बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी ह्यांना पत्र लिहून, मुंबईला विद्रुप करणाऱ्या कचरा व्यवस्थापनातील ढिसाळपणा आणि नाक्यानाक्यावर उभारले जाणारे बेकायदेशीर राजकीय होर्डिंग्ज; ह्या दोन समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधले.
ह्या विषयांचे गांभीर्य पाहता, आयुक्त तातडीने ठोस कारवाई करतील, अशी अपेक्षा आहे.
"कोकणात कोकणी माणसावर हल्ला"
गुजराती माणसाने,भाड्याचे परप्रांतीय बोलवून आमच्या कोकणी माणसावर हल्ला केला आहे!
हा हल्ला मराठी माणसावर आणि कोकणावर झाला आहे!
ह्याना ह्यांच्या भाषेत उत्तर मिळालेच पाहिजे,बस झाली नाटकी
नव हिंदू @NiteshNRane काय करतात हे बघायचे आहे!
#Marathi#Mumbai
महाराष्ट्रात सध्या जेवढा पर्यावरणीय विध्वंस होत आहे, तेवढा विनाश ह्याआधी कधीच पाहायला मिळाला नव्हता.
असं समजलंय की, ५०० मेगावॅट क्षमतेच्या खापरखेडा वीज प्रकल्पाने नंदगावमध्ये पुन्हा एकदा फ्लाय अॅश टाकण्यास सुरुवात केली आहे.
ही राख टाकण्यासाठी वापरण्यात येणारी जागा कोणत्याही वैज्ञानिक निकषांची पूर्तता करत नाही. ना कोणतीही 'लगून' व्यवस्था आहे, ना HDPE लाइनिंग – म्हणजेच पर्यावरण सुरक्षेसाठी आवश्यक त्या कोणत्याही गोष्टींची पूर्तता इथे नाही.
पर्यावरणीय सुरक्षा व राख व्यवस्थापनाच्या नियमांचा हा सरळसरळ भंग आहे.
@CPCB_OFFICIAL ह्यांना विनंती आहे की, त्यांनी ह्या गुन्ह्याकडे तातडीने लक्ष द्यावं. हा प्रकल्प परिसरातील शेतजमिनी, जलस्रोत आणि पेंच नदी ह्यांचं प्रदूषण करत आहे!
सरकार ही फ्लाय अॅश आपल्या काँक्रीट रस्त्यांच्या प्रकल्पांसाठी विनामूल्य का वापरत नाही? किंवा तिचा लिलाव का करत नाही?
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री असताना, मी अशा प्रकारच्या फ्लाय अॅश टाकण्यावर बंदी घातली होती.
राख टाकलेली सुमारे ८०% जागा आम्ही साफ केली होती, जिथे अंदाजे ७ फूट उंचीची राख साचलेली होती आणि ८०० एकर जमीन नष्ट झाली होती – ती आम्ही पुर्नजिवीत केली होती.
पण आता हे सगळं पुन्हा सुरू झालं आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ह्यात तातडीने लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी आणि पुन्हा हे घडू नये ह्याची खात्री करुन द्यावी.
स्थानिक लोक चिंतेत आहेत – त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे, आणि त्यांचा आवाज ऐकला जात नाहीये!
@moefcc
पहलगाम येथे निष्पाप भारतीय नागरिकांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे गेले २ दिवस महाराष्ट्रभर विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले, अतिरेक्यांना पाठबळ देणाऱ्या पाकड्यांचा निषेध करण्यात आला. जनतेच्या मनात असलेला राग, प्रतिशोध घेण्याची भावना आणि पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग व्हायलाच पाहिजे ही मागणी ठामपणे मांडण्यात आली.
देशावर ओढवलेल्या ह्या दुःखद प्रसंगात आम्ही भारत सरकारसोबत ठाम उभे आहोत. दहशतवादाविरोधात जो काही निर्णय केंद्र सरकारकडून घेतला जाईल, त्याला आमचा पाठिंबा आहे. कारण आता बदला घ्यायची वेळ आलीय! पाकधार्जिण्या अतिरेक्यांचा कणा आता मोडलाच पाहिजे!
दोन दिवसांपूर्वी मुंबईतील एक जैन देरासर पाडल्याच्या विरोधात जैन बांधवांनी @mybmc विरुद्ध आंदोलन केलं आहे.
सध्या बीएमसी ही पूर्णपणे मुख्यमंत्री कार्यालय आणि नगरविकास मंत्री ह्यांच्या नियंत्रणात आहे.
• मुख्यमंत्री - भाजप
• उपमुख्यमंत्री - एसंशि
• दोन सहपालकमंत्री - भाजप
• @mybmc चालवते - राज्य सरकार/मुख्यमंत्री कार्यालय
मग पालकमंत्री कोणाच्या विरोधात आंदोलन करत आहेत?
त्यांच्याकडे देरासर वाचवण्याची पूर्ण ताकद अधिकार, पण देरासर वाचवण्याऐवजी ते केवळ नौटंकी करत आहेत!
लोढा जी ह्यांचे एक बेकायदेशीर कार्यालय बीएमसीमध्येच आहे आणि त्यांना रिअल इस्टेट आणि अशा प्रकरणांचा मोठा अनुभवही आहे.
सर्वांनी हे लक्षात घ्यावं – भाजप कोणाचंही नाही.
भाजप सरकारच मुख्यमंत्री कार्यालयाद्वारे बीएमसी चालवंतय आणि नामानिराळं राहू पाहतंय!
कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बघा..
आपले राजे, त्यांचे रूप, त्यांचा पेहराव ,शस्त्र सगळंच भारदस्त!
देखणे रूप राजाचे... मालवणला किती हलक्या दर्जाचे काम केले, हे जाणवले...
Yesterday they tried riots to break the unity of Dharavi and Mumbai at large.
If we are divided, then the mindhe regime will hand over Mumbai for free.
For all the big talks of making National Highways the best, this is the real condition of the Mumbai- Goa highway.
This is by the union bjp government.
10 years, same road, same potholes.
शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना कार्यकारिणी सदस्य @siddheshsunils1 जी ह्यांच्यातर्फे वरळी येथे एसएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. ह्या कार्यक्रमास उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना लॅपटॉप आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना भस्म्या रोग जडला आहे. राज्य सरकारच्या व महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अधिकारी वर्ग मोकाट सुटलेला आहे.
याचेच हे के पूर्व विभागातील उत्तम उदाहरण!
@uddhavthackeray@AUThackeray@SardesaiVarun@mybmc
आज पुण्यातील सिंहगड रोड येथील आनंद नगर, एकता नगर ह्या पूरग्रस्त भागांना भेट देऊन पाहणी केली.
ह्यावेळी येथील रहिवाशांसह संवाद साधून एकूणच घटनेबद्दलचं त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यांच्याकडून समजलं की, रात्री कुठलीही पूर्वसूचना न देता खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आलं. त्यानंतर १५ मिनिटांत परिसरातील वीज कापली गेली. वेळेत मदत न मिळाल्याने वयोवृद्ध, लहान मुले, स्त्रियांचे अतोनात हाल झाले.
तसेच नुकसानीचे झालेले पंचनामे, मदतकार्य ह्याविषयी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
आज वरळी पोलीस कॅम्प येथील पोलीस पत्नी आणि कुटुंबीयांनी माझी भेट घेतली.
अनेक वर्ष तिथे राहणाऱ्या पोलीस कुटुंबीयांना आपल्या हक्काची घरे वरळीतच मिळणे आणि इतर विषयांवर सखोल चर्चा झाली.