६ आणि ७ ऑगस्ट २०२६ रोजी नाशिकच्या दौऱ्यात पदाधिकारी आणि नाशिकमधील माझ्या सहकाऱ्यांच्या सोबत बैठका घेतल्या. आणि आज ७ ऑगस्ट २०२६ रोजी नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधला.
१) राष्ट्रकुल स्पर्धेतील विजेते खेळाडू काल मला नाशिकमध्ये भेटायला आले, माझी आणि त्यांची भेट झाली नाही अशा बातम्या मी पाहिल्या. मुळात श्री. गावित हे मला भेटायला आलेत हेच मला माहित नव्हतं, मला कोणी सांगितलं नाही. त्यामुळे भेट झाली नाही. बाकी ते जर भेटायला आलेत असं कळलं असतं तर भेट नक्की झाली असती. मी का भेटणार नाही ? पण त्यांचा काहीतरी गैरसमज झाला. पण या सगळ्या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. सध्या ते दिल��लीला गेलेत असं कळलं, ते तिकडून आले की मी निश्चितपणे त्यांची भेट घेईन.
२) मी २००३ आणि २०१५ असे दोन कुंभमेळे पाहिले. २०१५ च्या कुंभमेळ्याबद्दल बोलूया. २०१५ च्या कुंभमेळ्याची तयारी म्हणून जी कामं झाली, त्याचं जे नियोजन झालं ते इतकं सहज आणि सोप्या पद्धतीने झालं, उत्तम कामं झाली, उत्तम रस्ते झाले, सगळं नियोजन झालं. हे का झालं ? तर यातून काही अर्थकारण व्हावं असला उद्देश नव्हता. उत्तम काम व्हावं ही इच्छा होती म्हणून ते शक्य झालं. पण आत्ता जे दिसतंय, जे ऐकायला येतंय त्यातून सध्याच्या या सत्ताधाऱ्यांना यातून फक्त कमिशन कमवायचं आहे. यातले बरेचसे काँट्रॅक्टर्स गुजरातमधले आहेत. थोडक्यात वरून जसे आदेश येईल तसं वागायचं इतकंच ठरलं आहे. बाकी रस्त्यांची चाळण झाली आहे, खड्ड्यात पडून अपघात होत आहेत, माणसं मरत आह���त याचं या सरकारला काही घेणंदेणं नाही.
३) मला वाईट वाटतंय की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्ताकाळात आम्ही नाशिक शहर इतकं सुंदर केलं, इतके चांगले रस्ते बांधले, त्या सगळ्याची पार वाट लागली आहे. बोटॅनिकल गार्डन असेल की माननीय बाळासाहेबांच्या नावाने उभारलेलं स्मारक असेल सगळ्याची पार वाट लावून टाकली आहे. दुसऱ्यांनी केलं मग ते का टिकवायचं, ही कु��ली वृत्ती ? नाशिकमध्ये झाडं तोडली गेली, लोकांनी आंदोलनं केली, प्रशासन ढिम्म राहिलं, तरीही नाशिककर जर त्याच लोकांना निवडून देणार असतील तर काय बोलायचं ?
४) दिल्लीत जंतरमंतरला जे आंदोलन झालं, तिथे विद्यार्थी, तरुण-तरुणी जमले ते काही फक्त NEET परीक्षेतील घोटाळ्यांमुळे त्रस्त झालेले विद्यार्थी नव्हते. ते आसपासच्या एकूणच परिस्थितीने त्रस्त झालेले विद्यार्थी होते. जंतरमंतरवरचं आंदोलन ही सुरु���ात आहे. हे आंदोलन घराघरात शिरलं. जेंव्हा आंदोलकांना मारलं तेंव्हा प्रत्येकाला वाटलं की माझ्या मुलाला मारलं.
