छायाचित्रे बोलकी असतात, असे आपण म्हणतो; पण हे छायाचित्र पाहून काय बोलावे, हेच समजत नाही! एका दुचाकीवर तब्बल पाच जण? भर रहदारीच्या रस्त्यांवर मोठ्या शहरांमध्ये असे दृश्य नेहमीच दिसते. वाहतूक पोलीस कारवाई करत असतातच; पण हा प्रश्न केवळ कारवाईचा नाही, तर स्वयंशिस्तीचा आहे. स्वतःचा आणि इतरांचाही जीव धोक्यात घालू नये, एवढे तारतम्य बाळगण्यासाठी पोलिसांची भीतीच कशाला हवी? सुरक्षिततेची जाणीव ही दंडाच्या भीतीतून नव्हे, तर स्वतःच्या जबाबदारीच्या भानातून यायला हवी.
#Traffic #ChhatrapatiSambhajinagar #Discipline
'लोकमत'चे पहिले संपादक, पत्रपंडित पां. वा. गाडगीळ यांनी मी लंडनला असताना मला पाठवलेले एक जुने अंतर्देशीय पत्र आज अनेक वर्षांनंतर पुन्हा हातात आले.
ते वाचताना क्षणभर काळ मागे सरकला आणि मी जुन्या आठवणींच्या जगात हरवून गेलो.
मोबाइल, व्हॉट्सॲप आणि सॅटेलाइट फोनच्या आजच्या युगात क्षणात जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत संवाद साधता येतो. पण एक काळ असा होता, जेव्हा १५ पैशांचे पोस्टकार्ड, अंतर्देशीय पत्र आणि अतिशय तातडीचा निरोप असेल तर तार—हेच संवादाचे प्रमुख मार्ग होते. त्या पत्राची वाट पाहण्यातही एक वेगळीच उत्सुकता होती आणि पत्र हातात पडल्यावर ते पुन्हा पुन्हा वाचण्यात एक वेगळाच आनंद.
पैसे पाठवायचे तेही यूपीआयने नव्हे, तर मनीऑर्डरने. ‘प्रायव्हसी’सारख्या आजच्या संकल्पना तेव्हा फारशा परिचयाच्या नव्हत्या. नवरा बायकोला पोस्टकार्डवर पत्र लिहायचा आणि ते कुणाच्या हातात पडले तर ते वाचले जाण्याची शक्यताही नाकारता येत नसे. तरीही त्या काळच्या पत्रांमध्ये माणसांमधील जिव्हाळा, आपुलकी आणि भावनांची ऊब होती.
बदल आणि प्रगती हवीच. मी आजच्या गतिमान युगाचाही तितकाच चाहता आहे. पोस्ट खात्यानेही काळाबरोबर नवे तंत्रज्ञान स्वीकारले, सेवांचा वेग वाढवला आणि संवादाची साधने अधिक आधुनिक केली.
पण नव्या युगाचे स्वागत करताना जुन्या काळाचे योगदान आणि त्या काळाने जपलेली माणुसकीची ऊब विसरता येणार नाही, एवढेच या जुन्या पत्राने आज पुन्हा जाणवून दिले.
जागतिक टपाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💌
#WorldPostDay #Post #Card
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या अकाली निधनाने मराठीसह भारतीय चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. रंगभूमीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास ‘अंकुश’, ‘प्रतिघात’, ‘प्रहार’, ‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’ ते ‘नटसम्राट’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांपर्यंत पोहोचला. प्रत्येक भूमिकेत नानांनी केवळ अभिनय केला नाही, तर आपल्या विलक्षण आवाजाने, देहबोलीने आणि अस्सल अभिनयाने व्यक्तिरेखा अक्षरशः जिवंत केली.
मराठी मातीतून उभा राहिलेला हा असामान्य अभिनेता आपल्या प्रतिभेच्या बळावर राष्ट्रीय पातळीवर अमीट ठसा उमटवून गेला. त्यांचे जाणे म्हणजे एका प्रभावशाली अभिनय पर्वाचा अंत आहे.
नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
#NanaPatekar #Actor #Shradhhanjali
नागोया, जपान येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेची सांगता झाली. २१ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३७ कांस्य अशा एकूण ८५ पदकांसह भारत चौथ्या क्रमांकावर राहिला. हांगझोऊ येथील २०२३च्या स्पर्धेतील १०६ पदकांपेक्षा ही संख्या कमी असली, तरी अनेक नव्या खेळाडूंनी आश्वासक कामगिरी केली. विशेष म्हणजे शेवटच्या दोन दिवसांत भारताने ११ सुवर्णपदके जिंकत मागील स्पर्धेतील चौथे स्थान कायम राखले.
मात्र, या स्पर्धेनंतर प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे आशियाई क्रीडा महाशक्ती म्हणून उदयास यायचे असेल, तर भारताला अजून मोठा पल्ला गाठावा लागेल. चीन ३४१, जपान २६९ आणि दक्षिण कोरिया १५० पदकांसह भारतापेक्षा खूप पुढे आहेत. त्यामुळे एकूण पदकांची आणि विशेषतः सुवर्णपदकांची संख्या वाढवणे हे भारताचे पुढचे लक्ष्य असले पाहिजे.
महाराष्ट्रासाठी मात्र ही स्पर्धा विशेष आनंदाची ठरली. कुमकुम मोहोड़ने दोन सुवर्ण आणि एक रौप्य जिंकून इतिहास घडवला. साताऱ्याच्या साहिल जाधवने दोन सुवर्णपदके जिंकली. रुद्रांक्ष पाटीलने एक रौप्य आणि एक कांस्य, पार्थ मानेने रौप्य, यशदीप भोगेने रौप्य, सरवेश कुशारेने रौप्य आणि हरिता भद्राने कांस्यपदक जिंकून पदकतालिकेत भर घातली. दिया चितळेनेही मिश्र दुहेरीत कांस्यपदक पटकावले.
महाराष्ट्रातील काही पदक विजेत्या खेळाडूंची आर्थिक पार्श्वभूमी बेताचीच होती. अथक मेहनत आणि आई वडिलांच्या त्यागामुळे ते आज देशाचे नाव मोठे करू शकले. प्रतिभा ग्रामीण आणि सर्वसामान्य कुटुंबांतही मोठ्या प्रमाणावर आहे; गरज आहे ती ती ओळखण्याची, घडवण्याची आणि आर्थिक अडचणींमुळे ती थांबू न देण्याची.
चीनशी स्पर्धा करायची असेल, तर शाळा-कॉलेज स्तरापासून प्रतिभा शोध, खेळनिहाय दीर्घकालीन नियोजन, प्रशिक्षकांची गुणवत्ता, क्रीडा विज्ञान आणि अधिकाधिक आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव यावर आता गांभीर्याने गुंतवणूक करण्याची वेळ आली आहे.
पदक जिंकणाऱ्या प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे; महाराष्ट्राच्या खेळाडूंचा आनंद तर विशेषच! 🇮🇳🏹🥇
#AsianGames #Nagoya #Sports #India
Change begins when you decide to step out of your comfort zone. Sometimes, the smallest change can open the door to something much bigger.
#Sunday#Life#Motivation
अमरावतीची सुवर्णकन्या कुमकुम मोहोडने कमाल केलीय! अवघ्या १७ वर्षांच्या कुमकुमने आशियाई स्पर्धेत रिकर्व्ह तिरंदाजीमध्ये वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धेत सुवर्ण तर सांघिक मिश्र प्रकारात रौप्य पदक जिंकले. तिच्या तीन पदकांपेक्षा अधिक कौतुकास्पद आहे ते या यशामागचे सातत्य, संयम आणि जिद्द.
आज महिलांच्या वैयक्तिक रिकर्व्ह तिरंदाजीच्या अंतिम सामन्यात ५-५ अशी बरोबरी झाल्यानंतर शूट-ऑफमध्ये कुमकुमने नेमका १० गुणांचा वेध घेतला. प्रतिस्पर्धीचा बाण ८ गुणांवर थांबला आणि कुमकुमच्या गळ्यात सुवर्णपदक पडले.
