धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला देणे ही संपूर्ण बेकायदेशीरता निवडणूक आयोगाने मोदी-शाह यांच्या दबावाखाली केली.
संविधानिक दृष्टीकोनातून विचार केल्यास एकनाथ शिंदे गटाला शिवसेना पक्ष व निवडणूक चिन्ह धनुष्यबाण देणे ही निवडणूक आयोगाची बदमाशी आज सर्वोच्च न्यायालयात न्या. जॉयमला बागची यांनी ओळखली इतकेच नाही तर थेट त्यावर वक्तव्य केले. निर्णय शिंदेंच्या विरोधात जाणार असा रागरंग आहे.
'शिवसेना' हे पक्षाचे नाव आणि पक्षचिन्ह 'धनुष्यबाण' यांचा वापर करून मोठा राजकीय फायदा शिंदेंनी घेतला. आता त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोग, अमित शाह यांचे आभार मानावे आणि भाजप मध्ये प्रवेशाची तयारी सुरु करावी.