यंदाची राज्यसेवा परीक्षा #objective पद्धतीची शेवटची परीक्षा असल्याने यंदाच्या परीक्षेत सर्वच ३५ संवार्गांचा समावेश करून dysp, तहसीलदार यासारख्या सर्वच पदांची मोठी जाहिरात असावी, तसेच #combine परीक्षेची जाहिरात भरघोस पदांसह लवकरात लवकर म्हणजे आचारसंहितेच्या अगोदर काढावी, या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत.
विद्यार्थी सरकारकडे यासंदर्भात वारंवार पाठपुरावा करत असताना देखील सरकार मात्र हा विषय SERIOUS पणे घेत नाही, सरकारने विद्यार्थ्यांचा अंत न पाहता सकारात्मक विचार करून निर्णय घ्यावा अन्यथा लवकरच रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mpsc_office
#MPSC | #Rajyaseva |
#StudentsRights |
पुण्यात आंदोलन करणाऱ्या एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. तसेच त्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणारी राज्यसेवा परीक्षा येत्या २५ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. परंतु त्याच दिवशी ‘आयबीपीएस’ची देखील परीक्षा ठेवली आहे. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे दोन्ही परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना यामुळे एका परिक्षेला मुकावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थी विविध माध्यमांतून शासनाकडे यासंदर्भात पाठपुरावा करीत आहेत. परंतु शासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र कृषि सेवा गट अ, ब, आणि ब (कनिष्ठ) संवर्गासाठी दोन-तीन दिवसांत जाहिरात प्रकाशित करण्यात येऊन सदर पदांसाठी ऑक्टोबरमध्ये परिक्षा घेण्यासंदर्भातील ट्विट केले आहे. जर हि परिक्षा ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येणार असेल तर कृषी विभागाची पदे राज्यसेवा परीक्षेमध्ये समाविष्ट करून ऑक्टोबर मध्ये एकत्रित सर्वसामवेशक राज्यसेवा परिक्षा घेता येणे शक्य आहे, व तेच तांत्रिकदृष्ट्या योग्य राहील असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. असे केल्यास विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षा देता येतील. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गेल्या वर्षी प्रसिद्ध केलेल्या राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा योजनेचा संदर्भ घेतला तर त्यांचे हे म्हणणे बरोबर देखील आहे. तरी मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की, या विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त असून कृपया त्यांची दखल घ्यावी आणि त्यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला योग्य ते निर्देश देऊन तातडीने त्यासंदर्भातील परिपत्रक जाहिर करावे. अशी मागणी केली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
@CMOMaharashtra@mpsc_office
केंद्र आणि राज्य सरकार युवकांचा विचार अजिबात करत नाही, हे पुन्हा एकदा दिसून आलंय. MPSC आणि IBPS च्या परीक्षा पुन्हा एकदा एकाच दिवशी होणार आहेत, ज्यामुळे लाखो विद्यार्थी परीक्षेला मुकण्याची शक्यता आहे. २५ ऑगस्टला IBPS ने देशपातळीवरील परीक्षा आयोजित केलेल्या असताना त्याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही आपल्या दोन महत्त्वाच्या परीक्षा आयोजित केल्यात. दोन्ही परीक्षा देऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांवर हा अन्याय आहे.
राज्यातल्या राजवटीने विद्यार्थ्यांचा विचार करून राज्यसेवा आयोगाची परीक्षा तातडीने पुढे ढकलायला हवी.
मुळात वारंवार असं घडत असेल तर केंद्राशी योग्य संवाद आणि समन्वय हवा.
विद्यार्थ्यांबाबत असंवेदनशील राहून चालणार नाही, हे ह्या राजवटीला समजायला हवं!
पुण्यात #mpsc विद्यार्थी आंदोलनासाठी बसलेले पहाटे ४ वाजताचे हे फोटो आहेत !
देशातील इतर राज्यांतील विद्यार्थी IBPS परीक्षेची तयारी करत आहेत, पण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना MPSC च्या आडमुठेपणामुळे परीक्षा देण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले आहे.
हा मुद्दा अहंकाराचा नाही, तर तरुणांच्या भविष्याचा आहे!
राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करून MPSC ला परीक्षेच्या तारखेत बदल करण्याच्या सूचनांची मागणी करावी आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, ही आमची विनंती आहे.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@NANA_PATOLE #MPSC #pune #maharahstra
नागरी सेवा पूर्व परीक्षा (राज्यसेवा परीक्षा) 2024 व IBPS CLERK परीक्षा एकाच दिवशी म्हणजे 25 ऑगस्ट 2024 रोजी होणार आहे.
दोन्ही परीक्षा एकाच दिवशी होत असल्यामुळे दोन्ही फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे.
