@mieknathshinde सावळा गोंधळ चालु आहे साहेब संजय गांधी निराधार फाईल सर्व कागदपत्रे देऊन सुद्धा काही कर्मचारी मुद्दामून फाईल नामंजूर करीत आहे तरी संबधित अधिकारी यांची चौकशी करण्यात यावी हि नम्र विनंती.
@RealBacchuKadu भाऊ प्लीज या महिलेने परिपूर्ण प्रस्ताव दाखल करून सुद्धा कन्नड तहसील कार्यालय यांनी नामंजूर केली आहे गरीब महिला विधवा व भूमिहीन आहे कृपया सहकार्य करावे हि नम्र विनंती.
@narendramodi मोदी साहेब महाराष्ट्र राज्यात जलजीवन मिशन अंतर्गत घरोघरी नल योजना मंजुर करण्यात आले आहे परंतु त्याची देखभाल ग्रामीण भागात ग्रामपंचायत कर्मचारी हा करीत आहे तरी कृपया ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्या मंजुर करण्याचे संबधित विभागास आदेश द्यावे हि नम्र विनंती.
सरकारला विनंती आहे की राज्यात गणेश उत्सव,दसरा इत्यादी सण आनंदात साजरा व्हावा याकरिता मोर्चा,आंदोलन,उपोषण यावर एक ते दोन महिने निर्बंध घालण्यात यावे सरकारने यावर तात्काळ दखल घ्यावी.
@mieknathshinde मा.मुख्यमंत्री साहेब आपणास विनंती करण्यात येते की थोडा वेळ लक्ष खेडेगावात काम करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या कडे द्यावे कारण आज पर्यंत अनेक वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर काम करीत असलेले अनेक कर्मचारी यांचे अपघाती निधन झाले आहे कृपया कोणत्याही प्रकारे विमा पॉलिसी नाही
हिवरखेडा गौताळा अभयारण्य तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर या ठिकाणी शेतकरी श्री. धर्मु गरदाल जाधव गट न 71 शेतकऱ्यांचे रान डुकरानी एक एकर क्षेत्राचे नुकसान केले आहे.तरी कृपया तात्काळ नुकसान भरपाई द्यावी व बंदोबस्त करण्यात यावे हि नम्र विनंती.
पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांच्या मातोश्री हिराबेन यांचे निधन झाल्याची बातमी ऐकून अतीव दुःख झाले. आम्ही सर्व नरेंद्र मोदीजी यांच्या दुःखात सहभागी आहोत. परमेश्वर त्यांच्या मातोश्रींच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.