@AsimSarode हे थोडं अधिक होईल सिद्धरमय्या सध्या 78 वर्षांचे आहेत. निवडणूक 2 वर्षांनी म्हणजे तेव्हा ते 80 वर्षाचे असतील. व्यावहारिकता म्हणजे त्यावेळी राज्यात फिरून काँग्रेस विरोधात भाजपला निवडून आणण्यात काय लाभ मिळेल ते समजण्या पलीकडे आहे.
@AnujaDhakras21 याच मराठी आणि शेतकऱ्यांच्या पोरांमुळे मुंबईला अर्धा माल मिळतो तुमची पोट भारतात. किती शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागली. आरक्षणामुळे किती मुलांना घरी बसावं लागतंय त्याचा अंदाज आहे का बाई तुला..
@ashish_jadhao@YouTube खान हा जिवंत असेपर्यंत स्वराज्याचा शत्रू होता म्हणणाऱ्या आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाची कबर बांधणाऱ्या शिवरायांचे विचार किती पुढारलेले होते. याची जाण आजच्या नेत्यांना नाही हा केवळ एक योगायोग असावा.
@waglenikhil खान हा जिवंत असेपर्यंत स्वराज्याचा शत्रू होता म्हणणाऱ्या आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाची कबर बांधणाऱ्या शिवरायांचे विचार किती पुढारलेले होते. याची जाण आजच्या नेत्यांना नाही हा केवळ एक योगायोग असावा.
मराठ्यांचा पराभव करण्यासाठी औरंगजेबाला जवळजवळ दोन दशकं दख्खनमध्ये तळ ठोकून बसावं लागलं होतं. तरीही मराठे त्याला पुरून उरले. शेवटी औरंगजेबाने दख्खनमध्ये शेवटचा श्वास घेतला आणि त्याचे दफन आताच्या खुलताबाद येथे करण्यात आले.
खरं तर खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाची निशाणी आहे आणि तिच्याकडे त्याच दृष्टीने बघायला हे आपण कधी लक्षात घेणार?
- प्रकाश बाळ
खान हा जिवंत असेपर्यंत स्वराज्याचा शत्रू होता म्हणणाऱ्या आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाची कबर बांधणाऱ्या शिवरायांचे विचार किती पुढारलेले होते. याची जाण आजच्या नेत्यांना नाही हा केवळ एक योगायोग असावा.
मालवण येथील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी आहे. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा, तो देखील अवघ्या ८ महिन्यांपूर्वी उभारला गेलेला, असा कोसळतोच कसा?
मुळात ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे, त्याची तपासणी वैगरे काही केली होती का नव्हती ?
आजच्या घटनेनंतर कुसुमाग्रजांच्या शहरातील 'पाच पुतळ्यांवरची' कविता आठवली. ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी ही कविता मुद्दामून देत आहे.
मध्यरात्र उलटल्यावर
शहरातील पाच पुतळे
एका चौथऱ्यावर बसले
आणि टिपं गाळू लागले .
ज्योतिबा म्हणाले ,शेवटी मी झालो फ़क्त माळ्यांचा.
शिवाजीराजे म्हणाले , मी फ़क्त मराठ़्यांचा.
आंबेडकर म्हणाले ,मी फ़क्त बौद्धांचा.
टिळक उद़्गारले ,मी तर फ़क्त, चित्पावन ब्राम्हणांचा.
गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला, आणि ते म्हणाले ,
तरी तुम्ही भाग्यवान.
एकेक जातजमात तरी
तुमच्या पाठीशी आहे.
माझ्या पाठीशी मात्र
फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !
पुतळे, स्मारकं ही फक्त आपल्यासाठी राजकीय सोय राहिली आहे. मी मागे पण अनेकदा म्हणलं होतं की, महाराजांचं खरं स्मारक, हे कुठला तरी भव्य पुतळा नसून, त्यांचे गड-किल्ले हे आहेत.
पण महाराजांच्या नावाने राजकारण करायचं, मतं मागायची, सत्ता मिळवायची, आणि मग स्मारकांची टेंडर काढायची, त्यातून काही मिळतंय का, हे बघायचं इतकंच राहिलं आहे.
ही प्रतिकांचं राजकारण करणारी व्यवस्था आता लोकांनी उध्वस्त केली पाहिजे. आणि तसं घडलं, तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो असं म्हणू शकतो.
राज ठाकरे ।