राज्यात सुरू असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आज विधानसभेतील दालनात विशेष बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र राज्य नगरपरिषद व संवर्ग कर्मचारी संघटनेसोबत संपाबाबत चर्चा करण्यात आली. या चर्चेत संघटनेच्या मागण्यांचा विचार करून त्या सोडवण्याबाबत सकारात्मकता दाखवण्यात आली.