पाकिस्तानला आपल्या देशाच्या मिसाईल प्रणाली विषयी संवेदनशील माहिती पुरविणारा हाच तो DRDO चा शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर, हे महाशय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक होते, पण संघाची अधिकृत भूमिका “त्यांचा आमच्याशी संबंध नाही” अशी आहे. तर खाली दिलेला व्हिडिओ बघा. 👇
||श्रीराम जयराम जयजयराम|| या १३ अक्षरी नामजपामुळे सर्व विघ्नांचा नाश होऊन, अवघ्या आयुष्याचे कल्याण होते अशी आपल्या अध्यात्माची शिकवण आहे. आज आपल्या भारतावरही लुटारूंचे विघ्न आलेले आहे. या चोरांनी सामान्य जनतेलाच काय तर रामप्रभूंच्या दानपेटीलाही सोडले नाही. या विघ्नाचा बंदोबस्त व्हावा आणि सर्व भारतीयांचे कल्याण व्हावे म्हणून १३ चरणांचा हा अभंग मी रामरायाला अर्पण करतो.
#JaiShriRam #AyodhyaRamMandir #incmaharashtra @INCMaharashtra #TempleTHeft #SanatanDharma
पुन्हा एकदा आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विश्वास नांगरे पाटील यांना तेच ६ प्रश्न विचारतोय... हिंमत असेल तर संविधानिक उत्तरे द्यावीत, उडवाउडवीची उत्तरे देऊ नयेत…नाही तर सिद्ध होईल की तुम्ही लोकशाही नाही, 'पेशवाई सरकार' चालवता आहात!
❓ पहिला प्रश्न- सरकारची पूर्वपरवानगी होती की मर्जी?
All India Services (Conduct) Rules, 1968 मधील Rule 13(2)(f)(iii) नुसार एखाद्या आयपीएस अधिकाऱ्याला खाजगी माध्यम, व्हिडिओ किंवा तत्सम कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सरकारची पूर्वपरवानगी आवश्यक असते.
* आमचा थेट सवाल आहे: विश्वास नांगरे पाटील यांनी उपस्थित राहिलेल्या या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र गृह विभागाची किंवा राज्य सरकारची पूर्वपरवानगी घेतली होती का ?
* परवानगी घेतली होती तर ती कोणत्या नियमांतर्गत देण्यात आली, त्याची प्रत सरकार सार्वजनिक करणार का?
* आणि जर परवानगी घेतली नव्हती, तर 'ऑल इंडिया सर्व्हिसेस रुल'च्या या उघड उल्लंघनाबद्दल गृहखातं आणि सरकार या अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार?
❓ दुसरा प्रश्न- Rule 3(1) ची पायमल्ली का केली?
All India Services (Conduct) Rules, 1968 मधील Rule 3(1) स्पष्ट सांगतो की, अधिकाऱ्याने असे कोणतेही वर्तन करू नये जे त्याच्या पदाच्या प्रतिष्ठेला आणि सचोटीला शोभणारे नाही.
* एका विशिष्ट वैचारिक संघटनेच्या मंचावर जाऊन, त्या विचारसरणीचे सार्वजनिक उदात्तीकरण करणे हे एखाद्या सामान्य नागरिकाला शोभेल; पण सेवेतील जबाबदार आयपीएस अधिकाऱ्याला शोभते का?
* पोलीस दलातील अधिकारी हा कायद्याचा रक्षक असतो, कुठल्या विचारधारेचा प्रचारक नाही, याचे भान विसरले गेले आहे का?
❓ तिसरा प्रश्न - Political Neutrality की Political Loyalty?
नियम 3(1A)(ii) स्पष्ट शब्दांत सांगतो:
"Every member of the Service shall maintain political neutrality."
(राजकीय तटस्थता हाच आयपीएस सेवेचा आत्मा आहे.)
* मग प्रश्न असा की, संघाच्या मंचावर जाऊन त्यांच्या विचारसरणीचे जाहीर कौतुक करणे ही 'तटस्थता' आहे की एका विशिष्ट राजकीय-वैचारिक प्रवाहाशी आपली सार्वजनिक निष्ठा (Political Loyalty) व्यक्त करणे आहे?
