कश्यासाठी काय आवश्यक आहे -
1. स्वप्ने (Dreams) → सातत्य (Consistency)
स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सातत्य आवश्यक असते.
2. यश (Success) → शिस्त (Discipline)
यश मिळवण्यासाठी शिस्त आवश्यक असते.
3. प्रेरणा (Motivation) → ध्येय / उद्देश (Purpose)
खरी प्रेरणा स्पष्ट ध्येयातून येते.
4. विजय (Win) → नियोजन (Planning)
जिंकण्यासाठी योग्य नियोजन आवश्यक असते.
5. प्रतिभा (Talent) → सराव (Practice)
प्रतिभेला धार चढवण्यासाठी सतत सराव आवश्यक असतो.
6. आत्मविश्वास (Confidence) → भीती (Fear)
भीतीवर मात केल्याने आत्मविश्वास निर्माण होतो.
7. विकास / प्रगती (Growth) → अस्वस्थता / कम्फर्ट झोनच्या बाहेर जाणे (Uncomfortable)
प्रगती नेहमी कम्फर्ट झोनच्या बाहेर होते.
म्हणजेच -
सातत्यातून स्वप्ने साकार होतात,
शिस्तीतून यश मिळते,
ध्येयातून प्रेरणा मिळते,
नियोजनातून विजय मिळतो,
सरावातून प्रतिभा खुलते,
भीतीवर मात केल्याने आत्मविश्वास वाढतो,
आणि अस्वस्थतेला सामोरे गेल्यावरच खरी प्रगती होते.
डॉ प्रशांत भामरे
प्रत्येकाच्या आयुष्याचा प्रवास चालूच असतो. संकटे, सुख, दुःख एका पाठोपाठ येत-जात असतातच पण त्या कठीण प्रसंगांना तोंड देण्यासाठी प्रेरणा आणि ताकद देणारं एकमेव ऊर्जा स्त्रोत म्हणजे शिव छत्रपती 🧡
#शिवबा 🚩
ज्या वयात "आपल्याला कुणीही फुकट देणार नाही अन आपला खरच कोणी गॉडफादर नाही" याची स्पष्ट जाणीव होते तिथून पुढे आपण खरे प्रौढ बनतो.
हे फक्त ऐकायला खूप चांगलं वाटतं की माणूस मनाने श्रीमंत असावा, ही सगळी अंधश्रद्धा आहे रे, या कलियुगात जगायला पैसा लागतो, पैसा असेल तरच तुम्हाला किंमत आहे नाहीतर तुम्ही समाजासाठी फक्त एक झोबीं/zombie आहात. त्यामुळे दाबून पैसे कमवा- वाटेल तिथे फिरा- बिनधास्त रहा- चांगलं जगा आणि घर सांभाळा.
जेव्हा आपण कमवते होतो तेव्हा जबाबदारी- पैसा- नम्रता- माणुसकी- व्यवहारज्ञान हे आपसूकच कळत जातं.
बांडगूळ किंवा झोंबी होण्यापेक्षा स्वतःच्या अस्तित्वाचीही जाणीव महत्त्वाची आहे. #गब्बर_बोले
आदर्श घ्यावा तर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा,
-२८व्या वर्षी विधवा.
-पती, मुलगा, मुलगी सगळं हरपलं पण त्या खचल्या नाहीत.
- ३० वर्षे आदर्श राज्य कारभार.
-१२ ज्योतिर्लिंग उद्धरक.
-१५०+ मंदिरे स्व खर्चाने बांधली.
- जगाने दिलं नाव - "Philosopher Queen"
त्यांच्या ४ शिकवणी-
१-शिक्षण सोडू नका
२-दुखात कोसळू नका
3‐स्वाभिमान कधी गमावू नका
४-सेवाच सर्वोच्च पूजा
एक बूढ़ा आदमी सड़क किनारे तरबूज़ बेच रहा था !
उसके बोर्ड पर लिखा था:
1 तरबूज़ = ₹30
3 तरबूज़ = ₹100
एक जवान लड़का वहाँ रुका और एक तरबूज़ खरीदा !
“₹30 होंगे,” बूढ़े आदमी ने कहा !
फिर उस लड़के ने दूसरा तरबूज़ खरीदा !
और फिर तीसरा भी !
हर बार ₹30 देकर लड़का अपने तरबूज़ उठाकर जाने लगा !
फिर वो मुस्कुराते हुए पीछे मुड़ा और बोला:
“अरे बूढ़े आदमी, तुम्हें पता है मैंने 3 तरबूज़ सिर्फ़ ₹90 में ले लिए, ₹100 में नहीं ! शायद बिज़नेस तुम्हारे बस की बात नहीं है!”
बूढ़ा आदमी मुस्कुराया और सिर हिलाते हुए बोला:
“अजीब बात है… हर बार लोग यहाँ आते हैं, एक की जगह 3 तरबूज़ खरीदते हैं…
और फिर मुझे ही बिज़नेस सिखाने लगते हैं!”
खुद को बेवकूफ़ दिखाकर, सामने वाले बेवकूफ़ को बेवकूफ़ बनाने की मार्केटिंग तकनीक...आख़िर में जीत हमेशा बूढ़े आदमी या दुकानदार की ही होती है !
डिसिप्लिन म्हणजे मनाविरुद्ध जाणे!
मन म्हणते आराम करूया पण आपण काम करत राहणे.
मन म्हणते सोडून देऊ या पण आपण टिच्चून काम चालू ठेवणे.
मन म्हणते उद्या/ नंतर करू पण आपण आत्ताच सुरू करायचे.
ही अशी शक्ती आहे जी अशक्याला शक्य करून टाकते.
डिसिप्लिन म्हणजे आपले मन म्हणजे आपण नव्हे हे लक्षात घेणे, अनुभवातून शिकत जाणे.
आपले मन म्हणजे मी नव्हे.
.मनात आलेला प्रत्येक विचार अंमलात आणणे माझ्यावर बंधनकारक नाही हे शिकणे, आत्मसात करणे यात ताकदवान होण्याचे रहस्य आहे.
आपण मनाप्रमाणे नाही तर मनाला आपल्याप्रमाणे करायला भाग पाडणे ही खरी साधना आहे.
तीन सोपे मंत्र/ हॅक्स
१) दररोज सकाळी उठल्यावर शक्य ते मेडिटीशन नक्की करणे त्यामुळे मनावर आणि विचारांवर अधिक ताबा मिळत जातो.
२) प्रत्येक क्षणी आपल्या नियंत्रणातील आणि नियंत्रणाबाहेर असलेल्या बाबी असे त्वरित वर्गीकरण करण्याची सवय आणि फक्त नियंत्रणातील बाबींवर वेळ, ऊर्जा खर्च करत इतर दुर्लक्षित करणे. त्वरित आपली कार्यक्षमता व उत्पादकता वाढायला सुरुवात होते.
३) रात्री झोपण्यापूर्वी आज अशी कोणती एक बाब आहे जी आपण करायला हवी होती पण केली नाही व का? हे लिहून काढणे आपले बेरिअर्स आपण नकळत तोडायला सुरुवात करतो. आपल्याला थांबणाऱ्या, अडथळा आणणाऱ्या बाबी कमीकमी होत जातात.
फक्त ३ आठवडे न चुकता करून पहा.
डॉ प्रशांत भामरे.
आपला समाज “स्टेटस-पोस्ट-फोटो-रील्स” ह्यांच्या २४ तासाच्या चक्रव्युव्हात अडकलेलला अभिमन्यू झालाय असं दिसतंय..
थांबून विचार आणि कृती करण्याची हीच ती वेळ आहे !🎯