Exchanged 36 calls with accused former NCP leader when Beed Sarpanch #SantoshDeshmukh was abducted, kept requesting police to act’: Brother of Deshmukh who was brutally killed in Maharashtra’s #Beed on December 9,by local strongmen with links to the NCP
https://t.co/9vMJnCbSB5
भारत के पहले इंटरनेशनल सुपरस्टार दार्शनिक आचार्य रजनीश ने मनुस्मृति के बारे में कहा है.
1) मनुस्मृति असत्य से भरी किताब है.
2) मनुस्मृति से ज्यादा पाखंडी कोई किताब नही.
3) भारत की दुर्दशा का जितना हाथ मनुस्मृति का है उतना किसी का नही.
4) मनुस्मृति ने भारत को वर्ण दिया.
5) मनुस्मृति ने भारतीय समाज के भीतर अलगाववाद पैदा किया. इसके लिए केवल मनु जिम्मेदार है, मनुस्मृति जिम्मेदार है.
मित्रों, इतना बढ़ा ज्ञानी दार्शनिक मनुस्मृति पर ऐसी राय रखते हैं. बाबा साहेब ने भी मनुस्मृति का विरोध किया. समानता और भाईचारे के लिए मनुस्मृति सबसे बड़ा खतरा है.
मेरा भी मानना है मनुस्मृति HINDU EKTA के लिए सबसे बड़ा खतरा है. मनुस्मृति केवल एक विशेषजाति जाति के वर्चस्व की बात करती है, इसीलिए इस जाति को मनुस्मृति मीठी लगती है.
दूसरी तरफ इसी जाति के नेता HINDU EKTA की बात करेंगे. एक हैं तो सेफ हैं, बटेंगे तो कटेंगे. जैसे नारों से OBC SC ST को खुश किया जाता है.
लेकिन सच्चाई यह है इन लोगों को मनुस्मृति भी चाहिए. यह तो इनका दोगलापन है.
शेवटी मुश्रीफ निवडून आलेच.. अंदाज अचूक ठरला याचंच काय ते समाधान... बाकी सत्ता स्थापन करतील त्यांना शुभेच्छा.."हमारी लडाई लंबी है" म्हणणाऱ्यांना ही शुभेच्छा...
पवार म्हणजे आपले वस्ताद आणि त्यांनी अस्तीनात काय डाव राखून ठेवलाय तो आखाड्यात आल्यावर कळणार...
सगळ्याच जागा निवडून येण्यासाठी लढवत नसतात. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्याचा प्रत्यय आला. शरद पवारांनी 10 जागा घेतल्या होत्या, नऊ जागांवर त्यांनी अक्षरशः विजय मिळवल्यात जमा होता.
पण त्यांची जी दहावी जागा होती जी रक्षा खडसेंच्या विरोधात होती. एकूण राज्याच्या मतदानात पडलेला स्ट्राईक रेट आणि इथला स्ट्राईक रेट यात हाय तोबा फरक होता. राजकीय वर्तुळात असं बोललं जात होतं की शरद पवारांनी ती जागा एकनाथ खडसे यांना सॉफ्ट कॉर्नर देण्यासाठी लढवली. तिथल्या उमेदवाराला जास्त रसदही पुरवली गेली नाही किंवा जादाचे डावपेचही टाकण्यात आले नाहीत.
सेम गोष्ट आहे की जेव्हा मुश्रीफांना ईडीद्वारे त्रास दिला जात होता तेव्हा सुप्रिया सुळे प्रसंगी कोल्हापूर मध्ये आल्या होत्या. शिवाय यामागे समरजित आहेत असंही बोलल्या होत्या. आता ज्या मुश्रीफांना त्रास दिला जातोय त्यांनी अजित पवारांबरोबर जाणं यात शरद पवारांना धोका देण्याचा काहीही विषय नव्हता. तर या सगळ्या अडचणीतून सुटका करून घेणं हा मुख्य विषय होता आणि तो त्यांनी साहेबांना कळवला होता. आणि हे त्यांनी त्यांच्या पहिल्या प्रतिक्रियांमध्ये सांगितलं देखील आहे.
आणि त्यांच्या जाण्याला पवार साहेबांनी किंवा त्यांच्या गटाने तितकासा विरोध केला नव्हता.
