सामान्य कार्यकर्त्यांचा,
असामान्य नेता ..!!
वेळ रात्री १२ ची.. आपल्या कार्यकर्त्याची जाण असणार आणि कार्यकर्त्यासाठी वेळेच बंधन न ठेवणार नेतृत्व ..!!
#Boss ❤️🙌🏻
@AhirsachinAhir
🙏बाप्पा आले माझ्या घरी… आनंद झाला अंतरी!🙏
श्री गणरायाचे घरी आगमन झाले. बाप्पाच्या आगमनाने घरात आनंद, उत्साह आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
गणरायाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि समाधान नांदो, हीच प्रार्थना.
गणपती बाप्पा मोरया! 🙏✨
जगभरातील नेत्यांच्या आवाजाने दुमदुमलेल्या ब्रिटनच्या संसदेतील वरिष्ठ सभागृह हाऊस ऑफ लॉर्डसमध्ये जय महाराष्ट्रचा निनाद घुमला. निमित्त होते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्यनेते मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांना प्रदान करण्यात आलेल्या ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ या प्रतिष्ठेच्या सन्मानाचे. उपमुख्यमंत्र्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि पुढच्याच क्षणी या ऐतिहासिक सभागृहात मराठी भाषेचा एकच गजर झाला. विशेष म्हणजे यावेळी आपल्या भाषणाची सुरुवात ‘नमस्कार- जय महाराष्ट्र’ अशी मराठीतून करून एकनाथजी शिंदे यांनी भाषेचा अभिमान तर व्यक्त केलाच, पण महाराष्ट्राच्या विकासाची कहाणीही मांडली. आई -पत्नीच्या काबाडकष्टांतून सर्वसामान्यांसाठी काम करण्याची माझी विचारसरणी घडली असे जेव्हा त्यांनी सांगितले तेव्हा संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. मुंबई आणि लंडन ही दोन्ही महत्त्वाची वित्तीय केंद्रे असून फिनटेक, ग्रीन एनर्जी, ग्रीन हायड्रोजन, डीप-टेक आणि कौशल्य विकास क्षेत्रात महाराष्ट्र-ब्रिटन सहकार्याला मोठी संधी असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
यूके एशियन बिझनेस कौन्सिल आणि ‘कॅनव्हास फॉर केअर क्रिएटिव्ह आर्ट कॅम्पस’ यांच्या संयुक्त विद्यमाने हाऊस ऑफ लॉर्ड्स येथे हा पार पडलेल्या या सोहळ्यात उत्तर आयर्लंडच्या माजी फर्स्ट मिनिस्टर ऑनरेबल बॅरोनेस आर्लेन फॉस्टर आणि यूके एशियन बिझनेस कौन्सिलचे चेअरमन अँड्र्यू ग्रोकॉक, कौन्सिलचे उपाध्यक्ष सुदीप सकाळे त्याचप्रमाणे संसदेच्या सभागृहांचे सदस्य, ब्रिटनचे वरिष्ठ मंत्री, महापौर, विविध देशांचे राजदूत, जागतिक उद्योजक आणि कॉमनवेल्थ देशांतील मान्यवर उपस्थित होते.
@mieknathshinde@DrSEShinde@Shivsenaofc
धर्मवीर गुरुवर्य आनंद दिघे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त ठाणे येथे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, आरोग्यदूत फाउंडेशन व ज्युपिटर रुग्णालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लहान मुलांसाठी मोफत हृदय तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास उपस्थित राहिलो.
या शिबिरात ० ते १८ वयोगटातील बालकांची मोफत 2D Echo तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान हृदयविकाराचे निदान झालेल्या गरजू बालकांना पुढील उपचारांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळणार असून, आवश्यकतेनुसार मोफत हृदय शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहे.
आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही बालकाला उपचारांपासून वंचित राहावे लागू नये, हीच या सेवाकार्यामागची भावना आहे. गरजू रुग्णांना वेळेवर उपचार आणि आवश्यक वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी असे सेवाकार्य पुढेही अविरत सुरू राहील.
यावेळी शिवसेनेचे संसदीय गटनेते तथा खासदार मा. डॉ. श्रीकांतजी एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के जी , युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश जी सरनाईक, माजी आमदार शहाजीबापू पाटील, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मंगेश चिवटे जी , उल्हासनगरच्या महापौर अश्विनी निकम, स्थानिक नगरसेवक तसेच ज्युपिटर हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सेवा, संवेदना आणि आरोग्याच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा संकल्प!
