जसं दहीहंडीत मराठी माणूस वरच्या थरांचा भार खंबीर पणे पाय रोवून खाली आधार देत उभा असतो.. तसंच इतर क्षेत्रात ही एकमेकांचे पाय खेचण्यापेक्षा, एकमेकांनां सहाय्य करणं हे मराठी माणसाने हे आचरणात आणलं तर मराठी माणूस अजून खूप प्रगतीमान होईल..!
#गोपाळकाला#मनसेदहीहांडी#mns
Over the past few years, the Adani Group has expanded at an extraordinary pace—be it the power sector, ports, airports, or almost every major sphere within the state. One by one, critical sectors are being handed over to a single corporate conglomerate.
As Maharashtrians, if we fail to view this rapid consolidation with the seriousness it demands today, inch by inch, vast stretches of land and key assets of this state will slip into the hands of one corporate group.
This video lays out the staggering scale of the Adani Group’s expansion across the state and is well worth watching.
आज, ११ जानेवारी २०२६ रोजी शिवतीर्थ दादर येथे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवशक्तीची जाहीर सभा पार पडली. या सभेत माझे व शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांचे भाषण झाले.
माझ्या ��ाषणातील प्रमुख मुद्दे -
- आज या क्षणाला आम्ही दोन भाऊ एकत्र आल्यानंतर आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि माँ. मिनाताई असायला हवे होते.
- गेले अनेक दिवस मराठीच्या या लढ्यात आम्हाला दीपक पवार व त्यांचे सहकारी, टेलिव्हिजन चॅनल्सचे पत्रकार आणि संपादक यांसारख्या अनेकांनी मदत केली त्यांचे मनःपूर्वक आभार!
- मी आणि उद्धव आम्ही एकत्र येण्याचं मूळ कारण म्हणजे या मुंबईवर आलेलं संकट.
- अकोटमध्ये भाजपने एमआयएमसोबत युती केली. बदलापुरात भाजपने काँग्रेससोबत युती केली.
- भाजपचे ६६ जण बिनविरोध निवडून आले. म्हणजे ६६ ठिकाणी मतदार मतदान करू शकत नाहीत.
- तुळजापूरात ड्रग्ज रॅकेटमधला आरोपी विनो�� गंगणेला भाजपने तिकीट दिलं. बदलापुरातील बलात्काराच्या प्रकरणातील सह-आरोपी तुषार आपटेला नगरसेवक केलं. ही हिंमत भाजपमध्ये आली कुठून?
- सध्या महाराष्ट्रात जे काही सुरू आहे त्याचं चित्र पाहून तुम्हाला भीती वाटली नाही तर निवडणुका न लढवलेल्याच बऱ्या.
- जगामध्ये अदानींप्रमाणे १० वर्षांत इतक्या मोठ्या प्रमाणात श्रीमंत झालेला दुसरा माणूस नसेल.
सरकारची एकट्या अदानींवर इतकी मेहरबानी का?
- व���ढवणला बंदर येतंय ठीक आहे. पण विमानतळ कशासाठी तर, सगळे कार्गो वाढवणला नेणार आणि मुंबई विमानतळावरची सगळी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं नवी मुंबईत हलवणार आणि नंतर मुंबई विमानतळाची जमीन विकायला काढणार.
- आधीपासून त्यांच्या डोक्यात आहे मुंबई गुजरातला न्यायची. त्यासाठी पालघरचा जिल्हा ताब्यात घ्यावा लागेल, ठाणे ��िल्हा आणि एमएमआर परिसराचा भाग ताब्यात घ्यावा लागेल आणि नंतर मुंबई गुजरातला जोडून घेणं सोपं होईल.
- एकदा मुंबई हातातून गेली तर महाराष्ट्र झारखंडपेक्षा वेगळा करणार नाहीत हे.
- देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी भुजबळांना जेलमध्ये टाकलं होतं. अजित पवारांविरोधात बैलगाडीभरून पुरावे फडणवीसांनी सादर केले आणि आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसलेत. आणि आमच्यावर भ्रष्टा��ाराचे आरोप करताय?
- काल उत्तर भारतातला एक माणूस बोलला, मुंबई महापालिकेत नोकऱ्या द्यायच्या असतील तर इथल्या उत्तर भारतीयांना दिल्या पाहिजेत, बाहेरून कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातून येणाऱ्यांना कशाला द्यायच्या. आमच्या कोल्हापूर, सातारा, सांगलीतून येणारी लोकं बाहेरची झाली?
