आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची पुण्यतिथी. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे दोन ठळक कालखंड ठरवायचे झाले तर अर्थात पहिलं, 'टिळक युग' आणि दुसरं 'गांधी युग' असं करता येईल. १९०० ते १९२० ह्या संपूर्ण कालखंडावर टिळकांचा एकूणच भारतीय सार्वजनिक जीवनावर जो पगडा होता त्याची तुलना होणे शक्यच नाही. असं म्हणतात की एकदा टिळक कलकत्त्याला जायला निघाले, तर त्या प्रवासाला जवळपास ११ दिवस लागले कारण इतक्या मोठ्या संख्येने वाटेतल्या प्रत्येक शहरांत टिळकांचं दर्शन घ्यायला, त्यांना भेटायला लोकांची गर्दी जमत होती. तेव्हा खंडप्राय भारताच्या कानाकोपऱ्यात पोहचलेला आणि मान्यता मिळवलेला हा बहुदा एकमेव मराठी नेता.
'स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे....' असं म्हणणाऱ्या टिळकांच्या स्वराज्याबद्दलच्या कल्पना सुस्पष्ट होत्या. त्यांच्या केंद्रीय सत्तेबाबतच्या मांडणीत भाषिक प्रांतरचनेचं महत्व आणि संघराज्यांना संपूर्ण स्वायत्तता ह्या बाबींना मध्यवर्ती स्थान होते. लोकमान्यांच्या ह्या विचाराचं स्मरण, पुरस्काररुपी आशीर्वाद मिळणाऱ्यांना असेल असं मी मानतो.
लोकमान्य टिळकांचे समकालीन नेत्यांशी तात्विक मतभेद होते पण त्यांनी ते मतभेद राष्ट्रहिताच्या आड येऊ दिले नाहीत. तसंच मतभेद आहेत म्हणून समोरच्याचं संपूर्ण चारित्र्यहनन करणं हे त्यांच्या कधीही ध्यानीमनी नव्हते. महात्मा गांधीजींचे आणि त्यांचे तात्विक मतभेद झाले पण त्यांनाही टिळकांबद्दल नितांत आदर होता आणि आपल्याला त्या पार्श्वभूमीवरच पुढे जायचं आहे ह्याचं भान होतं. तसंच टिळकांना देखील उद्याच्या भारतात गांधी हे राष्ट्रनेते ठरू शकतील ह्याची जाणीव होती आणि त्यासाठी टिळकांनी गांधीजींशी कोणतेही वैचारिक मतभेद सार्वजनिक चर्चेचा विषय होऊ दिले नाहीत. आज महापुरुषांच्या चारित्र्यहननाच्या काळात टिळकांचा ह्या विचारला पुन्हा उजाळा मिळायला हवा.
रवींद्रनाथ टागोरांनी काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारावं असा आग्रह टिळकांनी धरला होता, ह्यातून राजकारणात फक्त राजकीय आदर्श पुढे येण्याऐवजी प्रतिभाशक्तीचा आदर्श पण यावा असा आग्रह धरणारे टिळक हे खऱ्या अर्थाने द्रष्टे म्हणावे लागतील, ते ह्यासाठी की सद्य परिस्थितीत, 'सत्तेसाठी वाट्टेल ते'चे आदर्श उभे राहात असताना, प्रतिभा आणि संस्कृती किती महत्वाची आहे ह्याची जाणीव त्यांना होती. ह्या लोकमान्य कर्मयोग्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विनम्र अभिवादन.
मा. @Dev_Fadnavis साहेब आपण अभ्यासू नेते आहात, परंतु seriousness रहावा म्हणून परीक्षा फी हजार रुपये ठेवली, असल्याचं आपलं उत्तर समाधानकारक नाही. वर्षभरात अनेक परीक्षा होत असतात. वेगवेगळ्या विभागाच्या वेगवेगळ्या परीक्षेसाठीही वेगवेगळी फी असते. वर्षाला केवळ फी पोटी एका विद्यार्थ्याला जवळपास १५-२० हजाराचा भुर्दंड बसतो. सर्वच विद्यार्थी खासगी क्लास लावतात असंही नाही, झोपडीत राहूनही गुणवत्ता यादीत येणारी अनेक उदाहरणे आहेत. विद्यार्थ्यांकडून असे पैसे वसूल करणं आणि आपण दिलेलं उत्तर मला तर पटलं नाही, युवांना पटलं की नाही ते पहावं लागेल. म्हणून परीक्षा फी बाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेताना अर्थमंत्री @AjitPawarSpeaks दादांनाही बोलवा तसंच मंत्रीपद दिलं नाही म्हणून एखाद्या आमदाराला दिडशे कोटी रु. निधी दिला असं समजून विद्यार्थी हिताचाच निर्णय घ्यावा, ही विनंती!
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते, आमदार मा. एकनाथरावजी खडसे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!
@EknathGKhadse
नाथ प्रतिष्ठाणच्या माध्यमातून जनसेवेचे व्रत कायम जोपासले आहे. जनसेवेबरोबरच परळी शहराचा सांस्कृतिक लौकिक वाढविण्याचे काम अखंडित सुरू ठेऊ. हा कार्यक्रम व गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचे व तमाम परळीकरांचे मनस्वी आभार व अभिनंदन. (2/2)
@PawarSpeaks एस टी कर्मचारी सोबत तुम्ही खूप वाईट केलं... भविष्यात जे हाल काँग्रेस चे झाले ते तुमचे न होवो....या साठी एस टी कर्मचारी वर दया करून त्यांची मागणी पूर्ण करा
केजरीवाल यांच्या दिल्लीतील सरकारसंबंधी सामान्य माणसांची मतं जर जाणून घेतली तर ती मतं केजरीवालांच्या तसेच आम आदमी पक्षाच्या बाजूने असतात. आरोग्य, प्राथमिक शिक्षण यासंबंधित आप पक्षाने ज्या सुविधा पोहचवल्या त्याच आधारावर दिल्लीतल्या लोकांनी त्यांना निवडून दिलं.
गृहनिर्माण विभागाचा मंत्री म्हणून मी हा प्लॉट रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. फक्त तो सुनिल गावस्कर साठी बदलला. आतातरी सुनिल गावस्करने तिथे क्रिकेट अकॅडमी सुरु करावी एवढीच ईच्छा.
श्रीक्षेत्र झुंज ता.वरुड जि.अमरावती येथील वर्धा नदीमध्ये बोट उलटून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन तात्काळ मदत उपलब्ध करुन देण्याची मागणी आज मा. मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांना केली.
#SDRF#NDRF
आमचे मित्र, प्रसिद्ध अभिनेते तथा शिरूर लोकसभेचे लोकप्रिय खासदार @kolhe_amol जी, आपणास जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, आपली कारकीर्द यश व किर्तीसह बहरत जावो हीच प्रभू वैद्यनाथास प्रार्थना.