धुळवड #धूलिवंदन आज रंग नाही खेळत,
काल पूजा केलेल्या होळीची राख लावतात, तिला आज वंदन करतात.
धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा !
रंग हे रंगपंचमीलाच खेळू, ०८ मार्च ला..
#मराठी#सण#संस्कृती#परंपरा#मराठीएकीकरणसमिती
अखंड हरिनाम सप्ताहाची जागा शिव कथा पुराण ने घेतोय. ज्ञानोबा-तुकोबांची जागा बागेश्वर बाबा सारखे ढोंगी घेताय. खंडोबा जोतिबा च्या ऐवजी लोकांना खाटू श्याम, सावरिया सेठ वगैरे जास्त श्रध्येय झाले.
महाराष्ट्रावर ठरवून होत असलेल सांस्कृतिक आक्रमण आहे . गाय पट्ट्यात समावेश करायचं काम आहे
आईच्या दुधानंतर माणसाच्या अंगवळणी पडते ती मातृभाषा... ज्या भाषेतून हे जग समजलं ती माय मराठी समृद्ध आणि विशाल आहे ..शब्दांनी श्रीमंत... कोणत्याही गोष्टीसाठी ज्या भाषेत अनेक शब्द आहेत... जी भाषा रोज जगतो ,बोलतो ,वाचतो आणि श्वासही तिचाच घेतो ती मराठी ...!❣️
#मराठी_भाषा_गौरव_दिन
तुडवला 💪
गाववाले या भैयाची खूप दादागिरी सहन करत होते.
मराठी नहीं बोलणेका..तुम मराठी लोगोकी अवकाद नाही.
ह्यांना अस वाटायला लागलंय की महाराष्ट्रातील सत्ता ह्याचीच आणि यांनीच बसवले.
मातृभाषेचा आणि महाराष्ट्राचा अपमान मनसे तरी सहन करणार नाही म्हणजे नाही .
जय मनसे 💪
एका जपानी तरुणीचा एक व्हिडीओ समोर आला. ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्याला आहे आणि ती तिच्या परीने मराठी भाषा शिकायचा प्रयत्न करत आहे. ती एक नवीन मराठी शब्द रोज शिकते आणि त्याची एक चित्रफीत तिने टाकली. ती चित्रफीत पाहिल्यावर एक विचार डोक्यात आला की हे सगळे काही हजार किलोमीटरवरून येणारे परदेशी पाहुणे, पण इथे आल्यावर या प्रांताची भाषा 'मराठी' आहे हे सहज मान्य करतात. ते जर इथे खूप काळ राहणार असतील तर ती भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात,नाहीतर किमान भाषेचा अनादर कधीच करत नाहीत. उलट आपण त्यांच्यासमोर आपल्या भाषेत बोललो तर त्यांना आनंद होतो. त्यांना जमलं तर आपल्या भाषेतील नाटकं बघायची असतात, इथली खाद्यसंस्कृती समजून घ्यायची असते, इथला इतिहास समजून घ्यायचा असतो. आणि हे सगळं करताना त्यांना मराठीबद्दल जितकं अपार कुतूहल असतं तितका अपार आदर पण असतो.
ते इथून इतर राज्यात गेले तर तिकडे जाऊन पण त्याच उत्सुक्याने सगळं बघत असतात, शिकत असतात.
मध्यंतरी नवी मुंबईत कोल्डप्लेचा कार्यक्रम झाला तेंव्हा या शहराची, राज्याची भाषा मराठी आहे हे कळल्यावर, ख्रिस मार्टिनने अगदी सहज मराठीत एक दोन वाक्य बोलत प्रेक्षकांना अभिवादन केलं. या शहरांत जेंव्हा जेंव्हा इतर देशांचे राष्ट्राध्यक्ष आलेत तेंव्हा त्यांच्यातील बहुसंख्य राष्ट्राध्यक्षांनी मराठीत अभिवादन केलं आहे. मुंबईत असलेली दूतावासांची कार्यालयं मराठी ही या राज्याची भाषा आहे त्यामुळे महत्वाच्या सणांना मराठीत शुभेच्छा देतात. तिथे मराठी बोलणारा कर्मचारी वर्ग राहील हे बघतात. हे परक्यांना कळतं पण काही स्वकीयांना कळत नाही.
त्यांना मुंबईची भाषा मराठी नाही तर इथे अनेक भाषा आहेत हे म्हणावंसं वाटतं. मध्यंतरी सरसंघचालक मुंबईत एका कार्यक्रमाला येऊन गेले. त्यावेळी आपण मुंबईत आहोत, आपण मराठी पण आहोत त्यामुळे थोडाफार संवाद मराठीत पण साधावा असं त्यांना का वाटलं नाही ? माहित नाही.