* जर उद्या एखादा दुसरा वरिष्ठ पोलीस अधिकारी दुसऱ्या कुठल्या धार्मिक किंवा राजकीय संघटनेच्या मंचावर जाऊन त्यांचेही असेच गुणगान करू लागला, तर त्यालाही हेच सरकार पाठीशी घालणार का? मग प्रशासनावर जनतेचा विश्वास कसा टिकणार?
❓ चौथा प्रश्न - संविधान सर्वोच्च की संघ विचार?
नियम 3(2B)(ii) प्रत्येक सनदी अधिकाऱ्याला संविधानाच्या सर्वोच्चत्वाशी आणि मूल्यांशी बांधील ठेवतो. भारतीय संविधान कोणत्याही एका धर्माचे, जातीचे किंवा विचारधारेचे नाही; ते देशातील प्रत्येक नागरिकाचे आहे.
मग एका संविधानिक पदावर बसलेल्या अधिकाऱ्याने, एका विशिष्ट वैचारिक आणि वादग्रस्त संघटनेच्या मंचावर जाऊन तिचे जाहीर गुणगान करणे ही संविधानिक तटस्थता कशी असू शकते? हा थेट संविधानाचा अवमान नाही का?
❓ पाचवा प्रश्न - Rule 3(2B)(vi) : "प्रभावाखाली जाण्याची शंका"
हा नियम अधिकाऱ्याला कोणत्याही अशा संघटना किंवा व्यक्तीच्या प्रभावाखाली जाण्यापासून रोखतो, ज्यामुळे त्याच्या अधिकृत कर्तव्यांवर आणि निष्पक्षतेवर परिणाम होऊ शकतो.
आज महाराष्ट्रातील लाखो नागरिक आणि पीडित जनता विचारत आहे, जो अधिकारी सार्वजनिकपणे एका विशिष्ट विचारधारात्मक संघटनेच्या मंचावरून गौरवोद्गार काढतो, उद्या कायदा-सुव्यवस्थेचे निर्णय घेताना त्याच्यावर त्या विचारधारेचा प्रभाव पडणार नाही, याची खात्री महाराष्ट्राला कोण देणार? मुख्यमंत्री की स्वतः अधिकारी?
❓ सहावा प्रश्न - हा सर्वात गंभीर आणि कायदेशीर प्रश्न!
नियम 5(1) स्पष्टपणे सांगतो:
"No member of the Service shall be associated with any organisation which takes part in politics."
(सेवेतील कोणताही अधिकारी राजकारणात भाग घेणाऱ्या कोणत्याही संघटनेशी संबंधित असणार नाही.)
हा नियम केवळ औपचारिक सदस्यत्वापुरता मर्यादित नाही, तर यामध्ये "Associated with" (संबंधित असणे) हा शब्द जाणीवपूर्वक वापरण्यात आला आहे. मग संघाच्या मंचावर जाऊन, त्यांच्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण बनून सार्वजनिकरित्या त्यांचे गुणगान करणे ही थेट "association" (सहानुभूती आणि संबंध) मानली जाणार नाही का? हा थेट सेवा नियमांचा भंग नाही का?
उत्तर द्या मुख्यमंत्री महोदय... कायदा सर्वांसाठी समान आहे की तुमच्या मर्जीतील अधिकाऱ्यांसाठी ऑल इंडिया सर्व्हिसेसचे नियम बाजूला ठेवले जातात? महाराष्ट्राला उडवाउडवीची उत्तरे नकोत, संविधानाच्या चौकटीतली उत्तरे हवी आहेत!
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@vishwasnp
मा. अशोकराव,
ज्या कालखंडाचा आपण निषेध करताय, त्यावेळी आपले वडील कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते स्व. शंकरराव चव्हाण साहेब हे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री व गृहमंत्री ही होते. लोकशाही व संविधान विरोधी कोण आहे, हे सर्व भारतीयांना दिसतच आहे पण संघ-भाजपचा खोटा अजेंडा राबवताना आपल्याच रक्ताशी आपण गद्दारी करत नाही ना, हे ही स्वतःला एकदा विचारून बघा.
