सकल मराठा समाजाचे बांधव आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने मुंबईत आले आहेत. या मागण्या योग्य प्रकारे पूर्ण होऊन सर्व आंदोलक सणासुदीच्या काळात सुखरूप आपल्या घरी परततील, अशी मनःपूर्वक आशा. श्री. मनोज जरांगे जी हे उपोषणावर आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो आणि लवकरच यावर समाधानकारक तोडगा निघावा, मराठा समाजाला न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे 🙏🏽. जय शिवराय, जय महाराष्ट्र 🙏🏽.
हा महाराष्ट्र छत्रपती शिवाज�� महाराज यांच्या आदर्शचा आहे
हा महाराष्ट्र हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आहे
हा महाराष्ट्र मराठी माणसाच्या त्यागाचा बलिदानाचा आणि सामर्थ्याचा आहे
इथे चालणार राहणार बोलणार फक्त मराठी मराठी मराठी.....
🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩
इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेतला. सरकारने या संबंधातील २ जीआर रद्द केले. याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही, कारण ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली. हिंदी भाषेसाठी सरकार इतका अट्टाहास का करत होतं आणि यासाठी सरकारवर नक्की कुठून दबाव होता, हे मात्र अजून गूढच आहे.
पण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांनी हिंदी शिकावीच म्हणून तीन भाषा लादण्याचा जो प्रयत्न होता तो एकदाचा हाणून पाडला गेला आणि यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेचं अभिनंदन. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एप्रिल २०२५ पासून या विषयावर आवाज उठवला होता आणि तेंव्हापासून हा मुद्दा तापायला लागला. त्यानंतर एक एक राजकीय पक्ष आवाज उठवायला लागले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षविरहित मोर्चा काढायच्या ठरवल्यावर अनेक राजकीय पक्षांनी, संघटनांनी त्यात सहभागी होण्याची तयारी दाखवली. हा मोर्चा ��र झाला असता तर इतका विशाल झाला असता की संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळाची आठवण व्हावी. कदाचित या एकजुटीचा धसका सरकारने घेतला असेल, पण हरकत नाही ही भीती असली पाहिजे.
अजून एक गोष्ट, सरकारने पुन्हा एकदा नवीन समिती नेमली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतोय समितीचा अहवाल येऊ दे किंवा नको येऊ दे परंतू हे असले प्रकार परत खपवून घेतले जाणार नाहीत म्हणजे नाहीत ! ही गोष्ट सरकारने कायमची त्यांच्या मनात कोरून ठेवावी ! ! !
हा निर्णय कायमचा रद्द झाला आहे असं आम्ही गृहीत धरतोय आणि महाराष्ट्रातील जनतेने पण हेच गृहीत धरलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा समितीच्या अहवालाचा घोळ घालू नका, अन्यथा या समितीला महाराष्ट्रात काम करू दिलं जाणार नाही याची नोंद सरकारने घ्यावी.
आता मराठी माणसाने पण यातून बोध घ्यायला हवा. तुमच्या अस्तित्वाला, तुम��्या भाषेला नख लावायला आपलेच लोकं बसलेत आणि त्यांच्यासाठी ते ज्या भाषेत शिकले, वाढले, जी भाषा त्यांची ओळख आहे त्याच्याशी काही देणंघेणं नाहीये... त्यांना कोणालातरी खुश करायचं आहे बहुदा. यावेळेस मराठी मनांचा एकत्रित राग दिसला तो पुन्हा पुन्हा दिसला पाहिजे.
असो, पण भाषेसाठी मराठी माणसं एकवटताना दिसली हा आनंद आहे. हा कडवटपणा अधिक वृद्धिंगत होऊ दे, आणि मराठी भाषा ज्ञानाची आणि जागतिक व्यवहार��ची भाषा ��ोऊ दे हीच इच्छा.
मराठी जनांचं पुन्हा एकदा अभिनंदन.
राज ठाकरे ।
आपण निवडून दिलेल्या मंत्र्यांना भेटण्यासाठी सामान्य माणसाला जर तासनतास लाइन मध्ये उभे राहून वाट पहात लागत असेल तर फायदा काय असल्या लोकांचा.
शासन आपल्या दारी आणि ये मंत्रालय मध्ये रहा उभा आमच्या दारी.. जमल तर या वर लक्ष द्या.
CSC Jaankari Suvidha...
For all the latest information and details about the CSC Services, Videos, newsletters, Important Dates, and much more.
Visit the CSC Jaankari Suvidha Portal https://t.co/9tuIX6Cpsw
#CSC#DigitalIndia#RuralEmpowerment#CSCJaankariSuvidhaPortal
Saddened to hear about the demise of renowned painter & Padma Bhushan awardee, Shri Laxman Pai ji. The country shall be indebted to him for his immense contribution in the field of art. My heartfelt condolences to his family and loved ones.
आमचे बंधू लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष श्री राहुल दादा केंद्रे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना. बंटी शेळके नवी मुंबई
@OfficeofUT@PawarSpeaks विद्युत मंडाळा कडुन रात्री १२:०५ ते सकाळी १०:०५ पर्यंत लाईट दिली जाते.
दिवसभर शेतात काम करून रात्री पाणी भरण्यासाठी रात्रभर शेतात ऊभे रहावे लागते सध्या थंडीचा महीना असुन ८ते १० डिग्री तापमान ��सते.आम्ही ��ात्रभर का जागं राहायचं?साहेब तुम्ही खरच लक्ष घाला.
@PawarSpeaks विद्युत मंडाळा कडुन रात्री १२:०५ ते सकाळी १०:०५ पर्यंत लाईट दिली जाते.
दिवसभर शेतात काम करून रात्री पाणी भरण्यासाठी रात्रभर शेतात ऊभे रहावे लागते सध्या थंडीचा महीना असुन ८ते १० डिग्री तापमान असते.आम्ही रात्रभर का जागं राहायचं?साहेब तुम्ही खरच लक्ष घाला यात. शेतकरी..