विद्यार्थी २ आठवड्यापासून ही मागणी लावून सरकारकडे पाठपुरावा करत आहे. आम्ही सुद्धा याबाबत सरकारकडे मागणी केली होती.
याबाबत वारंवार मागणी करून देखील एमपीएससी कडून प्रतिसाद तर नाहीच उलट परीक्षांच्या तारखा तश्याच राहतील हे सांगण्यात येत आहे.
काल रात्रभर विद्यार्थ्यांना आंदोलन सुरू ठेवावे लागले. ४ दिवसांवर येऊन ठेपलेल्या परीक्षेच्या पूर्वी विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यात वेळ जात आहे.
आयोगाची हट्टी भूमिका विद्यार्थ्यांना मारक आहे.
#स्पर्धा_परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या संपर्कात असून सकाळीच आयोगाच्या सचिवांशी बोललो आहे.#कृषीच्या 258 जागांचा समावेश करून राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलावी,जागांमध्ये भरीव वाढ करून नव्याने सुधारित अधिकच्या जागांची दोन दिवसात जाहिरात काढावी तसेच भविष्यात #IBPS परीक्षा आणि आयोगाच्या परीक्षा एकच दिवशी येणार नाहीत यासाठी IBPS सोबत संपर्कात राहण्याची आयोगाला विनंती केली आहे.आचारसंहिता ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात लागणार असल्याने त्यापूर्वी परीक्षा पार पडतील असे नियोजन केल्यास विद्यार्थ्यांचा प्रश्न निकाली निघू शकतो ही बाब देखील आयोगाच्या लक्षात आणून दिली.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नात राजकारण करत नाही, परंतु विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करून पुढील दोन तासात विद्यार्थ्यांना अपेक्षित असा निर्णय न झाल्यास, मी मात्र विद्यार्थ्यांच्या सोबत आंदोलनाला बसेल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
@mieknathshinde@mpsc_office
#mpsc
प्रत्येक गोष्टींमध्ये आंदोलन केल्याशिवाय न्यायच मिळणार नसेल तर हे कुचकामी सरकार लोकांसाठी काम करत नाही, हा सरळसरळ अर्थ आहे. MPSC चे विद्यार्थी रात्रीपासून आंदोलनाला बसले आहेत पण हे ढिम्म सरकार आता विद्यार्थ्यांचा अंत पाहत आहे. कृषि विभागाच्या २५८ राजपत्रित जागा राज्यसेवा पूर्व परिक्षा २५ ऑगस्ट २०२४ च्या पदभरतीमध्ये त्वरित समाविष्ट करायला हव्यात. राज्यसेवा & IBPS क्लर्क परिक्षांच्या तारखेवर तोडगा काढायला हवा. परीक्षा तोंडावर असताना सरकारने वारंवार आंदोलन करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आणू नये. विद्यार्थांच्या हिताचा निर्णय सरकारने लवकर घ्यावा, ही विनंती!
@NCPspeaks@PawarSpeaks@Jayant_R_Patil@supriya_sule@RRPSpeaks@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mpsc_office@Mpsc_Andolan
#MPSC #Pune #Beed #बीड #competativeexams
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणारी राज्यसेवा परीक्षा येत्या २५ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. परंतु त्याच दिवशी ‘आयबीपीएस’ची देखील परीक्षा ठेवली आहे. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे अनेक उमेदवारांना कोणत्या तरी एका परीक्षेवर पाणी सोडावे लागणार आहे. वर्षानुवर्षे दोन्ही परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांवर हे अन्याय केल्यासारखे होईल. यासंदर्भात गेली काही दिवसांपासून हे सर्वजण विविध माध्यमांतून शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. परंतु शासनाने त्यांच्याकडे योग्य ते लक्ष दिलेले नाही. यामुळे हे सर्व विद्यार्थी काल रात्रीपासून पुण्यात आंदोलन करीत आहेत. त्यातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र कृषि सेवा गट अ, ब, आणि ब (कनिष्ठ) संवर्गासाठी दोन-तीन दिवसांत जाहिरात प्रकाशित करण्यात येऊन सदर पदांसाठी ऑक्टोबरमध्ये परिक्षा घेण्यासंदर्भातील ट्विट केले आहे. जर हि परिक्षा ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येणार असेल तर कृषी विभागाची पदे राज्यसेवा परीक्षेमध्ये समाविष्ट करून ऑक्टोबर मध्ये एकत्रित सर्वसामवेशक राज्यसेवा परिक्षा घेता येणे शक्य आहे, व तेच तांत्रिकदृष्ट्या योग्य राहील असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. असे केल्यास विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षा देता येतील. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गेल्या वर्षी प्रसिद्ध केलेल्या राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा योजनेचा संदर्भ घेतला तर त्यांचे हे म्हणणे बरोबर देखील आहे. तरी मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की, या विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त असून कृपया त्यांची दखल घ्यावी आणि त्यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला योग्य ते निर्देश देऊन तातडीने त्यासंदर्भातील परिपत्रक जाहिर करावे.
