@healiingroot No I will never allow it because lord ram will be used to buy liquor,drug's will be used for en number of illegal activities the best person is gandhi ji photo because he deserve all this u may disagree with me.
'कोयले को, कोयला मत समजना...'
असे म्हणत मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांनी कोळशाच्या पारंपरिक प्रतिमेला छेद दिला. त्यांचे हे विधान केवळ एक घोषणा नसून, कोळशाला केवळ इंधन न मानता, त्यातून मूल्यवर्धित उत्पादने आणि स्वच्छ ऊर्जा निर्माण करण्याच्या दूरदृष्टीचे प्रतीक आहे.
जागतिक स्तरावर नैसर्गिक वायूचे संकट गडद होत असताना, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या आवाहनाला प्रतिसाद देत, महाराष्ट्र सरकारने कोळसा गॅसीफिकेशन प्रकल्पांसाठी सामंजस्य करार (MoU) करणारा देशातील पहिले राज्य बनून 'संकटात संधी' शोधण्याचा आदर्श घालून दिला आहे.
कोळसा गॅसीफिकेशन हा भारताच्या ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. काल महाराष्ट्रात या संदर्भात महत्त्वपूर्ण करार झाले असून, चंद्रपूर येथे दोन प्रकल्पांचे भूमिपूजन सुद्धा झालं आहे.
सद्यस्थितीत जगभरात 'LPG' ऊर्जा संकट मोठ्या प्रमाणात 'आ' करून उभं आहे. त्यातल्या त्यात भारताची स्तिथी इतर राष्ट्राच्या तुलनेत खूप चांगली आहे, तरीही इंधनाच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्याचा निर्धार केला आहे.
कोळस्यापासून गॅस निर्मितीचे राज्याला तर फायदाच आहे त्याच बरोबर देशात इंधनाच्या बाबतीत मोठी क्रांती होणार आहे...
✅ आयात अवलंबित्व कमी करणे आणि परकीय चलनाची बचत
सध्या भारत पेट्रोकेमिकल्स, मिथेनॉल, अमोनिया आणि नैसर्गिक वायू यांसारख्या औद्योगिक कच्च्या मालासाठी मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे.
कोळसा गॅसीफिकेशनमुळे या रसायनांचे देशांतर्गत उत्पादन शक्य होईल. एका अंदाजानुसार, या प्रकल्पांमुळे सुमारे १६,००० कोटी रुपयांच्या आयातीला पर्याय निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे देशाच्या परकीय चलनाची मोठी बचत होईल
✅ भारताकडे कोळशाचा मोठा साठा उपलब्ध आहे. या देशांतर्गत संसाधनाचा वापर करून ऊर्जा आणि रसायने निर्माण केल्याने देशाची ऊर्जा सुरक्षा बळकट होईल. यामुळे जागतिक बाजारातील इंधनाच्या किमतीतील चढउतारांचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम कमी होईल.
✅ महाराष्ट्रातील चंद्रपूर येथे सुरू होणाऱ्या दोन प्रकल्पांमध्ये १०,००० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जात आहे. यातून २,००० हून अधिक थेट रोजगार आणि त्याहून पाच पट अधिक अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल.
✅ या प्रक्रियेतून मिळणाऱ्या सिंथेसिस गॅसचा वापर खते युरिया, अमोनियम नायट्रेट, खाणकाम, वस्त्रोद्योग आणि पॅकेजिंग यांसारख्या विविध क्षेत्रांसाठी आवश्यक रसायने बनवण्यासाठी होतो. यामुळे कोळशाचे केवळ इंधन म्हणून न वापरता त्याचे मूल्यवर्धन होते.
थोडक्यात सांगायचे तर, हे प्रकल्प सध्या प्राथमिक आणि उभारणीच्या टप्प्यात असून, आर्थिक वर्ष २०२९-३० पर्यंत ते पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
खालील कंपन्यांनी कोळस्यापासून गॅस निर्मितीसाठी महाराष्ट्रात गुंतवणूक केली आहे..
- वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड आणि कोल इंडिया या कंपनीचा चंद्रपूर येथे प्लांट असणार आहे. ही कंपनी कोळस्या पासून सिंथेटिक नॅचरल गॅस बनवणार आहे.
- ग्रेटा एनर्जी अँड मेटल प्रायव्हेट लिमिटेड भद्रावती कंपनीचा चंद्रपूर येथे प्लांट असणार आहे.
- न्यू एरा क्लीनटेक सोल्युशन प्रा. लि.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदृष्टी आणि नेतृत्वामुळेच महाराष्ट्राने कोळसा गॅसीफिकेशनमध्ये हे ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. त्यांच्या संकल्पनेतून साकारणारे हे प्रकल्प राज्याला ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर बनवून विकासाच्या नव्या वाटा उघडतील.
शब्द अपुरे पडतात, भावना नि:शब्द होतात... जेव्हा एक आधारवड हरपतो
आमचे मार्गदर्शक, केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मा. मुरलीधर अण्णा मोहोळ यांचे पूज्य वडील कै. किसनराव दगडोबा मोहोळ यांच्या दुःखद निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे.
सामान्य कार्यकर्त्यांची ताकद, आमचे खंबीर पाठीराखे आदरणीय @PrakashGade13 दादा यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
🎂🎉🎊💐
आपणास दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो, हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना.
#HappyBirthday#bjp#socialmedia
काल राज्याचे मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, भारताची क्षमता एवढी वाढली आहे की, एका झटक्यात आपण कर्ज फेडू शकतो. त्यांच्या या विधानानंतर, काही ‘बांडगुळ’ मंडळींना ‘कर्ज वाढले’ अशी पोटदुखी सुरू झाली आहे आणि ते लगेच सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. जणू काही देश प्रगती करत असताना, पैसा झाडाला लागतो आणि तो कोणी काढत नाही!
पण चला, या ‘कर्जाच्या’ मुद्द्यावर थोडं सडेतोड आणि उपरोधिक विश्लेषण करूया, म्हणजे या ‘बांडगुळांना’ही कळेल की, ‘विकास’ म्हणजे काय आणि ‘कर्ज’ म्हणजे काय.
पहिला मुद्दा समजून घेऊ, जीडीपीच्या तुलनेत कर्जाचे आदर्श प्रमाण काय आहे ? आणि भारताची स्थिती काय?
विरोधक जेव्हा ‘कर्ज वाढले’ म्हणून बोंबलत असतात तेंव्हा ते सोयीस्करपणे काही आकडेवारी विसरतात. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) सारख्या जागतिक संस्था विकसनशील देशांसाठी जीडीपीच्या तुलनेत कर्जाचे प्रमाण ६०% पर्यंत सुरक्षित मानतात. आता आपल्या भारताची स्थिती काय आहे ते पाहूया..
✅ आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये भारताचे एकूण सार्वजनिक कर्ज जीडीपीच्या सुमारे ५७.१% इतके आहे.
✅ आर्थिक वर्ष २०२५ - २६ मध्ये हे प्रमाण जवळपास ५६.१% पर्यंत आहे.
आता सांगा, ६०% च्या मर्यादेत ५६-५७% कर्ज असणे, हे ‘धोकादायक’ आहे की ‘आदर्श’ आहे? विरोधकांच्या गणितानुसार, कदाचित आपण कर्ज घेतलेच नाही पाहिजे, म्हणजे देश गरीबच राहील आणि मग त्यांना टीका करायला आणखी एक मुद्दा मिळेल! पण, भारताची अर्थव्यवस्था केवळ टिकून नाही, तर वेगाने वाढत आहे, हे त्यांना सोयीस्करपणे दिसत नाही.
भारतावर वाढलेला कर्ज कुठे खर्च होत आहे, हा तर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न...
