सरकार कृषी पदवीधरांना अजून किती दिवस नोकरी अभावी ताटकळत ठेवणार. २०��१ मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना अजूनही नियुक्ती दिली नाही. यासाठी त्यांना आंदोलन करावे लागत आहे. ही अतिशय खेदाची बाब आहे. २०२४ मध्ये नव्या भरतीसाठी कृषिमंत्र्यांनी अधिवेशनात २५८ जागांना मंजुरी दिली मात्र नव���न पदभरती घेतली जात नाही. पात्रता असूनही केवळ भरती घेतली जात नसल्याने युवकांमध्ये नैराश्य वाढत आहे. स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्यांच आत्महत्येचं उदाहरण असतांना आणखी किती स्वप्नील लोणकर बनवणार. हे सरकार महाराष्ट्राच्या शेतकरी कुटुंबातील गोरगरीब युवकांचं प्रती इतकं असंवेदनशील का वागत आहे..? शासनाने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणे तात्काळ थांबवावे. २५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये या जागांचा समावेश करावा...अन्यथा या विद्यार्थ्यांना घेवून मुंबईत मंत्रालयासमोर आंदोलन करू...
#mpsc
@CMOMaharashtra @mpsc_office
@Mpsc_Andolan
संदर्भ: आप महाराष्ट्र/२०२४/२३०७००१
प्रति,
मा. एकनाथ शिंदे,
मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य
विषय : "कृषि सेवक" पदाचा सेवक कालावधी रद्द करून "कृषि सहाय्यक" म्हणून सेवेत घेण्याबाबत.
महोदय,
महाराष्ट्र सरकारने २००४ मध्ये शासन निर्णयांनुसार राज्यातील सततची दुष्काळाची परिस्थिती हाताळण्यासाठी व वेतनावरील खर्च नियंत्रित करण्यासाठी कृषि सहाय्यकांची पदे ‘कृषिसेवक’ म्हणून भरणेबाबत निर्णय घेतला होता. यांमधील तरतुदीना अनुसरूनच ‘कृषि सेवक जाहिरात २०२४’ अंतर्गत पात्र उमेदवारांना कृषिसेवक म्हणून नियुक्ती मिळाली असून सध्या अनेक उमेदवार कृषि विभागामधे क��र्यरत आहेत. सध्या कृषि सेवकांना पदावर असताना विविध प्रकारच्या प्रशासकीय व वित्तीय जबाबदाऱ्या, विस्तार व प्रशिक्षणाची कामे, नैसर्गिक आपत्तीवेळीच्या विविध जबाबदाऱ्या, निविष्ठा व गुणनियंत्रण, फलोत्पादन/पणन, मृदसंधारण व जलसंधारण, सांख्यिकी/ संनियंत्रण व मूल्यमापन संबंधी विविध कामे तसेच गाव पातळीवरील विविध कामे, वेळोवेळी कृषि विभागाकडून आलेल्या कार्यक्रमांची अंमलबजावणी असे असंख्य कार्ये वेळोवेळी पार पाडावी लागतात. आपणांस ज्ञात आहेच की आपल्याच सरकारच्या नेतृत्वात आणि कृषि विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे नुकताच आपल्या महाराष्ट्र राज्याने देशपातळीवरचा १५ व्या कृषि नेतृत्व समितीचा २०२४ चा ‘सर्वोत्कृष्ट कृषि राज्य पुरस्कार’ पटकावला आहे.
आरोग्य विभागाप्रमाणे कृषि हाही घटक अत्यावश्यक सेवांमध्ये मोडत असुनही शेतकरी हितासाठी राबणाऱ���या कृषीसेवकांना "कृषी सहाय्यक" पदी सेवेत घेऊन न्याय मिळावा हि सर्व कृषीसेवकांची मागणी आहे.
या पत्राद्वारे आपणांस विनंती करण्यात येत आहे कि "कृषि सेवक" पदावरील कर्मचाऱ्यांचा सेवक कालावधी रद्द करून त्यांना "कृषि सहाय्यक" म्हणून सेवेत घेऊन सेवेचे लाभ पूर्वलक्षी प्रभावाने अदा करण्यात यावेत या मागणीचा विचार करावा व हजारो कृषीसेवकांना न्याय द्यावा.
धन्यवाद,
@mieknathshinde @CMOMaharashtra
संदर्भ: आप महाराष्ट्र/२०२४/२१०७००१
प्रति,
मा. एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
विषय - शिक्षणसेवक कालावधी रद्द करण्याबाबत.
महोदय,
राज्यातील शिक्षणसेवक (परिविक्षाधीन कालावधी) रद्द करावा हि राज्यातील हजारो शिक्षकांची मागणी आहे कारण राज्यात अनेक वर्षानंतर शिक्षक भरती झालेली आहे व या महागाईच्या काळात तुटपुंज्या मानधनावर घरखर्च चालविणे त्यांना अशक्य होत आहे. जवळजवळ सर्व शिक्षणसेवक यांचे वय ३५ वर्षांच्या जवळपास किंवा पुढे गेलेले आहे. महाराष्ट्र व गुजरात वगळता कुठल्याही राज्यात हा कालावधी लागू नसून, नियुक्ती नंतर लगेच पूर्ण वेतन लागू होते व याचा उल्लेख नवीन शैक्षणिक धोरणात सुद्धा करण्यात आला आहे. तसेच ज्या उद्देशाने शिक्षणसेवक ही पद्धत ���ालू केली होती सध्यातरी तशी राज्याची परिस्थिती नाही, महाराष्ट्र राज्य हे प्रगत झाले आहे, त्यामुळे या संपूर्ण परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून शिक्षणसेवक कालावधी रद्द करण्यासंदर्भातील राज्यातील हजारो शिक्षकांची मागणी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून पूर्ण करावी.
इतर अनेक विभागांमध्ये नियुक्तीनंतर लगेच पूर्ण वेतनश्रेणी लागू होते पण शिक्षणसेवकांना डी.एड / बी.एड + टी.ई.टी परीक्ष��� + अभियोग्यता चाचणी देऊनसुद्धा तीन वर्ष मानधनावर काम करावे लागते. अनेक शिक्षणसेवक हे अभयारण्य व दरडप्रवण क्षेत्रात काम करत आहेत, सर्पदंश, वन्य प्राण्यांचे हल्ले, अपघात यात जर दुर्दैवाने इजा झाली तर व्यवस्थित मदतही मिळत नाही. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात शिक्षकांन तीन वर्षे कंत्राटी पद्धतीने राबवून घेणे अशोभनीय आहे त्यामुळे "समान काम, समान वेतन" या न्यायानुसार त्वरीत शिक्षणसेवक रद्द करुन पूर्ण वेतनश्रेणी लागू करावी हि
नम्र विनंती.
@mieknathshinde @CMOMaharashtra #शिक्षणसेवक_रद्द #शिक्षणसेवक_पद_रद्द_करा #अन्यायकारक_शिक्षणसेवक_रद्द_करा
प्रति,
मा. धनंजय मुंढे
कृषी मंत्री
��हाराष्ट्र राज्य.
विषय : कृषीसेवक भरती - २०२३
महोदय,
२५ जानेवारी २०२४ च्या GR नुसार उमेदवार उपलब्ध किंवा पात्र नसल्या कारणामुळे रिक्त राहणाऱ्या समांतर आरक्षणाच्या जागा सामाजिक प्रवर्गात convert करणे अपेक्षित आहे. या GR नुसार विविध महानगरपालिका तसेच नगरपरिषद,पोलीस भरती,म्हाडा अशा इतर विभागांनी उमेदवार उपलब्ध नसल्यामुळे माजी सैनिक रिक्त जागा नियमानुसार convert केल्या आहेत.