काल बलाढ्य दक्षिण कोरियाचा पराभव करत भारताने महिलांच्या सांघिक रिकर्व्ह प्रकारातील पहिलेवहिले सुवर्णपदक जिंकले त्यावेळीही दबावाच्या क्षणी शांत राहण्याची तिची क्षमता दिसली. आज वैयक्तिक सुवर्णासह तिने गोल्डन डबल साधले.
कुमकुमच्या यशाची खरी गोष्ट मात्र या पदकांच्या पलीकडे आहे.
तिचे वडील अनिल मोहोड मिठाईचे खोके बनवण्याचे काम करतात. सुरुवातीला अवघ्या ३,००० रुपयांच्या साध्या लाकडी धनुष्याने, नंतर काही काळ जुन्या साहित्यावर सराव करत कुमकुमने आंतरराष्ट्रीय स्तर गाठला. साधनांची कमतरता होती; पण लक्ष्य मात्र मोठे होते.
आज शूट-ऑफमध्ये १० गुणांचा अचूक वेध घेणारी कुमकुम कदाचित याच संघर्षातून घडली आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी लक्ष्यावर नजर आणि मनावर ताबा असेल, तर इतिहास घडवता येतो, हे तिने दाखवून दिले.
कुमकुम, तिचे आई-वडील आणि प्रशिक्षक प्रफुल्ल डांगे व गणेश जाधव यांचे मनःपूर्वक अभिनंदन. या सुवर्णकन्येच्या यशाचा अमरावतीलाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे.
#Amravati #KumkumMohod
#AsianGames
रायगडमधील दिवेआगर समुद्रकिनारी आळंदी येथील ‘विनर्स अकॅडमी’च्या सहलीसाठी गेलेल्या अकरावी-बारावीतील आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना काळीज पिळवटून टाकणारी आहे.
२५ मुले, १७ मुली आणि सहा शिक्षक अशा ४८ जणांचा हा समूह होता. समुद्राच्या खोलीचा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने आठ विद्यार्थी पाण्यात वाहून गेले. सर्वांचे मृतदेह सापडले आहेत. या निष्पाप विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेले दुःख शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे. त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. मृत विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
असे अपघात केवळ ‘दुर्दैव’ म्हणून सोडून चालणार नाहीत. पाण्याची खोली आणि प्रवाहाचा चुकीचा अंदाज, भरती-ओहोटीची माहिती नसणे आणि मोठ्या विद्यार्थीगटावर पुरेसे प्रत्यक्ष निरीक्षण नसणे हे जोखमीचे घटक ठरू शकतात.
मोठ्या सहलींच्या नियोजनात समुद्रकिनाऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवे. प्रशिक्षित जीवरक्षकांची उपलब्धता, विद्यार्थ्यांवर सतत देखरेख आणि धोकादायक ठिकाणी पाण्यात उतरण्यास पूर्ण बंदी याची काटेकोर अंमलबजावणी केली तरच अशा घटना टाळता येतील.
#Diveagar #Raigad #Accident
काही धैर्याच्या कहाण्या शब्दांपलीकडच्या असतात...
आकाशात हजारो फूट उंचीवर विमान उड्डाण करत असताना सहवैमानिकाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या फ्लायदुबईच्या दुबई-तेल अवीव विमानाचे सारथ्य करणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांची कहाणी त्यापैकीच एक.
अत्यंत भयावह परिस्थितीत विमान अवघ्या ३० सेकंदांत सुमारे १४,३०० फूट खाली आले होते. प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता. स्वतः गंभीर जखमी होऊनही कॅप्टन स्मित यांनी प्रसंगावधान दाखवत कॉकपिटचा दरवाजा उघडण्याची यंत्रणा कार्यान्वित केली. त्यामुळे प्रवासी आणि क्रू सदस्यांना कॉकपिटमध्ये प्रवेश करून हल्लेखोर सहवैमानिकावर ताबा मिळवणे शक्य झाले. त्यानंतर विमानातील अतिरिक्त वैमानिकांनी नियंत्रण हाती घेत विमान सुरक्षितपणे सौदी अरेबियातील तबूक येथे उतरवले.
