*आज बुलढाणा राष्ट्रवादी भवन येथे महाविकास आघाडी ची बैठक संपन्न झाली.यावेळी संपूर्ण बुलढाणा विधानसभा आणि चिखली विधानसभेचे तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि आणि पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी प्रा.रिजवान खान (महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष) यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले..
फडणवीस मंत्रिमंडळात रम रमी रमा रमणी!
मी दिल्लीत आहे;
चार मंत्री नक्की घरी जात आहेत;
पाचवा गटांगळ्या खात आहे.
मिंधे अजित दादांचे मुख्य नेते अमित शहा यांनी निर्णय घेतला!
महाराष्ट्रात वेगवान घडामोडी लवकरच सुरू होतील!
@AmitShah
@PMOIndia
@Dev_Fadnavis
आज मतदार संघातील श्री.किशोर लक्ष्मणराव पवार रा.वडीगोद्री ता.अंबड यांचे चिरंजीव लक्ष्मीकांत व श्री.भास्कर गुलाबराव आटोळे रा.बीबी ता.लोणार जि.बुलढाणा यांची कन्या चि.सौ.का.कोमल यांचा दिनांक 16 जुलै रोजी विवाह सोहळा संपन्न झाला.आज वडीगोद्री येथे सदिच्छा भेट देऊन वधू-वरांना शुभाशीर्वाद देत पुढील वैवाहिक आयुष्यसाठी शुभेच्छा दिल्या.त्यांचं वैवाहिक जीवन सुखा, समाधानाचे आणि भरभराटीचे जावो, हिच सदिच्छा...!
याप्रसंगी श्री.मोती लक्ष्मण पवार माजी जि.प.सदस्य,श्री. दिपक लक्ष्मण पवार माजी सरपंच यांच्यासह संपूर्ण पवार परिवार उपस्थित होता.
#विवाह_सोहळा #स्वागत_समारंभ
#शुभेच्छा
MRTI: अल्पसंख्याकांसाठी सरकारची घोषणा की फसवी भूलथाप?
7 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र सरकारने ‘अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था’ (MRTI) स्थापनेची मोठी घोषणा केली. मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, पारशी समाजाच्या प्रगतीसाठी: ✅ 11 पदांचे सृजन ✅ 6.25 कोटी निधी मंजूर ✅ धोरणात्मक संशोधन व प्रशिक्षणाचे केंद्र.
आज 20 जुलै 2025, वर्ष उलटूनही: ❌ संस्था अस्तित्वात नाही ❌ भरती नाही ❌ कार्यालय नाही ❌ निधीचा वापर नाही ❌ संशोधन/प्रशिक्षण सुरू नाही
📰 सकाळ (20 जुलै 2025) वृत्तपत्रातील बातमी नुसार : ही घोषणा फक्त कागदावर! सरकारच्या निष्क्रियतेमुळे अल्पसंख्याक सशक्तीकरणाच्या हक्कांवर आघात!
✊ आता फक्त घोषणा नको, कृती हवी!
@INCHarshsapkal@VarshaEGaikwad@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde
#MRTI #MinorityEmpowerment #SocialJustice #Maharashtra
हिंदीच्या अट्टाहासापायी विद्यार्थ्यांचे नुकसान का करताय?
महाराष्ट्र शासनाने पहिलीपासून हिंदी भाषा शिकविण्याचा निर्णय घेतला असून मागच्या दाराने शिक्षणात त्रिभाषा सुत्र घुसडले आहे. यामुळे मराठी भाषक जनतेमध्ये नाराजीचा सूर आहे.
सर्वात काळजीची बाब म्हणजे त्रिभाषा सुत्राबाबतचा हट्ट पुरविण्यासाठी कार्यानुभव, खेळ आणि कला या विषयांसाठीचे तास कमी करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांचे व्यक्तिमत्त्व बहरावे यासाठी हे तास अतिशय महत्त्वाचे आहेत.