मात्र आता पवार साहेबांनी मुश्रिफांच्या विरोधात समरजित घाटगे यांना उमेदवारी देत मुश्रिफांच्या घरासमोर गैबी चौकात सभा घेतलीय. त्या स्टेजवर पवार साहेब म्हणत होते ईडीला घाबरून गडी तिकडं गेलाय, पण त्याचवेळी ज्या समरजित घाटगेंमुळे त्यांना तिकडे जावं लागलं ते कदाचित मिश्किलपणे हसत असतील. आणि हे सगळं कागलची जनता बघत होती.
जशी पवार साहेबांना ईडीची नोटीस आली आणि उभ्या महाराष्ट्रात त्यांना सहानुभूती मिळाली तशी ईडी मागे लागल्यामुळे कागल आणि कोल्हापुरात मुश्रीफांनाही सहानुभुती मिळालीच की. बाया गडी अगदी गहिवरून ठान मांडून मुश्रीफ यांच्या घरापुढ बसले होते. याचं कारण एकच त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात कधीच कोणत्या कार्यकर्त्याची गळचेपी केल्याचं ऐकिवात नाही. किंबहुना त्यांनी सहकारात आपला हात मोठा ठेवलाय. मग तिथं कोणीही असो.
आणि कागलच्या राजकारणाचं सांगायचं तर ते कायम गटातटाचं राहिलेलं आहे. अशातच मुश्रिफांनी संजय बाबा घाटगेंच्या गटाशी सौख्य राखलं आहे. त्यामुळे त्यांना ही निवडणूकही सोपी जाईल असं म्हटलं जातंय. अनेक कार्यकर्त्यांची काम करून त्यांना त्यांच्या त्यांच्या सोयीची भूमिका घेणारं नेतृत्व म्हणून मुश्रीफांकडे पाहिलं जातं आणि गटातटाच्या राजकारणात ही सगळी बरेजेची गणित महत्वाची असतात.
त्यामुळे वस्तदांनी जरी डाव टाकलेला असला तरी समोरच्या महाराष्ट्र केसरी समोर नवख्या शड्डू ठोकायला आलेल्या पैलवणाला उभ करणं आणि कोल्हापूरच्या मातीत कसलेल्या महाराष्ट्र केसरीशी कुस्ती करायला लावणं म्हणजे जड जाणार. तरीपण आणि वस्तादान अस्तीनात काय डाव राखून ठेवला असला तर तो मात्र आखाड्यातच उघड होईल..
#पण_कागल_तर_मुश्रीफांचंच
#MaharashtaraPolitics
#samarjitghatge
#हसन_मुश्रीफ
@RatnkantPawar मोठे शेतकरी, लहान व्यापारी, बडे व्यापारीही असतात..जो तिथपर्यंत आपला माल नेऊ शकतो त्या शेतकऱ्याने बऱ्यापैकी उत्पादन काढलेलं असतं. जो नाडलेला असतो तो दारातच पिशव्यांमध्ये बाजार करून मोकळा होतो. त्याला वाहतूक पण परवडत नाही.
good morning महाराष्ट्र.. या शेतकऱ्याचं पीक पावसाने वाहून गेलंय, स्टॅम्प महाग झालेत, तेलाचा डबा महाग झालाय. पश्चिम महाराष्ट्रातला हा शेतकरी आत्महत्या करायचं म्हणतोय. हा निवडणुकीचा मुख्य प्रश्न नसावा बहुतेक 😐
#Maharashtrapolitics#MaharashtraElection2024#शेतकरी
म्हातारी म्हणत होती, गुर तरी तोंड लावतील का नाई या सोयाब्याला सांगता यायचं नाय!
शेतातून मळून आणलेलं सोयाबीन उन्हाला लावलं होतं. पण दुष्काळी अशा माण तालुक्याला पण परतीच्या पावसाने झोडपून काढल्याने म्हातारीच्या सोयाबीनला मोड आले. त्या सोयाबीनच्या कुजकट वासाने मला शिसारी आली. आणि असं वाटलं चॅनेलवर सुपरफास्ट बातम्या सांगणाऱ्याने एका दमात 'परतीच्या पावसाने केलं सोयाबीनचं नुकसान' ही बातमी वाचावी. नाही म्हणजे लोकांना या विषयाबद्दल काहीच न वाटण्याला माध्यमंही तितकीच जबाबदार आहेत. त्या एका ओळीच्या बातमीत त्यांना काय कळणार त्या सोयाबीनचं नुकसान. त्याचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम.
