गेली तीन चार दिवसांपासूनच आजच्या जन्मदिवसासाठी आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि सदिच्छा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत आहेत, मी माझ्या आयुष्याची सामाजिक व राजकीय वाटचाल आपल्या सर्वांच्या पाठबळावर व वडीलधाऱ्यांच्या आशिर्वादाने पार करीत आहे. प्र��ास संघर्षाचा असला तरी जोतिबा म्हणून लाभलेली पतीची साथ,कुटूंबातील पाठीराखे, माझी महाराष्ट्रातील भली मोठी संघटना, सर्वच पदाधिकारी आणि राजकीय वरिष्ठ मार्गदर्शक या सगळ्यांचेच शुभचिंतन यामुळे मी हा प्रवास लीलया पेलू शकते. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांचा नम्रपुर्वक स्विकार करते, आपले हे नाते दिवसेंदिवस वृध्दींगत होवो हिच प्रार्थना..!