आम्हाला राज विचारांचा छंद लागला आहे, तो जोपासण्यासाठी आम्ही हे काम करतो.राज विचार तुमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतलाय.
#मनसे#Rajthackeray
मुंबईत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे माँ साहेब स्व. मीनाताई ठाकरे फुल मार्केट, दादर येथे मध्यरात्री झाड पडून व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. ह्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली, तसेच महापालिका कर्मचाऱ्यांना तात्काळ माझ्या प्रभागातील धोकादायक झाडांचे ऑडीट करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर मार्केट परिसरातील सर्व झाडांची छाटणी झाल्याशिवाय जायचं नाही असे निर्देश दिले, तसेच तोवर त्यांच्या अल्पोपहाराची व्यवस्थाही केली. तसेच महापालिका प्रशासनाकडे मी ह्या आधीही अनेकवेळा पाठपुरावा केला होता, पण झोपलेल्या प्रशासनाला दुर्घटना घडल्या खेरीज जाग येत नाही असे वाटते.
Due to the incessant heavy rainfall in Mumbai, a tree collapsed at the Late Maasaheb Meenatai Thackeray Flower Market in Dadar around midnight, causing significant losses to traders.
I visited the site to assess the situation and immediately directed the Municipal Corporation officials to conduct an audit of all dangerous trees in my ward. I also instructed them not to leave the market premises until the pruning of all trees in the area was completed. Arrangements for refreshments were made for the staff so they could continue the work without interruption.
I had repeatedly followed up with the Municipal Corporation on this issue earlier as well, but it seems the administration only wakes up after an unfortunate incident occurs.
#MNSAdhikrut #AaplaYashwant
विकासाच्या नावाखाली मुंबई विकली जाते
बिल्डर होतोय करोडपती..!
BMC खातेय पैसे
आणि जनता मरते..!
ही आहे "स्मार्ट सिटी" मुंबई ची हकीकत..!
@mybmc@CMOMaharashtra#Mumbairain#Mumbai
मुंबईतील पावसाळी दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार अमित साटम यांच्या वर्तनावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी त्यांच्यावर कठोर टीका करत आमदारकीचा राजीनामा आणि भाजपच्या मुंबई अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी केली. या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे.
.
.
.
#MumbaiRains #MaharashtraPolitics #AmitSatam #MNS #PoliticalNews
२ दिवसांत २ मुंबईकरांचे आपण खून केलेत, हे बोलायचं बहुदा चाटम विसरलेत दिसतंय …
पावसाळ्यापूर्वी पण आपण आणि आपल्या महापौर रस्त्यावर होतात.
काय दिवे लावलेत..?
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच स्कूल बसवर झाड कोसळून १ चिमुकल्याचा मृत्यू होतो, तर १० चिमुकले जखमी होतात… तर मॅनहोलमध्ये पडून ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू होतो… अन् हो,
रोज पावसामुळे मुंबईत कुठे ना कुठे अपघाताची घटना घडतच आहे…
पावसाळ्यात राजकारण्यांना आणि अधिकाऱ्यांना रस्त्यावर यावे लागू नये, याला शहर नियोजन म्हणतात… पण हे कळण्यासाठी शहराबद्दल प्रेम आणि अक्कल असावी लागते…
आपल्या हसण्यावरून ती आपल्यात नाही, याचे चित्र मुंबईकरांनी पाहिले आहे …
झालेल्या प्रकाराबद्दल मुंबईकरांची माफी मागण्याचे सोडून ठाकरेंवर बोलून चर्चेत राहण्याचे राजकारण करणे बंद करा …
लाज-शरम असेल तर जनतेची माफी मागा; अन्यथा निर्लज्जपणाचा पुरस्कार तर आपण केव्हाच पटकावला आहे …
'Power tends to corrupt, and absolute power corrupts absolutely' पण या वाक्याचा अर्थ उद्या समजून सांगायची वेळ आली तर सध्याचे भारतीय जनता पक्षाचे तुमचे सहकारी हे आदर्श उदाहरण ठरतील अशी परिस्थिती आहे - श्री. राज ठाकरे
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील ज्या ‘मिसिंग लिंक’चे गुणगान गात जाहिरातींवर कोट्यवधी रुपये उधळले, त्याच महामार्गाची अवघ्या २ महिन्यांत वाट लागली आहे!
‘मिसिंग लिंक’ म्हणजे ‘मिसिंग क्वालिटी’ हे या व्हिडिओतून स्पष्ट दिसत आहे.
कोट्यवधींचा निधी गेला कुठे ?
"राज ठाकरे" हा माणूस जेव्हा हरतो, तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही आणि तुमचे भविष्य हरत असते...
