Remembering a visionary tribal leader whose fight for justice and dignity left an enduring mark on India’s freedom movement, Bhagwan Birsa Munda, on his SmrutiDin...
जल, जंगल व जमिनीचे रक्षणकर्ते, थोर स्वातंत्र्यसैनिक, आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन...
#बिरसा_मुंडा #BhagwanBirsaMunda #BirsaMunda #Maharashtra
हमारी सरकार के बीते 12 वर्ष विश्वास, विकास और जनकल्याण को समर्पित रहे हैं। 140 करोड़ देशवासियों के आशीर्वाद और राष्ट्र प्रथम की भावना से हमने युवाओं, महिलाओं और अपने किसान भाई-बहनों को सशक्त बनाने में कोई कोर-कसर नहीं छोड़ी है। यह हमारे अथक प्रयासों का ही परिणाम है कि इंफ्रास्ट्रक्चर से लेकर डिजिटल क्रांति तक आज देश को दुनियाभर में एक नई पहचान मिली है। विकसित भारत के संकल्प को साकार करने के लिए हम सेवा, सुशासन और समृद्धि के इसी पथ पर निरंतर आगे बढ़ते रहेंगे।
#12YearsOfSeva
Under the leadership of Hon PM Narendra Modi Ji, India’s governance landscape has undergone a massive shift. By cutting down thousands of unnecessary compliances and taking processes fully digital, the nation has unlocked a new era of Ease of Doing Business.
Driven by the motto of Reform, Perform, and Transform, we are laying a bulletproof foundation for a Viksit Bharat, where industries grow, innovation thrives, and opportunities multiply!
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके नेतृत्व में हजारों अनुपालनों को सरल बनाया गया, अनावश्यक नियमों को समाप्त किया गया और प्रक्रियाओं को अधिक पारदर्शी, तेज एवं डिजिटल बनाया गया। जिसके कारण भारत ने ईज ऑफ डूइंग बिजनेस के क्षेत्र में उल्लेखनीय प्रगति हासिल की है। सुधार, सरलीकरण और डिजिटलीकरण के माध्यम से विकसित भारत की नींव और अधिक मजबूत हो रही है।
@narendramodi
#12YearsOfSeva #EaseOfDoingBusiness #ViksitBharat
आजच्याच दिवशी २०२४ मध्ये आदरणीय पंतप्रधान श्री @narendramodi जी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत देशाच्या इतिहासात एका नव्या पर्वाची सुरुवात केली.
गेली १२ वर्षे म्हणजे जनसेवा, सुशासन आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या नेतृत्वाचा प्रवास. गरीब कल्याणापासून ते भारताच्या जागतिक प्रतिष्ठेपर्यंत, पायाभूत सुविधांपासून ते डिजिटल क्रांतीपर्यंत, प्रत्येक क्षेत्रात देशाने अभूतपूर्व परिवर्तन अनुभवले.
'Nation First' या विचाराला केंद्रस्थानी ठेवत मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारताने विकास, विश्वास आणि आत्मविश्वासाचा नवा अध्याय लिहिला आहे.
विकसित भारत २०४७ च्या दिशेने वाटचाल करत असताना, #12YearsOfSeva हा प्रवास प्रत्येक भारतीयाला नव्या संधी, नवी ऊर्जा आणि नव्या भारताच्या निर्मितीची प्रेरणा देत राहील.
भारतीय लोकतंत्र के इतिहास में 9 जून 2024 एक ऐतिहासिक दिन के रूप में अंकित है, जब आदरणीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी ने लगातार तीसरी बार प्रधानमंत्री पद की शपथ ग्रहण कर राष्ट्रसेवा के एक नए अध्याय का शुभारंभ किया।
बीते 12 वर्ष जनसेवा, सुशासन और राष्ट्रहित को सर्वोच्च प्राथमिकता देने वाले नेतृत्व के साक्षी रहे हैं। गरीब कल्याण से लेकर भारत की बढ़ती वैश्विक प्रतिष्ठा तक, आधुनिक बुनियादी ढांचे से लेकर डिजिटल क्रांति तक, देश ने हर क्षेत्र में अभूतपूर्व परिवर्तन का अनुभव किया है।
'Nation First' के मंत्र को केंद्र में रखकर मोदीजी के नेतृत्व में भारत ने विकास, विश्वास और आत्मविश्वास की एक नई गाथा लिखी है।
विकसित भारत 2047 के संकल्प की ओर अग्रसर भारत के लिए #12YearsOfSeva केवल एक कालखंड नहीं, बल्कि 140 करोड़ देशवासियों की आकांक्षाओं, उपलब्धियों और विश्वास का प्रेरणादायी अध्याय है।
On this day in 2024, Prime Minister Shri @narendramodi Ji took oath for a third consecutive term, a moment that reflected the trust and aspirations of 140 crore Indians.