स्वतःच्या वेदनांपेक्षा १७४ प्रवाशांच्या जिवांचे रक्षण महत्त्वाचे मानणाऱ्या कॅप्टन स्मित यांची कर्तव्यनिष्ठा आणि अदम्य धैर्याला तोड नाही.
भारताच्या या शूर वैमानिकाला मनापासून सलाम! ते लवकरात लवकर पूर्णपणे बरे होवोत ही ईश्वरचरणी प्रार्थना.
#FlyDubai #CaptSmit #aviation
साताऱ्याच्या करंडी गावातून आलेल्या मराठमोळ्या साहिल जाधवने आज आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण इतिहास घडवला! 🇮🇳🏹
कंपाऊंड मिश्र सांघिक तिरंदाजीमध्ये साहिल आणि चिकिथा तनिपर्थी यांनी सुवर्णपदक पटकावले आणि भारताने या स्पर्धेत आणखी एक सोनेरी क्षण अनुभवला. मात्र या यशामागे अनेक वर्षांचा संघर्ष आणि कुटुंबाचा मोठा त्याग आहे. वयाच्या १९व्या वर्षी तिरंदाजीला सुरुवात करणाऱ्या साहिलला पहिले राष्ट्रीय पदक मिळवण्यासाठी तब्बल सात वर्षे प्रतीक्षा करावी लागली.
या काळात तो दरवर्षी अगदी थोड्या फरकाने यशापासून दूर राहिला. त्याच्या कुटुंबाने मात्र त्याची साथ सोडली नाही. साहिलसाठी नवीन कंपाऊंड धनुष्य घेण्यासाठी त्याच्या आईने स्वतःचे दागिने विकले.
आज त्याच संयम, जिद्द आणि कुटुंबाच्या त्यागाचे रूपांतर आशियाई सुवर्णपदकात झाले आहे. या विजयासोबत भारताने लॉस एंजेलिस २०२८ ऑलिम्पिकसाठी मिश्र कंपाऊंड तिरंदाजीतील स्थानही मिळवले आहे.
साहिल, तुझ्या जिद्दीला, तुझ्या कुटुंबाच्या त्यागाला मनापासून सलाम! या ऐतिहासिक यशाबद्दल हार्दिक अभिनंदन! 🇮🇳🥇
#SahilJadhav #AsianGames #Japan
स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. लतादीदींच्या आवाजाने अनेक पिढ्यांच्या भावविश्वाला शब्द, सूर आणि स्पंदन दिले. काळ बदलला, संगीत बदलले; पण ‘लता’ हा स्वर भारतीय मनात सदैव निनादत राहील.
त्यांची गाणी ऐकताना मला नेहमी जाणवते—हा केवळ आवाज नाही, ही एक विलक्षण अनुभूती आहे. स्वरातील निर्मळता, नजाकत, भाव आणि विलक्षण गोडवा याला तोड नाही. त्यांचे ते मधुर स्वर संपले नाहीत, अजरामर झाले आहेत.
#LataMangeshkar #Bharatratna #Music
सिंगापूरच्या राष्ट्रीय ग्रंथालय मंडळाने नागरिकांना पुन्हा वाचनाकडे वळवण्यासाठी ‘रीड एसजी’ या पाच वर्षांच्या राष्ट्रीय मोहिमेची नुकतीच सुरुवात केली आहे.
या मोहिमेअंतर्गत ‘रीड एसजी चॅलेंज’मध्ये सहभागी होणाऱ्यांनी दररोज किमान १५ मिनिटे वाचन करायचे आहे. प्रवासातील काही थांबे, बसची वाट पाहतानाचा वेळ, दुपारची विश्रांती किंवा सकाळच्या चहाचा वेळ—एवढ्याशा कालावधीतही वाचनासाठी वेळ देता येईल, अशी या उपक्रमाची संकल्पना आहे. ‘क्राउडटास्कएसजी’ या शासकीय व्यासपीठावर वाचनाची नोंद ठेवली जाते. त्यासाठी सहभागी व्यक्तींना गुण, आभासी नाणी आणि रोख बक्षिसही मिळते.