@AshokChavan1958
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपचा अंतर्गत कलह आणि जातीय मानसिकता महाराष्ट्रासमोर उघडी पडली!
यूपीएससी-एमपीएससीच्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची चर्चा होण्याऐवजी भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्यात पहिल्या रांगेतील खुर्चीवरून वाद झाला. त्यानंतर "हा मराठा समाजाचा कार्यक्रम आहे" असा आरोप-प्रत्यारोप झाल्याने कार्यक्रमाचे गांभीर्यच संपले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सर्व प्रकार घडत असताना त्यांनी यावर कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नाही. हा भाजपचा "सबका साथ, सबका विकास" आहे की "खुर्चीसाठी भांडा आणि जातीत समाजाला विभागा" हा नवा मंत्र?
यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्याऐवजी भाजपच्या नेत्यांनी स्वतःच्या अहंकाराचा आणि अंतर्गत गटबाजीचा देखावा केला. महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला हे शोभणारे नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर मौन सोडून महाराष्ट्राला उत्तर द्यावे. भाजपमध्ये खुर्ची मोठी की संविधान आणि समानतेची मूल्ये?
संविधानाची आणि खाकी वर्दीची शपथ विसरले,
राग दरबारी गाण्या संघाच्या दारी हजर झाले!
एका बाजूला भारतीय संविधानाची शपथ घेऊन, जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी अंगावर घेणार आणि दुसऱ्या बाजूला दिवसाढवळ्या समाजात द्वेष पसरवणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) जाहीर स्तुती करणार...हे कसले कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी?
शासकीय सेवेत असताना अशा प्रकारे एका विशिष्ट विचारसरणीची आणि द्वेष पसरवणाऱ्या संघटनेची चाटूगिरी करणे म्हणजे लोकशाहीचा आणि संविधानाचा अपमान आहे. पोलिसांचे काम समाजात कायदा व्यवस्था राखणे आहे, की अशा विद्वेष पसरवणाऱ्या संघटनांचे गुणगान गाणे? संघाच्या लोकांनी दंगली घडवल्या हा इतिहास यांना माहिती नाही की काय ?
आता या महाशयांची बदली नागपूरला झाली आहे. बरं झालं, ज्यांची सेवा करायची आहे, आता थेट त्यांच्याच चरणी जाऊन सेवा करण्याची संधी यांना मिळाली आहे. पण लक्षात ठेवा, तुम्ही जनतेच्या पैशावर पगार घेणारे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची शपथ घेतलेले सरकारी नोकर आहात, देशद्रोही संघाचे स्वयंसेवक नाही. वर्दीचा गैरवापर करून जर राजकीय आणि धार्मिक अजेंडा राबवणार असाल, तर नागपुर आणि महाराष्ट्राची संविधानप्रेमी जनता हे खपवून घेणार नाही!
महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, ज्यांनी अख्खं आयुष्य शाहू-फुले-आंबेडकर विचार जपले, जोपासले आणि वाढवले अश्या आदरणीय शरद पवार साहेबांचा पणतू हाफ चड्डी घालून संघाच्या शाखेत जाणार म्हणे.