विरोधकांना वाटतं की, हे कर्ज फक्त ‘फुकटच्या योजनां’वर खर्च होत आहे. पण सत्य याच्या अगदी उलट आहे. आज भारताचे कर्ज हे पायाभूत सुविधांच्या विकासासाठी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी वापरले जात आहे. बुलेट ट्रेनचे जाळे, अद्ययावत राष्ट्रीय महामार्ग, पूल, बंदरे, विमानतळे आणि आधुनिक औद्योगिक कॉरिडॉर... ही सर्व कामे आज जोरदारपणे सुरू आहेत. ही केवळ बांधकामे नाहीत, तर भविष्यातील भारताच्या आर्थिक वाढीची आणि रोजगार निर्मितीची इंजिने आहेत.
ज्या देशात रस्ते चांगले नसतात, वीज नसते, दळणवळणाची साधने अपुरी असतात, तो देश प्रगती करू शकत नाही. आज हे कर्ज घेऊन आपण उद्याच्या समृद्ध भारताची पायाभरणी करत आहोत. विरोधकांना कदाचित जुने, खड्डेमय रस्ते आणि मंदावलेली अर्थव्यवस्थाच आवडत असावी, कारण त्यात त्यांना टीका करायला जास्त वाव मिळतो.
विरोधकांना कदाचित हे कळत नसावे की, कर्ज घेणे हे नेहमीच वाईट नसते. जेव्हा एखादा उद्योजक नवीन कारखाना टाकतो, तेव्हा तो कर्ज घेतो. ते कर्ज त्याला भविष्यात अधिक नफा मिळवून देते. त्याचप्रमाणे, जेव्हा एखादा देश पायाभूत सुविधांवर खर्च करतो, तेव्हा तो भविष्यातील आर्थिक वाढीसाठी गुंतवणूक करत असतो. पण, ज्यांना केवळ वर्तमान दिसतो आणि भविष्य दिसत नाही, त्यांना हे कसे कळणार?
कदाचित विरोधकांना असे वाटत असेल की, भारताने कर्ज घेऊन विकासाची कामे करण्याऐवजी, ते पैसे त्यांच्या ‘मनोरंजना’साठी खर्च करावेत. पण, मोदी सरकार विकासाच्या मार्गावर ठाम आहे आणि हे कर्ज भारताला एका नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठीच वापरले जात आहे. त्यामुळे, ‘कर्ज वाढले’ म्हणून ओरडणाऱ्यांनी एकदा तरी बुलेट ट्रेनमधून प्रवास करून बघावा किंवा नवीन महामार्गावरून गाडी चालवून पहावी, म्हणजे त्यांना कळेल की, हे ‘कर्ज’ नाही, तर ‘भविष्यातील भारताची गुंतवणूक’ आहे!
थोडक्यात, भारताचे कर्ज हे नियंत्रणात आहे आणि ते देशाच्या विकासासाठी एक महत्त्वाचे साधन म्हणून वापरले जात आहे. विरोधकांनी केवळ आकडेवारीचा वरवरचा अर्थ न लावता, त्यामागील दूरदृष्टी आणि विकासाची गाथा समजून घ्यावी. कारण, जेव्हा देश प्रगती करतो, तेव्हा त्याचा फायदा सर्वांनाच होतो, अगदी टीका करणाऱ्यांनाही!
भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, युवा नेतृत्वाचे प्रेरणास्थान मा. कृष्णराजजी महाडिक साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा 🚩
आपल्या कर्तृत्ववान नेतृत्वातून युवा शक्तीला नवी दिशा आणि समाजकारणाला नवी ऊर्जा मिळत राहो.
प्रशासकीय शिस्त आणि अखंड राष्ट्रसेवेचा वस्तुपाठ म्हणजे राजमाता अहिल्याबाई होळकर! सांस्कृतिक राष्ट्रवादाची पायाभरणी करणाऱ्या आणि रयतेच्या सुख-दुःखात सदैव तत्पर असलेल्या लोकमातेचा वारसा पुढे नेणे, हीच खरी श्रद्धांजली!
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्त शतशः नमन! 🚩