PMC JE परीक्षेचा घोळ संपता संपेना.... मागच्या 18 तासात एकाच विद्यार्थ्याला 4 वेळा हॉलतिकीट त्यापैकी 2 वेगवेगळे सेंटर. असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना असे mail आले आहेत. या विद्यार्थ्यांनी नेमके करायचे काय?
PMC निर्णय घेणार कधी? @PMCPune@Dev_Fadnavis@mieknathshinde
२५ जानेवारीला होणारी PMC Junior Engineer परीक्षा फक्त TCSion अधिकृत सेंटरवरच घ्यावी.
२ वर्षे मेहनत करणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये.
परीक्षा फक्त TCSion अधिकृत केंद्रांवरच घ्यावी, ही नम्र पण ठाम मागणी.
#JuniorEngineerExam#PMC#StudentJustice#TCSionOnly
🚨 PMC JE Exam (25 Jan 2026)
Students paid ₹900–₹1000 fees, yet exam centers are allotted 200–500+ km away.
TCS iON centers were promised but private centers given.
This is unfair.
👉 Demand: TCS iON centers ONLY
#JEExam#PMC#JusticeForAspirants@PMCPune@navalMH
PMC कनिष्ठ अभियंता पदाच्या 169 जागांसाठी २५ जानेवारी रोजी होत असलेल्या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांनी TCS ION केंद्रांची मागणी करूनही त्यांना खाजगी परीक्षा केंद्र देण्यात आली आहेत. यापुर्वी खाजगी परीक्षा केंद्रांवर झालेले गैरप्रकार पाहता सदरील परीक्षा पुन्हा खा���गी केंद्रांवरच घेतली तर परत गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यासोबतच दुष्काळात तेरावा महिना म्हणजे बहुतांश विद्यार्थ्यांना ३०० किमीहून अधिक दुरची केंद्र देण्यात आली आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना मोठा मानसिक त्रास आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तरी सरकारने तात्काळ सदरील विषयामध्ये लक्ष घालून खाजगी केंद्रांऐवजी TCS ION केंद्रांवर परीक्षा घेण्याबाबत न��र्णय घ्यावा, ही विनंती...!
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
राज्यातील अनेक परीक्षा TCS iON Center वर सुरळीत होत असताना 25 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या PMC ज्युनियर अभियंता परीक्षा खाजगी आणि वाईट रेटींग असलेल्या केंद्रावर का घेतली जात आहे? आधीच भरमसाठ फी त्यात आपल्या शहरापासून शेकडो किमी लांब असलेली खाजगी परिक्षा केंद्रे विद्यार्थ्यांसाठी सोईस्कर नाहीत. मागील काही परीक्षांमधील गैरप्रकार पाहता या परिक्षा खाजगी परीक्षा केंद्रावर न घेता अधिकृत अशा TCS ioN केंद्रावरच घ्याव्यात जेणेकरून पारदर्शकता आणि व्यवहार्यता जपली जाईल.
@PMCPune@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
PMC JE परीक्षा 25 Jan खाजगी व खराब रेटिंगच्या केंद्रांवर घेणे हा विद्यार्थ्यांवरील सरळ अन्याय आहे.
300–400 किमी प्रवास, खर्च, मानसिक ताण आणि पूर्वीच्या अनियमिततेमुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
परीक्षा सुरक्षितता व पारदर्शकतेसाठी फक्त TCS iON अधिकृत केंद्रांवरच घ्यावी.
संदर्भ : महाराष्ट्र_काँग्रेस/२०२६/००६.
प्रति,
मा. आयुक्त,
पुणे महानगरपालिका,
पुणे.
विषय : PMC Junior Engineer (Civil) परीक्षा केवळ TCS iON अधिकृत केंद्रांवर घेण्याबाबत.
महोदय,
पुणे महानगरपालिकेमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या Junior Engineer (Civil) पदाच्या परीक्षेबाबत, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या वतीने ही बाब आपल्या निदर्शनास आणत आहे.
दिनांक १ डिसेंबर २०२५ पूर्वीच सदर परीक्षा TCS iON या अधिकृ��� आणि विश्वासार्ह केंद्रांवर घ्यावी, अशी विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात आली होती. या मागणीचा सकारात्मक विचार होईल, या अपेक���षेने पुणे महानगरपालिकेने परीक्षेची तारीख पुढे ढकलली होती. मात्र, आता हीच परीक्षा २५ जानेवारी २०२६ रोजी खासगी (Private) परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात येत असल्याचे समजते, जे अत्यंत चिंताजनक आहे.
