी आणि अर्थशास्त्राचा देखील त्यांचा उत्तम अभ्यास होता. बाबासाहेब हे त्या पिढीतले याबाबतीतले अग्रणी नेते.
छत्रपती शिवाजी महाराज , बाबासाहेब आंबेडकर , महात्मा ज्योतीबा फुले , लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अशा कितीतरी महान नेत्यांचे नुसते पुतळे उभे करणे, त्यांना जातीत पातीत विभागणे , त्यांच्या नाव���ने जाती धर्मात फूट पाडणे , त्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना कर्कश्य डीजे लावून नुसत्या मिरवणुका काढणे या सारख्या गोष्टींमधून हे राज्य आणि राजकारणी बाहेर येतील तेव्हाच या महान लोकांना आपण श्रद्धांजली अर्पण करू शकतो ! नाहीतर ह्या महान व्यक्ती फक्त जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना हार घालण्यापूरतेच उरतात आणि त्यांचा वारसा, त्यांचे विचार आपण आत्ताच्या सत्तापूपीसू राजकारण्यांसाठी पायदळी तुडवत राहू !
विकास म्हणजे सरकारी मदत, उड्डाणपूल आणि रस्ते इतकी मर्यादित कल्पना आत्ताची सरकारं रुजवत असताना, या सगळ्या वरवरच्या विकासाचा यत्किंचित फायदा नसलेला खूप मोठा वर्ग भारतात आहे. आज प्रखर सामाजिक आणि आर्थिक भान असणाऱ्या बाबासाहेबांसारख्या महामानवाची, त्यांच्या समग्र दृष्टीची उणीव वारंवार भासत आहे !
बाबासाहेबांच्या स्मृतीस पुन्हा एकदा विनम्र अभिवादन.
राज ठाकरे ।
नमस्कार,
गेल्या १५ दिवसापासून सीझर रोड आंबोली येथे कापलेले जाड व कचरा उचला गेला नाहीं आहे कृपया करून आपण लवकरात लवकर हे साफ करून घ्यावे अशी विनंती !
@mybmcwardKW@mybmc@AmeetSatam
📍 #मुंबई |
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नंदनवन या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
यावेळी त्यांच्यासोबत विविध विषयावर चर्चा झाली. तसेच नंदनवन या बंगल्याच्या हेरिटेज वास्तूचे वेगळेपण जपत केलेल्या सुधारणांचे त्यांनी विशेष कौतुक केले. या बंगल्यात लावलेल्या मुंबईतील जुन्या हेरिटेज वास्तूंच्या फोटो फ्रेम्सची त्यांनी बारकाईने ��ाहणी केली, आणि जुन्या मुंबईच्या आठवणींना उजाळा दिला.
#Shivsena #EknathShinde #MNS #RajThackeray #Mumbai #Maharashtra
@RajThackeray
नमस्कार,
गेल्या १ महिन्या पासून अंधेरी पश्चिम मार्केट , त��पे मसाला समोर पाण्याची लाईन फुटली असून सर्व पाणी वाया जात आहे आपल्या विनंती आहे की आपण ह्या कडे लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर ह्या वर मार्ग काढावा ! @mybmcwardKW @mybmc @AmeetSatam @DNNagarPS
नमस्कार,
अंधेरी पश्चिम, आंबोली ,सीझर रोड, N.R wine shop समोर गेल्या ३ महिना पासून स्पीड ब्रेकर तुटला आहे २ अपघात झाले असून, आपण ह्या वर लवकरात लवकर कारवाई करू नीट करून घ्यावे ही विनंती !!!
ऋषिकेश देवरुखकर 8454091180
@mybmc@mybmcwardKW@DNNagarPS
"गणपती बाप्पा" यांच्या वि��र्जनसाठी कृतिम तलाव आणि "छठ पूजा" साठी जुहू चौपाटी वरती ???
हेच का तुमचे मराठी आणि हिंदुत्व ??......
गणपती बाप्पा साठी न्यायालयात जाणारे आता छठ पूजा साठी न्यायालयात जाणार का ?
@Dev_Fadnavis @mieknathshinde @RajThackeray @SandeepDadarMNS
"गणपती बाप्पा" यांच्या विसर्जनसाठी कृतिम तलाव आणि "छठ पूजा" साठी जुहू चौपाटी वरती ???
हेच का तुमचे मराठी आणि हिंदुत्व ??......
गणपती बाप्पा साठी न्यायालयात जाणारे आता छठ पूजा साठी न्यायालयात जाणार का ?
@Dev_Fadnavis@mieknathshinde@RajThackeray@SandeepDadarMNS
@Adani_Elec_Mum दत्तगुरु बिल्डिंग,साई बाबा मंदिर जवळ, सीझर रोड ,आंबोली अंधेरी पश्चिम येथे गेल्या 3 दिवसा पासून लाईट चे पोल बंद आहे आपण लवकरात लवकर ह��या वर लक्ष द्यावे ही विनंती @mybmcwardKW