- तुम्ही मराठी म्हणून एकत्र येता कामा नये म्हणून यांचा हा खेळ सुरू आहे.
- मराठी माणसाला एकटं पाडण्यासाठी हा डाव रचल�� जातोय. पण एकटे असलो तरी बास आहोत.
- माझा कोणत्याही भाषेला विरोध नाही पण तुम्ही आमच्यावर लादणार असाल तर लाथच मारू.
- हिरे, मोती, सोनं, चांदी व अन्य कितीही मौल्यवान वस्तू असतील तरी फक्त जमिनीला रिअल इस्टेट म्हंटलंय कारण तीच खरी संपत्ती आहे. जर जमीन तुमच्या हातातून गेली तर तुमचे अस्तित्व संपते.
- ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे. आज जर चुकलात तर मुकलात म्हणून समजा.
- माझं इतर पक्षांतील मराठी माणसांनाही आवाहन आहे. सोडा ते सगळं मराठीसाठी एक व्हा, महाराष्ट्रासाठी एक व्हा.
- ही मुंबई, हा महाराष्ट्र मराठी माणसाच्या हातात रहावा, तुमच्या हक्काचं असावं तुमचंच आहे ते.
- जो लढा आजवर मराठा साम्राज्याने दिला तो लढा आता आपल्याला उभा करायचाय. हा महाराष्ट्र वाचवायचाय, महाराष्ट्र समृद्ध करायचाय, ही मुंबई आपल्याला वायचायचीये यासाठी आपण कामाला लागाल अशी अपेक्षा करतो.
- 'हिंदीची सक्ती राष्ट्र��य एकतेसाठी घातक ठरेल हे सत्य कोणीही लपवू शकत नाही' हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे किती घातक आहे हे तेव्हाच लिहून ठेवलंय.
एमएमआर परिसरात अदानी समूहाचा सुरु असलेला विस्तार जरूर पहा. मुंबई गुजरातला न मिळता महाराष्ट्राला मिळाली याचा अजून राग असलेल्या काही शक्ती आता या उद्योगसमूहाला ह��ताला धरून मुंबईवर आणि एमएमआरवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत... अदानी समुहाचा एमएमआर परिसरातील विस्तार जरूर पहा...
ठाणे महानगरपालिका निवडणूकीच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय अध्यक्ष मा.श्री. राज ठाकरे साहेब यांनी गुरूवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रतिमेला वंदन करून ठाणे शहरात प्रचार दौरा केला.
#rajthackeray#mns#shivsenaubt#mashal#thane#maharashtra
Wishing a very happy birthday to the one who was Gambhir when he played for India and now even more Gambhir while coaching for India! Lots of love brother ❤️ Keep up the great work and have a lovely year ahead!
@GautamGambhir
आज १८ जुलै २०२५ रोजी, सायंकाळी मीरा-भाईंदर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचं उदघाट्न केल्यानंतर तिथे जमलेल्या मराठी जनांना संबोधित केलं. त्या भाषणा��ील महत्वाचे मुद्दे
१) त्या दिवशी मिठाईवाल्याच्या बाबतीत जो प्रसंग घडला तो साधा होता. हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला म्हणून महाराष्ट्र सैनिक आनंद साजरा करत होते, तर एक आगाऊ मिठाईवाला म्हणाला की इथे तर हिंदीच चालणार, हे ऐकल्यावर महाराष्ट्र सैनिकांनी जे करायचं ते केलं. आता कानाला मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच...
त्या अमराठी मिठाईवाल्याने आगाऊपणा क��ला म्हणून त्याच्या कानाखाली बसली. मग त्यावर इथल्या व्यापाऱ्यांनी बंद पुकारला,मोर्चा काढला. मोर्च्या काढणाऱ्या कानाखाली मारली होती का ? अजून नाही मारली आहे.. कुठल्यातरी राजकीय पक्षाच्या दबावाखाली येऊन तुम्ही हे सगळं करणार... तुम्हाला काय वाटलं मराठी व्यापारी नाहीयेत... किती काळ दुकानं बंद करून राहणार आहात ? शेवटी आम्ही काही घेतलं तरच दुकान चालणार ना. महाराष्ट्रात राहताय शांतपणे रहा, मराठ��� शिका, आमचं काही भांडण नाहीये तुमच्याशी. पण मस्ती करणार असाल तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार....
