पुणे सातारा महामार्ग वारजे भागातील नदीवरील हायवे पूल नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला आहे परंतु पुलाच्या Expansion joint rubber टाकण्यात आलेले नाही प्रशासनाने संबंधित कॉन्ट्रॅक्टर कडून संपूर्ण काम व्यवस्थित करून घेतले पाहिजे @pmc_pune @nitin_gadkari
3 टर्म आमदार, माजी मंत्री असलेल्या भाजपच्या संभाजी पाटील निलंगेकर यांच्या निलंगा मतदार संघात जर वृद्ध दाम्पत्याला बैल मेला म्हणून स्वतःला जुंपून घ्याव लागत असेल तर कसली महासत्ता आणि कसली महाशक्ती!
अरे, थू तुमच्या असल्या राजकारणावर!
#YouthForDemocracy#SPR
तुम्ही किती ही प्रयत्न केला तरी अजून पण तुमच्या गाड्या वेळेवर सुटत नाहीत त्यामुळे बहुसंख्य लोक रेल्वेने जातात.आज मी सकाळी पुणे ते छ संभाजीनगर 05.15 च्या गाडीचे आरक्षण केले होते पण प्रत्यक्षात गाडी 05.50 ला सुटली. त्यात गाडीची व्यवस्थित सफाई केली नव्हती. सुधरा रे...
पुरावा म्हणून मृत्यू झालेल्या बहिणीचा सांगाडा बँकेत घेऊन जातानाचा ओडिशातील आदीवासी व्यक्तीचा हा व्हिडिओ व्यवस्थेच्या कानाखाली दिलेली सणसणीत चपराक आहे.. तुम्ही देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरची करा…. किंवा जनधन योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक व्यक्तीचं बँक खातं उघडा त्याला इथं तोपर्यंत अर्थ नाही जोपर्यंत व्यवस्थेतील झारीतल्या शुक्राचार्यांना तुम्ही सरळ करत नाही आणि माणसाला माणूस म्हणून वागणूक देण्याचं शिकवत नाही…
सरकार यातून बोध घेईल, ही अपेक्षा..!
संतापजनक!
हडपसर, पुणे येथे एका व्यक्तीला भररस्त्यात बॅंकेचे वसूली एजंट घेरुन मारहाण करतात. रिझर्व्ह बँकेने स्पष्टपणे नमूद केले आहे की -
१. वसुली एजंट कर्जदाराला केवळ सकाळी ७:०० ते संध्याकाळी ७:०० या वेळेतच फोन करू शकतात किंवा भेटू शकतात.
२. एजंटांनी कोणत्याही परिस्थितीत शारीरिक किंवा मानसिक छळ, अपमान किंवा मारहाण करणे हा गंभीर गुन्हा आहे.
3. कर्जदाराच्या थकबाकीची माहिती त्याच्या शेजाऱ्यांना किंवा मित्रांना देऊन त्याची बदनामी करता येत नाही.
4. वसुलीसाठी येणाऱ्या व्यक्तीकडे बँकेने दिलेले अधिकृत ओळखपत्र आणि अधिकृत पत्र असणे अनिवार्य आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने देखील स्पष्ट केले आहे की, बँका केवळ गुंडांच्या जोरावर कर्जाची वसुली करू शकत नाहीत.जर बँकेच्या एजंटने कायद्याचे उल्लंघन केले, तर त्यासाठी संबंधित बँकेला जबाबदार धरले जाईल.
या सगळ्या गोष्टी धाब्यावर बसवून हडपसरमध्ये ही मारहाण झाली.राज्यात कायदा सुव्यवस्था अस्तित्वात आहे की नाही, याबाबत शंका यावी अशी ही घटना आहे. राज्याच्या गृहखात्याने या घटनेची गांभीर्याने नोंद घ्यावी. सदर वसुली एजंटांवर कारवाई झाली पाहिजेच पण संबंधित बॅंकेचीही जबाबदारी टाळता येणार नाही. या बॅंकेवरही योग्य ती कारवाई झाली पाहिजे. या खासगी फायनान्स कंपन्यांच्या मुजोरीला आळा घालणे गरजेचे आहे.
@Dev_Fadnavis
@punepolicecity @FinMinIndia@RBI
माझ्या विदर्भ आणि खान्देशातील जनतेला नम्र विनंती आहे एप्रिल मे महिन्यात लग्न काढू नका
डिसेंम्बर मध्ये पण तारखा असतात .एकतर पाण्याची कमतरता,उन्हाची लाहीली आणि मुहूर्त दुपारी 1वाजून 40 मिनिटांचे .वयस्कर आणि लहान मुलांची काळजी घ्या.थंडीत लग्न काढा रे .🤦.भान राहू द्या .
हडपसरमधील १५ नंबर चौकात भररस्त्यात क्रेडिट कार्ड वसुलीवरून जोरदार राडा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे."
"एका खाजगी फायनान्स कंपनीच्या वसुली एजंटांनी सर्व मर्यादा ओलांडत एका ग्राहकाला त्याच्या पत्नीसमोरच बेदम मारहाण केली..