सोयाबीन हे खरीप हंगामातील महत्त्वाचं पीक आहे. त्यामध्ये 19 टक्के तेलाचं आणि 42 टक्के प्रथिनांचं प्रमाण आहे. शिवाय एकूण तेल उत्पादनात जवळजवळ 48 टक्के सोयाबीन तेलाचा वाटा आहे. सारं गणित ट्विटरवर समजावण केवळ अशक्य आहे.
पण म्हातारी सांगत होती, लाडक्या बहिणीला पैसे मिळाले, आमच्यासाठी काय केलंय सरकारनं? असं म्हणत तिने मोदीला चार दोन शिव्या देखील हासडल्या. पंचनामे करायला कोण आलं का असं विचारलं तर म्हातारी म्हणाली, 'त्यांची तोंड अवसं पूनवला दिस्त्यात.' मी विचारलं तुम्ही पीकविमा तर उतरवलाय का? तर सांगितलं चोख पै न पै भरलीय. पण आता ना बी बियाणांचा खर्च निघत, ना खतांचा, ना भांगलनीचा, ना मळणीचा खर्च निघत. सगळं कसं पाण्यात गेलं.
मध्येच तिला इंदिरा गांधी आठवली. म्हणे इंदिरा चांगली होती. मोदी व्यापाऱ्यांची घरं भरतोय. मी व्हिडिओ बंद केला. आणि व्यापाऱ्याचं नाव विचारलं तर तिने अंबानी आणि अदानी असं अगदी स्पष्टच सांगितलं.
दिवस आता मावळू लागला होता, पावसाचे थेंब परत त्या सोयाबीनवर पडू लागले होते, तशी म्हातारीची परत झाकाडाळ करायची गडबड सुरू झाली होती. मी आभाळाकडे बघून चालती झाले, म्हटलं हा देशाचा मुख्य प्रश्न नसावा.
#महाराष्ट्रराजकारण
#MaharashtraElection2024
#MaharashtraAssemblyElection
#MaharashtraPolitics
#शेतकरी
#सामान्य
पदवीधर असून साधेपणानं जीवन जगणारी शेतकऱ्याची अर्धांगिनी.. तिचा एक मुलगा डॉक्टरकीचं शिक्षण घेतोय, दुसरा बी. कॉम करतोय. दोघेही वांग्याच्या पिकावर औषध फवारत होते.
बाहेरच्या जगाशी काहीच देणंघेणं नसलेली ही शेतकरी महिला घरात दूध नसतानाही चहा घेणार का असं विचारत होती आणि हळूच डोळ्यात पाणी आणून सांगत होती की, हो आमचा कांदा पण सडतो, आमचं पण नुकसान होतं, पण दोष कोणाला देणार ? आमचे हे सांगणार नाहीत, निवडणुका आहेत ना...
तुम्हाला काय वाटतं निवडणुका कोणत्या मुद्द्यावर व्हायला हव्यात?
#महाराष्ट्रराजकारण
#MaharashtraPolitics
#विधानसभा2024
लाडकी बहीण half ticket... welcome to महाराष्ट्र ग्रामीण
महिलांना एसटीत हाफ तिकीट आहे. लाडक्या बहिणी सीट पकडून बसल्या कि पुरुषांना/दिरांना उभारून जाण्याशिवाय पर्याय नाही.
#वास्तव#महाराष्ट्रनिवडणुका
काही दिवसांपूर्वी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भेटण्यासाठी म्हणून खेड तालुक्यातील कनेरसर गावी जाणं झालं होतं. शेतकऱ्यांच्या भेटी वैगरे झाल्या. मी निघताना त्यांनी अगदी अभिमानाने सांगितलं ते म्हणजे आमचं गाव म्हणजे सरन्यायाधीश चंद्रचुडांच गाव आहे. त्यांचा वाडा बघायला तुम्ही गेलंच पाहिजे.
माझी जाण्याची फारशी काही इच्छा नव्हती. पण शेतकऱ्यांच्या आग्रहाखातर मनाला मुरड घालत मी तो वाडा पाहायला गेले. शेतकरी त्या वाड्यासमोर अगदीच अदबीने उभे होते जणू समोर न्यायदेवता उभी असावी.
असो. मी त्यांच्या समाधानासाठी दोन चार फोटो काढले. वास्तू पाहिली, दोन चार किस्से ऐकले. पण माझ्या डोळ्यात भरली होती ती जीर्ण होऊ लागलेली वास्तू.