परंतु ते कमी करण्यात येत असल्याने शासनाचे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबाबत नेमके काय धोरण आहे असा प्रश्न उपस्थित होतो. माझी शासनाला विनंती आहे की कृपया विद्यार्थ्यांना गरजेचे असणाऱ्या या विषयाचे तास कमी करु नयेत. तसेच जनतेच्या तीव्र भावना लक्षात घेता त्रिभाषा सुत्राचा पुनर्विचार करावा.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये 'कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील करिअर व संधी' (AI Career Pathways Exploring Opportunities in Artificial Intelligence) ह्या एकदिवसीय कार्यशाळेत विद्यार्थ्यांशी 'शेतीतील AI क्रांती आणि बारामतीतून घेतला जाणारा पुढाकार' ह्यावर संवाद साधला.
सन्माननीय व्यासपीठ आणि सहकारी बंधू-भगिनींनो...
गेले दोन- अडीच तास आपण सर्वजण 'कृत्रिम बुद्धिमत्ते'संबंधी जाणकारांचे विचार ऐकतोय. विद्या प्रतिष्ठानने Artificial intelligence च्या संदर्भात कालपासून इथे कार्यशाळा आयोजित केली. त्या कार्यशाळेत सहभागी व्हायला मला मनापासून आनंद आहे. विद्या प्रतिष्ठानच्या प्रवासाचा हा एक महत्वाचा टप्पा आहे. बारामतीसाठी ते एक अभिमानास्पद पाऊल आहे. आपण आपल्या शहराची भविष्यासाठी Innovation म्हणजेच 'अभिनव कल्पनांचे केंद्र' म्हणून देशाच्या नकाशावर ओळख होईल, अशी काळजी करत आहोत.
आपण सध्या Artificial intelligence द्वारे चालवल्या जाणाऱ्या परिवर्तनाच्या युगात प्रवेश करत आहोत. ही एक अशी 'ज्ञान क्रांती' आहे की जगात शिक्षण, कामकाज आणि जीवनशैली पूर्णपणे बदलतेय. अलीकडे हे प्रगत तंत्रज्ञान फक्त मुंबई, दिल्ली, बेंगलोर, हैदराबाद अशा महानगरांपुरतं मर्यादित होतं. पण ते आज या मोठ्या शहरांची सीमा पार करत आहे. आपण ही अत्याधुनिक सुविधा थेट ग्रामीण भागात व महाराष्ट्रात घेऊन आलो. आपण दाखवून देत आहोत की, जागतिक दर्जाची नवसंशोधन ग्रामीण पातळीवर सुद्धा सुरू होऊ शकते. मला अभिमान आहे की, भारत सरकारच्या 'AI मिशन'च्या अनुषंगाने हे बारामती मधील खाजगी 'सेंटर ऑफ एक्सलन्स' काही कालावधीमध्ये पूर्ण होईल. त्याचं बांधकाम सुरू आहे. माझी खात्री आहे की, दिवाळीच्या आसपास हे आपलं केंद्र या ठिकाणी पूर्णत्वाला गेलेलं तुम्हा सर्वांना पाहायला मिळेल.
आपण याची सुरुवात कुठून केली? हे मी तुम्हाला थोडक्यात सांगू इच्छितो. मला आठवतंय की, १९७२ साली एक साधं स्वप्न आणि ठाम विश्वास घेऊन विद्या प्रतिष्ठानची आपण स्थापना केली. त्यावेळी एका शाळेपासून त्याची सुरुवात झाली. आज या संस्थेमध्ये कला, विज्ञान, वाणिज्य, अभियांत्रिकी, कायदा, जैव तंत्रज्ञान इ. शाखांमध्ये बालवाडी पासून ते पदव्युत्तर शिक्षण देणारं प्रतिष्ठान म्हणून आपली ओळख आता झालेली आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी येथे येतात व आपलं भविष्य घडवतात. आमचं ध्येय केवळ इमारती आणि सुविधा तयार करणं इतकंच नाही. तर शेतकरी, कष्टकरी, महिला, समाजातील कमकुवत घटक आणि मागासवर्गातील मुलं- मुली यांनाही पुणे व मुंबईच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच संधी प्राप्त व्हाव्यात, हा आमचा उद्देश होता. या विचाराची फलश्रुती सांगायचं झालं तर, 'करिष्मा इनामदार' ही एक लहान समाजातली मुलगी विद्या प्रतिष्ठानमध्ये शिकली आणि आता थेट NASA मध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करतेय.