प्रेमनगर, वरळीला प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांच्या समस्यांची पाहणी
प्रेमनगर, वरळी येथे आज प्रत्यक्ष भेट देऊन परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. कचरा, ड्रेनेज आणि स्वच्छतेच्या प्रश्नांची पाहणी करताना स्थानिक नागरिक तसेच महापालिका सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी संबंधित BMC अधिकाऱ्यांना कचरा तातडीने हटवणे, परिसराची नियमित स्वच्छता राखणे आणि ड्रेनेज लाईनची समस्या दूर करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन समजून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहील.
नेहरू सायन्स सेंटर परिसरातील स्वच्छता, वाहतूक व पार्किंग व्यवस्थेचा आढावा
वरळीतील मोतीलाल संघी रोड, नेहरू सायन्स सेंटर परिसरात आज प्रत्यक्ष भेट देऊन सुरू असलेल्या BMC स्वच्छता मोहिमेची पाहणी केली.
यावेळी महापालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधून परिसरातील स्वच्छतेच्या कामांचा आढावा घेतला. तसेच स्थानिक नागरिकांना भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या समस्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
परिसरातील स्वच्छता, वाहतूक व्यवस्था आणि पार्किंगची समस्या अधिक प्रभावीपणे सोडवण्यासाठी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल.
नागरिकांच्या सुविधांसाठी प्रत्यक्ष पाहणी आणि तातडीची कार्यवाही!
@mieknathshinde@DrSEShinde@Shivsenaofc
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या मुंबईतील स्मारकासाठी महत्त्वपूर्ण पुढाकार!
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे मुंबईत भव्य स्मारक उभारावे, ही मुंबईस्थित कोल्हापूरकरांची गेल्या ५० वर्षांपासूनची मागणी आहे. या मागणीला गती देण्यासाठी विधान भवनात माझ्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीची पहिली बैठक पार पडली.
या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील जी , वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ जी , आमदार विनय जी कोरे, आमदार अजय जी चौधरी, आमदार सुनील जी शिंदे, आमदार राजेंद्र जी यड्रावकर, आमदार चंद्रदीप जी नरके, तसेच कोल्हापूर जिल्हा फेडरेशन मुंबईचे अध्यक्ष सूर्यकांत कडाकणे जी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
स्मारकासाठी योग्य जागा निश्चित करून पुढील कार्यवाहीला गती देण्याबाबत बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. संबंधित प्रशासनाशी समन्वय साधून या मागणीचा सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
शाहू महाराजांच्या सामाजिक न्याय, समता, शिक्षण आणि लोककल्याणाच्या विचारांना मानवंदना देणारे स्मारक मुंबईत उभे राहावे, यासाठी पुढाकार घेण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे.
@mieknathshinde@DrSEShinde@Shivsenaofc
मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. एम. अंगमुथू यांच्यासोबत मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या (MbPA) जमिनी व बंदर परिसरातील पुनर्वसन आणि पुनर्विकासाबाबत महत्त्वपूर्ण बैठक झाली.
या चर्चेत वडाळा इस्टेट, शिवडी, कॉटन ग्रीन, दारुखाना, हे बंदर, हाजी बंदर, रे रोड, कौला बंदर तसेच वरळीतील बीपीटी कॉलनी या परिसरातील नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्र शासन आणि मुंबई पोर्ट प्राधिकरण यांच्यात परस्पर सहमती व समन्वयातून जमिनीविषयक प्रश्न सोडवून नियोजित पुर्नविकास, रहिवाशांचे सन्मानपूर्वक पुनर्वसन आणि आवश्यक पायाभूत सुविधांचा विकास करण्याबाबत चर्चा झाली.
मुंबईच्या बंदर परिसराचा आणि ईस्टर्न वॉटरफ्रंटचा दीर्घकालीन विकास साधताना स्थानिक नागरिकांचे पुनर्वसन आणि त्यांच्या हिताचे संरक्षण करण्याला प्राधान्य देण्याचा निर्धार करण्यात आला.
————————
Had a meeting with @MumbaiPortTrust Authority Chairman Dr. M. Angamuthu regarding the rehabilitation and redevelopment of Mumbai Port Authority (MbPA) lands and port areas, covering Wadala Estate, Sewri, Cotton Green, Darukhana, Hay Bunder, Haji Bunder, Reay Road and Kaula Bandar, along with BPT Colony Area, Worli.
The discussion focused on the concerns of residents, the need for mutual understanding between the Government of Maharashtra and Mumbai Port Authority, and facilitating planned redevelopment, dignified rehabilitation and improved infrastructure across these port areas.
The objective is to balance residents’ rehabilitation with the long-term development of Mumbai’s port areas and the Eastern Waterfront, contributing to a stronger and more sustainable Mumbai.
