आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहरचे सरचिटणीस समीर उत्तरकर व संघटक अमित खानेकर यांनी भेट घेतली. पाषाण- सुस खिंडीतील प्रलंबित उड्डाणपुलाचे काम मार्गी लागल्याबद्दल त्यांनी आभार मानले.
पुण्यातील पाषाण तलाव��तील मासे मरण पावले असून त्यांचा खच तलावात पडला आहे. प्रक्रिया न केलेले सांडपाणी, विषारी रसायने या तलावात सोडली जात आहेत. त्यामुळे या तलावातील जैवविविधता धोक्यात आली आहे. याखेरीज माशांचा खच गेली चार पाच दिवसांपासून पडलेला असल्याने त्यावर आता किटक घोंघावत असून नागरीकांच्या आरोग्याला त्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. महापालिका आयुक्तांना माझी विनंत�� आहे की कृपया आपण याची गांभीर्याने नोंद घ्यावी. या तलावात सांडपाणी सोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.यासोबतच हा तलाव स्वच्छ करण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी.
@PMCPune
पाषाण तलाव परिसरातील गंभीर बाबीवर तातडीची कारवाई
पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील पाषाण तलाव परिसरास
मा. महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम यांनी द��. १०/०४/२०२६ रोजी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. सदर पाहणीदरम्यान संबंधित कार्यक्षेत्रातील मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प (STP) बंद अवस्थेत असल्याचे नि��र्शनास आले.
यामुळे शुद्धीकरण न झालेल्या मैलापाण्याचा थेट तलावात विसर्ग होत असल्याचे आढळून आले असून, त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी निर्माण झाली आहे. तसेच तलावातील पाणी दूषित झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात मासे मृत अवस्थेत आढळून आले आहेत. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून पर्यावरणीय आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने चिंताजनक आहे.
मा. आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून तत्काळ परिस्थितीचा आढावा घेतला असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याचे तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत. सदर प्रकरणात तात्काळ सुधारणा करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्यात येत आहेत.
मुख्य अभियंता, मलनिःसारण व देखभाल दुरुस्ती विभाग, पुणे महानगरपालिका, श्री. जगदीश खानोरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे.
मा. आयुक्तांच्या आदेशानुसार, श्री. अजयकुमार दत्तात्रय वायसे (कार्यकारी अभियंता, मलनिःसारण देखभाल व दुरुस्ती विभाग), श्री. विनायक चोपडे (आरोग्य निरीक्षक, औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय) आणि श्री. विजय भोईर (विभागीय आरोग्य निरीक्षक, औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय) यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ५६(२)(क) नुसार खातेनिहाय चौकशी करून निलंबन करण्यात आले आहे.
पुणे महानगरपालिका नागरिकांच्या आरोग्य व पर्यावरण सुरक्षेला स��्वोच्च प्राधान्य देत असून, पर्यावरणाला पूरक असे निर्णय श्री. नवल किशोर राम यांच्याकडून घेण्यात येत आहे. अशा प्रकारच्या घटनांवर शून्य सहनशीलतेची भूमिका घेत आहे.
शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: https://t.co/vI31aw2xUv
#Pashanlake #Visit #पुणे #PMCPune #PMCAction
ज्येष्ठ गांधीवादी सामाजिक कार्यकर्ते मा अण्णा हजारे यांनी आपल्या बॅनरची दखल घेत त्यावरती प्रतिक्रिया दिली व म्हणाले की मी 90 वर्षांचा झालो आहे अजून सगळं काही मीच करायचं का? आणि तुम्ही झोपूनच राहायचं का?
त्याबद्दलची ही माझी प्रतिक्रिया.@abpmajhatv@lokmat@saamTVnews@zee_24taas
#डेंग्यू_ला_आमंत्रण
बाणेर फाटा पुणे येथे मेट्रोचे काम चालू आहे, या कामाचे साहित्य रस्त्याच्या बाजूलाच ठेवले आहे ज्यामध्ये पावसाचे पाणी साठले आहे यामुळे मोठ्या प्रमाणात डेंग्यू चा धोका निर्माण झाला आहे.@PMCPune कृपया तातडीने उपाययोजना कराव्यात. @MoHFW_INDIA@metrorailpune
जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने,
कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व,
भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
महामानव डॉ बाबासाहेब आ���बेडकर
यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
जय जिजाऊ, जय शिवराय,जय भीम