आज जेव्हा महाराष्ट्र निवडणुकीचं बिगुल वाजलं तेव्हा अचानक न्यायव्यवस्थेने अनिर्णीत ठेवलेल्या काही गोष्टी आठवल्या जसं की राष्ट्रवादी, शिवसेना पक्ष फुटी आणि चिन्ह.
इथे एक जाणवलं की वास्तू आणि विश्वास या अशा दोन गोष्टी आहेत ज्या वेळीच सावरल्या नाही तर ढासळतात.
#राजकारण
#सत्ता
#न्यायव्यवस्था
#सामान्य
मराठी अभिजात होती..आहे..राहील..प्रश्न होता राजमान्यतेचा.. इतिहासात नोंद होण्यासाठी.
बाकी ज्यांनी ही भाषा टिकवली अशा तुमच्या माझ्या अनेकांचं यानिमित्ताने कोडकौतुक..
बाकी सत्ता येतात, जातात, मड्याच्या टाळूवरचं लोणीही खातात...#महाराष्ट्रविधानसभानिवडणूक#मराठीभाषेलाअभिजातदर्जा
In 2023, when the Hindenburg report made serious allegations against the Adani Group, Sharad Pawar had stated that these allegations were "politically motivated."
Pawar was also one of the key supporters when the Adani Group began investing in major projects in Maharashtra, particularly in the energy and infrastructure sectors.
Now, there could be several reasons for Pawar's silence. For instance, Pawar maintains relationships with multiple political parties to safeguard the interests of his own party. In such a scenario, speaking out directly against a powerful conglomerate like the Adani Group may not be politically advantageous for him.
Another reason could be his ties with the Adani Group, which might lead him to avoid commenting on the matter publicly.
NCP v NCP
शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे ज्यात अजित पवार गटाने आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी नवीन चिन्हासाठी अर्ज करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
पण सामान्य लोकांच्या न्यायालयात काय निकाल लागणार हे निवडणुका ठरवणार.
#महाराष्ट्राचंराजकारण
#MaharashtraNews
#MaharashtraPolitics
#विधानसभानिवडणुका
#राष्ट्रवादी
•या महाराष्ट्र सरकारचा मुडदा बशिवला 😅
•आमचेच पैसे घेऊन आम्हालाच पैसे परत करता
•लाडकी बहिण म्हणून त्या 1500 रुपयांची लालूच दाखवता
•आमच्या पिकांना हमीभाव द्या🧅
नारायण मेघाजी लोखंडे यांच्या गावातील काही धाडसी महिला
#महाराष्ट्रराजकारण#लाडकीबहीणयोजना#maharashtraPolitics
राज ठाकरे म्हणाले तसं "जर हे लोक असेच पैसे वाटत सुटले तर जानेवारीत कर्मचाऱ्यांना पगार द्यायला सरकारच्या तिजोरीत पैसे राहणार नाहीत, राजकीय स्वार्थासाठी जर अशा प्रकारे आपलं राज्य खड्ड्यात घातलं जात असेल तर चुकीचं आहे."
अगदी मनातलं बोलले राज ठाकरे. एककाळ असा होता की, अजित दादा तिजोरीतला पैसा सोडत नसत, मग काही होऊ दे. अगदी उपोषणाला बसलेल्या माणसाला काहीतरी सुनावत, पण तिजोरीतला एक पैसा बाहेर काढत नसत.
पण आज जेव्हा या तिन्ही पक्षाच्या (भाजप+शिंदे +अजित पवार) रणनीतीकारांनी त्यांना तुम्ही सत्तेत येणार नाही अशी भीती घातलीय तेव्हापासून त्यांनी पुढच्या पाच वर्षांच्या योजना आत्तापासूनच राबवायला सुरुवात केलीय. यातीलच एक आहे लाडकी बहीण योजना. ही योजना राबिण्यासाठी त्यांना थेट केंद्राकडून आदेश आहेत म्हणे. सरकारी पैसा तीन महिन्यात संपवण्याचा चंग बांधला आहे गड्यांनी
पण त्याच पार्श्वभूमीवर कोणत्या इतर योजना तर बंद झाल्या नाहीत ना याची दखल कोणी घेतली आहे का?
साहजिक या योजनांचा सरकारी तिजोरीवर भार पडणार. आणि पुढे निवडून येणाऱ्या सरकारांना याचा भार सोसावा लागणार आणि लोक येणाऱ्या सरकारच्या नावे शिव्या घालणार.
जेव्हापासून या फुटलेल्या महायुतीचं सरकार आलंय तेव्हापासून महाराष्ट्राच्या विकास योजनांवर आणि भांडवली खर्चावर विपरीत परिणाम झाल्याचं दिसून आलंय.