बक्षिसाची रक्कम फार मोठी नाही; मात्र महत्त्वाचे हे की, या निमित्ताने नागरिक काहीतरी वाचतील.
मला आठवते, लहानपणी शाळेत शिक्षकांकडून नेहमीच वाचण्याचा आग्रह व्हायचा. घरीही वाचनाचे वातावरण होते. पुढे पत्रकारितेत आल्यावर तर वाचन जीवनाचा अभिन्न भागच झाले. त्यामुळे वाचनासाठी अवघी १५ मिनिटे द्यावीत, यासाठी कुठेतरी राष्ट्रीय आव्हान सुरू करावे लागले, हे वाचून क्षणभर हसू आले.
पण काय करणार, काळ बदलला आहे. मोबाईल आणि संगणकाच्या पडद्यावरून आता नजर हटत नाही. कामासाठी ते आवश्यकही आहे. मात्र स्क्रीनचेही व्यसन लागू शकते, हे नाकारता येणार नाही. सलग आणि सखोल वाचनासाठी आवश्यक असलेली एकाग्रता टिकवणे आज अधिक आव्हानात्मक होत आहे.
म्हणूनच ‘रीड एसजी’ ही केवळ पुस्तक वाचण्याची मोहीम नाही; ती ‘पडद्यापासून थोडे दूर व्हा आणि पुस्तकात थोडे अधिक बुडून जा’, असा साधा पण महत्त्वाचा संदेश देते.
वाचनासाठी १५ मिनिटे—स्वतःसाठी, विचारांसाठी!
आपणही ही कल्पना स्वीकारायला हरकत नाही. तुम्हाला काय वाटते?
#Singapore #ReadSG #Reading
भारताच्या अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देणारे महान अर्थतज्ञ, शांत, संयमी नेते माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.
१९९१ मधील गंभीर आर्थिक संकटाच्या काळात अर्थमंत्री म्हणून त्यांनी उदारीकरणाच्या व्यापक सुधारणांना आकार दिला. त्या बदलांनी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी नव्या पर्वाची सुरुवात केली.
रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर, अर्थमंत्री, आणि दोन कार्यकाळ देशाचे पंतप्रधान अशी त्यांची प्रदीर्घ कारकीर्द त्यांच्या बहुआयामी योगदानाची साक्ष देते.
विद्वत्ता, साधेपणा, नम्रता, आणि कामाप्रती असलेली निष्ठा हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे ठळक पैलू होते. देश आर्थिक इतिहासातील निर्णायक वळणावर असताना त्यांनी केलेल्या महान कार्याची नेहमीच आठवण येत राहील.
@INCIndia@INCMaharashtra
#PrimeMinister #DrManmohanSingh #India
गडचिरोली जिल्ह्याच्या
अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील जिजगाव येथील शेतकरी सीताराम मडावी यांच्या जलसंवर्धन व शाश्वत शेतीच्या प्रयोगांची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात येत आहे, ही त्या जिल्ह्यासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब आहे.
भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयातर्फे नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे २२ ते २६ सप्टेंबरदरम्यान आयोजित होत असलेल्या ९व्या भारत आंतरराष्ट्रीय जल सप्ताहात जेंव्हा मडावी यांनी आपली जलव्यवस्थापनाची यशोगाथा मांडली, तेंव्हा सर्वजण प्रभावित झाले.
‘जलवायु परिवर्तन के प्रति सक्षम और लचीला जल प्रबंधन’ ही यंदाची संकल्पना आहे. उद्घाटन सत्रात विशेष निमंत्रीत असलेले ५५ वर्षीय मडावी यांनी गेल्या २३ वर्षांपासून जलयुक्त शिवार, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून १८४ गावांमध्ये शाश्वत जलसिंचनाची विविध कामे केली. तलावांचे खोलीकरण, विहिरींचे पुनर्भरण, नाला खोलीकरण आणि शेततळ्यांच्या माध्यमातून पाण्याचे नियोजन कसे करण्यात आले, याचा लेखाजोखा त्यांनी मांडला. या कामांमुळे तब्बल ११ हजार ५०० हेक्टर क्षेत्रात दुबार पीक घेणे शक्य झाले, हीच त्यांच्या यशाची पावती.
