छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील भगतवाडी येथे युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन शेतीच्या नुकसानीचा आढावा घेतला व बळीराजाच्या समस्या जाणून घेतल्या.
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार मा. श्री. आदित्यजी ठाकरे यांनी हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील माळवटा शिवारातील पिकाच्या नुकसानीची पाहणी केली..
यावेळी परिसरातील शेतकरी बांधवांशी संवाद साधत त्यांनी करपलेली पिके, उत्पादनातील घट, शेतीसमोरील आर्थिक संकट आणि शेतकऱ्यांच्या विविध अडचणी जाणून घेतल्या..
पिकांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य आर्थिक मदत मिळावी, पंचनाम्याच्या नावाखाली विलंब होऊ नये आणि शेतकऱ्यांच्या अडचणींवर तातडीने कार्यवाही व्हावी, यासाठी आम्ही पूर्ण ताकतीने तुमच्या पाठीशी आहोत..
संकट कितीही मोठे असले तरी शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. तुम्ही एकटे नाहीत, शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे, असा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना दिला..
@AUThackeray@iambadasdanve@ShivsenaUBTComm
#दुष्काळ #शेतकरी #Farmer #Soybean #FarmerRelief #AdityaThackeray #शिवसेना
जे मुख्यमंत्री आपल्या सुरक्षेतील कर्मचाऱ्याची साधी काळजी घेत नाहीत, त्यांच्याकडून महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेने काय अपेक्षा ठेवावी?
धाराशिवच्या दुष्काळी दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेतील एक कर्मचारी गाडीत चढताना पडल्याचे दृश्य समोर आले. त्यांच्या दौऱ्यात शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी थांबण्याऐवजी पुढे जाण्याचीच घाई दिसली; आणि आता आपल्या सुरक्षारक्षकासाठीही थांबले नाहीत.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदना असोत किंवा स्वतःच्या सुरक्षेतील कर्मचाऱ्याची अडचण…मुख्यमंत्र्यांची हीच असंवेदनशीलता महाराष्ट्राने किती काळ सहन करायची?
मुख्यमंत्री साहेब,
दौरे आणि फोटोसेशनपेक्षा माणुसकी मोठी असते!
बळीराजाला आश्वासनांची नाही, आधाराची गरज आहे; घोषणांची नाही, प्रत्यक्ष मदतीची गरज आहे..
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार मा. श्री. आदित्यजी ठाकरे यांनी जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील वरफळ येथे सोयाबीन पिकाच्या नुकसानीची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या..
निसर्गाच्या संकटाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक उद्ध्वस्त झाले आहे. वर्षभराची मेहनत, बियाणे-खते-औषधांचा खर्च आणि लाखो रुपयांची गुंतवणूक डोळ्यांसमोर मातीमोल झाली आहे. शेतकरी आज मदतीच्या प्रतीक्षेत आहे, त्याला केवळ दुष्काळ जाहीर केल्याच्या घोषणा नकोत, तर प्रत्यक्ष आर्थिक मदत त्याच्या खात्यात जमा झाली पाहिजे..
शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे दुर्लक्ष करून घोषणा, पंचनामे आणि कागदी आदेशांच्या फेऱ्यात सरकारने वेळ घालवू नये. बळीराजाला तातडीने ठोस मदत मिळवून देण्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत..
शेतकऱ्यांच्या हक्काच्या मदतीबाबत सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल. शेतकऱ्यांच्या जखमेवर फसव्या घोषणांचा मुलामा लावण्याचा प्रयत्न झाला, तर शिवसेना स्वस्थ बसणार नाही. गरज पडल्यास शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला..
#दुष्काळ #शेतकरी #Farmer #Soybean #FarmerRelief #AdityaThackeray #शिवसेना
उशिरा का होईना, राज्य सरकारने २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. पण केवळ कागदावर दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचे अश्रू पुसले जाणार नाहीत.
माझ्या दुष्काळ पाहणी दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. केवळ कर्ज तहकुबी नाही, 'कर्जमुक्ती' हवी आहे!
कुंभकर्ण टाकळी,
ता. परभणी
दुष्काळाचा दाह बळीराजाने अजून किती सोसायचा?
राज्यात ७५% दुष्काळ फक्त कागदावर जाहीर करून चालणार नाही,
आता बळीराजाला प्रत्यक्ष मदतीची गरज आहे.
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आणि बळीराजाला धीर देण्यासाठी मी आज मराठवाडा दौऱ्यावर आहे.
सॊलापूर जिल्ह्यातील बोरामणी येथे भेट देऊन शेतकरी बांधवांच्या व्यथा जाणून घेतल्या.
सोयाबीन, तूर सारखी प्रमुख पिकं अक्षरशः करपून गेली आहेत.
हाताशी आलेलं पीक पाण्याअभावी मरताना पाहून, बळीराजा टाहो फोडतोय. ह्या कठीण परिस्थितीत आम्ही अन्नदात्याच्या सोबत आहोत.
बार्शी तालुक्यातील कासारी मध्ये सुभाष माळी यांना सततच्या नापिक आणि कर्जबाजारी कोणाला कंटाळून काल आत्महत्या केली.
पक्षाच्या वतीने त्यांच्या कुटुंबीयांना भेट देऊन आर्थिक मदत केली तथा मुलगा प्रवीण माळी यांच्या पुढील संपूर्ण उच्च शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली.
बळीराजाच्या जखमेवर फसव्या घोषणांचा मुलामा नको; हक्काची मदत मिळेपर्यंत शिवसेना गप्प बसणार नाही..
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार मा. श्री. आदित्यजी ठाकरे यांनी तुळजापूर तालुक्यातील खानापूर येथील शेत शिवारातील पिकाच्या नुकसानीची पाहणी केली..