मित्रांनो, भारतामध्ये AI सारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये नेतृत्व करण्याची उत्तम संधी आहे. कारण आपल्याकडे आयटी व संगणक विज्ञानासाठी प्रतिभावान मनुष्यबळ आहे. अनेक वर्षांपूर्वी मला ही गोष्ट जाणवू लागली होती. त्यादृष्टीने विद्या प्रतिष्ठानात 'सेंटर ऑफ एक्सलन्स' स्थापन करण्याचं ठरवलं. बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये Microsoft आणि Oxford University यांच्याशी भागीदारी केली. 'Farm of the Future' हा प्रयोग सुरू केला. आपल्याला आश्चर्य वाटेल की, या दोन्ही संस्थांनी आम्हा लोकांना साथ दिली आणि नुसतीच साथ दिली नाही तर कृषी क्षेत्रामध्ये AI चा वापर करण्यासाठी Microsoft ने ७१ तज्ञांची नियुक्ती केली. Oxford University ने १३ तज्ञ या संशोधनासाठी Recruit केले. या दोघांच्याही कष्टांतून आणि अभ्यासातून एक नवीन अभ्यासक्रम तयार झाला. त्याची सुविधा आपण इथून देण्याचा निर्णय घेतलेला आहे. माझी खात्री आहे की, आत्मविश्वासाने भारलेला आणि जगाच्या पाठीवर कुठेही जाऊन आपली भूमिका मांडण्याची कुवत असलेला 'विद्यार्थी वर्ग' हा यातून तयार होऊ शकेल.
आज भारताकडे AI सारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये नेतृत्व घेण्याची संधी आहे. पण आपल्याकडे आयटी व संगणक विज्ञानात प्रतिभावान मनुष्यबळ आहे. त्याचा आधार घेऊनच आपण Microsoft आणि Oxford यांची मदत घेऊ शकलो. आता मला असं वाटतं जे काही आपण केलं, त्या उपक्रमातून एक पाऊल पुढे जाऊन 'सेंटर ऑफ एक्सलन्स' ची अंमलबजावणी थोड्याच कालावधीत इथे तयार होईल.
महाराष्ट्र वासियांनो,
दाल में कुछ तो काला हैं।
निवडणुकीचे #CCTV फुटेज आणि तत्सम रेकॉर्डिंग ४५ दिवसांत नष्ट करण्याचे आदेश नुकतेच निवडणूक आयोगाने दिले आहेत. निवडणुका मुक्त आणि मोकळ्या वातावरणात तसेच निष्पक्षपणे पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. निवडणूक प्रक्रियेवरून राजकीय पक्ष तसेच सामान्य जनतेत कोणताही संशय राहू नये या दृष्टीने खबरदारी घेणे ही आयोगाची जबाबदारी असते. असे असूनही निवडून आयोगाला असा निर्णय घ्यावा लागत असेल तर नक्कीच यात काहीतरी गौडबंगाल आहे. महाराष्ट्रातील जनतेला जो संशय आहे त्यात काहीतरी तथ्य आहे.
काही वेळा, काही लोक उठून प्रश्न विचारतात की आदरणीय शरद पवार साहेबांनी काय केलं ? त्यांनी हा व्हिडिओ नक्की पहावा...
जेव्हा एकदा लोकप्रतिनिधी त्याच्या भागात अमुलाग्र बदल घडवतो आणि त्या भागातील कष्टकरी बांधवांची मुले परदेशात शिकायला जातात त्याला 'विकास' म्हणतात
"मराठीला अंतर देणार नाही"
असं म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंनी पहिलीपासून हिंदी शिकवणार नाही, असं जाहीर करुन दाखवावं.
शिक्षणमंत्री शिवसेनेचेच आहेत ना?
#MaharashtraPolitics#Marathi#Hindi
'नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार' पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व माननीय आमदार श्री. जयंतराव पाटील यांनी सांगली येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मांडलेले ठळक मुद्दे.