🗓️ २३ ऑगस्ट २०२६ l 📍 ठाणे
गुरुवर्य धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेबांच्या पुण्यतिथी निमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, आरोग्यदूत फाउंडेशन व ज्युपिटर रुग्णालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हृदयाला छिद्र असलेल्या लहान मुलांची मोफत 2 D इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया शिबिरास उपस्थित राहिलो.
२० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण या शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्त्वानुसार शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष गरजू आणि सर्वसामान्य नागरिकांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. आजच्या या शिबिराचा लाभ अनेक लहान मुलांना मिळाला असून त्यांना जीवनदान मिळाले आहे. या शिबिरासाठी सर्व आयोजकांचे मनःपूर्वक आभार.
यावेळी विधान परिषदेचे उपसभापती मा. सचिन अहिर, खासदार नरेश म्हस्के, आमदार शहाजी बापू पाटील, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
#Purveshsarnaik #healthcamp #shivsena
@AhirsachinAhir
जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले;
तोचि साधू ओळखावा, देव तेथेच जाणावा.
संत तुकाराम महाराजांच्या या विचारातून समाजसेवा, करुणा आणि मानवतेचा संदेश मिळतो. याच भावनेने आपण सर्वांनी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि समाजाच्या कल्याणासाठी कार्य करण्याचा संकल्प करूया.”
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्व नागरिकांना आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
विठ्ठल विठ्ठल… जय हरी विठ्ठल!
आषाढी एकादशीनिमित्त आयोजित ‘अवघा विठ्ठल’ या भक्तिमय संगीत सोहळ्यास उपस्थित राहिलो.
यावेळी कॅबिनेट मंत्री अॅड. आशिष शेलारजी, लोकमत मुंबईचे संपादक श्री. अतुल कुलकर्णी जी तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
अभंग, भावगीत आणि नाट्यगीतांनी सजलेल्या या भक्तिमय कार्यक्रमात विठ्ठल नामाचा गजर आणि भक्तिरसाचा अनोखा अनुभव लाभला. अशा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक उपक्रमांमुळे आपल्या समृद्ध परंपरेचे जतन होत असून समाजात एकात्मता, संस्कार आणि भक्तीभाव अधिक दृढ होतो.
🙏 जय जिनेंद्र!
आज स्काय फॉरेस्ट जैन संघ, प्रभादेवी यांच्या वतीने आयोजित परमपूज्य आचार्य भगवंत श्री नयपधम सागर सूरीजी महाराज यांच्या पावन चातुर्मास प्रवेश महोत्सवास उपस्थित राहून गुरुदेवांचे दर्शन व वंदन करण्याचे भाग्य लाभले.
गुरुदेवांच्या प्रेरणादायी आशीर्वचनांतून धर्म, संस्कार, सेवा आणि समाजकल्याण यांविषयीची बांधिलकी अधिक दृढ करण्याची प्रेरणा मिळाली.
यावेळी मा. खासदार श्री. सुनील तटकरेजी, आमदार श्री. नरेंद्र मेहता जी तसेच नगरसेवक श्री. भरत कोठारीजी उपस्थित.
परमपूज्य गुरुदेवांच्या श्रीचरणी कोटी कोटी वंदन करून समाज आणि राष्ट्राच्या सुख, शांती, समृद्धी व सर्वांच्या मंगलमय भवितव्यासाठी प्रार्थना केली.
जय जिनेंद्र! 🙏
रूपादेवीचा पाडा पंप आणि इंदिरानगर पंप सुरू झाल्यामुळे नागरिकांना दररोज आणि वेळेवर पाणी मिळणार असून पाण्याचा दीर्घकालीन प्रश्न सुटेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. महिलांची पाण्यासाठी होणारी धावपळ कमी होईल, मुलांच्या शिक्षणावर होणारा परिणाम टळेल आणि नागरिकांचे दैनंदिन जीवन अधिक सुलभ होईल असेही याप्रसंगी अधोरेखित केले.
या प्रकल्पामुळे इंदिरानगर, रूपादेवीचा पाडा, साठेनगर, हनुमान नगर, वाल्मिकी पाडा, श्रीनगर, किसन नगर, भटवाडी, शांतीनगर, वारली पाडा, रामनगर, शिपीतला, जुना गाव आणि कैलासनगर या भागांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. इंदिरानगरसाठी ३१ एमएलडी आणि रूपादेवीचा पाड्यासाठी २१ एमएलडी, अशी एकूण ५२ एमएलडी पाणीपुरवठा क्षमता निर्माण करण्यात आली असून ठाण्याच्या इतिहासात या भागांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा यापूर्वी कधीच झाला नव्हता, असेही यावेळी स्पष्ट केले.