२) राज्यात त्रिभाषा सूत्र लागू करणारच असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका मुलाखतीत म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न करून दाखवावा, मी त्यांना सांगतो की तुम्ही पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न तर करून बघा, राज्यातील दुकानंच नाही तर शाळाही ब���द करू. सर��ारला हिंदी सक्तीची करून आत्महत्याच करायची असेल तर त्यांनी करावी. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीची सक्ती सोडून हिंदीच्या सक्तीसाठी प्रयत्न करतोय ? कोण दबाव आणत आहे तुमच्यावर?
३) संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा प्रचंड लढा लढला गेला, मुंबईला वेगळे करण्याचा डाव होता तो कोणाचा होता? तर तो काही गुजराती नेते, गुजराती व्यापाऱ्यांचा होता. आचार्य अत्रे यांनी एका पुस्तकात म्हटले आहे की वल्लभभाई ��टेल ह्यांनी महाराष्ट्राला मुंबई देण्यास प्रथम विरोध केला. आम्ही देशाचे लोहपुरुष म्हणून तुमच्याकडे आदराने पाहत होतो. तुम्ही महाराष्ट्राला विरोध केलात ? पुढे मोरारजी देसाईंनी गोळीबार करून मराठी माणसांना ठार मारलं होतं. गेली अनेक वर्ष यांचा मुंबईवर डोळा आहे. हे चाचपडून बघत आहेत तुम्हाला... हिंदी भाषा आणून बघायची, मराठी माणूस पेटतोय का बघायचं आणि तो शांत बसला तरी हिंदीची सक्ती करायची. हिं��ी भाषा सक्ती ही पहिली पायरी आहे, त्यावर मराठी माणूस शांत बसला तर मुंबई ताब्यात घेऊन गुजरातला जोडायची हा खरा डाव आहे. त्यामुळे राज्यातील मराठी माणसांनी सावध राहण्याची गरज आहे. हा डाव अगदी आधीपासूनचा आहे, पूर्वी तो उघडउघड होता, आता थोडा लपूनछपून प्रयत्न केला जातो.
४) जगातील एक मोठं सत्य आहे. तुमची भाषा मेली आणि तुमच्या पायाखालची जमीन गेली की तुम्हाला कोणीही विचारणार नाही... तुमची भाषा टिकवणं महत्वाचं आहे, तुमची जमीन टिकव��ं महत्वाचं आहे.
५) फक्त मुंबईत काही झालं तर हिंदी चॅनल्स अजेंडा चालवतात. ही कसली हिंदी चॅनेल्स. ही तर सत्ताधाऱ्यांच्या चपलेखालची ढेकणं आहेत. थोड्या वेळाने सुरु करतील, 'राज ठाकरेने उगला जहर'... फक्त मुंबईत आणि महाराष्ट्रात काही झालं की कोणाच्यातरी सांगण्यावरून किंवा स्वतःच्या मनातील रागातून ही लोकं पेटून उठतात. २०१८ साली २० हजार बिहारी लोकांना गुजरात मधून हाकलून लावले, तेव्हा बातम्या ना���ी झाल्या. ज्याने हाकलले तो आज भाजप मध्ये आमदार आहे. गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वीसुद्धा बिहारी लोकांना हाकलले, एकही बातमी झाली नाही. इथे महाराष्ट्रात एका मिठाईवाल्याच्या कानाखाली बसली तर देशभर बातम्या?
६) मराठी भाषेला अडीच तीन हजार वर्षांचा इतिहास आहे. हिंदीला २०० वर्षांचाच. अभिजात भाषेचा दर्जा मिळायला साधारण १४०० वर्षे लागतात. म्हणजे हिंदीला हा दर्जा मिळायला अजून १२०० वर्षे आहेत, ती भाषा आ��च्या मुलांनी सक्तीने का शिकायची?
७) हिंदी ही कुणाचीही मातृभाषा नाही. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानमधील अनेक मातृभाषांसह २५० भाषा हिंदीने मारल्या. अगदी हनुमान चालिसासुद्धा अवधी भाषेत आहे, हिंदी नव्हे. तिथल्या लोकांना उलट ही गोष्ट सगळ्यात आधी समजायला हवी.