The last 12 years have been defined by a governance model rooted in service, scale and delivery. From empowering the poor and accelerating development to strengthening India's global standing, every milestone has been guided by a singular commitment — Nation First.
As India moves steadily towards Viksit Bharat 2047, the journey of #12YearsOfSeva continues to inspire confidence, opportunity and transformation for every citizen.
@BJP4India@BJP4Maharashtra
#12YearsOfSeva
श्रद्धेय पंडित दीनदयाळ उपाध्यायजींनी मांडलेली "अंत्योदय" ही संकल्पना सत्यात उतरवत गेल्या १२ वर्षांत आदरणीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने गरीब कल्याणासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. यामुळे देशातील कोट्यवधी गोरगरिबांचे जीवनमान उंचावले आहे.
#12YearsOfGaribKalyan
#Glorious12Years
#राष्ट्र_निर्माणाची_तपपूर्ती
कोकणातील हवाई संपर्क अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने Fly91 चे श्री. मनोज चॅको यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली.
यावेळी नवी मुंबई–सिंधुदुर्ग विमानसेवा स्वातंत्र्यदिनापूर्वी सुरू करण्याबाबत तसेच गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन अतिरिक्त उड्डाणांची व्यवस्था करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
या सेवेसाठी शासनाच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य व पाठबळ देण्याचे आश्वासन देण्यात आले. या उपक्रमामुळे कोकणातील पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच नागरिकांच्या प्रवासाची सोय होणार असून सिंधुदुर्ग व संपूर्ण कोकणाच्या विकासाला नवी गती मिळेल.
Had a fruitful interaction with Mr. Manoj Chacko of Fly91 regarding strengthening air connectivity for the Konkan region.
Discussions focused on commencing flight services between Navi Mumbai and Sindhudurg before Independence Day, with additional flights planned during Ganesh Chaturthi to accommodate increased passenger demand.
All necessary support and cooperation from the Government's side was assured to facilitate the successful commencement and operation of these services. Enhanced air connectivity will boost tourism, improve ease of travel for citizens, and further accelerate the growth and development of Sindhudurg and the Konkan region.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@fly91_IN
राज्यातील सागरी किनारपट्टीवरील ९१ अति संवेदनशील लँडिंग पॉईंटवर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत सुरक्षा रक्षक व पर्यवेक्षक नियुक्त करण्याबाबत तसेच प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत ‘सागर मित्र’ नेमणुकीसंदर्भात आज मंत्रालयातील माझ्या दालनात आढावा बैठक पार पडली.
यावेळी ‘सागर मित्र’ नियुक्ती प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री महोदयांची मान्यता घेऊन सागर मित्रांच्या नियुक्तीबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल. तसेच त्यांच्या गणवेश, मानधन व इतर सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येत असून, इतर राज्यांमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांच्या धर्तीवर महाराष्ट्रातील सागर मित्रांनाही अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी शासन प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.
बैठकीस पदुमचे सचिव एन.रामास्वामी, मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@fisheriesgom
मुंबईतील कफ परेड येथे साकारण्यात येणाऱ्या प्रस्तावित मरीना प्रकल्पाविरोधात पारंपरिक मच्छीमार बांधवांनी नोंदवलेल्या आक्षेपांच्या अनुषंगाने आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली.