📍कळवा, #ठाणे |
#कळवा विभागातील मनिषा नगर येथील यशवंत रामा साळवी आंतरराष्ट्रीय तरण तलाव आणि क्रीडा संकुलाचा भूमिपूजन सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी विकासकामांत कोणतेही राजकारण न आणता काम करण्याचे आवाहन केले.
यशवंत रामा साळवी आंतरराष्ट्रीय तरण तलाव हा कळवा येथील अतिशय प्रतिष्ठित असा तरणतलाव असून त्यासह क्रीडा संकुलाचे भूमिपूजन आज करण्यात आले. या प्रकल्पामुळे अनेक सुविधा या भागात उपलब्ध होणार आहेत. मात्र या सोयीसुविधा उच्च दर्जाच्या आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना याप्रसंगी संबंधित ठेकेदारांना दिल्या. ठाण्यातील खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे हे शासनाचे उद्दिष्ट असल्याचे यावेळी स्पष्ट केले.
यावेळी विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, खासदार नरेश म्हस्के, ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, गटनेते पवन कदम, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रवींद्र फाटक, नगरसेवक मंदार केणी, ज्येष्ठ नगरसेविका प्रमिला केणी, नगरसेवक मिलिंद पाटील तसेच #शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Thane #EknathShinde #Maharashtra
राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, वरळी येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक व रुग्णालयातील सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी.
आज खालील मान्यवर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रुग्णालयातील सध्या सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित ऑपरेशन थिएटर (Operation Theatre) आणि आयसीयू (ICU) उभारणीच्या कामांची तसेच इतर विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यासोबतच रुग्णालयाच्या सादरीकरणाद्वारे (Presentation) विविध सुविधा, सुरू असलेली कामे आणि आगामी आरोग्यसेवा उन्नतीकरणाच्या योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
उपस्थित मान्यवर:
• डॉ. अशोक थोरात – संचालक (वैद्यकीय)
• श्री. सोहम वायाळ – संचालक (प्रशासन)
• डॉ. संजय ढवळे – उपसंचालक (वैद्यकीय)
• श्री. सचिन देसाई – उपसंचालक (प्रशासन)
• डॉ. अमेय पोवार – वैद्यकीय अधीक्षक
• श्री. स. ब. चुक्का – मुख्य प्रशासन अधिकारी
• डॉ. प्रसेनजित घोरपडे – निवासी वैद्यकीय अधिकारी
• श्रीमती वंदना गांगुर्डे – अधिसेविका
• श्री. बाळाराम सावर्डेकर– सरचिटणीस, राज्य कामगार विमा योजना, महाराष्ट्र
कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना अधिक सक्षम, आधुनिक आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी सुरू असलेल्या कामांचा वेग वाढविणे आणि आवश्यक सुविधा लवकरात लवकर कार्यान्वित करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
जनतेच्या सेवेसाठी शासन आपल्या दारी!
मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य आणि माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वरळी विधानसभा मतदारसंघात आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ चे उद्घाटन करण्याचा मान लाभला.
या विशेष शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजना, दाखले, प्रमाणपत्रे, ओळखपत्रे तसेच अनेक महत्त्वाच्या सेवांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला. शासनाच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून प्रत्येक पात्र नागरिकाला त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
यावेळी मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल जी, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल जी, सहायक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर जी, महेश हरीचंद्रे जी, शिवसेना विभागप्रमुख दत्ता नरवणकर, भाजपचे किरण शेलार, माजी नगरसेविका रत्ना माळी, विविध अधिकारी, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित नागरिक यांची उपस्थिती लाभली.
“सशक्त नागरिक, सक्षम प्रशासन आणि सर्वसमावेशक विकास” या ध्येयाने अशा लोकाभिमुख उपक्रमांद्वारे शासन आणि जनतेतील दुवा अधिक बळकट करण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध आहोत.
📍 श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर, अक्कलकोट
कुटुंबासमवेत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र चरणी दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केले.
सर्वांच्या सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रार्थना केली.
“भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.”
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने जनसेवेचे कार्य अधिक जोमाने करण्याची प्रेरणा लाभो, हीच प्रार्थना.
॥ श्री स्वामी समर्थ ॥ 🙏
📍 श्री तुळजाभवानी मंदिर, तुळजापूर
कुटुंबासमवेत श्री तुळजाभवानी मातांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
महाराष्ट्राच्या सुख, समृद्धी आणि जनकल्याणासाठी तसेच सर्व नागरिकांच्या उत्तम आरोग्य, आनंद आणि प्रगतीसाठी प्रार्थना केली.
आई तुळजाभवानीची कृपा सदैव सर्वांवर राहो, हीच प्रार्थना.
जय तुळजाभवानी! 🙏🚩