८) भाषा कोणतीही वाईट नसते, पण ती भाषा सक्तीने लादणे खपवून घेणार नाही. आमच्यावर लादणार असाल तर आम्ही नाही बोलणार. लहान मुलांवर तर नाहीच लादू देणार.
काल विधानभवन परिसरात सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षातील आमदार यांच्या कार्यकर्त्यांच्यात तुफान हाणामारी झाल्याची चित्रफीत पाहिली. ही चित्रफीत पाहून मला खर���च प्रश्न पडला, ' काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची ?'
सत्ता हे साधन असावं साध्य नाही याचा विसर पडल्यामुळे वाट्टेल त्या लोकांना पक्षात घ्यायचं, त्या लोकांचा वापर इतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर गलिच्छ शेरेबाजी करण्यासाठी करायचा आणि पुन्हा राजकीय साधनशुचितेच्या गोष्टी बोलायच्या हा भंपकपणा आता तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आला असेल असं मी मानतो. मी तर मराठी जनतेलाच विचारेन, 'कोणाच्या हातात दिला आहेत महाराष्ट्र?'
मराठी भाषेसाठी, मराठी माणसाच्या अपमानासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हात उचलला तर त्याच्यावर, आमच्या पक्षावर तुटून पडणारे आता कुठे लपून बसलेत? जेंव्हा मराठी भाषेला किंवा मराठी माणसाच्या गळ्याला कोणी नख लावायचा प्रयत्न केला तर माझा महाराष्ट्र सैनिक त्या व्यक्तीला दणका देतो याचा मला अभिमान आहे कारण ते कृत्य हे व्यक्तिगत हेव्यादाव्यातून येत नाही तर ते माझ्या भाषेसाठी आणि माझ्या मराठी माणसासाठी असतं. माझ्या दिवंगत आमदाराने पण विधानभवनात एका मुजोर आमदाराला दणका दिला होता, तो व्यक्तिगत द्वेषातून नव्हता तर मराठीला कमी लेखायचा प्रयत्न केला होता म्हणून. पण यांचं काय?
अचूक आकडेवारी जरी माझ्याकडे नसली तरी, एका जुन्या अंदाजानुसार अधिवेशनाच्या एका दिवसाचा खर्च हा किमान दीड ते दोन कोटी रुपये असतो. हे पैसे तुमच्या व्यक्तिगत शेरेबाजीसाठी वाया घालवायचे? महाराष्ट्रात इतके प्रश्न प्रलंबीत आहेत, राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे, ���ंत्राटदारांची देणी रखडली आहेत, जिल्ह्यांना विकास निधी मिळत नाहीये... सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि मंत्रीच प्रश्न विचारत आहेत की अधिवेशन ही औपचारिकता उरली आहे का? या सगळ्याकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून माध्यमांना खाद्य पुरवण्यासाठी या उथळ गोष्टी घडू दिल्या जात आहेत? आज अशा लोकांना जर माफ केलं गेलं तर यापुढे हे प्रमाण मानून भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही !
माध्यमांमध्ये जे काही ��ोडे सूज्ञ आवाज उरलेत त्यांना विनंती आहे की या भंपक प्रकारणांच्यात तुम्हाला कितीही गुंतवायचा प्रयत्न झाला तरी त्यात अडकू नका आणि सरकारला पण माझं आव्हान आहे की जर थोडी जरी साधनशुचिता शिल्लक असेल तर तुमच्या स्वतःच्या लोकांवर पण कारवाई करून दाखवा. जर ती तुम्हाला करायची नसेल तर हरकत नाही, मग मात्र मुजोर मराठी द्वेष्ट्याना माझे महाराष्ट्र सैनिक हात सोडून सरळ करतील तेंव्हा आम्हाला अक्कल श��कवू नका.
। राज ठाकरे
UNESCO has given the status of World Heritage Sites to 12 forts built by Maharashtra's beloved deity Chhatrapati Shivaji Maharaj. This is a matter of great joy. Out of these 12 forts, 11 are in Maharashtra and one fort, the fort of Jinji, is in Tamil Nadu. On this occasion, those who talk about Maharashtra's achievements will know how far the idea of Swarajya instilled by Maharaj had reached and will also know how old and strong the bridge between two languages and cultures is.