परंतु कृषी विभागात ���वळपास २४२ माजी सैनिक जागा रिक्त असून पण काही कार्यवाही झालेली नाही. २०१९ साली अशाप्रकारेच २००+ जागा lapse झाल्या होत्या.
५ वर्षानंतर येणाऱ्या जाहिरातीमधील २४२ जागा रिक्त राहणार असतील तर तो कृषी च्या विद्यार्थ्यावर अन्याय आहे.
कृपया आपण यात लक्ष घालून शेतकऱ्यांच्या मुलांना न्याय द्यावा ही विनंती.
@dhananjay_munde @dr_prashantsb @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @Mpsc_Andolan @punyachiMPSC @mpsc_office @Drsuvarnas #DhananjayShinde
महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्याबाबत पाठवण्यात आलेली फाईल कृषी मंत्र्यांनी का अडवून ठेवली आहे?
मह��राष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत कृषी विभागात पदस्थापना आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण होवून ७ महिन्यांचा कालावधी लोटला असतानाही उमेदवारांना नियुक्ती देण्यास सरकार टाळाटाळ करत आहे. मुख्य सचिवांनी तत्काळ मान्यता दिल्यानंतर कृषीमंत्र्यांनी ३ आठवड्यापासून फाईल ��डवून ठेवण्याचे कारण काय याचे उत्तर कृषीमंत्र्यांनी उमेदवारांना द्यावे.
निवडणुकीची आचासंहिता लागण्यापूर्वी सरकारने उत्तीर्ण उमेदवारांना तातडीने नियुक्ती पत्र द्यावे ही सरकारकडे मागणी आहे.
#कृषी_सेवा_परीक्षा_नियुक्ती
@dhananjay_munde
#MPSC_EXAM 2024
#राज्यसेवा_2024_जागावाढ#राज्यसेवा_2024_1500#MPSC_Civil_1000_posts#Civil_Engineering_2024
♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा 2024 अंतर्गत..
' राज्यसेवा' व 'स्थापत्य अभियांत्रिकी' उमेदवारांच्या खालील मागण्या त्वरित मान्य कराव्या ही शासनाला नम्र विनंती..🙏
1. राज्यसेवा 2024( last attempt of old pattern)
जाहिरात सर्व 35 संवर्गातील
किमान 1500 पदांसह सुधारित करावी.
2. D.C., Dysp, ACST, CO,Education officer, B.D.O., तहसीलदार सह सर्व संवर्गाचा समावेश 2024 जाहिरातीत त्वरित करण्यात यावा.
3. स्थापत्य अभियांत्रिकी चे हजारो पदे रिक्त असताना केवळ 26 पदांची जाहिरात काढली आहे त्यात बदल जागावाढ करावी.. 🙏
👉 5 पैकी केवळ 2 संवर्गाची अत्यल्प पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे त्यात त्वरित सर्व 5 संवर्गाची किमान 1000 पदांसह सुधारित जाहिरात प्रसिद्ध करावी. शासनाने वरील गोष्टी जागावाढ बाबतीत #MPSC ला पत्रक पाठवून दखल घ्यावी ही नम्र विनंती.. 🙏
@CMOMaharashtra@AbhiPawarBJP@atullondhe@NANA_PATOLE@mieknathshinde@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RRPSpeaks
@AROM_GOM
@supriya_sule@maha_governor
नगर परिषद जागा वाढ झाली पाहिजे.
100% पदभरती GR चे CM साहेबांच्या खात्याकडूनच उल्लंघन होतंय.
मोजक्याच पद���ंसाठी जाहिरात काढून विद्यार्थ्यांवर अन्याय केला जातोय.
नगर विकास अधिकारी कडून मुख्यमंत्री साहेबांनी दिलेल्या आदेशाला केराची टोपली..6-7 वर्षानंतर येणारी जाहिरात,,60% पदे रिक्त ,, राज्यातील वाढती बेरोजगारी बघुन ही हि जागा वाढ का नाही..??