@CPPuneCity@PuneCityPolice
#पुणे
मंडईतीव बाबू गेणू पार्किंगमध्ये दुव्हिलरसाठी प्रतितास ३ ₹ चार्ज आहे. पण इथे प्रति तास १० ₹ घेऊन लूट केली जात आहे. त्याचा व्हिडिओ काढता आला नाही. मनपाचे मुख्य अभियंता दिनकर गोजारेंकडे तक्रार केली.
हा प्रकार घडण्यापूर्वी हा काढलेला व्हिडिओ. यात म्हणल्याप्रकर् अनुभव आला.
एक वर्षापासून IT मध्ये काम करणारा मित्र मोबाईलवर निनाद बेडेकर सरांचे भाषण ऐकत होता…
आज तोच इतिहासाची पुस्तकं वाचतोय!
इतिहास माणसाला वेड लावतो आणि तेच वेड त्याला घडवतं! वाचनाशिवाय समृद्धी नाही. आणि जिथे महाराज येतात, तिथे आधाराची कमी नसते!
#वाचनसंस्कृती#इतिहास#छत्रपती#मराठी
हिंदू महिलांवर वाईट नजर टाकली तर त्याचे हातपाय काढणार-राणे, पडळकर, जगताप, लांडगे.
कॅप्टन खरात ने नुसती नजर नाही तर हिंदू महिला बाटवल्या. माईकवर मर्दानगी दाखवणारे बायले झालेत की काय? कॅप्टन विरुद्ध एक शब्द ही नाही.
घरगुती गॅस ₹60/- ने महागला..
आता दुसरा सिलेंडर ही 25 दिवसांच्या फरकानेच मिळणार..
आदरणीय महोदय, ते नाल्यातून गॅस बनवायची युक्ति देशवासियांना सांगाल का?
देश गॅस तुटवड्याच्या संकटात आहे!
विवाह सत्यशोधकी😱
🎯 भरमसाठ पब्लिक
🎯 भाड्याने घेतलेला हॉल
🎯 वधू ने केलेला सुंदर असा मेकअप
🎯उपस्थित कॅमेरामन
🎯 हार तुर्यांसाठी खर्च केलेला पैसा...
🎯भव्य दिव्य लायटिंग
🎯पाठीमागे असलेले डेकोरेशन
आज ज्योतीरावांचा आत्मा काय म्हणत असेल?
देशाच्या स्वातंत्र्याची किंमत त्यांनाच कळते ज्यांच्या रक्ताने ही माती पवित्र झाली. हजारो क्रांतिकारकांनी फासावर जाऊन, तुरुंगात सडून प्राणांची आहुती देऊन हे स्वातंत्र्य मिळवलंय.
म्हणूनच आज अमेरिकेच्या इशाऱ्यावर भारताचे निर्णय होताना दिसले की प्रश्न पडतो, "142 कोटी भारतीयांचा स्वाभिमान इतका स्वस्त आहे का?" माझी सरकारला हात जोडून विनंती आहे की देशाचा स्वाभिमान गहाण टाकू नका.
भारत हा स्वतंत्र, सार्वभौम देश आहे; कोणाची कॉलनी नाही. आपलं परराष्ट्र धोरण डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार नाही तर भारताच्या जनतेच्या स्वाभिमानावर ठरलं पाहिजे. लोकशाहीत जनताच जनार्दन असते.
मग प्रश्न पडतो की
- देशाच्या स्वाभिमानाशी तडजोड करणारे निर्णय नेमके कोणत्या “फाईल्सच्या” दबावाखाली घेतले जात आहेत?
- आपलं भारत सरकार अमेरिकेचा निषेध नोंदवणार का?
#IndiaFirst
#SovereignIndia
#NationalPride
#BharatSwabhiman
#IndependentForeignPolicy
अमेरिकन ट्रेजरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट यांनी आज एक जाहीर घोषणा केली आहे ती सर्व भारतीयांनी वाचली पाहिजे. किमान जे सुशिक्षित आहेत, ज्यांचं आपल्या देशावर थोडंफार प्रेम शिल्लक आहे आणि ज्यांच्या मेंदूला मोदीभक्तीचा नारू झालेला नाही त्यांनी तरी वाचलीच पाहिजे!!
अमेरिकेकडून झालेल्या या घोषणेत भारताला रशियन तेल विकत घेण्यासाठी ३० दिवसांची परवानगी दिली गेली आहे.
वरील वाक्य परत एकदा वाचा. परवानगी दिली आहे. म्हणजे भारताने अगदी अमेरिकेने जगावर लादलेल्या युद्धाच्या काळातही आपली चूल पेटवण्यासाठी रशियाकडून तेल घ्यायचं की नाही हे अमेरिका ठरवणार! किती दिवस घेता येईल हेही अमेरिकाच ठरवणार!!
भारताचं परराष्ट्र धोरण आपण अत्यंत कुचकामी, निर्लज्ज आणि कणा नसलेल्या लोकांच्या हाती दिलं असल्याचा अजून वेगळा पुरावा तुम्हाला काय पाहिजे?