मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग रस्ता अजून पूर्ण झाला नाही, पण पुलाचा काँक्रीट मात्र आधीच हार मानताना दिसतो आहे. | 3 ऑगस्ट 2026 |
मी बोललो म्हणून राग येत असेल, तर एकदा या पुलाकडेही बघा. प्रश्न माझ्या शब्दांचा नाही, तर नागरिकांच्या सुरक्षिततेचा आहे
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नव्याने बांधलेल्या पुलाची ही अवस्था पाहून अनेक प्रश्न निर्माण होतात. ���ुलाच्या खालच्या बाजूचा काँक्रीटचा काही भाग निखळलेला दिसत आहे. सुदैवाने तो कोणाच्या अंगावर पडला नाही; पण प्रत्येक वेळी नशीब साथ देईल, याची कोण हमी देणार?
@NHAI_Official @nhairo_mumbai
@MORTHRoadSafety @nitin_gadkari
@rashtrapatibhvn @Shivendraraje11
कोट्यवधी रुपयांची कामे जर काही वर्षांतच अशी दिसू लागली, तर जबाबदारी कोणाची? नागरिकांनी टोल भरायचा, पण बदल्यात सुरक्षित आणि दर्जेदार रस्ता मिळणार की नाही ?
@CollectorRaigad @RaigadPolice
ही बाब केवळ डागडुजी करून संपवण्याची नाही. स्वतंत्र तांत्रिक तपासणी, दोषींची जबाबदारी निश्चित करणे आणि संपूर्ण पुलाची सुरक्षा तपासणी होणे गरजेचे आहे. अपघात झाल्यावर चौकशी करण्यापे��्षा, अपघात होण्यापूर्वी कारवाई करणे हेच खरे प्रशासनाचे कर्तव्य आहे.
हा काही साधा सर्व्हिस रोड नाही. मुंबई ते अलिबाग या पर्यटन मार्गाचा हा महत्त्वाचा दुवा आहे. दररोज हजारो वाहने या मार्गाचा वापर करतात. अशा ठिकाणी पुलाचा स्लॅब निखळलेला दिसत असेल, तर हा फक्त बांधकाम���चा दोष नाही; हा नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळ आहे.
Vc - स्थानिक जागरूक नागरिक
धन्यवाद 🇮🇳🙏
कु. चैतन्य उषा लक्ष्मण पाटील
सुजाण नागरिक
मु. पाटणी-कासू, ता. पेण, जि. रायगड,महाराष्ट्र
#mumbaigoahighway #wadkhal #alibag #todays #August2026 #preventionisbetterthancure
आपण हे सर्व रात्रीचा दिवस करून का करतो , माहिती आहे का? कारण “🇮🇳भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझ��� बांधव आहेत” ही प्रतिज्ञा मी फक्त शाळेत म्हणून विसरले नाही; ती माझ्या कृतीतून जगण्याचा प्रयत्न करत आहे.@rashtrapatibhvn
@PMOIndia @NSCI1966 @adgpi
आज जर काहींच्या निष्काळजीपणामुळे माझे बांधव आणि भगिनी नाहक जीव गमावत असतील, तर ते थांबावे, एखाद्या कुटुंबाचा आधार हिरावला जाऊ नये, एखाद्या आई-वडिलांनी आपल्या लेकराला गमावू न��े, एखाद्या मुलाने आपल्या आई-वडिलांना अकाली गमावू नये—यासाठी माझा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.
@NHAI_Official @MORTHRoadSafety @MORTHIndia @nitin_gadkari @CMOMaharashtra @Shivendraraje11 @PratapSarnaik @Riteishd
मी एकटा संपूर्ण व्यवस्था बदलू शकत नाही, पण आणखी एका जीवाचेही प्राण वाचले, तर आपले प्रयत्न सार्थकी लागले असे मी मानेन. नागरिक म्हणून माझे कर्तव्य पार पाडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. कारण देश फक्त सीमांमुळे महान होत नाही; देशातील प्रत्येक नागरिक सुरक्षित असेल, तेव्हाच देश खऱ्या अर्थाने मजबूत होतो.
@HSPMaharashtra @DGPMaharashtra @RaigadPolice @CollectorRaigad
म्हणूनच मी एकच प्रश्न विचारते—जर एखादा जीव वाचावा म्हणून केलेला प्रयत्न चुकीचा असेल, तर मग बरोबर नेमकं काय आहे?
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वडखळ येथे नवीन बांधलेल्या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू केल्याबद्दल संबंधित यंत्रणेचे आभार.
मात्र, एक जागरूक नागरिक म्हणून एवढीच नम्र विनंती आहे की, रस्ते दुरुस्तीची कामे करताना IRC आणि MoRTH च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार योग्य अंतरावर इशारा फलक, रिफ्लेक्टर, बॅरिकेड्स, ब्लिंकर्स आणि वेग कमी करण्याच्या सूचना असणे अत्यंत आवश्यक आहे.