राज्य सरकारने 2023-24 मध्ये अभूतपूर्व असं ₹82,0432 कोटी कर्ज घेतलं, ज्यामुळे कर्ज ₹ 7.82 लाख कोटींवर गेलं. याचबरोबर विकास प्रकल्पांवरील खर्च कमी झाला. महायुती सरकारच्या लुभावणाऱ्या योजनांमुळे ₹96, 000 कोटींचा वाढीव आर्थिक भार देखील निर्माण झाला, ज्यामुळे आर्थिक अनियमितता वाढली.
गेल्या दोन वर्षांत सरकारचा भर सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांवर आणि काही निवडक घटकांना आर्थिक लाभ देण्यावर होता, जेणेकरून त्यांना राजकीय फायदा मिळावा. उदाहरणार्थ, 2023-24 मध्ये ₹1.05 लाख कोटींच्या पूरक अर्थसंकल्पातील बहुतांश रक्कम आमदारांवर खर्च करण्यात आली, ज्यामुळे महसूल तुटीमध्ये वाढ आणि कर्जात वाढ झाली असं अधिकारी खाजगीत म्हणतात.
राज्याच्या महसूलाचा उपयोग राजकीय लाभांसाठी करणं देशात एक फॅशन बनलीय. यामुळे वित्तीय अनुशासनाचे उल्लंघन होतं, जे दीर्घकालीन दृष्ट्या खूप धोकादायक आहे. पण सरकारने मोफत पैसे वाटताना हे लक्षात ठेवायला हवं की हे अंबानीचं लग्न नाही, ना अदानीला मोफत द्यायला मुंबईची धारावी. सरकारकडे महसूल येण्याचे मार्ग थंडावले असताना ही उधळपट्टी बरी नव्हे.
#महाघोटाळा
#लाडकीबहीणयोजना
#महाराष्ट्रराजकारण
#MaharashtraPolitics
@shitalshah497 एक असतात भक्त
दुसरे असतात अंधभक्त
तिसरे असतात मोदीभक्त
जे अब की बार चारसो पार म्हणून
अयोध्येत हरतात... शेमलेस.
तुम्ही कोणत्या कॅटेगरी मध्ये येत्या मॅडम?
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाच्या युवा सेनेनं जोरदार मुसंडी मारत 10 च्या 10 जागा जिंकल्या तर सत्ताधारी आणि विरोधक भाजप पुरस्कृत अभाविपचा सुपडा साफ झाला. या निवडणुका मुंबईच्या दृष्टीने महत्वाच्या असतात कारण यातून एक परसेप्शन सेट होत असतं. आणि आपण पाहिलंय भाजपने खाल्लेला मलिदा परसेप्शनच्या जीवावर खाल्लाय. त्यामुळे मुंबई कोणाची?
आता मुंबई उबाठा गटाची, हे या निवडणुकीत दिसलं. कोणत्याही परिस्थिती मध्ये उबाठा गटाला मुंबई हातातून निसटू द्यायची नाही. भले ही मग हा लहानसा विजय का असेना. महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्यामुळे या निवडणुका निदान मुंबईत तरी उबाठाच्या पथ्यावर पडणार हे सांगायला तिसऱ्या कोणाची गरज नको.
या सिनेटच्या निवडणुका भाजपने जवळपास दोन वर्ष थांबवून ठेवल्या. कारण त्यांच्या अभाविपकडे नसलेलं नेतृत्व. मात्र या उलट युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई हिरीहिरीने काम करताना दिसले. जेव्हा मातोश्री बाहेर राणा जोडप्याने हनुमान चालीसाचे पठण करण्याचं ठरवलं होतं तेव्हा खारमधील राणांच्या घराबाहेर हजारो शिवसैनिकांना जमवणारे, राणे पिता-पुत्रांविरोधात रणशिंग फुंकणारे वरुण सरदेसाई या विजयाचे खरे सूत्रधार आहेत हे म्हणायला काही हरकत नाही.
बाकी सगळे या निवडणुकांपासून लांब राहिले. तसाही भाजप आणि उबाठा सोडला तर नगरविकास, मुंबई, सिनेट मध्ये कोणालाच इंटरेस्ट नसतो. सगळे ढिम्म झालेत.
#Maharashtrapolitics
#महाराष्ट्रराजकारण
#मुंबईसिनेटनिवडणुका