मला संघाच्याच काही लोकांनी सांगितलं की या आधीचे सरसंघचालक सुदर्शनजी यांचा जन्म आणि बालपण रायपूरमध्ये झालं होतं, त्यांना हिंदी यायचं पण ते जे कर्नाटकातून आले होते त्या राज्याच्या कन्नड भाषेचा त्यांना कधी विसर पडला नाही. उलट कर्नाटकात गेले तर आवर्जून कन्नडमध्ये संवाद साधायचे.
असो..
माझं मराठी भाषिकांना आवाहन आहे की परदेशी व्यक्ती तुमच्या भाषेचा सन्मान करतील आणि करतात. पण इथल्या मूठभर स्वकीयांना या भाषेत बोलतं करण्यासाठी आपली भाषा ज्ञानाची आणि अर्थार्जनाची बनवूया. जेणेकरून ती शिकल्या शिवाय पर्यायच उरणार नाही.
त्या जपानी मुलीला मनःपूर्वक धन्यवाद 🙏
राज ठाकरे ।
No, I won't give exiled Kashmiri Hindus money - every politician promises that. I will, instead make sure their children never have to ask for money. 5% seats in Maharashtra colleges will henceforth be reserved for Kashmiri Hindus - Bal Thackeray, born this day, January 23, 1926.
महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय परिदृश्यावर खोलवर प्रभाव टाकणारे
दिवंगत मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त, या दिग्गज व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण आदरांजली.
तीक्ष्ण बुद्धिमत्ता, प्रभावी वक्तृत्व आणि ठाम विचारसरणीसाठी ओळखले जाणारे बाळासाहेब जनतेशी एक अद्वितीय नाते जपून होते. राजकारणाबरोबरच त्यांना संस्कृती, साहित्य आणि पत्रकारितेचीही विशेष आवड होती. व्यंगचित्रकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीत समाजाचे सूक्ष्म निरीक्षण आणि विविध विषयांवरील निर्भय भाष्य दिसून येते.
महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांच्या दृष्टिकोनातून आम्हाला मोठी प्रेरणा मिळते आणि ती साकार करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू.
राजकारणाच्या व्यतिरिक्त आपल्या दैनंदिन जीवनात या सवयी लावून घेणे अत्यंत गरजेचे आहे. येणारा काळ कठीण आहे त्यामुळे भाषेचा कडवटपणा आणखीन तीव्र करावाच लागेल.
भाषा मेली आणि पाया खालची जमीन गेली तर तो भूभाग पारतंत्र्यातच जातो. वेळ मिळाला तर आयर्लंड च्या निर्मितीचा इतिहास नक्की वाचा!
“मराठी महापौर नाही तर मिरा-भाईंदरमध्ये माझे रक्त सांडेल!” — गोवर्धन देशमुखांचा इशारा, मोठ्या आंदोलनाचा एल्गार
माझा जीव गेला तरी चालेल मराठी महापौरच हवा यासाठी मराठी माणसाचे भव्य आंदोलन केले जाईल संयुक्त महाराष्ट्र 2 लढा मिरा भाईंदरात पाहायला मिळेल.
भाजप अध्यक्ष, @RaviDadaChavan
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis
यांना निवेदन पाठवले.. मिरा भाईंदर आगरी कोळ्यांचे शहर आहे स्थानिक मराठी महापौर करा.
हे म्हणत आहेत आमच्याइथे मराठी टक्का जास्त असल्यामुळे मी हरलो.
महाराष्ट्रात मराठी मतदार नाही तर कोण पाहिजे यांना ? म्हणजे मुंबईत भाजप शिंदे गट यांच्या निवडून आलेल्या जागा या परप्रांतीय मतदारांमुळे आल्या आहेत आणि म्हणून यांना मुंबईतल्या #मराठी माणसाची काहीही पडलेली नाहीये.
.....तर कानफाडीतच बसणार...🔥🔥🔥
Blinkit (@letsblinkit) प्रशासनाचा उद्दामपणा आणि मराठी द्वेष पुन्हा एकदा समोर!
एकीकडे कंपनी ईदच्या शुभेच्छांची पोस्ट टाकते (त्याबद्दल आमचा आक्षेप नाही), पण जेव्हा त्याच कंपनीचा एक मराठी रायडर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 'शिवराज्याभिषेक दिना'ची पोस्ट टाकतो, तेव्हा त्याचा आयडी २४ तासांसाठी बंद केला जातो? हा कुठला न्याय?
आमची भूमिका स्पष्ट आहे:
✅ आम्हाला धर्म किंवा जातीपातीच्या वादात पडण्याची अजिबात इच्छा नाही.
✅ या महाराष्ट्रात हिंदू असो वा मुस्लिम, महाराजांना मानणारे सर्वच जण आहेत. महाराजांची अस्मिता ही आमच्यासाठी सर्वोच्च आहे.