बेभरवशाचा पाऊस, सिंचनाचा अभाव, वर्षानुवर्षे रखडलेले सिंचन प्रकल्प या सर्वांचा शेतीवर, शेतकऱ्यांच्या आयुष्यावर होत असलेल्या विपरीत परिणामांची चर्चा सर्वत्र होत असतात मडावी यांच्या सारखी मंडळी अतिशय उत्तम आणि कमी खर्चाचे प्रकल्प राबवत आहेत. त्यांच्या या मॉडेलचा अभ्यास करून टंचाईग्रस्त भागात त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.
#WaterConservation #Gadchiroli #JalSaptah
कर्करोगावरील अत्यावश्यक एक औषध किरकोळ विक्रेत्याला २७०० रुपयात उपलब्ध होत असताना त्याची कमाल किरकोळ किंमत २७,००० रुपये एवढी, म्हणजे चक्क १० पट जास्त लिहिल्याचे आढळल्याने आश्चर्यचकित झालेल्या सर्वोच्च न्यायालयाने याला रुग्णांवर भरदिवसा टाकलेला दरोडा आणि लूट म्हटले आहे. औषधांसंबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करणाऱ्या दोन याचिकांच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने हे निरीक्षण नोंदविले आहे.
राज्याच्या अन्न आणि औषधी प्रशासनाने केलेल्या एका सर्वेक्षणात रुग्णालयांनी ₹११.०५ला खरेदी केलेल्या आयव्ही सेटची एमआरपी ₹३२५, ₹६.७५च्या सिरिंजची ₹५७.२० आणि ₹२९.४१च्या कॅथेटरची ₹३१०, म्हणजे तब्बल १५० ते २८०० टक्के जास्त असल्याचे आढळून आल्यानंतर खात्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केंद्र सरकारचा फार्मास्युटिकल्स विभाग आणि नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीकडे नुकतीच विशेष शिफारस पाठवली असून, खरेदी किंमत आणि एमआरपीमधील तफावत रोखण्यासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे बनवण्याची मागणी केली आहे.
औषधे, आरोग्यसेवेच्या किंमती हा कोट्यवधी भारतीयांच्या जीवनमानावर प्रचंड प्रभाव टाकणारा घटक आहे. असे नाही की सध्या सरकारचे काहीच नियंत्रण नाही. औषध किंमत नियंत्रण आदेश, २०१३ अंतर्गत अत्यावश्यक औषधांच्या यादीतील औषधांसाठी कमाल किंमत निश्चित केली जाते. २०२२च्या अत्यावश्यक ३८८ औषधांच्या यादीत कर्करोगावरील औषधांचाही समावेश आहे. 'एनपीपीए'ने २०२६ मध्ये ९३५ औषधांच्या सूत्रांसाठी कमाल किंमती निश्चित केल्या आहेत.
असे असले तरी प्रत्येक औषध, प्रत्येक वैद्यकीय उपकरण आणि प्रत्येक रुग्णालयीन वस्तूसाठी खरेदी किंमत, व्यापारातील मार्जिन आणि रुग्णाकडून आकारली जाणारी अंतिम किंमत यांची साखळी स्पष्टपणे दिसतेच असे नाही.
औषध कंपन्या, वितरक, औषधविक्रेते आणि रुग्णालयांना त्यांचे वैध खर्च आणि वाजवी नफा मिळणे नक्कीच आवश्यक आहे. पण रुग्ण हा या संपूर्ण साखळीतील सर्वात कमकुवत घटक असतो. त्याच्याकडे औषधाची किंमत तपासण्याची, पर्याय शोधण्याची किंवा रुग्णालयाच्या दुकानाशी घासाघीस करण्याची संधी अनेकदा नसते. त्यामुळे आरोग्यसेवेच्या बाजारात नफ्याइतकीच पारदर्शकताही आवश्यक आहे.
