आजवर कितीतरी माता-भगिनींनी मला ओवाळलं. कपाळावर आशीर्वादाचा गंध लावला. आजही त्याच भावनेनं अंगठा कपाळाला टेकला पण तो पायाचा... हाताचा नव्हे. आयुष्यात असे हे क्षण येतात आणि आतून-बाहेरून मन थरारतं. अंगावर रोमांच उभे राहतात. डोळ्यांच्या कडा ओलावतात पण क्षणभरच. कारण पायाच्या अंगठ्यानं टिळा लावणाऱ्या, त्याचं पायानं आरतीचं तबक ओवाळणाऱ्या, त्या दिव्यांग भगिनीच्या चेहऱ्यावर हास्य फुललेलं होतं. तिच्या नजरेतली चमक आणि धमक जणू नियतीला आव्हान देत म्हणत होती की "तू काय मला हरवणार? मला कोणाची सहानुभूती नको, दया नको. मी खंबीर आहे."
ते पाहून मी इतकंच म्हणालो, "ताई, तू लढत राहा. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत." या भगिनीकडून ऊर्जा आणि प्रेरणा घेताना कुसुमाग्रज आठवले -
"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!"
#Jalgaon #inspiring #motivating #emotional #Maharashtra #blessed #touched
"संपतील शब्द मात्र आपल्या कर्तृत्वाच्या गाथा अनंत राहतील"
माणसं पदाने नाही त्यांच्या कार्यकर्तृत्वाने मोठी होतात हे विलासराव देशमुख साहेब यांच्या जीवनप्रवासातून कळते.
#VilasraoDeshmukh@Riteishd@AmitV_Deshmukh@MeDeshmukh