पुणे महापालिका भरतीत 26 डुप्लिकेट उमेदवार?
पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती निकालात तब्बल २६ उमेदवारांची नावे दोनदा आढळली आहेत. नोंदींमध्ये वेगवेगळे रोल नंबर आणि वेगवेगळे प्रवर्ग नमूद आहेत.
निकालाच्या पहिल्याच पानावर सर्व मजकूर टाईप असताना फक्त तारीख मात्र हस्ताक्षरात आहे. सही ��िजिटल नाही तर इमेज आहे.पहिल्याच पानावर "पान क्र. 31" असा उल्लेख दिसत असल्याने मूळ फाईलशी छेडछाड झाल्याची शंका येते.
याशिवाय, भरती परीक्षा तीन वेगवेगळ्या दिवशी झाल्याचे असताना Normalization पद्धतीचा तपशील सार्वजनिक करण्यात आलेला नाही. निकालाच्या PDF मध्ये Editable DOCX File Path दिसत असल्याची बाबही दस्तऐवज व्यवस्थापनाबाबत प्रश्न उपस्थित करते. तसेच Digital Signature किंवा Tamper-Proof Authentication, Final Answer Key, Objection Report आणि Subject-wise Marks सार्वजनिक नाही.
या प्रकरणात स्वतंत्र Digital Forensic Audit, Recruitment Process Audit आणि तांत्रिक चौकशी करून सर्व तथ्ये सार्वजनिक करावीत.
@navalMH @PMCPune
#पुणे_महापालिका #कनिष्ठ_अभियंता_भरती #Transparency #DigitalForensicAudit #JusticeForCandidates #26_डुप्लिकेट_उमेदवार
🚨 सिव्हिल इंजिनिअर्सना महाराष्ट्र सरकारचा मोठा धक्का!
MPSC जाहिरात क्र. 133/2025-26 मध्ये सिव्हिल अभियांत्रिकी संवर्गासाठी तब्बल 0 पदे जाहीर करण्यात आली आहेत.
एकीकडे हजारो कोटींचे रस्ते, पूल, धरणे, ��लसंपदा आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांची घोषणा केली जाते, तर दुसरीकडे हे प्रकल्प उभारणाऱ्या सिव्हिल अभियंत्यां��ाठी एकही पद उपलब्ध करून दिले जात नाही. हा राज्यातील हजारो गुणवंत अभियंता युवकांवर झालेला अन्याय आहे.
या गंभीर प्रश्नाबाबत मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून MPSC 2026 भरती प्रक्रियेत सिव्हिल अभियांत्रिकी संवर्गातील सर्व रिक्त पदांचा समावेश करण्याची मागणी केली आहे.
राज्य सरकारने तातडीने रिक्त पदांचा आढावा घेऊन सुधारित प्रस्ताव MPSC कडे पाठवावा आणि सिव्हिल अभियंत्यांना न्��ाय द्यावा.
अन्यथा राज्यातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार आणि युवकांच्या न्याय्य हक्कासाठी व्यापक लोकशाही आंदोलन उभारले जाईल.
धनंजय रामकृष्ण शिंदे
सरचिटणीस
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष
रोजगार व स्वयंरोजगार विभाग
@INCHarshsapkal @Dev_Fadnavis @degree_holders @CongressRojgar
#MPSC2026 #JobsForYouth #Maharashtra #रोजगार_काँग्रेस #EmploymentCongress #YouthRights
MES-2026 मधील स्थापत्य अभियांत्रिकी (Civil Engineering) संवर्गासाठी तब्बल 0 पदे दर्शविण्यात आली आहेत. राज्यातील हजारो अभियंता विद्यार्थ्यांवर हा अन्याय आहे.
राज्यात अनेक विभागांमध्ये स्थापत्य अभियंत्यांची मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असताना भरतीत एकही पद न देणे अत्यंत चिंताजनक आहे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून MES-2026 मध्ये रिक्त पदांचा समावेश करत सुधारित मागणीपत्र तात्काळ MPSC कडे पाठवावे, ही विनंती.
@INCHarshsapkal@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@girishdmahajan@RVikhePatil@SanjayDRathods@GulabraoRPatil@cbawankule
#MES2026 #CivilEngineering #MPSC #MaharashtraJobs #रोजगार
महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनो,
वर्षानुवर्षे अभ्यास करूनही लाखो विद्यार्थी आजही सरकारी निष्काळजीपणामुळे प्रतीक्षेत आहेत. आता प्रत्येक बेरोजगाराचा प्रश्न एकत्रितपणे विधानमंडळ ��धिवेशनात मांडण्याची वेळ आली आहे.
तुमची कोणतीही परीक्षा, निकाल, निवड यादी, नियुक्ती आदेश किंवा भरती प्रक्रिया रखडली असेल तर कृपया खाली कमेंट करा/संदेश पाठवा.
१. विभागाचे नाव
२. पदाचे नाव
३. जाहिरात तारीख
४. सध्याची स्थिती (परीक्षा/निकाल/नियुक्ती प्रलंबित)
तुमचा प्रश्न फक्त तुमचा नाही, तो महाराष्ट्रातील लाखो बेरोजगारांचा प्रश्न आहे. चला, एकत्र येऊया आणि रोजगारासाठी बुलंद आवाज उठवूया!
��ंपर्क : ९८६७६ ९३५८८
जय भारत, जय संविधान !
@INCHarshsapkal @VijayWadettiwar @satejp @INCMaharashtra @mpsc_office @degree_holders @Mpsc_Andolan @PunyachiMPSC @FutureMpsc12 @MPSCstudsRight @Yesjassociation
#रोजगार_हक्क_आंदोलन #StudentsVoice #MaharashtraStudents #MPSC #WRD #WCD #MIDC #CIDCO #DhananjayShinde #Dhananjay_Shinde
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@degree_holders
२ वर्ष उलटली, १००+ आमदार-खासदार-मंत्र्यांना निवेदने दिली, पण WRD चे RR आणि जाहिरातींऐवजी फक्त 'घोषणांचा पाऊस' पडला! विद्यार्थ्यांच्या पदरी फक्त निराशाच. जाहिरातीसाठी महाराष्ट्रात��्या विद्यार्थ्यांनी नक्की कोणत्या 'देवा'ला नवस करावा ?
📍#CIDCO@CIDCO_Ltd निकालाच्या बाबत भावी अधिकारी अत्यंत निराशेतून जात आहेत आणि याला जबाबदार पूर्णतः @CIDCO_Ltd चे प्रशासन आहे, एकीकडे राज्यसरकार गतिमान कारभाराबाबत आग्रही असताना @CIDCO_Ltd ने त्याला केराची टोपली दाखवली आहे. लवकरात लवकर निकाल लावून उमेदवारांना नियुक्ती द्यावी.
महाराष्ट्रातील युवक रोजगारासाठी संघर्ष करत आहेत आणि @CIDCO_Ltd मात्र भरती प्रक्रिया रखडवून बसले आहे. पात्र उमेदवारांना महिनोनमहिने प्रतीक्षा करायला लावणे म्हणजे त्यांच्या भविष्याशी खेळ करण्यासारखे आहे.
राज्य सरकारने आणि सीआयडीसीओ प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून अंतिम निकाल जाहीर करावा व नियुक्ती आदेश द्यावेत. युवकांच्या संयमाचा अंत पाहू नका.
@INCHarshsapkal@samant_uday@Aaple_Sarkarr
#DhananjayShinde
#Dhananjay_Shinde
#CIDCO #Recruitment #JobsForYouth
प्रति,
मा. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
विषय : MPSC जाहिरात क्र. 133/2025-26 अंतर्गत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2026 मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गासाठी शून्य पदे दर्शविल्याबाबत तातडीने सुधारित मागणीपत्र पाठवून रि���्त पदांचा समावेश करण्याबाबत.
महोदय,
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) जाहिरात क्र. 133/2025-26 अंतर्गत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2026 साठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदसंख्येमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गासाठी "शून्य (0) पदे" दर्शविण्यात आली आहेत. ही बाब राज्यातील हजारो अभियांत्रिकी पदवीधर विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण करणारी असून राज्याच्या विकासाच्या दृष���टीनेही अत्यंत चिंताजनक आहे.
माहिती अधिकार कायद्यांतर्गत प्राप्त झालेली माहिती, विभागीय आस्थापना अभिलेख तसेच विविध शासकीय कागदपत्रांमधून जलसंपदा विभागासह इतर विभागांमध्ये स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी संवर्गातील मोठ्या प्रमाणावर पदे ��िक्त असल्याचे स्पष्ट होते. असे असतानाही 2023, 2024 आणि 2025 या सलग तीन वर्षांपासून स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे कोणतेही मागणीपत्र न पाठविणे अथवा शून्य पदांची मागणी करणे हे राज्यातील गुणवंत उमेदवारांवर अन्याय करणारे आहे.
जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, ग्रामीण विकास, नगरविकास आणि इतर पायाभूत सुविधा विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रकल्प सुरू असताना तांत्रिक ���नुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. परिणामी कामांच्या गुणवत्तेवर, देखरेखीवर आणि अंमलबजावणीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे आपणास नम्र विनंती करण्यात येते की,
1. जलसंपदा विभागासह संबंधित सर्व विभागांमधील स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी संवर्गातील प्रत्यक्ष रिक्त पदांची माहिती तातडीने संकलित करून सार्वजनिक करावी.