काहीही कारण असलं तरी ही नशिबाने केलेली क्रूर थट्टाच म्हणावी लागेल…
#साहेब#पुरोगामी_महाराष्ट्र
न्यायाची अपेक्षा ठेवणाऱ्या प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तिसाठी लढणारा देशाचा बुलंद आवाज, जननायक मा. श्री. राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आज देशाच्या राजकारणातील एका अशा निडर लढवय्या नेत्याचा वाढदिवस आहे, ज्याने सत्तेची हाव न धरता केवळ आणि केवळ जनतेच्या हक्कांसाठी आणि देशाच्या लोकशाहीसाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावले आहे. केंद्र सरकारच्या हुकूमशाही प्रवृत्तीविरोधात संसदेपासून रस्त्यापर्यंत शड्डू ठोकून उभा राहिलेल्या, 'नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान' उघडणाऱ्या, जननायक श्री. राहुल गांधी जी यांना महाराष्ट्रातील कॉंग्रेसचा सर्वसमावेशी विचार मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तिच्या वतीने वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
जेव्हा या देशात द्वेषाचे राजकारण शिगेला पोहोचले होते, तेव्हा राहुलजींनी हाती तिरंगा घेऊन 'भारत जोडो यात्रा' सुरू केली आणि कन्याकुमारी ते काश्मीर अशी ४,००० किलोमीटरची ऐतिहासिक पायी यात्रा पूर्ण केली. ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता, पायाला पडलेल्या फोडांना सोसत ते चालत राहिले. त्यांनी जनतेची दुःखे जवळून पाहिली, गरिबांना मिठी मारली, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले आणि तरुणांच्या आकांक्षांना आवाज दिला. 'भारत जोडो न्याय यात्रे'च्या माध्यमातून त्यांनी मणिपूरच्या जळत्या भूमीपासून महाराष्ट्रात मुंबईच्या चैत्यभूमीपर्यंत न्यायाचा आणि संविधानाचा लढा अधिक मजबूत केला.
आज श्री. राहुल गांधी जी हे देशातील 'GenZ' अर्थात नव्या तरुण पिढीच्या हक्कांचे सर्वात मोठे रक्षक बनले आहेत. 'NEET' परीक्षेचा पेपर लीक करून जेव्हा या फॅसिस्ट सरकारने देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा आणि त्यांच्या पालकांच्या कष्टाच्या कमाईचा लिलाव केला, तेव्हा या अन्यायाविरुद्ध राहुलजींनी सर्वात पहिला आवाज उठवला. कोट्यवधी तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या पेपर लीक माफियांच्या विरोधात राहुलजींनी नुकतीच कोटा (राजस्थान) येथून 'छात्रों की गूंज' (Save Education, Save Your Future) या देशव्यापी आंदोलनाची रणशिंगे फुंकली. जेव्हा हे सरकार पेपर लीक रोखण्याच्या नावाखाली टेलिग्रामसारख्या अभ्यासविषयक माध्यमांवर बंदी घालून मूळ चोरांना सोडून विद्यार्थ्यांचाच छळ करत होते, तेव्हा राहुलजींनी "मोदीजी, नौटंकी बंद करा आणि विद्यार्थ्यांवर नव्हे, तर माफियांवर प्रहार करा!" असे ठणकावून सांगत थेट हुकूमशाहीला आव्हान दिले.
आजचे केंद्र सरकार सत्तेच्या बळावर लोकशाही आणि बाबासाहेबांचे संविधान संपवायला निघाले आहे. ED आणि CBI सारख्या सरकारी यंत्रणांचा गैरवापर, संसदेतून बेकायदेशीर निलंबन, खोटे गुन्हे आणि हक्काचे घर हिरावून घेण्यासारखे छळायचे कोणतेही साधन या सरकारने सोडले नाही. परंतु, राहुलजींनी हसतमुखाने "माझे घर संपूर्ण देशातील जनतेच्या हृदयात आहे" असे सांगत सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात डोळे घालून "डरो मत!" हा एकमेव मंत्र दिला. शिक्षण व्यवस्थेला वसुलीचे साधन बनवणाऱ्या या सरकारच्या दडपशाहीविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या प्रत्येक तरुणाच्या आणि विद्यार्थ्याच्या पाठीशी राहुल गांधी एक भक्कम ढाल म्हणून आज उभे राहिले आहेत.
महाराष्ट्राची ही पुरोगामी भूमी संतांची, विचारवंतांची, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वाभिमानाची भूमी आहे. राहुलजी जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या मातीत आले, तेव्हा येथील जनतेने त्यांना आपल्या कुटुंबातील सदस्यासारखे भरभरून प्रेम दिले आहे. राहुलजी, तुम्ही दिलेला 'डरो मत, प्रतिकार करो!' हा मंत्र आज महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या नसानसात भिनला आहे. तुमच्या वाढदिवशी आम्ही हाच संकल्प करतो की, जोपर्यंत देशातील सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही पूर्णपणे संपत नाही आणि देशाच्या संविधानाचे रक्षण होत नाही, तोपर्यंत आम्ही तुमच्या पाठीशी निधड्या छातीने खंबीरपणे उभे राहू. आपल्याला उदंड, निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो, हीच आई भवानी चरणी प्रार्थना!