हा माणूस गेली कित्येक वर्षे मुंबईवर होणाऱ्या अतिक्रमणांविरुद्ध आवाज उठवतोय, परप्रांतियांच्या लोंढ्यांवर आणि त्यांच्यामुळे प्रशासनात होणाऱ्या ढवळाढवळीवर बोट ठेवतोय, तसेच शहराच्या नियोजनावर सातत्याने बोलतोय.
पण दुर्दैव असं की, आपण मतदार म्हणून आपल्या रोजच्या मूलभूत गरजांकडे डोळेझाक करतो. निवडणुकीच्या आदल्या रात्री होणाऱ्या पैशांच्या उलाढालीवर आणि अवघ्या १५०० रुपयांवर मोहात पडून, आपण आपल्या आयुष्यातील हक्काची ५ वर्षे स्वतःहून अंधारात ढकलतो.
असो! हा माणूस नेहमी सत्य बोलत राहिला आणि तुम्ही मात्र नेहमीच सत्यापासून पळत राहिलात... हेच आजचे कडू 'सत्य' आहे!
राज्यात सध्या लोकप्रतिनिधींची संवेदनशीलता ढासळत चालल्याचं चित्र आहे अशावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्याचा प्रमुख म्हणून याला आळा घातला पाहिजे अशी भावना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
आता तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारवाई करतील का ?
तुंबलेल्या पाण्यात फिरणे आणि त्यालाच फील्ड वर काम करणे असा गोड गैरसमज करून घेतलेल्या बेताल अमित साटम ह्यांना मनसे नेते श्री संदीप देशपांडे ह्यांनी जबरदस्त उत्तर दिले आहे.
आता ढोंग नको तर रिझल्ट दाखवा, साटम.
@SandeepDadarMNS@AmeetSatam
मिसिंग लिंक वर दोनच महिन्यात मोठे मोठे खड्डे पडले, ते प्रवाश्यांनी पाहिले, फोटो टाकले , अधिकाऱ्यांनी पळापळ करत थूकपट्टी करत खड्डे बुजवले.
आता भारतीय जनता पक्षाचे खोटारडे कार्यकर्ते म्हणताहेत खड्डेच नव्हते , म्हणजे प्रवासी वेडे आहेत.
@VishalBhargava5@MFuturewala
प्रति
श्री. देवेंद्र फडणवीस,
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला आहे, हे पूर्व , पश्चिम , उत्तर , दक्षिण भारतातील लोकं सर्रास बोलत आहेत. केंद्रातील लोकं वाट्टेल तसे वागत आहेत याचा राग लोकांच्या मनात होता आणि आहेच. पण हा संसर्ग आता आपल्या राज्यापर्यंत पसरला आहे ? आणि तुम्ही तो पसरू देताय?
देशातील इतर राज्यातील राजकारण आणि महाराष्ट्रातील राजकारण यात जमीन अस्मानाचा फरक होता. महाराष्ट्रच्या राजकीय नेत्यांच्या विचारांचं आणि उमदेपणाचं एक कौतुक आणि कुतूहल साऱ्या देशात होतं ! पण गेल्या काही वर्षांत आपण आपली बरोबरी उत्तरेकडील काही मागास विचारांच्या राज्यांबरोबर करायला लागलोय हे आता स्पष्टपणे जाणवत आहे !
तुमचा एक आमदार आणि पदाधिकरी लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतो आणि त्यावर कारवाईचा एकही आसूड ओढला जात नाहीये. एक फार प्रसिद्ध वाक्य आहे जे तुम्ही पण कधी ऐकलं असेल, 'Power tends to corrupt, and absolute power corrupts absolutely' पण या वाक्याचा अर्थ उद्या समजून सांगायची वेळ आली तर सध्याचे भारतीय जनता पक्षाचे तुमचे सहकारी हे आदर्श उदाहरण ठरतील अशी परिस्थिती आहे.
कोणाला कशाचाच खेद नाही, खंत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि या सगळ्यात तुम्ही एकही अवाक्षर बोलत नाही यामुळे सगळे बेफाम झाले आहेत.
देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत, संवेदनशील आहेत असं महाराष्ट्राला वाटत होतं, आणि मलाही वाटत होतं. पण हे असले प्रकार जेंव्हा होतात आणि त्यावर जेंव्हा काहीही खेद तुमच्या कडून व्यक्त केला जात नाही, तेंव्हा मात्र तुमच्या संवेनशीलतेबद्दलच शंका घ्यावी लागते.
मी गेली ३७ वर्ष राजकारणात सक्रिय आहे. या काळात महाराष्ट्रात एखाद्या नेत्याकडून प्रमाद घडला, चूक झाली तर तो स्वपक्षाचा आहे म्हणून त्याच्या चुकांवर त्यावेळच्या राज्यातील नेत्यांनी कधी पांघरूण घातलंय असं झालं नाही. बाळासाहेब असोत, पवार साहेब असोत की प्रमोदजी असोत किंवा कोणीही असोत, म्हणून महाराष्ट्राचं राजकारण वेगळं आहे अशी देशभर प्रतिमा होती.
आज तुम्ही हा आपला आहे ना मग त्यांनी काहीही केलं तरी घाल त्याला पाठीशी सुरु केलं आहेत. याने तुम्ही तुमची आणि महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहात असं वाटत नाहीये का ? तुमचे मंत्री रोज बेताल विधानं करत आहेत, त्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही. तुमचे इतर नेते असंवेदनशीलता उघडपणे दाखवतात त्यांना तुम्ही काही बोलत नाही .
( बोलला असता तर परत त्यांची तीच चूक करायची हिम्मत झाली नसती पण ते तसेच वागत आहेत यावरून समजतंय की तुम्ही त्यांना काहीच समज देत नाही आहात) तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय आहे?
तुमच्याकडून म्हणण्यापेक्षा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून काही संकेतांची अपेक्षा कायम असते. मग तो कुठल्या का पक्षाचा का असेना. त्याचा अपेक्षाभंग करू नका. अन्यथा देवेंद्र फडणवीस हा माणूस फक्त स्वकीयांच्या चुकांना पाठीशी घालणारा भाऊ इतकीच तुमची प्रतिमा राहील आणि यांत सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात चुकीचे पायंडे पडतील.
खरंतर असं बेफाम वागणाऱ्यांकडून तुम्ही राजीनामे घ्यायला हवेत. पण तुम्ही ते का करत नाही आहात माहित नाही. वेडंवाकडं वागणाऱ्यांना फडणवीस जबर शासन करतात हे एकदा दाखवून द्या म्हणजे सगळेच सुतासारखे सरळ येतील.
तुम्ही सुज्ञ आहात. तुमच्याकडून अपेक्षा आहेत.
राज ठाकरे ।
उत्तर प्रदेश चा भाजप आमदार काय म्हणातोय पहा.
राम मंदिरातील चोरीची माहिती असून देखील कारवाई केली नाही.
आता दक्षिणेतील मंदिराकडून व्यवस्थापन शिका म्हणात आहेत. #AyodhyaChandaChori
कुत्र्यासारखे मार खात आहेत रे.... म्हात्रे असून मार खातोय! 🤨
सत्ता गेल्यावर काय होणार ते बोलायलाच नको.
कल्याण मधून तडीपार असलेला माणूस कल्याण मध्ये येऊन नगरसेवकाला मारतोय!
कुठे आहे कायदा आणि सुव्यवस्था!
@kalyan_news@KalyanForum
आज १ जुलै २०२६ रोजी राजसाहेबांनी ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी एसआयआरचा भारतीय जनता पक्ष स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी कसा गैरवापर करत आहे, सध्याचं फोडाफाडीचं सुरु असलेलं राजकारण यावर परखड भाष्य केलं. त्याची ही चित्रफीत. जरूर पहा
#MNSAdhikrut
पालिका आयुक्त कुठे आहेत?
पालिकेचे अधिकारी कुठे आहेत?
आमदार कुठे आहेत?
खासदार कुठे आहेत?
नवी मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झाला आहे का?
नेरूळ येथे पावसाच्या पाण्यात उतरलेल्या विजेच्या तारेमुळे शॉक लागून दोन अवघ्या १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनी शुभांगी बलखंडे आणि उज्वला वाघ गंभीर जखमी झाल्या. त्यांची फोर्टिस हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रकृतीची विचारपूस केली.
हा अपघात नाही, तर संबंधित यंत्रणेच्या निष्काळजीपणाचा परिणाम आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या दोषी अधिकारी आणि संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई झालीच पाहिजे.
नवी मुंबईकरांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत माफ केले जाणार नाही!
मनसे रोजगार व स्वयंरोजगार विभाग, रायगड जिल्हा नवी कार्यकारिणी! 🤝
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा:
🔹 श्री. सतीश कालेकर - रायगड जिल्हाध्यक्ष
🔹 श्री. अमोल कालेकर - कर्जत तालुका संघटक
🔹 श्री. जितेंद्र रुठे - उपतालुका संघटक
नायगाव-पवित्र धाम बससेवेच्या दुरवस्थेवरून मनसे आक्रमक! 🚌
पवित्र धाम परिसरातील अनियमित बसफेऱ्या आणि प्रवाशांच्या त्रासाबाबत आज (१ जुलै २०२६) मनसे पदाधिकाऱ्यांनी परिवहन अधिकारी श्री. धैर्यशील जाधव यांची भेट घेऊन सडेतोड चर्चा केली व निवेदन दिले.
@vvcmc_official