@CMOMaharashtra@mpsc_office
मा. @mieknathshinde साहेब
शेवटी रस्त्यावर उतरावे लागलंच
🔶गेले कित्येक महिने लाखो बेरोजगारांच्या मागण्या आपल्याकडे नम्रपणे मांडत होतो,पण झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला त्यात काडीचा रस नव्हता.
गेल्या 16 तासापासून #MPSC उमेदवारांच्या मनातील तीव्र असंतोष,रोष आपण
अहिल्यादेवी अभ्यासिका समोर,पुणे येथे पाहिला असेलच.
आज काय तो
एकदाचा सोक्षमोक्ष झालाच पाहिजे.
प्रमुख मागण्या
🔶1. IBPS & MPSC exam dates overlapping issue
25 august
🔶 2. #MPSC कृषी च्या 258 जागा
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित 2024 मध्येच तात्काळ समाविष्ट करण्यात याव्यात
🔶3. #MPSC च्या जुन्या पॅटर्ननुसार होणाऱ्या शेवटच्या राज्यसेवा परीक्षेत सर्व 35 संवर्ग किमान 1500 जागांचे
सर्वसमावेशक मागणीपत्रक तात्काळ
पाठवण्यात यावे.
उपजिल्हाधिकारी,
पोलीस उपाधीक्षक,मुख्याधिकारी सह सर्व महत्वाच्या संवर्गाचा समावेश करण्यात यावा.
गेल्या 9 महिन्यापासून हे उमेदवार विनवण्या करत आहेत,पण आपण त्यांच्यावर अक्षरशः सूड उगवत आहात.
🔶4. #MPSC ची संयुक्त अराजपत्रित
गट-ब् व गट -क जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करण्यात यावी.
फेब्रुवारी त नियोजित असणारी जाहिरात ऑगस्ट संपत आला तरी प्रसिद्ध झाली नाही.
@maha_governor@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mpsc_office@Drsuvarnas@ssaunik@NANA_PATOLE@dhananjay_munde
@AbhiPawarBJP पोलीस उपनिरीक्षक-2021 ची जाहिरात येऊन जवळपास 3.5 वर्ष झाली आहेत,सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असूनही उमेदवारांना नियुक्ती दिलेली नाही,मा.शासनाने उमेदवारांना आचारसहिंते अगोदर लवकरात लवकर नियुक्ती देऊन उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AbhiPawarBJP
2024 शेवटची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाची परीक्षा आहे...
पोरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे...
राज्यसेवा जागा वाढण्यासाठी टोकाचे प्रयत्न करून उमेदवारांना न्याय मिळाला पाहिजे.
बळीराजाच्या लेकरांसाठी अखेर बळीराम मैदानात उतरलाच...
सर आम्ही तुमच्यासोबत आहोत कोणत्याही परिस्थितीत कृषी विभागातील 258 जागा आल्याच पाहिजेत.
तूम्ही म्हणाल ते धोरण आणि बांधाल ते तोरण..!
@BaliramDoleyINC शेवटची आशा आहे...
बळीराजाच्या लेकरांसाठी अखेर बळीराम मैदानात उतरलाच...
सर आम्ही तुमच्यासोबत आहोत कोणत्याही परिस्थितीत कृषी विभागातील 258 जागा आल्याच पाहिजेत.
तूम्ही म्हणाल ते धोरण आणि तुम्ही बांधाल ते तोरण..!
@BaliramDoleyINC 🔥🔥🔥
कृषीच्या 258 जागा राज्यसेवा जागा वाढीला मारक ठरणार असतील,
राज्यसेवा उमेदवारांनी 258 जागा याच परीक्षेत समाविष्ट होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
उद्या नियम आणि तांत्रीक बाबतीत तुमची कोणीच मदत करु शकत नाही.
तारखांचा घोळ आणि उमेदवारांच्या आयुष्याचा खेळ...
MPSC आणि IBPS क्लर्क आणि यांचा काहीही संबंध नाही सांगणाऱ्या लोकांची दया येते.
जसे काय राज्यसेवा देणारा प्रत्येक उमेदवार क्लास वन अधिकारीच होणार आहे.
सव्वा दोन लाखापैकी 10-15 हजार मुख्य परीक्षा देतील बाकी लोकांना आपल्या पोटा पाण्यासाठी बाकी परीक्षा द्याव्याच लागतील याचा कोणीच विचार करत नाही.
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@CMOMaharashtra