पाच सहा वर्षांपूर्वीचे सांगतो...आताचे बदलले असेल तर माहित नाही...
MPSC च्या अभ्यासक्रमात इतिहास सोबत समाजसुधारक नावाचा घटक असायचा...त्यावर जास्त भर असायचा.
शेकडो समाजसुधारक आहेत पण मुख्य प्रश्न हे
बाबासाहेब आंबेडकर,
धोंडो केशव कर्वे
महात्मा फुले
गोपाळ आगरकर
राजर्षी शाहू महाराज
या पाच लोकांवर जास्त प्रश्न असायचे...परीक्षा पास झालेल्या अधिकाऱ्याने यांच्या जीवनावरचे पारायण केले नसेल तरच नवल...एवढी स्पर्धा असते.
आज नाशिकच्या भोंदू बाबा च्या तावडीत मोठ मोठे अधिकारी पाहून..अभ्यासक्रम, परीक्षा आणि नंतरचे जीवन यात किती फरक असतो हे समजले.