कोण म्हणतंय १५ कोटी,
कोण २५, तर कोण ८५ कोटी म्हणतंय…
ही बोली लागतेय खासदारांची,
त्यांना मतदान केलेल्या मतदारांची, लोकशाहीची…
यावर मार्ग एकच…प्रतिकार!
श्री. राहूल गांधी यांनी म्हंटल्याप्रमाणे सततचा प्रतिकार!
न थकता, न आराम करता…
प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी…
कुठल्याही तडजोडीशिवाय!
या लोकशाही विरोधी व्यवस्थेविरूद्ध,
जननायक श्री. राहूल गांधी यांच्यासोबत!
हा दुसरा स्वातंत्र्य लढा आहे.
त्यामुळे संघर्षही तेवढाच मोठा असणार आहे…
आणि संघर्ष हाच काँग्रेसचा श्वास आहे,
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात असो,
किंवा देशाच्या निर्मितीत असो,
आणि आता संविधान तसेच लोकशाही रक्षणातही...
#संघर्ष #प्रतिकार #लोकशाही
आदरणीय निखिल सर... रस्त्यांवर उतरून जनतेच्या आणि युवकांच्या हक्कांसाठी लढण्यात भारतीय युवक काँग्रेस नेहमीच अग्रेसर असते.
पुण्यात, कोल्हापुरात आणि आज मुंबईत युवक काँग्रेसने नीट, CBSE घोटाळ्या प्रकरणी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जोरदार आंदोलन केले.
अशीच आंदोलने या आधीही देशभर आणि सबंध महाराष्ट्रात झालेली आहेत, यापुढेही होतील.
आपली साथ या पुढेतरी मिळावी, जेणेकरून आमच्या आंदोलनांचा "इम्पॅक्ट" वाढेल, अशी मनोकामना..!
@waglenikhil
.@waglenikhil सर ११ मे ला NEET पेपरफुटीची बातमी आली आणि लगेच १२ तारखेला दिल्लीतील NTA कार्यालयाबाहेर NSUI चे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद जाखड (@VinodJakharIN) यांच्या नेतृत्वात जोरदार आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर आजतागायत राजस्थान, छत्तीसगढ़, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, दिल्ली, आंध्रप्रदेश, तामीलनाडू, महाराष्ट्र, गुजरात, हिमाचल, कर्नाटक, पंजाब, उत्तराखंड, हरियाणा, ओडिसा यांसह देशातील प्रत्येक राज्यात, प्रत्येक शहरांत NSUI रस्तांवर उतरून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची लढाई लढत आहे.
ही लढाई अजूनही संपलेली नाही. पेपरफुटीचा सरदार धर्मेंद्र प्रधान याचा राजीनामा घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांचा हा लढा थांबणार नाही. येत्या 5 तारखेला अमरावतीत ही आपण NSUI चे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद जाखड यांच्या नेतृत्वात आंदोलन करणार आहोत, तुम्ही ही नक्की या!
This is so funny, I couldn't stop laughing 😂😂
🇮🇳 Indian police will now catch thieves and criminals using bicycles.
MODI Hai To pumpkin Hai 🤡
📍 Jaipur Rajasthan
#FitnessTips
शिवाजी कोण होता ? या पुस्तकाच्या जाहीर ऑनलाईन वाचनाच्या X (ट्विटर) स्पेसला श्रोत्यांनी उदंड प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्वांचे मनःपुर्वक आभार.
पुस्तक वाचनाचा दुसरा भाग आपण उद्या करणार आहोत, त्यालाही आपण आजप्रमाणेच प्रतिसाद द्याल ही अपेक्षा!