५) सध्या एक विचित्र ट्रेंड सुरु आहे. दहावीची परीक्षा झाली की मुलं आधी क्लास लावणार आणि मग क्लास मुलांना सांगणार कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्या ते. ही मुलं ८,८ तास क्लासला जाऊन बसणार असतील, तर मग कॉलेज काय करत आहे ? कोचिंग क्लासेसकडूनच NEET चा पेपर फुटला. आता नंदन निलेकणीना आणलं आहे, त्यांनी क्लासेसवर पहिलं लक्ष आणावं. कॉलेजची फी २० हजार आणि क्लासेसची फी १ लाख ४० हजार रुपये, हे काय आहे ? क्लासला ८ तास बसल्यावर कॉलेजला अटेंडंन्स कशी लागते ? म्हणजे क्लास आणि कॉलेजमध्ये काही अर्थकारण आहे का ? आणि या सगळ्याने त्रस्त झाल्यावर विद्यार्थी चिडले, त्यांनी आंदोलन केलं तर त्यांचं चुकलं काय ?
६) काल नाशिकमध्ये विद्यार्थी भेटले ते म्हणाले, सर परत पेपर नाही ना फुटणार ? मला ऐकूनच वाईट वाटलं. काल नाशिकमध्ये मला NEET परीक्षेतील गोंधळाने नैराश्य येऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे (यश गोसावी ) आई वडील भेटले. ज्या २१ मुलांनी आत्महत्या केली त्यात त्याचं नाव नाहीये. आपल्या जिल्ह्यातील मुलगा व्यथित होऊन आत्महत्या करतो, याबद्दल पालकमंत्र्यांना सहानुभूती नाही वाटत ?
७) सध्या भाजपमध्ये अंतर्गत सत्तासंघर्ष सुरु आहे. तुम्ही जेंव्हा बाहेरचे शत्रू संपवता तेंव्हा तुमच्या आत शत्रू तयार होतात हा इतिहास आहे आणि हेच भाजपमध्ये सुरु आहे.
८) क्लासेसचा जो काही धंदेवाई�� अप्रोच आहे आणि कॉलेजेसची काही भूमिकाच नाहीये या सगळ्यावर सरकारने आता स्पष्ट भूमिका घ्यावी. वर्तमानपत्रांत पानपानभर क्लासेसच्या जाहिराती येतात की हा पहिला आणि तो पहिला आला. कसा आला ? जेंव्हा पहिल्यांदा NEET चा पेपर फुटला तेंव्हा त्याचा रेट २५ लाख होता असं ऐकायला आलं आणि आता तो दीड कोटी होता असं ऐकायला आलं. डॉलरचा रेट का वाढला हे कळलं आता.
९) आज देशातील तरुण-तरुणी त्यांच्या मोबाईलवर बाहेरचे जग बघतात आणि जेंव्हा आसपासची परिस्थिती बघतात तेंव्हा त्यांना नैराश्य नाही का येणार ? त्यांना का रहावसं वाटेल इथे ? या सरकारमधल्या मंत्र्यांची मुलं परदेशात शिकतात, ज्यांचा राजीनामा झाला त्या धर्मेंद्र प्रधानांची मुलगी परदेशात शिकत आहे. जर तिचाच या देशातील शिक्षण व्यवस्थेवर विश्वास नाही तर बाकीच्यांचं काय घेऊन बसलो आहोत आपण ?
Youngsters of Ahilyanagar!
The voice of transformation is rising loud and clear. Meet Sumit Santosh Verma our dynamic MNS leader since college days, full of energy, vision, and fearless spirit! He’s fighting for a better Ahilyanagar, development, jobs for youth, clean governance, and proud Marathi identity.
This election, let’s back the Railway Engine 🚂 of progress!
Support MNS | Support Sumit Santosh Verma
#MNSAhilyanagar #VoteMNS #RajThackeray #Maharashtra
आजच्या निवडणुका आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली ! आणि आता १००% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे.. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे... दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय ? जबाबदारी तर तुम्ही केंव्हाच झटकली आहेत, आत्ता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदांच करायचं काय ?
महाराष्ट्राती��� जनतेने ही क्लिप जरूर पहा... तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल...
बाकी या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं मनापासून अभिनंदन...
📌 राखीवरून वादा���ा नवा धागा?
