लिपिक टंकलेखक परीक्षा २०२३ मधील एकूण ७००६ जागांपैकी ४२६५ जागांवर नियुक्त्या झाल्या असल्या, तरी साधारणतः २७०० पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. याप्रकरणी खुल्या प्रवर्गातील रिक्त जागा, तसेच राखीव प्रवर्गातील प्रतीक्षा यादीतून जाहिरातीप्रमाणे राहिलेल्या रिक्त जागा पूर्ण क्षमतेने भराव्यात, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका (Writ Petition) दाखल आहे.
#MPSC विद्यार्थ्यांच्या सत्याग्रह आंदोलनात लिपिक टंकलेखक परीक्षा २०२३ मधील उर्वरित जागा भरण्याची मागणी केली होती. त्यावर विद्यार्थीहिताची भूमिका घेतली जाईल, असे आश्वासन शासनाने दिले होते. दोन दिवसांपूर्वी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त सचिव व्ही. राधा मॅडम यांची भेट घेऊन याविषयी उच्च न्यायालयात शासनाकडून विद्यार्थीहिताचे प्रतिज्ञापत्र सादर करावे, याबाबत चर्चा केली होती. त्यांनीदेखील सकारात्मक भूमिका घेत लवकरच शपथपत्र सादर करण्याचा शब्द दिला होता. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात उच्च न्यायालयात सुनावणी असल्याने न्यायालयाने रिक्त जागा भरण्यासंदर्भात शासनाची भूमिका विचारली आहे.
ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन सामान्य प्रशासन विभागाने आता दिलेल्या शब्दाप्रमाणे २८ ऑक्टोबर २०२६ पूर्वी विद्यार्थीहिताची भूमिका घेणारे शपथपत्र तत्काळ न्यायालयात सादर करावे, ही विनंती!
@Dev_Fadnavis
MPSC ने लिपिक-टंकलेखक (गट-क) भरतीची प्रतिक्षा यादी न लावल्यामुळे हजारो पात्र उमेदवारांचा संघर्ष वाया गेला आहे. हा केवळ विद्यार्थ्यांच्या भविष्याशी केलेला खेळ आहे.
सरकारने तातडीने दखल घेऊन प्रतिक्षा यादी जाहीर करावी.
#MPSC#बेरोजगार_युवक@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
गट-क (२०२३) खुल्या प्रवर्गातील सर्व रिक्त पदे तत्काळ भरून काढावीत. उमेदवार रुजू न झाल्याने रिक्त राहिलेल्या जागांची प्रतीक्षा यादी तयार करून पात्र उमेदवारांना संधी द्यावी.... @CMOMaharashtra@mpsc_office@Dev_Fadnavis
अनुसूचित जाती आणि जमातींसाठी स्वतंत्र आयोग आवश्यकच होता!
अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्यासंदर्भातील विधेयकावरील चर्चेत सहभागी होत या विधेयकाचे स्वागत केले. तसेच या विधेयकाच्या अंमलबजावणीबाबत काही सूचना सभागृहात मांडल्या.
आदिवासी समाज हा जल, जंगल आणि जमीन याच्यावर खऱ्या अर्थाने अधिकार असलेला, देशाचा खरा मूळनिवासी समाज आहे. अनुसूचित जमाती व अनुसूचित जातींमधील प्रश्नांचे स्वरूप काही प्रमाणात वेगवेगळे असल्यामुळे दोन्हींसाठी स्वतंत्र आयोग अत्यंत गरजेचे होते.
आजही अनेक भागात प्रामुख्याने नंदुरबार, धुळे, नाशिक, नगर या जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाज अतिशय कष्टप्रद जीवन जगतो आहे. आदिवासी भागातील अनेक आश्रमशाळा व वसतिगृहांची अवस्था दयनीय आहे. हजारो कोटींचा निधी खर्च होत असूनही गुणवत्ता नाही.
म्हणूनच विधेयकाची अंमलबजावणी करत असताना, अधिकाऱ्यांची नियुक्ती केवळ अनुभव या निकषावर न करता त्यांची आदिवासी बांधवांसाठीची काम करण्याची तत्परता पण पाहिली पाहिजे.
त्याचबरोबर आणखी काही महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या:
📌 निधीचा अपव्यय, ठेकेदारांचा भ्रष्टाचार यासंदर्भातील कारवाईचा अधिकारही आयोगाला मिळाला पाहिजे. कारण निधीचा अपव्यय हा देखील एक प्रकारचा सामाजिक अन्यायच आहे.
