धर्माचं राजकारण करणाऱ्या आणि खऱ्या हिंदुत्वाचा वारसा पुढे नेण्याची दवंडी पिटवणाऱ्या पक्षांच्या दहीहंडी या देवाच्या सणामध्ये बायका आणून अश्लिल नृत्य सादर केली जात आहेत ( अनेक वर्ष चाललंय हे)
विरुद्ध
ज्यांना हिंदूविरोधी, तुष्टीकरण करणारे म्हणून हिणवलं जातं त्यांच्याकडून सण कसा साजरा केला जातोय ते पाहा!
आम्हाला हे नियोजन हवंय.. आम्हाला असा महाराष्ट्र हवाय... आम्हाला आमच्या राजाने दिलेली शिकवणीवर जो पाऊल टाकेल असा नेता हवाय... दहीहंडीला अश्लील डान्स करणाऱ्या बायका नाचवणाऱ्यांनी एकदा डोळे उघडे ठेऊन बघावं हे सारं...! ❣️🔥
#जय_महाराष्ट्र
I have never thought that I will see this change ever since last 12 years 😳- धन्यवाद मुंबईकर , @mnsadhikrut ,@Awhadspeaks हे दृष्य जीवंत केल्याबद्दल, हे चित्र फ़ार आश्वासक आहें महाराष्ट्रासाठी, देशासाठी
@INCMaharashtra
जय जय महाराष्ट्र माझा 💪 🇮🇳 जय हिंद
#Mumbai ❤️
आधारवड हरपला..!
माझे वडील, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दादा) यांचे आज 4 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजून 8 मिनिटांनी वयाच्या 91व्या वर्षी निधन झाले.
त्यांच्या जाण्याने आम्हा सर्वांच्या आयुष्यातील आधारवड हरपला आहे. दादांनी आयुष्यभर माणसं जोडली, शिक्षणाचा दीप लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात प्रज्वलित केला, समाजसेवेला आपल्या जीवनाचे ध्येय मानले. आमच्यावर माणूस म्हणून जगण्याचे संस्कार दिले. त्यांचा प्रेमळ मायेचा हात, धीर देणारे शब्द आणि मूल्यांसाठी जगण्याची शिकवण हीच आमची कायमची संपत्ती आहे...ह्या भावना शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे.
बुधवार, दिनांक 5 ऑगस्ट रोजी अंत्यदर्शन आणि अंत्यसंस्कार होतील.
अंत्यदर्शन :
सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत यशवंत निवास ,कसबा बावडा येथे
अंत्ययात्रा :
सायंकाळी 4 वाजता, यशवंत निवास कसबा बावडा येथून सुरू होईल.
अंत्यसंस्कार :
सायंकाळी 5 वाजता डी. वाय.पाटील मेडिकल कॉलेज, लाईन बाजार, कसबा बावडा, कोल्हापूर येथे होणार आहेत.
As the Women in Blue begin their T20 World Cup journey, Apollo Tyres stands behind their courage, their belief and every mile that brought them here.
This is more than support for a team; it is a salute to the rise of women’s cricket in India, and to every girl who now knows the game belongs to her too
Kyunki Har Safar Mein Dum Hai
Nostalgic 😊Fond memories 😌
I had not preserved such beautiful moments . Thank you friends and well wishers for sharing this one . I shall cherish it forever
#wonder#memories#Pune#maharashtra#TukaramMundhe#IAS
He achieved escape velocity from his modest beginnings…
But never abandoned the orbit he escaped from.
I will connect & support his project 30303
#MondayMotivation
माझे मित्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला.
अजित पवार यांचा आणि माझा राजकारणातला प्रवेश हा काहीसा एकाच काळातील, अर्थात आमचा परिचय हा बराच नंतरचा. पण राजकारणावर कमालीचं प्रेम या एका गुणावर अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी झेप घेतली. अजित पवार हे पवार साहेबांच्या मुशीत जरी तयार झालेले नेते असले, तरी त्यांनी नंतर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. आणि ही ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ठसवली.
१९९० च्या दशकांत महाराष्ट्रात शहरीकरणाने वेग पकडला. ग्रामीण भाग अर्धशहरीपणाकडे झुकू लागला, तरी तिथल्या राजकारणाचा बाज हा ग्रामीणच होता, जरी तिथल्या प्रश्नांचं स्वरूप हे काहीसं शहरी होत चाललं असलं तरी. या पद्धतीच्या राजकारणाचा पूर्ण अंदाज आणि ते उत्तम पद्धतीने कसं हाताळायचं याचं कसब अजित पवारांकडे होतं. पिंपरी चिंचवड आणि बारामती ही त्याची दोन उत्तम उदाहरणं. पिंपरी चिंचवड असेल की बारामती असेल अजित दादांनी या भागांचा कायापालट केला हे त्यांचे राजकीय विरोधक पण मान्य करतील.
प्रशासनावर अचूक पकड आणि एखाद्या फाईलीचा गुंता सोडवताना त्याची गाठ नक्की कुठून सोडवायची याचं अचूक ज्ञान असलेला हा नेता होता. प्रशासन हे सत्ताधाऱ्यांच्या पेक्षा वरचढ होण्याच्या काळात असा नेता महाराष्ट्राने गमावणं हे अतिशय दुर्दैवी आहे.
अजित पवार हे कमालीचे स्पष्टवक्ते होते. काम होणार नसेल तर ते तोंडावर सांगायचं आणि होणार असेल तर त्यासाठी ते सगळी शक्ती लावायचे. आश्वासनं देऊन स्वतः भोवती माणसांचा पिंगा घालायचा हा त्यांचा स्वभाव नव्हता. राजकारणात सडेतोडपणाची आणि स्पष्टवक्तेपणाची किंमत मोजावी लागते, त्याचा अनुभव मला पण आहे आणि त्यामुळे ती अजित पवारांना पण किती मोजायला लागली असेल याचा अंदाज करता येतो.
अजित पवारांच मला आवडणारं अजून एक वैशिट्य म्हणजे ते अजिबात जातीय नव्हते आणि त्यांच्या राजकरणात जातीपातीला अजिबात स्थान नव्हतं. सध्याच्या राजकारणात जातपात न मानता राजकारण करण्याचं धारिष्ट्य दाखवणारेच नेते कमी उरलेत, त्यात अजित पवार हे अग्रणी होते हे नक्की.
राजकारणातला विरोध हा राजकीय असतो, तो व्यक्तिगत नसतो. त्यामुळे एकमेकांवरची जहरी टीका ही व्यक्तिगत घ्यायची नसते, हे भान असलेले नेते महाराष्ट्रात कमी होत चालले आहेत. राजकारणातले दिलदार विरोधक एका मागे एक जाणे हे महाराष्ट्राच्या उमद्या राजकारणाचं मोठं नुकसान आहे.
मी आणि माझं कुटुंबीय पवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अजित पवारांना भावपुर्ण श्रद्धांजली.
राज ठाकरे ।