Now one can hope that these 11 forts in Maharashtra will get preserved properly. Once UNESCO gives the status of World Heritage Site, there are very strict criteria for the conservation and renovation of those structures, which will have to be followed, and the forts of our Maharaj will get the attention they deserve. Now the state government will receive funds for the conservation of these forts and the state should also allocate some more themselves. Every single government in the past had left these forts in a state of disrepair, making it impossible to invite the world to visit them and show them the glory of our Maharaj and Maharashtra. I hope that this will change now. I have been saying this for many years that if we preserve the forts built by Maharaj and preserve the coastline Maharashtra has been blessed with, and if we make the necessary infrastructure available for tourism, the state’s economy will truly soar.
Anyway.
I just want to remind the government that just because UNESCO has given it World Heritage status, it cannot be taken for granted. If the criteria are not followed properly, the status gets withdrawn. So far there have been two such examples in the world. One example is the Arabian Oryx Sanctuary in Oman and the other one is the Dresden Valley in Germany. The Dresden Valley got the World Heritage status, but it was taken away in 2009 due to non-compliance with the criteria. The government should not just celebrate this but also acknowledge the responsibility. Firstly, the government should demolish all the unauthorized constructions on these forts immediately! Regardless of the religion or cast of the encroachers.
Once again, congratulations to the Marathi people.
Yours,
Raj Thackeray.
एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओज सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही.
आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय, माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाहीये, आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाही.
राज ठाकरे ।
ज्यावेळी
मराठी माणसाला मारहाण होते
मांसाहार करतो म्हणून हिणवलं जातं
मराठी भूमीतच घर नाकारलं जातं
तेव्हा परप्रांतीयांची बाजू घेणारे मराठी कुठे असतात?
परप्रांतीयांना मारहाण झाली म्हणून तुमच्या पोटात जर कळ येतेय, तर आपल्याच मराठी माणसाला घर नाकारलं जातं तेदेखील संविधानात बसत नाही असा ढोल तेव्हा का नाही बडवत?
मारहाण चुकीचीच असते, पण ती करण्याची वेळ आणली जाते मग्रुरी, उन्माद आणि अहंकाराने.
मराठी माणसं हक्काचीच, हिंदुत्वाच्या-विकासाच्या जोरावर मतं देत आहेत म्हणून त्यांना इतकं गृहित धरावं की त्यांच्यावर अन्याय झाल्यानंतर तुमच्या तोंडातून ब्र सुद्धा निघणार नाही?
इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेतला. सरकारने या संबंधातील २ जीआर रद्द केले. याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही, कारण ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली. हिंदी भाषेसाठी सरकार इतका अट्टाहास का करत होतं आणि यासाठी सरकारवर नक्की कुठून दबाव होता, हे मात्र अजून गूढच आहे.
पण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांनी हिंदी शिका��ीच म्हणून तीन भाषा लादण्याचा जो प्रयत्न होता तो एकदाचा हाणून पाडला गेला आणि यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेचं अभिनंदन. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एप्रिल २०२५ पासून या विषयावर आवाज उठवला होता आणि तेंव्हापासून हा मुद्दा तापायला लागला. त्यानंतर एक एक राजकीय पक्ष आवाज उठवायला लागले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षविरहित मोर्चा काढायच्या ठरवल्यावर अनेक राजकीय पक्षांनी, संघटनांनी त���यात सहभागी होण्याची तयारी दाखवली. हा मोर्चा जर झाला असता तर इतका विशाल झाला असता की संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळाची आठवण व्हावी. कदाचित या एकजुटीचा धसका सरकारने घेतला असेल, पण हरकत नाही ही भीती असली पाहिजे.
अजून एक गोष्ट, सरकारने पुन्हा एकदा नवीन समिती नेमली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतोय समितीचा अहवाल येऊ दे किंवा नको येऊ दे परंतू हे असले प्रकार परत खपवून घेतले जाणार नाहीत म्हणजे ��ाहीत ! ही गोष्ट सरकारने कायमची त्यांच्या मनात कोरून ��ेवावी ! ! !
हा निर्णय कायमचा रद्द झाला आहे असं आम्ही गृहीत धरतोय आणि महाराष्ट्रातील जनतेने पण हेच गृहीत धरलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा समितीच्या अहवालाचा घोळ घालू नका, अन्यथा या समितीला महाराष्ट्रात काम करू दिलं जाणार नाही याची नोंद सरकारने घ्यावी.