📌 या आयोगांनी फक्त तक्रारी ऐकणं आणि सुनावण्या घेणं तेवढ्यापुरतंच मर्यादित न राहता, त्या समाजाच्या उन्नतीसाठी सकारात्मक धोरणं तयार करून त्यांची अंमलबजावणी करावी.
कारण महाराष्ट्राच्या व भारताच्या अर्थव्यवस्थेचा पाया 18 पगड जाती, जमाती आणि 12 बलुतेदारांच्या कष्टांवर उभा आहे. मोठमोठ्या उद्योगांपेक्षाही जास्त योगदान ही जनता देत असते. या विधेयकाच्या माध्यमातून अनुसूचित जाती व जमातींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणत त्यांचा सर्वंकष विकास होईल, अशी मला अपेक्षा आहे. कारण- सिर्फ हंगामा खड़ा करना इसका मकसद नहीं होना चाहिए, सूरत बदलनी चाहिए !
#MonsoonSession #Maharashtra #SC #ST #Tribal
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@drashokuike_mla @RamShindeMLA
विवाह समारंभात ग्रामीण महिलांचा उत्साह आणि त्यांच्या आवाजात इंदिरा गांधी आणि पंडित नेहरूंच्या स्तुतीचा गजर, हे दर्शवते की त्यांच्या कार्याची प्रेरणा आजही जिवंत असून यावरून हेच सिद्ध होते की त्यांच्या योगदानाचा प्रभाव किती मोठा आहे. 😍✋
#RahulGandhi#PriyankaGandhi#incIndia
काळाराम मंदिर सत्याग्रह हा कोणत्याही देवासाठी किंवा धर्मासाठी नव्हता. तो लढा होता समतेचा,अस्मितेचा,स्वाभिमानाचा,
मानवतेचा. भिमरायांना शतशः प्रणाम... लढ्यात सहभागी सर्व सत्याग्रहींना विनम्र अभिवादन... 🙏🏻💙
#काळाराममंदिरसत्याग्रह
सोनी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका कौन बनेगा करोडपतीच्या धर्तीवर क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठच्या राज्यशास्त्र व लोकप्रशासन विभाग आयोजित राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त लोकशाही सप्ताहामधील "कौन बनेगा चाणाक्ष वोटर" या प्रश्न मंजुषा स्पर्धेची चलचित्रे...
#kbc#kbcnmu#voter#kbcv
आज 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त एच.जे.थिम कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, जळगाव येथे "लोकशाही मध्ये निवडणूक आणि मतदार जागरूकता" या विषयावर व्याख्यान दिले त्यावेळेचे क्षणचित्रे.
#VotersDay2024#VoterAwareness
नव्या आशा आणि उमेद घेऊन
नव्या वर्षाची पहाट उगवतेय...
सरत्या वर्षाबद्दल कृतज्ञ असतानाच
आगामी वर्ष सर्वांना आनंदी, निरोगी आणि
भरभराटीचे जावो ही सदिच्छा...
सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...!
#HappyNewYear#HappyNewYear24#HappyNewYear2024
“जैसे भारत है बेजोड़, वैसे हम बेजोड़ हैं,
ग्यारह हमको मत गिनना हम एक सौ चालीस करोड हैं..!
लिख दो आसमान में यह जीत भारत की खास है....चूक गया अगर बैट तो बोलिंग में धधकती आग है.”
विजयी भव मेरे देश...!!
#INDvsAUSfinal#INDvAUS#ICCWorldCupFinal#WorldcupFinal#RohithSharma
नको नको रे जोतिष्या
नको हात माझा पाहू
माझं दैव मला कये (कळे)
माझ्या दारी नको येऊ
बहिणाबाईंना लिहिता वाचता येत नव्हतं. पण एखाद्या ग्रंथाएवढं तत्वज्ञान त्या चार ओळीत, साध्या सोप्या भाषेत सांगत.
बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏
#BahinabaiChaudhari
मोजु तरी कशी उंची तूझ्या कर्तृत्वाची,
जगाला शिकवलीस तू व्याख्या माणुसकीची,
तू देव ही नव्हता, देवदूत ही नव्हता,
तू माणसाच्या माणुसकीचा पूजा करणारा,
महामानव होतास...,
#विश्वरत्न, #भारतरत्न#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त #विनम्र#अभिवादन 🙏💙