ज्यांचं दुसरे राज्य आहे ज्यांची मातृभाषा मराठी नाही ते परप्रांतीयच..
मराठीला विरोध करणाऱ्यांचा माज आणि मुजोरी मोडून काढा
मराठी एकीकरण समिती अध्यक्ष गोवर्धन देशमुख news१८ मराठी वाहिनीवरील बडे मुद्दे कार्यक्रमात सहभागी होऊन रोखठोक भूमिका मांडली
महाराष्ट्रात राहायचं, महाराष्ट्रात व्यवसाय करायचा, आणि इथल्या राजभाषेशीच फारकत घ्यायची हे किती दिवस चालणार?
२० ऑगस्टपासून राज्यातील रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीचे व्यावहारिक ज्ञान असणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही काही नवी किंवा अवाजवी मागणी नाही जो प्रवासी रोज लाखोंच्या संख्येने रिक्षा-टॅक्सीतून प्रवास करतो, त्याच्याशी संवाद साधता येईल इतकी मराठी येणं ही किमान अपेक्षा आहे, अन्याय नाही.
ही सक्ती अचानक लादलेली नाही पुरेशी संधी देऊनच याची अंमलबजावणी होते आहे.
ज्या राज्याची भाषा मराठी आहे, तिथेच मराठी शिकायला विरोध करणे हे भाषिक आत्मसन्मानाला दिलेलं आव्हान आहे.
तुम्हाला आमची खाद्यसंस्कृती, राहणीमान किंवा विचार पटत नसतील, ठीक आहे.पण आम्ही याच मातीत जन्मलोय. आमचं अस्तित्वच तुम्हाला खटकत असेल, तर आम्ही जायचं तरी कुठे?
आम्ही तुमच्या प्रांतात येऊन तुमच्यावर आमच्या पद्धती लादत नाही. मग तुम्हीही आमच्या मातीत राहून आम्हाला कसं जगायचं हे शिकवू नका.
सहअस्तित्व जमत नसेल, तर दोष आमच्या अस्तित्वाचा नाही, तुमच्या विचारांचा आहे.
'एक'अधिकारी कदाचित ऑफिस मध्ये कमी आणि स्टुडिओ - सभागृहात आणि स्वतःच्या पुस्तक प्रदर्शनातच जास्त दिसतोय बहुदा.
अपेक्षित असलेल्या प्रामाणिकपणाचा PR फक्त आपल्याच इथे होत असावा - हाय रे दुर्दैव !