आता मराठी माणसाने पण यातून बोध घ्यायला हवा. तुमच्या अस्तित्वाला, तुमच्या भाषेला नख लावायला आपलेच लोकं बसलेत आणि त्यांच्यासाठी ते ज्या भाषेत शिकले, वाढले, जी भाषा त्यांची ओळख आहे त्याच्याशी काही देणंघेणं नाहीये... त्यांना कोणालातरी खुश करायचं आहे बहुदा. यावेळेस मराठी मनांचा एकत्रित राग दिसला तो पुन्हा पुन्हा दिसला पाहिजे.
असो, पण भाषेसाठी मराठी माणसं एकवटताना दिसली हा आनंद आहे. हा कडवटपणा अधिक वृद्धिंगत होऊ दे, आणि मराठी भाषा ज्ञानाची आणि जागतिक व्यवहाराची भाषा होऊ दे हीच इच्छा.
मराठी जनांचं पुन्हा एकदा अभिनंदन.
राज ठाकर��� ।
सस्नेह जय महाराष्ट्र,
आज सकाळी आपल्या मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी येत्या ६ जुलैला मोर्च्याची घोषणा केली होती. त्यात थोडा बदल आहे, ह�� मोर्चा रविवार ६ जुलैच्या ऐवजी, ५ जुलै शनिवारी सकाळी १० वाजता असणार आहे. बाकी ठिकाण आणि इतर सर्व तपशील तसेच असणार आहेत. त्यामुळे माध्यमांनी आणि महाराष्ट्रातील जनतेनी या बदलाची नोंद घ्यावी.
आपला नम्र,
राज ठाकरे ।
Jai Maharashtra to all the principals of schools in Maharashtra,
Since April, the education department has been in a state of chaos in Maharashtra. First, it was decided that three languages should be taught from class one in schools following the Maharashtra State Board of Education curriculum, and Marathi, English and Hindi should be made compulsory. This decision was strongly opposed by the Maharashtra Navnirman Sena, which formed a public opinion. Realising that, the government swiftly found a loophole and said that Hindi would not be compulsory, but if anyone wanted to learn Hindi, that curriculum would be made available.
There is no question of making Hindi compulsory. Because Hindi is not the national language. It is a language spoken in some northern provinces, so in a sense it is a state language. In the states where it is spoken, there are many local languages, which are starting to come under the sway of Hindi and there is a fear that the local dialects there will disappear over time. Anyway, it is their decision whether they wish to let their local dialects die or not. It is of no concern to us.
But when such a compulsion was forced upon Maharashtra, we raised our voice and will continue to raise it. The government further said that only two languages will be taught from class one. But where is the written order? If one has been published, we haven’t seen it yet. A government good at playing around with documents, will play with this one as well. Then our question is, if the children do not want to learn a third language, then why are textbooks getting printed, as noticed by my Maharashtra Sainiks. This means that the government is planning to impose the language discreetly. Your schools should not cooperate with this.
The government’s effort to impose the language on children must be thwarted. This is not only damaging to the children but damaging to the Marathi language as well.
The government just blindly follows orders from above, but you need not fall prey to it. And if you are forced by the government, we are here to support. To become well educated, model citizens who can make the nation and Maharashtra proud, you need to know one state language and one world language. Why learn more of them? But we must understand the political motive behind this! The people of the north want to capture a civilized Maharashtra and the easy way to do that is to impose their language directly or indirectly. Do not fall prey to their politics.
When the children grow up tomorrow, they can learn any language they want according to their needs, but why burden them from now on? If you stay firm and thwart the government's plans, we will stand behind you like a rock. But if you willingly support the government's hidden agenda by imposing the burden of a language, that is immaterial if they learn it or not, my Maharashtra Sainiks will surely visit you (for discussion).
While we are raising this issue with you, we have also sent a similar letter to the government. We have firmly told the government that we need a written letter stating that Hindi language or any third language in general will not be taught. They may or may not issue such a letter, but if your actions support the government's hidden agenda, we will surely consider it as a betrayal of Maharashtra...
Do keep in mind that there is growing discontent in Maharashtra regarding this imposition of languages!
Word to the wise! What more can I say?
Yours,
Raj Thackeray.