कारण अशा छोट्या सुरक्षेच्या त्रुटींमुळे गंभीर अपघात होऊ शकतात. माझा उद्देश टीका करणे नाही, तर भविष्यात कोणाचाही जीव धोक्यात येऊ नये, हीच अपेक्षा आहे.
“Prevention is Better Than Cure.”
धन्यवाद 🇮🇳🙏
कु. चैतन्य उषा लक्ष्मण पाटील
सुजाण नागरिक ( ना कोणत राजकी�� पक्ष ना कोणती संघटना)
📞8766797529
मु. पाटणी-कासू, ता. पेण, जि. रायगड,महाराष्ट्र
#mumbaigoahighway #repairwork #nighttime #PreventionIsBetterThanCure #chaitanyaushalaxmanpatil #road #nationalhighway #roadsafety #maharashtra #india
तिकडे आड, इकडे विहीर… आणि मध्ये भरडला जातो तो सामान्य नागरिक!
नवीन बांधलेला मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग अवघ्या एक -दोन वर्षांत पुन्हा खोदला जातो, पुन्हा दुरुस्ती, पुन्हा खड्डे… हा विकासाचा रस्ता आहे की कायम सुरू असलेलं बांधकाम?
खारढोंबी- गडब ( पेण) परिसरातील हा भाग तर आता अपघातप्रवण (Black Spot) म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. आमच्या माहितीनुसार, याच ठिकाणी तीन ते चार नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आणखी किती बळी गेल्यावर उपाययोजना होणार?
येथील गावकऱ्यांची वाहने सर्व्हिस रोड किंवा अप्रोच रोडवरून थेट चढावर राष्ट्रीय महामार्गावर येतात. समोरून वेगाने येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे वारंवार अपघात होतात. या ठिकाणी तातडीने सुरक्षित प्रवेशमार्ग, योग्य सूचना फलक, वेगमर्यादा, रंबल स्ट्रिप्स किंवा इतर आवश्यक सुरक्षा उपाय करण्यात यावेत.
गडकरी साहेब, आपण म्हणता की “आम्ही एका दिवसात १०० किलोमीटर रस्ता बांधतो.”
मग एक साधा प्रश्न आहे…
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग एकूण किती किलोमीटरचा आहे? त्या हिशोबाने तो किती दिवसांत पूर्ण व्हायला हवा होता?
असो 🇮🇳🙏
वेगाने रस्ता बांधण्यापेक्षा, सुरक्षित रस्ता उभारणे अधिक महत्त्वाचे आहे.
#mumbaigoahighway #concreet #potholes #PreventionIsBetterThanCure #chaitanyaushalaxmanpatil
देशभर चर्चा आहे—सर्वाधिक काळ पंतप्रधान कोण राहिले ? @narendramodi@PMNehru
वडखळकरांचा प्रश्न मात्र वेगळाच आहे—
“सर्वाधिक काळ रखडलेला महामार्ग कोणता? आणि सर्वाधिक काळ टिकणारे खड्डे कोणते?”
इतिहास महत्त्वाचा आहे… पण वर्तमान रोज धक्के देत आहे.
रेकॉर्ड मोडण्याच्या चर्चा सुरू आहेत.
इथे मात्र मुंबई–गोवा महामार्गावर खड्डे आणि र���डलेल्या कामांनीच रेकॉर्ड मोडले आहेत.
नागरिकांना आकडे नाहीत, सुरक्षित रस्ता हवा आहे.
@NHAI_Official @MORTHIndia @CMOMaharashtra @mieknathshinde @RahulGandhi @Shivendraraje11 @Cockroachisback @CollectorRaigad @RaigadPolice @HSPMaharashtra @1033_Helpline
देशात विक्रमांची चर्चा सुरू आहे.
वडखळमध्ये मात्र रोज एकच प्रश्न—
खड्डे आधी बुजणार, की त्यांच्यावरची चर्चा अजून वाढणार?
धन्यवाद 🇮🇳🙏
कु. चैतन्य उषा लक्ष्मण पाटील
सुजाण नागरिक
8766797529
मु. पाटणी-कासू, ता. पेण, जि. रायगड,महाराष्ट्र
#2august #2k26 #todays
#wadkhal #mumbaigoahighway #reality #PreventionIsBetterThanCure #chaitanyaushalaxmanpatil
विषय: NH-66 मुंबई-गोवा महामार्गावरील वडखल बायपास ब्रिजबाबत तातडीची सूचना
NH-66 मुंबई-गोवा महामार्गावरील पेण तालुक्यातील वडखल येथील बायपास ब्रिजचा स्लॅब खचला असून तो अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. अलिबागहून पेणकडे जाणारी वाहने ब्रिजखालून जिथे वळण घेतात, नेमक्या त्याच ठिकाणी
NEET विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा संपूर्ण पाठिंबा आहे.
कायदेशीर मदतीसाठी आम्ही विशेष ईमेल आयडी उपलब्ध करून दिला आहे.
[email protected]
विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. न्यायासाठीचा प्रत्येक लढा महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थ्यांसोबत खंबीरपणे लढेल.
#MNSAdhikrut #NEET #Protest #LegalHelp