देशाच्या सुरक्षेसाठी आयुष्य वेचणाऱ्या देशभक्त मा.अजित डोवाल यांचा अपमान करणे म्हणजे बालिशपणा आहे!
इंदूर येथील विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा मी जाहीर आणि ठाम निषेध करतो.
अजित डोवाल यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. वयाच्या ८१व्या वर्षीही देशसेवेसाठी कार्यरत असलेल्या अशा व्यक्तीबद्दल अवमानकारक वक्तव्य करणे ही गंभीर बाब आहे.
राजकीय मतभेद असू शकतात. सरकारवर टीका करण्याचा अधिकारही प्रत्येकाला आहे. मात्र देशाच्या सुरक्षेशी संबंधित व्यक्तींविषयी बोलताना तथ्य, पुरावे आणि जबाबदारीचे भान ठेवणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांसमोर आयोजित कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून देशाच्या सुरक्षेशी संबंधित वरिष्ठ व्यक्तीवर अशा प्रकारे वक्तव्य करणे हे निश्चितच योग्य नाही.
देशासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या राष्ट्रसेवकांचा सन्मान करणे ही आपली जबाबदारी आहे; त्यांच्या कार्याची अवहेलना करणे हा राजकीय मतभेद व्यक्त करण्याचा मार्ग असू शकत नाही.
अजित डोवाल यांच्या देशसेवेबद्दल माझ्या मनात आदर आहे आणि त्यांच्या संदर्भातील या वक्तव्याचा मी ठामपणे निषेध करतो.
🇮🇳 देश प्रथम. देशाची सुरक्षा सर्वोच्च.
— डॉ. उदय सामंत
@PMOIndia@PIBHomeAffairs@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde