माफीनामा वैगरे खूप झालं आता...!!
महाराष्ट्रात राहून इथली सरकारी नोकरी करणारा कोणताही कर्मचारी/अधिकारी जर का #मराठी भाषा बोलण्यास नकार देऊन भाषेचा अवमान करत असेल, तर त्या कर्मचाऱ्याचं #निलंबन झालंच पाहिजे.
#मुंबईसेंट्रल@drmbct@grpmumbai@MumbaiPolice
आज २० जून २०२६ रोजी, मुंबईतील वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात, मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे जिल्हा आणि महापालिका क्षेत्रांतील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
- मतदारयादी पुनर्निरिक्षण (SIR) या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका, आपलं मतदार याद्यांकडे लक्ष नसल्याने काय गोष्टी घडू शकतात हे आपण पाहिलं.
- महाराजांच्या जिरेटोपावर जैनांचा झेंडा, हे इथपर्यंत गेलं? या गोष्टी जाणूनबुजून सुरू आहेत का? निवडणूक प्रक्रियेकडे दुर्लक्ष करून तुम्हाला आंदोलनामध्ये गुंतवून ठेवण्यासाठी हे सुरू आहे का याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे.
- आम्ही हातात बांगड्या नाहीत भरल्या असं म्हणणाऱ्याने मराठी माणसाचं मनगट पाहिलंय का कधी? आम्हाला वाद नको आहेत पण वाद उकरून काढणार असाल तर आम्ही रस्त्यावर उभे राहू.
- तुम्ही धर्माचं काम करत आहात, ते करत राहा. उगाच नको ते उद्योग कशाला करता? मध्यंतरी कबुतरांचा विषय आला, आता पांढरी पट्टी, हे सगळं राजकारण्यांच्या नादी लागून करतायेत.
- आपल्याकडे खासदार फोडणं सुरू आहे, सत्तेसाठी राजकारण सुरू आहे. मला वाटतं या सगळ्या गोष्टींकडे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांपेक्षा जनतेनं लक्षं ठेवलं पाहिजे. एक जुनं वाक्य आहे "स्वाभिमान मेला की उरतात फक्त जिवंत प्रेतं."
- इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार देशात सर्वात जास्त २२,१७४ आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. आज शेतकरी आत्महत्या करतायेत, नीट पेपरफुटीमुळे विद्यार्थी आत्महत्या करतायेत. राज्यात लहान मुलं, मुली पळवण्याचे प्रकार घडतायेत. एवढं सगळं सुरू असताना आपल्याकडे खासदार, आमदार, नगरसेवक फोडण्याचं काम सुरू आहे.
- या आमदार, खासदार पळवापळवीमध्ये आपण आपल्या मुलभूत गोष्टी विसरून जातोय. महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राचा इतिहास, देशाची परंपरा आपण विसरत चाललोय.
- केंद्राच्या रिपोर्टनुसार MSEDCL ला पॉवर डिस्ट्रिब्युशनमध्ये १०० पैकी दीड गुण मिळालेत. MSEDCL चा आता IPO येत आहे अशावेळी दीड टक्का मिळालेल्या कंपनीत गुंतवणूक करायला कोण येणार? कंपनी अदानीच्या हातात देऊन महाराष्ट्राचा वीज पुरवठा ताब्यात घेण्याचं हे कारस्थान आहे.
- कोण सत्तेवर आहे याने मला फरक पडत नाही. सत्तेवर बसून तुम्ही काय करताय याने मला फरक पडतो. सत्तेवर बसून चुकीचे पायंडे पाडले जातायेत याचं कोणाला भान उरलेलं नाहीये.
- आपलं आंदोलन घरापर्यंत पोहोचतं पण घर मतपेटीपर्यंत पोहोचत नाही याला काय म्हणायचं? आपल्या आजूबाजूला काहीतरी षडयंत्र रचलं जातंय याची आपल्याला कल्पना आहे का?
- लवकरच जनगणना सुरू होत आहे. माझी महाराष्ट्र सैनिकांना विनंती आहे, डोळ्यात तेल घालून या जनगणनेवर लक्ष ठेवा. काही ठिकाणी, घर गणनेच्या वेळेस भाजपचे लोकं तिकडे हजर असतात. ते अंदाज घेत आहेत की या घरात आपले मतदार आहेत का नाही? जर त्यांना वाटलं, नाही तर त्यांची नावं काढून टाकण्याच्या हालचाली सुरु होतात. तुम्ही आंदोलनं करता, ती लोकांना आवडतात, लोकांपर्यंत पोहचतात पण त्यांची मतं आपल्यापर्यंत का पोहचत नाहीत याचा विचार करा. ३ वर्षांनंतर निवडणुका आहेत म्हणून गाफील राहू नका.
- निवडणुकीचा खेळ कसा खेळला जातोय, किती चालाखीने खेळला जातोय याची कल्पना आपल्याला नसेल तर निवडणुका लढवण्याला काहीही अर्थ नाही.
- मी २०१९ला सांगत होतो निवडणुकांवर बहिष्कार टाकायला हवा, ज्या प्रकारचं राजकारण, ज्या प्रकारच्या निवडणुका सध्या सुरू आहेत हे पाहता हाताला काही लागणार नाही. आणि लागलं तरी हे आमदार, खासदार पळवून नेतील.
राज ठाकरे ।
परप्रांतीयांच्या सोयीनुसार चालणारे, त्यांची पायपुसणी होणारे @PratapSarnaik यांना मराठीशी काहीही घेणंदेणं नाही.
मोठ्या तोऱ्यात घोषणा केलेल्या... त्या घोषणा, कायदा, नियम सर्वकाही कागदात गुंडाळून त्याची सुरळी घश्यात कोंबली आहे आता...
#परप्रांतीय_मोकाट
।। पदाधिकारी मेळावा ।।
मुंबई, पुणे, ठाणे व नाशिक जिल्हा तसेच महानगरपालिका क्षेत्रातील सर्व पदाधिकाऱ्यांचा मेळावा.
🗓 शनिवार, दि. २० जून २०२६
🕙 सकाळी १०.०० वाजता
📍 रंगशारदा हॉल, लिलावती हॉस्पिटलजवळ, वांद्रे (पश्चिम), मुंबई
#राजठाकरे#पदाधिकारी_मेळावा#MNSAdhikrut
उड्डाणपुल वाहतुकीसाठी सुरू असो वा बंद असो, आता काय फरक पडतो...⁉️
उड्डाणपुल बांधण्यासाठीचे पैसे खाऊन झाले... झालं तर मग. आता कशाला कोण लक्ष देणार...⁉️
@CMOMaharashtra@mieknathshinde
महाराष्ट्रात अनेक शाळांमध्ये सहावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी अजून मराठीचं पुस्तक मिळालं नाहीये पण सरकारने तप्तरतेने हिंदीचं पुस्तक मात्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहचेल हे पाहिलं आहे. वा रे वा, काय तत्परता आहे हिंदी भाषेसाठी.
साभार - डॉ. महेश देशमुख
"पांढरी पट्टी" वादाआडून काही दुसर्या गोष्टी तर मार्गी लावल्या जात नाही आहेत ना...⁉️
प्रामुख्याने मुंबईतच हा वाद निर्माण करून नेमकं काय साध्य केलं जातंय❓
जैन आणि भाजपा यांचं साटंलोटं आहे. हे सगळ्यांनाच माहीत आहे.
सुक्ष्म जिवांची एवढी काळजी करणारे ॲंटीबायोटीक/ ॲंटीव्हायरल गोळ्या घेत असतील का?
घरात मच्छर झाले तर गुडनाईट वापरतात का?
ढेकणं झाली तर पेस्ट कंट्रोल करतात का?
सहजच मनात शंका आली.!
रात्री अपरात्री उशिरापर्यंत बोलणं
सुख दुःखाच्या गोष्टी वाटून घेणं
संवादाचे ते सूर अजूनही
ऐकू येतात कानात
त्या सुंदर आठवणींचा खजिना
जपला आहे मनात
निवांतपणाची अनुभुती
जगाला वाटते सोपी
मी मात्र अजूनही त्या मैत्रीच्या आठवणीत
रोज पिते ही लेट नाईट #कॉफी...✍🏻
#मी_शुभांगी ❤️
#कॉफीप्रेमी
तुझ्या श्वासात बेधुंद झालेली मी
माझ्या शब्दांत गुरफटलेली कविता तू
तुझा अल्लडपणा त्यावर संयम माझा
माझ्या कल्पनेत जे तेच वास्तव आहेस तू... ✍🏻
#मी_शुभांगी#म#मराठी#चारोळी
उत्तर भारतीयांना "इथे थुंकून घाण करू नका." हे सांगणंही आता गुन्हा झाला का❓
ठाण्यात एवढी मुजोरी वाढलीय परप्रांतीय रिक्षाचालकांची...⁉️
@mieknathshinde@ThaneCityPolice
भेंडी... सगळेच कसे काय कृष्णाचे अवतार⁉️
बरं... पण तो कृष्णच स्वतः एक अवतार आहे...!
बाकीच्या देवांनी अवतार घेण्यावर बंदी घातली आहे वाटतं...!🤦🏻♀️
#अवताराची_गोष्ट
भारतातील सर्व चित्रपटसृष्टीत चित्रपट, वेबसिरीज, मालिकांमध्ये गाड्या चालवण्याच्या आणि कृत्रिम पाऊस पडण्याच्या चित्रिकरणावर बंदी घालायला हवी.
तिथे विनाकारण इंधन आणि पाणी वापरलं जातंय. जे कोणाच्याही काहीच उपयोगाचं नसतं.
इंधन, पाणी वाचवण्याची जबाबदारी फक्त सामान्य माणसांची आहे का❓