काही शाळांमध्ये रक्षाबंधन साजरं होण्यास अडथळा येत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचं आक्रमक ��िवेदन.
🔸 “अन्याय सहन करू नका... गाफील राहू नका!”
🔸 पालक व विद्यार्थ्यांना राज्य उपाध्यक्ष सुमित वर्मा यांचे खुले आवाहन
#Rakhi2025 #RakshaBandhan #MNS #विद्यार्थीसेना #MarathiNews
@SumitVarma18
@mnsadhikrut
@RajThackeray @amitrthackeray
मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञा सिंगसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता
भगवा आतंकवाद शब्दाचे जनक कॉंग्रेसी पिलावळांनो समजून घ्या.हा भगवा तिरंग्याच्या शिरावर आहे हा कधीच तिरंग्याला डाग लागू देणार नाही या भगव्याने नेहमी तिरंग्याची सेवाच केली आहे याला बदनाम करण्याची हिंमत करू नका
संपुर्ण पुण्यात फक्त खडसे च्या जावायाकडेच रेव्ह पा���्टी , दारू , वगैरे वगैरे वगैरे चाललं होतं? खरंच ? पुणे विद्येचे माहेरघर आहे पण अमली पदार्थांचा सेवादार झालेला आहे अशी परिस्थिती असताना फक्त खडसे चा जावाईच का उचलला ?ओ पुणे पोलीस सांगा की #punepolice @commissionerpune
@CPPuneCity
काल विधानभवन परिसरात सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षातील आमदार यांच्या कार्यकर्त्यांच्यात तुफान हाणामारी झाल्याची चित्रफीत पाहिली. ही चित्रफीत पाहून मला खरंच प���रश्न पडला, ' काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची ?'
सत्ता हे साधन असावं साध्य नाही याचा विसर पडल्यामुळे वाट्टेल त्या लोकां��ा पक्षात घ्यायचं, त्या लोकांचा वापर इतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर गलिच्छ शेरेबाजी करण्यासाठी करायचा आणि पुन्हा राजकीय साधनशुचितेच्या गोष्टी बोलायच्या हा भंपकपणा आता तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आला असेल असं मी मानतो. मी तर मराठी जनतेलाच विचारेन, 'कोणाच्या हातात दिला आहेत महाराष्ट्र?'
मराठी भाषेसाठी, मराठी माणसाच्या अपमानासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हात उचलला तर त्याच्यावर, आमच्या पक्षावर तुटून पडणारे आता कुठे लपून बसलेत? जेंव्हा मराठी भाषेला किंवा मराठी माणसाच्या गळ्याला कोणी नख लावायचा प्रयत्न केला तर माझा महाराष्ट्र सैनिक त्या व्यक्तीला दणका देतो याचा मला अभिमान आहे कारण ते कृत्य हे व्यक्तिगत हेव्यादाव्यातून येत नाही तर ते माझ्या भाषेसाठी आणि माझ्या मराठी माणसासाठी असतं. माझ्या दिवंगत आमदाराने पण विधानभवनात एका मुजोर आमदाराला दणका दिला हो���ा, तो व्यक्तिगत द्वेषातून नव्हता तर मराठीला कमी ��ेखायचा प्रयत्न केला होता म्हणून. पण यांचं काय?
अचूक आकडेवारी जरी माझ्याकडे नसली तरी, एका जुन्या अंदाजानुसार अधिवेशनाच्या एका दिवसाचा खर्च हा किमान दीड ते दोन कोटी रुपये असतो. हे पैसे तुमच्या व्यक्तिगत शेरेबाजीसाठी वाया घालवायचे? महाराष्ट्रात इतके प्रश्न प्रलंबीत आहेत, राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे, कंत्राटदारांची देणी रखडली आहेत, जिल्ह्यांना विकास निधी मिळत नाहीये... सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि मंत्रीच प्रश्न विचारत आहेत की अधिवेशन ही औपचारिकता उरली आहे का? या सगळ्याकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून माध्यमांना खाद्य पुरवण्यासाठी या उथळ गोष्टी घडू दिल्या जात आहेत? आज अशा लोकांना जर माफ केलं गेलं तर यापुढे हे प्रमाण मानून भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही !
माध्यमांमध्ये जे काही थोडे सूज्ञ आवाज उरलेत त्यांना विनंती आहे की या भंपक प्रकारण���ंच्यात तुम्हाला कितीही ��ुंतवायचा प्रयत्न झाला तरी त्यात अडकू नका आणि सरकारला पण माझं आव्हान आहे की जर थोडी जरी साधनशुचिता शिल्लक असेल तर तुमच्या स्वतःच्या लोकांवर पण कारवाई करून दाखवा. जर ती तुम्हाला करायची नसेल तर हरकत नाही, मग मात्र मुजोर मराठी द्वेष्ट्याना माझे महाराष्ट्र सैनिक हात सोडून सरळ करतील तेंव्हा आम्हाला अक्कल शिकवू नका.
। राज ठाकरे
सन्मा राज ठाकरे साहेबांनी भाषणात उल्लेख केलेले, गुजराती श्री नयन शाह यांनी कबूल केले आणि मांडलेले मुद्दे;
#आमच्या ३ पिढ्या महाराष्ट्रात गेल्या, माझा गुजरात शी काही संबंध नाही,मी महाराष्ट्रीयन आहे
#१ वर्ष जरी इथे राहिलात तरी तुम्हाला मराठ��� यायलाच पाहिजे
#अहमदाबाद मध्ये सगळे गुजराती बोलतात मग महाराष्ट्रात मराठी का नको?
भाजप च्या IT सेल ने कितीही द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी जनतेला आता त्यांचा खरा चेहरा कळला आहे
सस्नेह जय महाराष्ट्र,
आज सकाळी आपल्या मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी येत्या ६ जुलैला मोर्च्याची घोषणा केली होती. त्यात थोडा बदल आहे, हा मोर्चा रविवार ६ जुलैच्या ऐवजी, ५ जुलै शनिवारी सकाळी १० वाजता असणार आहे. बाकी ठिकाण आणि इतर सर्व तपशील तसेच असणार आहेत. त्यामुळे माध्यमांनी आणि महाराष्ट्रातील जनतेनी या बदलाची नोंद घ्यावी.
आपला नम्र,
राज ठाकरे ।
महाराज मुजरा 🚩 🙏
सध्या परिस्थिती मराठी भाषेच्या विरोधात आहे आज मी तुम्हाला काही सांगावं एवढी माझी पत नाही पण आपण या बाबत बोललं पाहिजे ही माफक अपेक्षा. हिंदी सक्ती परतवून लावली पाहिजे यासाठी आपल्या भुमिकेची मावळे वाट पाहून आहेत.
जय महाराष्ट्र जय शिवराय
@YuvrajSambhaji
विठ्ठल माझा... 🚩
राजकारणात येण्याचं एकमेव कारण म्हणजे राजसाहेब ठाकरे , राजकारण असो वा समाजकारण असो राजसाहेब हे सर्वसमावेशक असं व्यक्तिमत्त्व आम्हाला लाभलं ही गोष्ट खरंच ��शिबी आलेली पुण्याईच.. भगवंत माझ्या राजसाहेबांना निरोगी आणि उदंड आयुष्य देवो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना
आज शिवराज्याभिषेक सोहळा... छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य म्हणजे, एक युगपरिवर्तन आणि युगपरिवर्तनातील अतिशय महत्वाचा टप्पा म्हणजे, शिवराज्याभिषेक सोहळा. या सोहळ्याने या हिंद��ूमीला तर प्रेरणा मिळालीच पण मरहट्ट्यांनी पुढे शासक म्हणून या भूमीवर राज्य केले त्याचा पाया पण याच दिवशी घातला गेला. हा दिवस मराठी माणसाला प्रेरणा देत राहू दे हीच इच्छा.
छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्र नवनिर्माण सेन���चा मानाचा मुजरा !
राज ठाकरे ।
#शिवराज्याभिषेक_सोहळा२०२५