बालपण हे शिक्षण, खेळ आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी असते; कामाच्या ओझ्याखाली दबण्यासाठी नाही.
जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त आपण सर्वांनी बालकामगार प्रथेला विरोध करून प्रत्येक मुलाला शिक्षण, संरक्षण आणि सन्मानाचे जीवन मिळावे यासाठी प्रयत्न करूया.
#WorldDayAgainstChildLabour
आषाढ कृष्ण पक्षातील पवित्र कमला एकादशीच्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा!
भगवान श्रीविष्णू व माता लक्ष्मी यांच्या कृपेने आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य, यश आणि आनंद नांदो.
॥ श्री लक्ष्मी-नारायण प्रसन्न होवोत ॥
👁️ जागतिक दृष्टीदान दिन 👁️
“मृत्यूनंतरही दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश पेरण्याचे सामर्थ्य दृष्टीदानात आहे.”
आपल्या डोळ्यांचे दान करून दोन अंध व्यक्तींना नवजीवन आणि जग पाहण्याची संधी देता येते.
#WorldSightDay#EyeDonation#GiftOfVision#दृष्टीदान#नेत्रदान
🌊 जागतिक महासागर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌊
महासागर हे पृथ्वीचे फुफ्फुस आहेत. ते आपल्या पर्यावरणाचा समतोल राखतात, जैवविविधतेचे संरक्षण करतात आणि मानवजातीच्या अस्तित्वासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.
#WorldOceansDay#जागतिकमहासागरदिन#SaveOcean#OceanConservation
॥ श्री गणेशाय नमः ॥
संकष्ट चतुर्थीच्या पावन निमित्ताने विघ्नहर्ता श्री गणराय आपल्या सर्वांच्या जीवनातील दुःख, संकटे आणि अडचणी दूर करो व सुख, समृद्धी, आरोग्य आणि यशाचा आशीर्वाद देवो, हीच प्रार्थना.
अजूनही वेळ गेलेली नाही मित्रांने पर्यावरणाकडे वळा !
शेवटी हेच आपले रक्षण करणार आहे. आपल्याला ज्या गोष्टीची गरज व सवय लावली आहे ते ठराविकांसाठी व्यवसाय आहे. आपल्याला पर्यावरणाची गरज आहे हे ओळखा ! पुन्हा निसर्गाच्या कुशीत चला….
#पर्यावरण
गल्लीबोळातले कार्यकर्ते राजकारणासाठी आपल्या जिवा भावाच्या लोकांशी वैर घेतायेत त्यांच्या साठी सल्ला, पक्ष हे ठराविक नेत्यांची जहागिरी बनली आहे त्यामुळे शेवटपर्यंत तुम्ही कार्यकर्तेच राहणार ! जवळच्या माणसांना जपा स्वतः चा विचार करा…
#विधानपरिषद_निवडनूक
धैर्य, न्यायप्रियता, दूरदृष्टी आणि लोककल्याणकारी शासनाचा आदर्श निर्माण करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.
सौगंध मुझे मिट्टी की, में देश नहीं झुकने दूँगा ।
इथून झालेली सुरूवात आता ट्रंप समोर लोटांगण घालण्यात आणि मेलोडी वाटाण्यापर्यंत पोहोचली आहे.
#मोदी#Melodi
“सुदृढ पचन हीच निरोगी जीवनाची गुरुकिल्ली…
संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि चांगल्या सवयी अंगीकारून पचनसंस्था निरोगी ठेवूया.
आरोग्यदायी जीवनशैलीचा संकल्प करूया!”
जागतिक पचन स्वास्थ्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌿🍎
कमला एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा! 🪷🙏
भगवान श्रीविठ्ठलाच्या कृपेने आपल्या जीवनात भक्ती, श्रद्धा, सुख, समृद्धी आणि समाधानाचा प्रकाश सदैव नांदो.
“आम्हा नादी विठ्ठल, आम्हा छंदी विठ्ठल…
विठ्ठल हृदयी, विठ्ठल मिळतसे…!”