एक दुर्धर आजार एका संपूर्ण सामान्य कुटुंबाचे आयुष्य आर्थिकदृष्ट्या उध्वस्त करू शकतो. आयुष्यमान भारत सारख्या योजना, राज्य सरकारांच्या विविध योजना नक्कीच गरीब रुग्णांना लाभदायक आहेत. मात्र, सार्वजनिक आरोग्य निरामय ठेवायचे असेल तर औषधे, उपकरणे, आरोग्य सेवा यांच्या किंमती ठरविण्याबाबत पारदर्शकता हवीच.
#NPPA #medicines #health
बळीराजापुढे अडचणी अनेक असतात पण आपल्या तल्लख बुद्धीने तो त्यातून मार्ग काढतोच. थेंब थेंब पाणी जपले, तर शेतीही फुलते, याचे उदाहरण म्हणजे हा शेतकरी.
#Farmer#Nanded#Agriculture
खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करून देशाचे नाव उज्ज्वल करतात; मात्र या यशापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रवास किती खडतर असतो, याची आपल्याला अनेकदा कल्पनाही नसते.
कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पुष्पनगर येथील नेमबाज सोनम मस्कर आणि तिच्या कुटुंबाचा संघर्ष हे याचे ताजे उदाहरण आहे. सोनम आणि तिच्या दोन सहकाऱ्यांनी जपानमधील नागोया येथे होत असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी काल भारताला १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्यपदक मिळवून दिले. मात्र, हा आनंदाचा क्षण पाहण्यासाठी मस्कर कुटुंबाने मोठा संघर्ष केला आहे.
सोनमचे वडील उत्तम मस्कर यांनी मुंबईत सुरू केलेल्या दूध व्यवसायाला कोरोना महामारीच्या काळात मोठा फटका बसला आणि त्यांना पुन्हा गावी परतावे लागले. याच काळात सोनम नेमबाजीत सातत्याने प्रगती करत होती. तिला सरावासाठी महागडी रायफल आवश्यक होती. मुलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मागचा-पुढचा कोणताही विचार न करता उत्तम यांनी गावाकडील जमीन आणि दुकान विकले आणि पाच लाख रुपयांहून अधिक किमतीची रायफल तिला घेऊन दिली.
सोनमनेही अथक मेहनत घेत वडिलांच्या त्यागाचे आणि तिच्यावर त्यांनी ठेवलेल्या विश्वासाचे चीज केले. तिच्या सातत्यपूर्ण कामगिरीची दखल घेत तिला ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्टकडून प्रायोजकत्व मिळाले, तसेच रेल्वेत नोकरीही मिळाली. मात्र, संघर्षाच्या दिवसांत वडिलांनी दिलेले पाठबळ तिच्या प्रवासातील सर्वांत मोठे बळ ठरले.
आशियाई क्रीडा स्पर्धेतील सोनमचे यश पुन्हा एकदा दाखवून देते की गुणवत्ता, मेहनत आणि ध्येय गाठण्याची जिद्द असेल तर खेळाडू कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकतो. त्याचबरोबर आपल्या मुलीच्या स्वप्नांसाठी आई-वडील किती मोठा त्याग करू शकतात, याचीही ही प्रेरणादायी कहाणी आहे.
सोनम, संपूर्ण मस्कर कुटुंब आणि तिच्या प्रशिक्षकांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
#SonamMaskar #JapanAsiad #SilverMedal
महाराष्ट्रातील शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) प्रश्नपत्रिका आग्रा येथील महिम पात्रन प्रायव्हेट लिमिटेडच्या गोपनीय प्रिंटिंग प्रेसच्या दोन कर्मचाऱ्यांनी बुटाच्या तळव्यात लपवून बाहेर नेल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. प्रत्येकी अवघ्या आठ हजार रुपयांसाठी त्यांनी हा गुन्हा केला. ठाणे शहर पोलिसांनी दाखल केलेल्या ३,५०० पानी आरोपपत्रात याचा उल्लेख आहे.
हे अत्यंत धक्कादायक आणि निराशाजनक आहे. प्रकरण उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २८ जून रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली होती खरी; पण सहा लाख उमेदवारांच्या आशा-आकांक्षांची राखरांगोळी केवळ आठ हजार रुपयांसाठी कोणी कशी करू शकतो?
संबंधित परीक्षार्थींनीही ८० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत प्रश्नपत्रिका विकत घेण्याची, आणि आपली शैक्षणिक कागदपत्रे आणि गुणपत्रिका सुरक्षा म्हणून प्रश्नपत्रिका विक्री करणाऱ्यांकडे देण्याची तयारी त्यांनी दर्शवली होती, असे आरोपपत्र सांगते.
हे काय चालले आहे? काही हजार रुपयांसाठी प्रश्नपत्रिका फोडणारे आणि लाखो रुपये मोजून त्या विकत घेण्यास तयार असणारे यांना या गैरप्रकाराचे गांभीर्य का वाटेनासे झाले आहे? महाराष्ट्र राज्य आयोगाच्या औषध निरीक्षकाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका आपल्या पाल्यासाठी खरेदी करण्याचा प्रयत्न एका पालकानेच केल्याचेही समोर आले होते. ही बाब तर अधिकच चिंताजनक आहे.
मेहनत, गुणवत्ता आणि प्रामाणिकपणापेक्षा पैसा आणि गैरमार्ग वरचढ ठरू लागला, तर परीक्षा व्यवस्थेवरील विश्वासच डळमळीत होतो. नव्या पेपरफुटीविरोधी कायद्यामुळे अशा प्रवृत्तींना आळा बसेल, एवढीच आता प्रामाणिक विद्यार्थी आणि पालकांची अपेक्षा आहे.
#Exam #Leak #Chargesheet
एसटी बसमध्ये जागा पक्की करण्यावरून प्रवाशांमध्ये मारामारी झाल्याचे किस्से कानावर येत असतात पण चक्क विमानात हाणामारी होऊन अगदी टी-शर्ट फाटण्यापर्यंत भांडण विकोपाला गेल्याचे कधी ऐकले आहे का?
बिमान बांगलादेश एअरलाईन्सच्या लंडन-ढाका विमानात नुकतेच असे घडले. क्षुल्लक बाचाबाचीपासून सुरू झालेला दोन प्रवाशांमधील वाद हवेत हजारो फूट उंचीवर काही क्षणांत मारामारीपर्यंत पोहोचला. आरडाओरड आणि गोंधळामुळे अन्य प्रवाशांमध्ये, विशेषतः महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये घबराट पसरली. अखेर विमान कर्मचाऱ्यांनी आणि सहप्रवाशांनी मध्यस्थी करून दोघांना वेगळे केले.
विमानात अशी घटना घडणे केवळ संबंधित दोघांसाठी नव्हे, तर शेकडो प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरू शकते. क्षणिक रागासाठी स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात घालण्यात काय अर्थ? आकाशात असताना संयम हाच खरा ‘सेफ्टी बेल्ट’ असायला हवा.
सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. पण पुढच्या वेळी ‘फाईट’ऐवजी ‘फ्लाइट’ शांतपणे पार पडू द्या, असेच या भांडखोर प्रवाशांना सांगावेसे वाटते.
#BimanAir #London #Dhaka
Abhishek Sharma’s 30-ball hundred today was more than a record-breaking assault; it was a statement of where his batting is heading. He attacked from ball one, took on Afghanistan’s spinners without hesitation and, remarkably, accelerated after reaching 50. The 108 off 34 balls, 9 fours and 11 sixes was brutal yet remarkably clean.
Yes, it came against Afghanistan, but even that context should not diminish the quality of the hitting. To dismantle an international attack with such clarity of intent and range is a tremendous feat.
The fastest T20I hundred by an Indian, breaking Rohit Sharma’s 35-ball mark, and the fastest by a batter from a full member nation. Records apart, it was the manner of the innings that stood out. Great knock Abhishek.
@IamAbhiSharma4
#AbhishekSharma #INDvsAFG