१) परीक्षा सुव्यवस्था आणि केंद्र व्यवस्थापन :
सदर परीक्षा पुन्हा खासगी केंद्रांवर आयोजित करण्यात आली असून, अनेक उमेदवारांना त्यांच्या राहत्या ठिकाणापासून ३००-४०० किलोमीटर अंतरावर केंद्रे वा��प करण्यात आली आहेत. सामान्यत: अशा मोठ्या प्रमाणातील परीक्षा TCS iON सारख्या सक्षम यंत्रणेमार्फत २-३ दिवसांच्या स्लॉटमध्ये सुव्यवस्थितपणे पार पाडता येतात. मात्र, PMC सारखी महत्त्वाची परीक्षा एकाच दिवशी ४२,००० पेक्षा अधिक उमेदवारांसाठी खासगी केंद्रांवर घेण्यात येत आहे. यातील अनेक केंद्रांची रेटिंग, सुविधा आणि पारदर्शकता अत्यंत निकृष्ट असल्याची वस्तुस्थिती आहे.
२) परीक्षा गांभीर्य आणि उमेदवारांचा मानसिक त्रास :
अचानक आणि पुरेशी पूर्वसूचना न देता परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवास नियोजन, निवास व्यवस्था तसेच काही उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या ड्युटीसंबंधी अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तब्बल २ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या या परीक्षेसाठी अपारदर्शक आणि असुविधाजनक खासगी केंद्रांवर परीक्षा देण्याची सक्ती केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड मानसिक तणाव निर्माण झाला आहे.
वरील सर्व बाबींचा विचार करता, आपणास विनम्र विनंती आहे ��ी, PMC Junior Engineer (Civil) परीक्षा दिनांक २५ जानेवारी २०२६ ही केवळ TCS iON अधिकृत केंद्रांवरच आयोजित करण्यात यावी. यामुळे परीक्षेतील पारदर्शकता, सुव्यवस्था आणि सुरक्षितता सुनिश्चित होईल. तसेच, उमेदवारांचा अनावश्यक प्रवासाचा त्रास टाळून योग्य आणि समतोल परीक्षा वातावरण निर्माण होईल.
आपण विद्यार्थ्यांच्या हक्क, भविष्य आणि प्रशासकीय जबाबदारीचा सकारात्मक विचार करून योग्य निर्णय घ्यावा, ही नम्र विनंती.
धन्यवाद,
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी करिता,
धनंजय रामकृष्ण शिंदे
सरचिटणीस
अध्यक्ष : रोजगार व स्वयंरोजगार विभाग (भ्रमणध्वनी : ��८६७६ ९३५८८)
प्रत,
मा. हर्षवर्धन दादा सपकाळ, प्रांताध्यक्ष : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
@PMCPune @INCHarshsapkal @INCMaharashtra @CMOMaharashtra
PMC Jr इंजिनिअर पदभरतीसाठी २५ जानेवारी रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी उमेदवारांनी अर्जात निवडलेली परीक्षा केंद्रे देण्यात आलेली नाहीत.
काही विद्यार्थ्यांना शेकडो किमी अंतरावरील खासगी कें��्रे देण्यात आली आहेत. पुणे महापालिका आयुक्तांनी तातडीने कार्यवाही करून परीक्षा केंद्रे बदलून अधिकृत TCS iON Centre वर परीक्षा घ्यावी.
#TCSion
@PMCPune @navalMH
जाहीर पाठिंबा ✊📘
पुण्यातील सिव्हिल इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचे पुस्तक वाचन आंदोलन हे लोकशाही आणि संविधानिक मूल्यांचे प्रतीक आहे. आपल्या हक्कांसाठी शांत, शिस्तबद्ध आणि वैचारिक मार्गाने लढा देणे हीच खरी लोकशाही आहे.
PMC तसेच MJP व MAHATRANSCO संदर्भातील अन्यायकारक निर्णयांविरोधात विद्यार्थ्यांनी उचललेले हे पाऊल संविधान, समान संधी आणि सामाजिक न्यायाच्या बाजूने आहे. पुस्तक हातात घेऊन रस्त्यावर उतरलेली तरुणाई ही कुठ��्याही सरकारसाठी गंभीर इशारा असते.
काँग्रेस पक्षाचा या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा आहे. विद्यार्थ्यांचा आवाज दाबला जाऊ नये, त्यांच्या भविष्याशी खेळ केला जाऊ नये, हीच आमची ठाम भूमिका आहे.
@INCMaharashtra @INCIndia @PMCPune
#पुस्तकवाचनआंदोलन #विद्यार्थीहक्क #संविधान #लोकशाही #पुणे #Dhananjay_Shinde #DhananjayShinde