प्रस्तावित मरीना प्रकल्प हा मुंबईच्या सागरी पर्यटन, जलवाहतूक आणि किनारी पायाभूत सुविधांच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असून या प्रकल्पामुळे मुंबईच्या विकासाला चालना मिळणार आहे.
या प्रकल्पामुळे स्थानिक पारंपरिक मच्छीमारांच्या उपजीविकेवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घेतली जाईल. मच्छीमार बांधवांना पूर्ण विश्वासात घेऊन, त्यांच्या सूचनांचा विचार करूनच हा प्रकल्प पुढे नेण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.
मच्छीमार बांधवांच्या सर्व शंका आणि आक्षेपांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली असून विकास आणि मच्छीमारांचे हित यांचा समतोल साधत हा प्रकल्प राबविण्यात येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
बैठकीस पदुमचे सचिव एन.रामास्वामी, मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, मच्छीमार सर्वोदय सहकारी सोसायटी लि. कुलाबा यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@fisheriesgom
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दि.१८ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्हास्तरीय जिल्हा आरोग्य संपन्न गाव अभियान समितीची बैठक आज मंत्रालयात पार पडली. जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्य अभियानांचा बैठकीत आढावा घेण्यात आला. संबंधित अभियानांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायत नोंदणी करून सक्रिय सहभाग नोंदवावा, अशा सूचना देण्यात आल्या.
तसेच, विविध अभियानांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध आहे का, याची सविस्तर पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले. विविध स्तरांवरील कर्मचारी संख्या, त्यांची उपलब्धता आणि गरजेनुसार नियोजन याबाबतही संबंधितांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
बैठकीस सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रवींद्र खेबुडकर,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग, जिल्हा कार्यक्रम अधिकारी: महिला व बालविकास सिंधुदुर्ग, जलजीवन मिशन प्रकल्प संचालक :सिंधुदुर्ग, जिल्हा शल्यचिकित्सक यांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध राज्यस्तरीय योजनांसाठी मत्स्यव्यवसाय आयुक्त यांनी केलेले नियोजन, सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तसेच अंमलबजावणीची सद्यस्थिती याबाबत आज मंत्रालयात बैठक घेऊन आढावा घेतला.
बैठकीत मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत विभागीय प्रशिक्षण केंद्रांची स्थापना, आंतरराज्य अभ्यास दौरे, मत्स्यबाजार उभारणी, निमखारे पाण्यात सुपर-इंटेन्सिव्ह कोळंबी संवर्धन, समुद्री शैवाळ बीज निर्मिती केंद्र उभारणी तसेच मासळी उतरविण्याची केंद्रे, बंदरे आणि जेट्टी दुरुस्ती यांसंदर्भातील राज्यस्तरीय योजनांच्या सविस्तर प्रकल्प अहवालांचा आढावा घेण्यात आला.
याशिवाय मच्छिमार समुदायांसाठी पर्यावरणीय जलजनक तंत्रज्ञानाच्या पायलट प्रकल्पाचा प्रस्ताव, महाराष्ट्र सागरी व भूजलाशयीन मच्छिमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची प्रक्रिया, महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ड्रोन खरेदी प्रस्ताव, मासेमारी बंदी कालावधीत क्रियाशील मच्छिमारांना आर्थिक सहाय्य, बारामती तालुक्यातील शिरसुफळ जलाशयातील पिंजरा पद्धतीच्या मत्स्यसंवर्धन प्रकल्पांवरील कार्यवाही, ससून डॉक सामंजस्य करार, पेनटाकळी जलाशयातील एकात्मिक पथदर्शक प्रकल्प, मरोळ मच्छिमार मार्केट विकास तसेच मच्छिमार महिलांसाठी हँडग्लोज आणि गमबूट उपलब्ध करून देण्याच्या विषयांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला.
मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रलंबित विषयांवर कालबद्ध पद्धतीने कार्यवाही करून विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर द्यावा आणि त्यांना गती द्यावी, असे निर्देश यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
बैठकीस पदुमचे सचिव एन.रामास्वामी, मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@fisheriesgom
भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रातील आगामी विधानपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
सर्व उमेदवारांना निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा !
@BJP4Maharashtra#VidhanParishad#Maharashtra
भारतात असे एकही घर नसेल, जिथे उन्हाळ्यात आंब्याबद्दल चर्चा होत नाही. प्रत्येक भागाचा स्वतःचा आंबा, स्वतःची चव आणि स्वतःचा सुगंध आहे.
महाराष्ट्र आणि कोकणचा हापूस (Alphonso) ते देशाच्या इतर राज्यातील विविध आंबे, जागा बदलते तसा आंब्याचा रूप-रंग आणि त्याची चवही बदलते. आंब्याचा हा प्रवास आता गावाकडून जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहोचत आहे. - पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी जी
#MannKiBaat
@narendramodi@BJP4Maharashtra
The inauguration of the beautification and modernization works carried out at the Versova Passenger Terminal, Mandavi Galli, Vesave Village, Versova, by the Maharashtra Maritime Board was conducted at the hands of former Chief Minister of Maharashtra and current Member of Parliament Narayan Rane.
Due to poor sanitation and inadequate facilities in and around the Versova Passenger Terminal and jetty area, passengers, tourists, members of the fishing community, and local residents were facing various difficulties. After these issues were brought to attention, a site inspection was conducted and the concerned officials were instructed to immediately undertake beautification and modernization works. Accordingly, the project was completed within just 45 days, and the newly developed terminal was inaugurated today.
The Mahayuti Government is committed to the comprehensive development of the state's water transport sector. Under the visionary leadership of Hon'ble Chief Minister Devendra Fadnavis, the Maharashtra Maritime Board is implementing various initiatives, including the development of modern passenger terminals, safe and well-equipped jetties, digital facilities, the expansion of the Mumbai Water Metro, and water transport services based on green technologies. Through these efforts, the government aims to provide passengers with safer, more convenient, and modern transportation services.
The event was attended by actress Archana Puran Singh, Maharashtra Maritime Board Chief Executive Officer Mr. P. Pradeep, non-official member Mr. Balasaheb Desai, other dignitaries, and a large number of local residents.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@MeNarayanRane@mahamaritime1
महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने वर्सोवा प्रवासी टर्मिनल, मांडवी गल्ली, विसावे गाव, वर्सोवा येथे करण्यात आलेल्या सुशोभीकरण व आधुनिकीकरण कामांचे उद्घाटन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार मा. श्री. नारायणराव राणे साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले.
वर्सोवा प्रवासी टर्मिनल आणि जेट्टी परिसरातील अस्वच्छता व गैरसोयींमुळे प्रवासी, पर्यटक, मच्छीमार बांधव आणि स्थानिक नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही बाब निदर्शनास आल्यानंतर परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सुशोभीकरण व आधुनिकीकरणाची कामे हाती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार अवघ्या ४५ दिवसांत कामे पूर्ण करून आज या नव्याने विकसित करण्यात आलेल्या टर्मिनलचे लोकार्पण करण्यात आले.
महायुती सरकार राज्यातील जलवाहतूक क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत आधुनिक प्रवासी टर्मिनल्स, सुरक्षित व सुसज्ज जेट्ट्या, डिजिटल सुविधा, मुंबई वॉटर मेट्रो तसेच हरित तंत्रज्ञानावर आधारित जलवाहतूक सेवांचा विस्तार करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या माध्यमातून प्रवाशांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि आधुनिक सेवा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
कार्यक्रमास अभिनेत्री अर्चना पूरणसिंग, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पी. प्रदीप, अशासकीय सदस्य श्री. बाळासाहेब देसाई तसेच इतर मान्यवर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@MeNarayanRane@mahamaritime1
विजयदुर्ग परिसरातील उबाठा गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रवेशकर्त्यांमध्ये पंचायत समिती सदस्य विष्णू घाडी, तालुकाप्रमुख जयेश नर, पुरळ विभाग प्रमुख संदीप गायकवाड, संदीप ढवळकर, मणचे गावचे सरपंच दीपक तोरस्कर, गिर्ये ग्रामपंचायत सदस्य विनोद गावकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis@RaviDadaChavan
#पक्षप्रवेश #भाजपा #विजयदुर्ग