2. उपलब्ध रिक्त पदांच्या आधारे सुधारित मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे तातडीने पाठवून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2026 मधील पदसंख्या वाढवावी व रिक्त पदांचा समावेश करावा.
3. सेवाप्रवेश नियमांमधील प्रलंबित बदलांचा परिणाम न होणारी पदे तात्काळ भरती प्रक्रियेत समाविष्ट करून पात्र उमेदवारांना न्याय द्यावा.
4. गेल्या तीन वर्षांपासून स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गासाठी शून्य मागणीपत्र का पाठविण्यात आले याची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी.
राज्याच्या विकासासाठी आवश्यक असलेले तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे आणि हजारो स्पर्धा परीक्षा उमेदवारांना न्याय मिळवून देणे ही शासनाची जबाबदारी आहे. या विषयात आपण वैयक्���िक लक्ष घालून तातडीने सकारात्मक निर्णय घ्याल, अशी अपेक्षा आहे.
धन्यवाद,
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी करिता,
धनंजय रामकृष्ण शिंदे
सरचिटणीस
अध्यक्ष : रोजगार व स्वयंरोजगार विभाग
मोबाइल क्र. ९८६७६ ९३५८८
@CMOMaharashtra @INCHarshsapkal @INCMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @girishdmahajan @RVikhePatil @degree_holders @mpsc_ofice @Mpsc_Andolan @PunyachiMPSC
#MPSC #MES2026 #CivilEngineering #Maharashtra
नम्र विनंती:
1. स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी संवर्गातील प्रत्यक्ष रिक्त पदांची माहिती तातडीने संकलित करावी.
2. ��ुधारित मागणीपत्र MPSC कडे तातडीने पाठवून MES-2026 भरतीत रिक्त पदांचा समावेश करावा.
3. सेवाप्रवेश नियमातील प्रलंबित बदलांमुळे प्रभावित न होणारी पदे तरी तात्काळ भरतीसाठी
RTI, शासकीय नोंदी व उपलब्ध माहितीनुसार जलसंपदा विभागात मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे असूनही 2023, 2024 व 2025 या सलग तीन वर्षांपासून स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गासाठी "शून्य" ��ागणीपत्र देण्यात आले आहे.
स्थापत्य अभियांत्रिकी कॅडरवर ६०:४० चे प्रमाण लादणे म्हणजे हजारो अभियंता युवकांच्या पदोन्नतीच्या हक्कावर गदा आणणे आहे. सरकारने तात्काळ हा अन्यायकारक निर्णय मागे घेऊन न्याय्य धोरण जाहीर करावे. अन्यथा विद्यार्थ्यांसोबत काँग्रेस रस्त्यावर उतरून राज्यव्यापी आंदोलन उभारेल. रोजगार आणि करिअरच्या संधींवर कुठलाही घाला सहन केला जाणार नाही.
@INCHarshsapkal@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@SanjayDRathods
#EngineerJustice #MaharashtraYouth
६०:४० हे प्रमाण स्थापत्य अभियांत्रिकी कॅडर साठी अन्यायकारक तर आहेच परंतु पदोन्नती बाबतच्या संधीवर परिणाम करणारा आहे. यावर तत्काळ निर्णय घेण्यात यावा अन्यथा विद्यार्थ्यांना घेऊन आम्हाला राज्यव्यापी आंदोलन करावे लागेल.
@SanjayDRathods@naikindranil@Dev_Fadnavis@Aaple_Sarkarr
विद्यार्थी हितासाठी सदैव तत्पर असणाऱ्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनी PMC परीक्षा TCs ion सेंटर वरच व्हाव्यात हा विद्यार्थी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल खूप खूप आभार🙏
@Dev_Fadnavis
२५ जानेवारीला होणारी PMC Junior Engineer परीक्षा फक्त TCSion अधिकृत सेंटरवरच घ्यावी.
२ वर्षे मेहनत करणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये.
परीक्षा फक्त TCSion अधिकृत केंद्रांवरच घ्यावी, ही नम्र पण ठाम मागणी.
#JuniorEngineerExam#PMC#StudentJustice#TCSionOnly
🚨 PMC JE Exam (25 Jan 2026)
Students paid ₹900–₹1000 fees, yet exam centers are allotted 200–500+ km away.
TCS iON centers were promised but private centers given.
This is unfair.
👉 Demand: TCS iON centers ONLY
#JEExam#PMC#JusticeForAspirants@PMCPune@navalMH