Blinkit ला आमचा इशारा:
जर जाणीवपूर्वक मराठी माणसाला त्रास देण्याचा प्रयत्न केला किंवा आमच्या दैवताचा अपमान केला, तर लक्षात ठेवा... ही शिवरायांची भूमी आहे. इथे वाकड्यात शिरलात, तर कानफाडीतच बसणार! 👊🚩
आम्ही शांत आहोत तोपर्यंतच, आमच्या अस्मितेशी खेळू नका!
#Blinkit #BoycottBlinkit #ShivajiMaharaj #Maharashtra #MarathiAsmita #RajThackeray #MNS #MaharashtraDharma #MNSAdhikrut
शेवटी पोटातलं ओठांवर आलंच... भाजपाला आम्ही शेवटचं सांगतोय, निवडणुका गेल्या तेल लावत पण मुद्दामहून असल्या बांडगुळांना आणून मराठी माणसाला चिथावू नका... पुन्हा तुमचा कुणी भाजपावाला मुंबादेवीच्या मुंबईला बॉम्बे म्हणाला आणि बलिदान देऊन मिळवलेल्या मुंबईवरून मराठी माणसालाच हिणवलं तर तुमची मराठी माणसाशी गाठ आहे, हे लक्षात असू द्या... @annamalai_k@BJP4India शहरांची नावे फक्त शब्द नसतात तर भाषा, संघर्ष, अभिमान आणि स्वाभिमान दर्शवतात.
मुंबई म्हणजे मुंबईच! बॉम्बे नाही! आणि
मुंबई महाराष्ट्राचीच !
जय महाराष्ट्र!
मुंबईचा बिहार उत्तर प्रदेश बिहार करणार चालू झालेला आहे मराठी माणसं जागा हो
या भाडखाउ त्रिपाठीला सिद्धिविनायक टेम्पल चा कोषाध्यक्ष केलेला आहे
मुंबई मधली उत्तर भारतीय लोकांसाठी केलेली प्रचार सभा आहे
लाजा वाटू दे… शेअर करा जास्तीतजास्त !!
जाहीर निषेध! जाहीर निषेध!
मराठी अभ्यास केंद्राने पुकारलेल्या या लढ्याला मराठी एकीकरण समिती - महाराष्ट्र राज्य पूर्णपणे पाठिंबा देत आहे. मराठी शाळा वाचवण्यासाठी प्रा. दीपक पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उचललेले हे पाऊल कौतुकास्पद असून, येणाऱ्या काळात आम्ही सर्व मराठी संघटना एकत्रित येऊन हा लढा अधिक तीव्र करू.
मराठी शाळांच्या अस्तित्वावर घाला घालणाऱ्या आणि भूखंडांचे श्रीखंड खाणाऱ्या शासन धोरणांचा 'मराठी एकीकरण समिती' तर्फे तीव्र निषेध!
महाराष्ट्राच्या मातीत मराठी माध्यमाच्या शाळा या केवळ वास्तू नसून आपल्या संस्कृतीचे आणि अस्मितेचे जडणघडण केंद्र आहेत. मात्र, दुर्दैवाने आजचे शासन या शाळांचे संरक्षण करण्याऐवजी त्या उध्वस्त करायला निघाल्याचे चित्र दिसत आहे.
आमचे आक्षेप आणि मागण्या:
* भूखंड लाटण्याचे षडयंत्र: शाळांच्या मोक्याच्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचे प्रयत्न थांबवा.
* मराठी शाळांचे विलीनीकरण: 'कमी पटसंख्या' हे निमित्त करून मराठी शाळा बंद करून मराठी मुलांचे शैक्षणिक नुकसान करणे थांबवा.
* अपुरी साधनसामग्री: मराठी शाळांना जाणीवपूर्वक सोयी-सुविधांपासून वंचित ठेवून त्या 'कुचकामी' ठरवण्याचा डाव बंद करा.
मराठी शाळा वाचवणे हे केवळ आमचे कर्तव्य नसून आमचा हक्क आहे. जर शासन मराठी शाळांच्या मुळावर उठणार असेल, तर मराठी एकीकरण समिती गप्प बसणार नाही. या अन्यायाविरोधात आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करू!
मराठी शाळा वाचली, तरच मराठी टिकेल!
#मराठीएकीकरणसमिती
होय,
मुंबई आमच्याच बापाची,
हिंगलाय देवीची,
मुंबादेवीची,
बहिरीदेवाची,
स्थानिक भूमिपुत्र आगरी कोळी बांधवांची,
ती १५-२० वर्षापूर्वी आलेल्या आणि मुंबईकर म्हणवणाऱ्या गुजरात्यांची,मारवाड्यांची,भैयांची नाही….
विषय संपला !!